विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलमगीर डोंगर - ( बंगाल इलाखा ) कटक जिल्ह्याच्या जयपूर विभागांतील एका डोंगराचें शिखर. उत्तर अक्षांश २०० ३९’ व पू. रेखांश ८६० १४.’ या डोंगरावर सन १७१९ सालीं बांधलेली तख्त-इ-सुलेमानची मशीद प्रसिध्द आहे (इं. गॅ. ५-१९०८).