प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

अलमोरा, जि ल्हा.- ( संयुक्त प्रांत ) कुमाउन भागाचा ईशान्येकडील जिल्हा. २८० ५९’ ते ३०० ४९’ उ. अ. व ७९० २’ ते ८१०  ३१’ पू. रे. क्षेत्रफळ ५४१९ चौरस मैल. उत्तरेस तिबेट; पूर्वेस काळी नदी व पलीकडे नेपाळ; दक्षिणेस नैनिताल जिल्हा; वायव्येस गढवाल जिल्हा. या जिल्ह्यांतील काहीं थोडा भाग खेरीज करून बाकी बहुतेक सर्व प्रदेश हिमालय पर्वतांत आहे. या पर्वताच्या ओळी अगदीं निरनिराळ्या व स्पष्ट दिसतात; व त्या आग्नेयीकडून वायव्येकडे पसरल्या आहेत व मध्यभागीं नेहमीं हिमानें आच्छादणारीं शिखरे आहेत. पश्चिमेकडे त्रिशूळ पर्वत असून त्याची सरासरी उंची २२३०० ते २३४०० फूट आहे. या पर्वताचा काही भाग गढवाल जिल्हयांत आहे. त्रिशूळ पर्वताच्या आग्नेयीस नंदादेवी शिखर २५६६१ फूट उंच आहे; व ‘नंदाकोट’ २२५३८ फूट आहे. यांच्या पूर्वेस नेहेमी हिमाच्छादित असणारे पांच चौली डोंगर आहेत. त्यांत दोन शिखरें, आहेत. त्यांची उंची अनुक्रमें २२६७३ आणि २१११४ फूट आहे. सरासरी १८००० फूट उंचीची एक पर्वताची ओळ तिबेट व हिंदुस्थान यांच्यामध्यें असून तेथून उत्तरेकडे सिंधु व सतलज, व दक्षिणेकडे काली नदी या उगम पावल्या आहेत. या जिल्ह्यांतील मुख्य नदी काली ही असून तिला येऊन मिळणार्‍या नद्यात गौरीगंगा, धवलगंगा या हिमप्रवाहापासून निघतात, सरयू आणि रामगंगा यांचा उगभ हिमरेषेखालीं आहे व गोमती, लहुवती आणि लढिया या हिमालय पर्वताच्या बाहेरील ओळीतून उगम पावतात. या जिल्ह्यांत नदीकाठचा प्रदेश सोडून दिला तर ३००० फूट वर चढून गेल्यावर साधारणपणें सपाट प्रदेश मिळत नाहीं.

भूस्तरशास्त्रदृष्ट्या पाहिल्यास त्यांत पुष्कळ प्रकारचे खडक आहेत. या जिल्ह्यांत पुष्कळ प्रकारच्या वनस्पती सांपडतात. येथें उष्ण, समशीतोष्ण व शीत प्रदेशांतील वनस्पती सांपडतात. येथें उष्ण, समशीतोष्ण व शीत प्रदेशांतील वनस्पती पर्वताच्या निरनिराळ्या उंचीवर दृष्टीस पडतात. उन्हाळ्यांत वनस्पती फुलल्या कीं तेथें अप्रतिम शोभा दिसते.

येथें रानटी जनावरें विपुल व नानाप्रकारचीं आहेत. हत्ती, वाघ, अस्वल, रानडुकरें, रानकुत्रे, हरणें वगैरे.

हिमालय पर्वताच्या बाहेरील ओळीवर पाऊस सुमारें ८० इंचपर्यंत पडतो. पण थोडे उत्तरेकडे गेलें कीं, पावसाचें प्रमाण कमी होतें. हिमरेषेजवळ किती बर्फ व पाऊस पडतो हें मांडून ठेवण्याची व्यवस्था नाहीं, पण जिल्ह्याच्या मध्यभागापेक्षा तेथें पाऊस व बर्फ जास्त पडतो यांत संशय नाहीं.

इतिहास.- महाभारतांत या पर्वतामधील पुष्कळ ठिकाणांचें वर्णन आलें आहे. सातव्या शतकांत आलेल्या चिनी प्रवाशानें येथें ब्रह्मपुर नांवाचें राज्य असून तेथील लोक राकट व अशिक्षित आहेत असें वर्णन करून ठेविलें आहे. या राज्यासभोंवती हिमाच्छादित डोंगर असून त्यावर एका स्त्रीचा अंमल त्यावेळीं होता. पूर्वी येथें कत्यूरी नांवाच्या घराण्यांतील राजे राज्य करीत होते. त्यानंतर चंद राजांनीं येथे राज्य केलें. चंद राजांपैकी पहिला राजा सोमचंद हा दहाव्या शतकात अलाहाबाद जवळील झूसी येथून आला व चंदराजांनीं काली कुमाउन मध्यें चंपावत येथें आपलें राज्य प्रस्थापित केलें होतें. इ. स. १५६३ साली आसपासची सर्व राज्यें या चंद राजाची माडलिक झाल्यावर राजा कल्याण चंद याने आपली राजधानी आलमोरा येथें नेली. याचा मुलगा रूद्रचंद हा अकबराचा रूमकालीन असून तो इ. स. १५८७ साली अकबर बादशहास मुजरा करण्याकरितां लाहोर येथें आला होता. मुसुलमान राजाना डोंगरी राज्याचें स्वामित्व पूर्णपणें कधीच मिळालें नाही. परंतु इ. स. १७४४ साली अली अहमदखान रोहिला याने कुमाउनवर स्वारी करून अलमोरा देखील काबीज केले होते, ते तेथें जरी फार थोडा वेळ राहिले तरी त्यानी तेवढ्यांत तेथील देवळांची फार नासाडी केली. लवकरच त्या रोहिल्यानें पाठविलेले सरदार तेथील हवेला कंटाळले व तीन लाख रूपयाची लाच घेऊन त्यानीं आपला पाय तेथून मागे घेतला. परंतु अली महमदखानास ही गोष्ट न आवडून त्यानें इ.स. १७४५ च्या आरंभी पुन्हां कुमाउनवर स्वारी केली. परंतु बारखेडी जवळील पर्वताच्या खिंडींत त्याचा पराभव झाला. नंतर मुसुलमानांनीं पुन्हां त्या प्रातावर कधी स्वारी केली नाही. दिल्ली येथील पातशहांनीं कुमाउनवर प्रत्यक्ष अशी सत्ता कधीं सांगितली नाहीं. तथापि या भागातील राजास पर्वताच्या पायथ्यावरील राज्य कायम राखण्याकरितां बादशहाचें नामधारी माडलिकत्व कबूल करावें लागत असे. पुढें कुमाउनमध्यें आपसांतच तंटे झाले व लवकरच त्या राजांनीं आपला पर्वताच्या पायथ्याखालील प्रदेश गमावला व भाबर नांवाचा प्रदेश फक्त त्याच्या ताब्यांत राहिला.

अठराव्या शतकांत हल्ली जेथें नेपाळचें राज्य आहे त्या भागावर पृथ्वीनारायण हा गुरखा जातीचा राजा राज्य करीत होता. त्याच्या वंशजांनीं इ. स. १७९० मध्यें कुमाउनवर स्वारी केली. तेव्हां चंद राजा पळून गेला व गुरख्यांनीं त्या भागावर चोवीस वर्षें राज्य केलें. त्या अवधींत त्यांनीं फार जुलूम केला. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीं गुरखे सपाट प्रदेशावरील ब्रिटिश मुलखांत फार त्रास देऊं लागले. चंद राजांचा कायदेशीर वारस कोणी शिल्लक नसल्यामुळें ब्रिटिशांनीं हा भाग गुरख्यांपासून जिंकून घेण्याचें ठरविलें. या बेतास पूर्वींच्या चंद राजाचा प्रधान हरकदेव याची पूर्ण संमति होती. इ. स. १८१५ सालीं अलमोरा ब्रिटिशांनीं काबीज केलें. व त्यानंतर झालेल्या तहांत कुमाउन आणि गढवाल ब्रिटिशांकडे आले.

वागेश्वर येथें कत्यूरी राजांच्या वेळचा एक शिलालेख आहे. पण त्यावर तारीख नाहीं. चंपावत येथें चंद राजांच्या वेळच्या पुष्कळ वस्तु आहेत. येथें निरनिराळ्या देवळांत पुष्कळ ताम्रपट अद्याप जतन करून ठेविले आहेत. या जिल्ह्यांत २ गांवें व ४९२८ खेडी आहेत. लोकसंख्या दिवंसें दिवस वाढत आहे. १९२१ सालीं लोकसंख्या ५३०३३८ होती. हिवाळ्यात लोक खाली उतरतात परंतु उन्हाळ्यांत ते पुन्हां वर राहण्यास जातात. या जिल्ह्यांत चंपावत व अलमोरा अशा दोन तहशिली आहेत. येथें हिंदू जवळ जवळ शेंकडा ९९ आहेत. कुमाउनी पहाडी भाषा येथें बोलतात.

जमीनलागवड उंचीवर व जागेच्या स्थितीवर अवलंबून आहे. सुमारें ३००० ते ५००० फूट उंचीपर्येतच्या प्रदेशावर कांहीं म्हणण्यासारखी लागवड होते. इ. स. १९०३-४ साली एकंदर ४६३ चौरस मैलांत लागवड झाली होती. मुख्य पिकें भात, गहू, मका वगैरे. चहाची लागवड सुमारें २१०० एकर जमिनीत होते. गुरांची अवलाद लहानच आहे. घोडे चांगल्या जातीचे नसतात मेंढरें, बकरी सर्व भागांत पाळतात व त्यांच्यापासून खत व लोंकर मिळते. येथील गुरांची अवलाद सुधारण्याचे प्रयत्‍न केले, परंतु त्यांत विशेषसें यश आले नाहीं.

येथें तांब्याच्या खाणी आहेत. त्या खाणींचा उपयोग करून घेण्याची परवानगी एका पाश्चात्य कंपनीस देण्यांत आली आहे. ग्रफाइट, लोखंड, शिसें, व गंधक यांच्या खाणी या जिल्ह्यांत आहेत. या जिल्ह्याचा व्यापार एकसारखा वाढत आहे. या जिल्ह्यांत रेल्वे नाही. दुष्काळ येथें फारसा जाणवत नाही. जिल्ह्याचा अधिकारी डेप्युटी कमिशनर असतो व नॉन रेग्युलेशन खाली या जिल्ह्याचा कारभार चालतो. गुरख्यांकडून ज्यावेळी हा जिल्हा ब्रिटिशांकडे आला त्यावेळीं जमीन महसूल ७०,००० रूपये होता. इ. स. १९०३-४ सालीं तोच वसूल २.३ लाख रूपये होता. अलमोरा येथेंच फक्त म्युनसिपालिटी आहे.

तहशील - संयुक्त प्रांत, अलमोरा जिल्हा. हींत परगणे जोहार, दानपुर, चौगरखा, गंगोली, बारामंडल, फलदाकोट आणि पाली पच्चौन हे आहेत.

ही  २९० २६’ ते ३८० ४९’ उत्तर अक्षांश व ७९० २ ते ८० ३०’ पूर्व रेखांश यांमध्यें आहे. क्षेत्रफळ ३१६४ चौरस मैल. लोकसंख्या : (सन १९०१ ) ३४३८७०. या तहशिलींत दोन गांवें व ३४६६ खेडी आहेत. सन १९०३-४ सालीं जमीनमहसूल रूपये १६५००० व इतर कर १२००० रूपये होता.

ही तहशील हिमालय पर्वतांत वसलेली असून हिमाच्छादित शिखरांपलीकडे तिबेटच्या सरहद्दीपर्यंत जाऊन भिडली आहे. अन १९०३-४ सालीं लागवडीखालील क्षेत्र २९४ चौ. मैल होतें (इं गॅ. ५).

गांव - संयुक्त प्रांत. हें अलमोरा जिल्ह्याचें व तहशिलीचें मुख्य ठिकांण. उ. अ. २९० ३६’ व पू. रे ७९० ४०’. लोकसंख्या सन १९०१ सालीं ८५९६ होती. रोहिलखंड-कुमाउन या रेल्वेच्या काथगोदम स्टेशनापासून अलमोरा गांव ३७ मैलांवर आहे. पाऊस सरासरी ४२ इंच पडतो.

सोळाव्या शतकापासून अलमोरा ही चंद राजांची राजधानी होती. इ. स. १७४४ सालीं रोहिले लोकांनी या प्रांतावर स्वारी करून अलमोरा सर केलें होतें; परंतु ते लवकरच परत गेले. अलमोराजवळच सितोळी येथें ब्रिटिशांची व गुरख्यांची लढाई झाली व इ. स. १८१५ मध्यें हा जिल्हा इंग्लिशांकडे आला येथें म्युनिसिपालिटि इ.स. १८६४ पासून आहे. येथें गुरखा फौज असते. येथें व्यापार बराच चालतो. येथून बाहेर जाणारा माल आणि आयात माल धान्य, कापड, साखर आणि मीठ हा होय. येथें बागाहि पुष्कळ आहेत. जिल्ह्याचे अधिकारी येथें राहतात. गांवांत निरनिराळ्या शिक्षणसंस्था व ५-६ इस्पितळें आहेत. ( इं. गॅ. ५-१९०८ अर्नोल्डचें इंडियन गाईड १९२० ).

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .