प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

अलाउद्दीन खिलजी ( १२९६-१३१६ )-दिल्लीच्या खिलजी घराण्याचा संस्थापक जलालुद्दीन याचा हा पुतण्या. याच्या बापाचें नांव शहाबुद्दीन मसा-उद जलालुद्दीन गादीवर आल्यापासून त्यानें यास व याच्या भावास आपल्याजवळ बाळगिलें होतें. अलाउद्दिनानें मोंगलांस हटविलें म्हणून त्यास त्याच्या चुलत्यानें गंगा व यमुना या नद्यांमधील अंतर्वेदीतील कोरा प्रांताचा सुभेदार नेमिलें. इ. स. १२९३ त अलाउद्दिनानें माळव्याच्या स्वारींत भिलसा वगैरे कित्येक ठिकाणच्या हिंदूलोकांस जिंकिलें म्हणून जलालुद्दिनानें त्यास आणखी अयोध्येचा सुभा सांगितला. माळव्यांत अलाउद्दिनानें पुष्कळ किल्ले व लूट मिळविल्यामुळें त्यास मोठी फौज बाळगितां आली.

देवगिरीची मोहीम.-भिलसा येथें असतांना अलाउद्दिनास दक्षिणेंतील देवगिरी नामक धनाढ्य शहराची खबर कळून त्याच्या तोंडास पाणी सुटलें. आपला खरा बेत चुलत्यास किंवा दुसर्‍या कोणासहि न कळवितां तो आठहजार स्वार घेऊन ११९३ त कोराहून निघाला, आणि बुंदेलखंडाच्या जंगलांतून दक्षिणेकडे गेला. सहा महिनेपर्येत त्याचा मागमूस पाठीमागें कोणासहि कळला नाहीं. दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन याचा मी पुतण्या असून चुलत्याबरोबर भांडून नोकरी पतकण्याकरितां मी तेलंगणाच्या राजाकडे राजमहेंद्रीस चाललों आहे असें तो रस्त्यानें सांगत असे.

अलाउद्दीन नर्मदापार होऊन एकाएकीं देवगडच्या तटाखालीं उतरला. त्या वेळीं तेथील राजा रामदेवराव याची फौज दुसरीकडे गेली होती. शिवाय आयत्या वेळीं किल्ल्यांत धान्याच्या ऐवजीं मिठाची पोतीं भरलीं गेलीं असल्याचें रामदेवरावास आढळून आलें. तेव्हां त्यानें घाबरून जाऊन एकदम पुष्कळ द्रव्य देऊन अलाउद्दिनाशीं तह केला. अलाउद्दिन परत जाणार तोंच रामदेवरावाचा पुत्र शंकरदेव मोठी फौज जमवून बाहेरून आला. व त्यानें वडिलांच्या तहास न जुमानतां अलाउद्दिनाशीं लढाई दिली. या लढाईंत मुसलमानांचा समूळ नाश होण्याची वेळ आली होती. पण इतक्यांत किल्ल्यांच्या रक्षणार्थ ठेवलेला रामदेवरावाचा सरदार शंकरदेवाच्या मदतीस येत असतां, त्याच्या लोकांच्या पायांनीं उडालेली धूळ पाहून, अलाउद्दिनाच्या मदतीस दिल्लीहून लवकरच मागून मोठी फौज येत आहे असें तो म्हणत होता ती हीच अशी समजूत होऊन हिंदु लोक रणांगण सोडून सैरावैरां पळूं लागले व अलाउद्दिनास जय मिळावा. अलाउद्दिन किल्ल्याकडे गेला तेव्हां तेथें त्यास धान्याऐवजीं किल्ल्यांत मिठाचीं पोतीं भरीलं गेलीं असल्याचें कळलें. तेव्हां रामदेवरावास दुसरा कांहीं उपाय न राहून अपरंपार द्रव्याशिवाय आणखी एलिचपूर व आसपासचे प्रांत अलाउद्दिनास देऊन आपला बचाव करून घ्यावा लागला.

चुलत्याचा खून.-अशा प्रकारें विजय मिळवून अलाउद्दीन कोरा येथें परत आला. आपल्या पुतण्यास भेटण्यासाठीं बादशहा थोड्या फौजेनिशीं कुरा येथें गेला. पुढें अलाउद्दिनाची व त्याची भेट झाली, तींत तो प्रेमानें आपल्या पुतण्याच्या गालावरून हात फिरवीत असतां अलाउद्दिनाच्या मारेकर्‍यांनीं त्याचा खून केला १७ रंमजान ( हि. स. ६९५ = जुलै १२९६ )

राज्यारोहण.- जलालुद्दिन मरण पावल्याची बातमी समजतांच त्याच्या राणीनें आपल्या धाकट्या अल्पवयी मुलास तख्तावर बसवून त्याच्या तर्फेनें राज्य चालविलें परंतु अलाउद्दीन कूच करून राजधानीकडे गेला व देवगडच्या लुटींत मिळालेल्या पैशाच्या साहाय्यानें जे सरदार व फौजेतले अंमलदार कांकूं करीत होते त्यांस वश करून त्यानें छपन्नहजार स्वार व साठ हजार पायदळ एवढी फौज जमा केली. अलाउद्दीन येत आहे हें ऐकतांच राणी मुलास घेऊन मुलतानास पळून गेली. यामुळें १२९६ च्या आक्टोबर महिन्यांत ( जिल्हेज ६९५ ). अलाउद्दिनास दिल्लीचे तख्त बिनहरकत प्राप्त झालें. लोकांचीं मनें संतुष्ट करण्याकरितां अलाउद्दिनानें मोठमोठे समारंभ करून लोकांस मेजवान्या दिल्या. लहानथोरास इनामें व बक्षिसें दिलीं व फौजेस सहा महिन्यांचा पगार एकदम अगाऊ दिला. नंतर आलफखान नामक आपल्या एका दूधभावाकडून अलाउद्दिनानें मुलतानहून दोघा राजपुत्रांस धरून आणून त्याचे डोळे काढून त्यांस हंसीच्या किल्ल्यांत बंदींत ठेविलें.

राज्यावर येतांच अलाउद्दिनानें लांचखाऊ अंमलदारांची पुरी खोड मोडली. ज्यांस त्यानें पैसे भरून वश केलें होतें त्यांस त्यांच्या कृतघ्नतेबद्दल चांगलें शासन करून चुलत्याच्या वधाच्या घातकी कृत्यांत ज्यांनीं त्यास स्वत:स साहाय्य केलें होतें त्यांचीं त्यानें अत्यंत दुर्दशा केली. ज्यांनीं अलाउद्दिनाच्या लांचांस न जुमानतां जलालुद्दिनास सोडलें नव्हतें असें तीनच अंमलदार होते त्यांनां अलाउद्दिनानें कांहीं एक त्रास दिला नाहीं.

मोंगलांची पहिली स्वारी.- अलाउद्दिनाच्या कारकीर्दीच्या प्रथमार्धांत मोंगलाच्या टोळधाडी एकसारख्या हिंदुस्थानांत येत होत्या. इ. स. १२९६ मध्यें मध्यतुर्कस्तानचा बादशहा चेंगीझखानाचा वंशज अमीर दाऊद यानें एक लाख लोकांनिशीं सिंध व पंजाब प्रांतावर स्वारी केली. तेव्हां अलाउद्दिनाचा सरदार आलफखान यानें लाहोरनजीक त्यांचा मोड करून ज्यांचीं बायकामुलें हातीं सांपडलीं त्यांचा शिरच्छेद केला.

गुजराथचा पाडाव  :-( इ. स. १२९७ ) अलाउद्दिनानें गादीवर बसल्यानंतर आलफखान व वजीर नुस्त्रतखान यांस गुजराथ प्रांत जिंकण्यास पाठविलें. गुजराथेंत अन्हिलवाडा येथें राजा कर्णराय राज्य करीत होता. मुसलमान फौज आल्याबरोबर तो पळून देवगडास राजा रामदेव याजकडे आश्रय मागण्यासाठीं गेला. मागें त्याचें राज्य व बायकामुलें मुसुलमानांनीं काबीज केलीं. खंबायत प्रांत त्यावेळीं व्यापारामुळें सधना होता तो नुस्त्रतखानानें येऊन लुटला. शिवाय या स्वारींत मुसलमानांनीं सोमनाथाचें देवालय पुनरपि लुटलें व तेथील मूर्ति फोडून तिचे तुकडे दिल्लीस नेऊन मशिदीच्या पायास लाविले. आलफखान व नुस्त्रतखान परत जात असतां त्यांचें लष्करांत नोकर असलेल्या मोंगल लोकांशीं कडाक्याचें भांडण होऊन मोंगलांनीं आलफखानाच्या पुतण्यास आलफखान म्हणून ठार मारलें. दिल्लीस पोचल्यावर बादशहानें बंडखोर मोंगल लोकांची एकजात कत्तल केली. कर्णरायाची लावण्यवती स्त्री कमलादेवी मुसलमानांनीं पकडून दिल्लीस नेली होती तिला बादशहानें आपली पट्टराणी केली आणि तिजवर त्याची फार मर्जी बसली.

मोंगलाची दुसरी स्वारी - दाऊदची स्वारी होऊन दोन वर्षें होतात न होतात तोंच इ. स. १२९८ च्या सुमारास दाऊदचा मुलगा कुतलघखान यानें दोन लक्ष मोंगल स्वार घेऊन हिंदुस्थानांत प्रवेश केला व दिल्लीनजीक येऊन यमुनेच्या काठीं तळ देऊन राहिला. मोगलांच्या त्रासास भिऊन बाहेरचे सर्व रयतलोक दिल्ली शहरांत घुसले त्यांनीं दिल्लीचे रस्ते गच्च भरून गेले व बाहेरून दाणादुणा येण्याचें बंद झाल्यामुळें धान्याची अत्यंत महर्गता झाली. अशा आणीबाणीच्या प्रसंगी अलाउद्दीन दरबारच्या लोकाची सल्ला नसतां नशीबावर  ला ठेवून आपली तीन लाख फौज घेऊन मोगलावर गेला. जाफरखान व आलफखान या आपल्या दोघांसरदारांस दोन बाजूंस ठेवून अलाउद्दीन हा आपला वजीर नुस्त्रतखान यासह मध्यभागीं लढाईस उभा राहिला. सुरवातीसच जाफरखानानें निकराचा हल्ला करून मोंगलास मागें हटविले व त्यांचा पाठलाग करीत तो एकटाच दूरपर्यंत गेला. हें पाहून सुलतानानें आलफखानास त्याच्या मदतीस जाण्याचा हुकूम केला. या दोघां सरदारांत मत्सरभाव असल्यानें आलफखान जाफरखानाच्या मदतीस गेला नाहीं. त्यामुळें मोंगलांस जाफरखानाच्या लोकांस वेढून त्यांची कत्तल करण्यास चांगलेंच फावलें. तथापि अलाउद्दिनाची बाकीची फौज तयारींत होती. तिजपुढें मोंगलाचें काहीं न चालल्यामुळें ते जीव घेऊन हिंदुस्थान सोडून पळून गेले.

रतनभोरचा पाडाव :- इ. स. १२९८ मध्यें अलाउद्दिनानें जयपूरच्या हद्दींत रतनभोर नांवाचा किल्ला आहे तो घेण्यास आलफखान व नुस्त्रतखान यांस पाठविलें. तेथील राजा हंबीरदेव यानें मुसुलमानांस मागें हटविलें, तेव्हां अलाउद्दिन यानें स्वत:जाऊन किल्ल्यास वेढा घातला. हंबीरदेवाचा प्रधान विश्वासघात करून अलाउद्दिनास मिळाल्यामुळें रजपुतांचा घात होऊन राजासुध्दां सर्व लोक मुसलमानांच्या तरवारीस बळी पडले व अलाउद्दिनास किल्ला मिळावा. विश्वासघातकी प्रधानास अलाउद्दिनानें आपल्या नेहमींच्या वहिवाटीप्रमाणें ठार मारिलें. या स्वारींत अलाउद्दिनाचा पुतण्या रूक्नखान यानें अलाउद्दिनाचा खून करून राज्य बळकविण्याचा प्रयत्‍न केला पण अलाउद्दिनाच्या नशिबानें तो फसून रूक्नखानास देहांत शासन भोगावें लागलें.

चितोडगडची स्वारी.- इ. स. १३०३ मध्यें अलाउद्दिनानें चितोडच्या राण्याच्या पद्मिनी नांवाच्या सुस्वरूप स्त्रीच्या लोभानें चितोडवर स्वारी केली. किल्ल्यास वेढा घालून शहर हस्तगत होईना. तेव्हां अलाउद्दीनानें पद्मिनी कपटानें हस्तगत करून घेण्याचा प्रयत्‍न केला पण तो साध्य झाला नाहीं. पुढें कांहीं दिवस निकराचें युध्द होऊन अलाउद्दीनाचें पुष्कळ नुकसान झालें व शेवटीं दिल्लीवर मोंगलांनीं हल्ला केल्याचें समजल्यामुळें त्यास वेढा उठवून परत जावें लागलें. दुसर्‍या वर्षी अलाउद्दीनानें चितोडवर पुन्हा स्वारी करून तें काबीज केलें ( ३ मोहरम ७०३:= ऑगस्ट १३०३ ) व तेथें मुसुलमानी लष्कर जाबत्यास ठेवून व झालोरच्या घराण्यांतील मालदेव नामक एका राजास चितोरच्या गादीवर स्थापून अलाउद्दीन दिल्लीस परत आला. पण अलाउद्दीन दिल्लीस परत येऊन कांहीं दिवस झाले नाहींत तोंच हंमीर नामक मेवाडच्या एका शूर राजपुत्रानें मालदेवापासून चितोडचें राज्य परत मिळविलें ( इ. स. १३०४ ). लखमसी, पद्मिनी व हंमीर पहा.

मोंगलांची तिसरी व चौथी स्वारी .- १३०३ सालीं अलाउद्दीन चितोड घेण्यांत गुंतला असतां मोंगल सरदार तुर्धायखान यानें पुनरपि हिंदुस्थानावर स्वारी केली. या प्रसंगीं अलाउद्दीनाची फौज जवळ नसल्यानें दिल्ली शहर मोंगलांच्या अगदी ताब्यांत जाण्याचा योग आला होता. पण कांहीं दैवी चमत्कार होऊन मोंगलाची गाळण उडून ते मागच्या स्वारीप्रमाणेंच एकाएकीं हिदुस्थान सोडून निघून गेले असें म्हणतात. मध्यंतरी मध्यआशियांतील मोंगल वगैरे नव्या मुसलमानांनी बसलेल्या मोंगलपुरा नामक दिल्लीच्या भागात अलाउद्दिनास फितवा झाल्याचें उघडकीस येऊन त्यानें एका दिवसात तीस चाळीस हजार लोकांची कत्तल करून त्याच्या बायकापोरांस देशोधडीस लाविलें. पुढें सन १३०५ मध्यें ऐबकखान नामक सरदाराच्या हाताखालीं मोंगली फौज पुनरपि हिंदुस्तानांत उतरली व मुलतान उध्वस्त करून ती शिवालीक पहाडावर आली. पण गाजीबेग तुघलक नामक अलाउद्दिनाच्या दिल्लीच्या पश्चिमेस बंदोस्तास ठेविलेल्या सरदारानें दुसर्‍याच रस्त्यानें त्याच्या पाटीवर एकदम हल्ला करून पुष्कळाची कत्तल केली. जे कोणी वाळवंटाकडे पळून गेले त्याचा उन्हाळ्यामुळें तिकडे संहारच झाला. पुष्कळानां पकडून दिल्लीस नेऊन हत्तीच्या पायाखालीं तुडविलें, व त्यांच्या शिरांचा एक मोठा मनोरा वुदाऊन गेटाबाहेर उभारण्यात आला. पुन्हां एकवार या कारकीर्दीत मोंगलाची अशीच दशा झाल्यामुळें त्याचा धीर इतका खचला कीं, ते पुष्कळ दिवसपर्यंत हिंदुस्तानांत पाय ठेवण्यास धजले नाहींत.

मलीककाफूरच्या दक्षिणेंतील स्वार्‍या.- देवगिरीचा रामदेवराव खंडणी पाटवीनासा झाला म्हणून इ. स. १३०६ मध्यें अलाउद्दिनानें आपला सरदार मलीक काफूरयाच्या हाताखालीं मोठें सैन्य देऊन दक्षिणेंत रवाना केले; व गुजराथेंतील सररदार आलफखान यास काफूरच्या मदतीस जाण्याचा हुकूम केला, काफूरनें या स्वारींत सर्व महाराष्ट्रांत लुटालूट करून रामदेवराय यास आपल्याबरोबर दिल्लीस आणले. तेथें अलाउद्दिनानें रामदेवरावाचा चांगला सन्मान केला. त्यास छत्र, राजाधिराज किताब व एक लाख रूपये बक्षीस देऊन प्रतिष्टेनें स्वदेशी पाठविलें. पुढें १३०९ मध्यें सुलतानानें काफूर यास आंध्र देशाची राजधानी जी वारंगळ तिजवर पाठवून तेथील नरपति राजास आपला तावेदार केलें १३१० च्या स्वारींत काफूरनें बल्लाळवंशी राजाची राजधानी द्वारसमुद्र ही घेऊन त्यांचे राज्य बुडविलें नंतर काफूर थेट दक्षिणेकडे गेला. त्यास कोणी विशेष आडविलें नाहीं. या स्वारींतून अलाउद्दिनाच्या सेनापतींनीं ६१२ हत्ती, वीस हजार घोडे, ९५ हजार मंण सोनें व शिवाय जडजवाहिर एवढी संपत्ति दिल्लीस आणली ( सेवेल फरगॉटन एंपायर, पृ ४०२ ). रामदेवरावाच्या मुलाकडून खंडणी वेळेवर न आल्यामुळें इ. स. १३१२ मध्यें काफूरनें दक्षिणेंत शेवटची स्वारी केली व त्यानें रामदेवरावाच्या मुलास ठार मारून देवगड राजधानी घेतली, व महाराष्ट्र पूर्णपणें मुसुलमानांच्या ताब्यांत आणून अपार संपत्ति घेऊन दिल्लीस परत आला.

बंडेंब अखे र.- काफूरच्या या शेवटच्या स्वारीनंतर अल्लाउद्दिनाची सत्ता शिखरास पोंचली. काफूरवंर त्याची बहाल मर्जी असे. या कृपेचा दुरूपयोग करून काफूरनें अलाउद्दिनाजवळ आपल्याशिवाय दुसर्‍या कोणाचें चालेनासें केलें. प्रत्यक्ष राणी व मुलगे यांच्याशीं सुध्दा सुलतानाचें वैमनस्य काफूरनें पाडून त्यास अटकेंत ठेविलें. यामुळें उमराव लोक त्रासले, गुजराथेंत बंड झालें; चितोडगड हातचा गेला. दक्षिणेंत रामदेवरायाचा जावई हरपाळदेव यानें मोठा उठावा करून तो मुसुलमान किल्लेदारांस हाकून लावून स्वतंत्रपणें राज्य करूं लागला. इकडे अलाउद्दिनाची तब्येत अव्यवस्थित राहण्यानें दिवसानुदिवस बिघडत चालली होती.  या बातम्यामुळें त्यास क्रोधाच्या लहरी येऊं लागल्या व दुखणें बळावून थोड्याच दिवसानीं त्यांचा काळ झाला. त्यानें वीस वर्षे राज्य केले. कोणी म्हणतात काफूरनेच त्याला विषप्रयोग केला. फेरिस्त्याप्रमाणें अलाउद्दिनाच्या मृत्यूची तारीख ६ सवाल हि. स. ७१६ ( १९ दिसेंबर १३१६ ) ही आहे पण अमीर खुश्रु हा त्याच्या कारकीर्दीतील कवि आपल्या दिवाणाच्या बकिय-इ-नकिय नामक भागांत ती ६ सवाल हि.स ७१५ अजमासे ३० दिसेंबर १३१५ ) देतों.

राज्य व्यवस्था - अलाउद्दीन हा स्वभावानें छादिष्ट निर्दय व जुलमी होता, तथापि त्याचा राज्यकारभार प्रशंसा करण्यासारखा होता. १३०३ च्या मोंगलाच्या स्वारीपासून धडा घेऊन अलाउद्दिनानें दिल्ली येथें मजबूत किल्ला बांधला. नवीन तोफा आतून हत्यारें तयार करवून राजधानीच्या बचावाचा चांगल्या बंदोबस्त केला. अलाउद्दिनाची राज्यनीति चमत्कारिक होती. हातीं घेतलेल्या कामात त्यास एकसारखें यश येत गेल्यामुळें तो उर्मट व बेपरवा झाला, व स्वत:च्या इच्छेस येईल तसे कायदे करूं लागला. बराणी म्हणतो कीं, लग्नकार्ये, सणवार मेजवान्या यांसारख्या प्रसंगीं लोक एकत्र जमून मद्यप्राशन वगैरे करून भलभलती चर्चा व मसलती करतात, व त्यांच्याजवळ पैसा फार झाल्यानें त्यांनां बंडाची सामुग्रीं सहज तयार ठेवतां येते म्हणूनच राज्यांत फंदफितूर होतात असें अलाउद्दिनानें ठरविलें होतें. म्हणून त्यानें सरकारच्या परवानगी वांचून मेजवान्या, लग्नकार्यें वगैरे कोणी करूं नये किंवा एकत्र जमून दरबार प्रकरणीं वादविवाद करूं नये असे कायदे करून गुप्त हेरांची नवीन व्यवस्था सुरू केली. त्यानें स्वत: मद्यप्राशन सोडून मद्य व इतर अंमली पदार्थ यांची विक्री बंद केली. लोकांस गांव जमिनी, इनाम दिल्या होत्या त्या त्यानें खालसा केल्या. व कांहींनां कांहीं सबबीवर त्यानें सर्व लोकांस पिळून त्यांजपासून पैसा उकळला. शेतकरी लोकांनीं अमुकच जमीन, गुरें व नोकर ठेवावें असें ठरविलें. सरकारी वसूल त्यानें सक्तीनें सुरू केला, तथापि वसुलाच्या बाबतींत लोकांवर जुलूम झाल्यास त्याची चौकशी करण्यास त्यानें योग्य कामगारहि नेमले होते. त्यानें जिनसांचे दर कायमचे ठरवून त्याच दरांनीं लोकांनां माल विकण्यास लाविलें. राज्यांतून माल बाहेर नेण्याची त्यानें बंदी केली. तो सरकारी पैसा लोकांस कर्जाऊ देई. धर्मसंबंधांत अलाउद्दिनानें जुलमी वर्तन केलें नाहीं; तथापि हिंदूंसंबंधीं त्याचे कायदे अधिक कडक होते असें दिसतें. अलाउद्दिनाच्या कडक कायद्यांनीं त्याचा जिकडे तिकडे वचक बसून राज्यास सुरक्षिता आली. असें म्हणतात कीं याच्या कारकीर्दीत, साम्राज्य फार भरभराटीस आलें. जिकडे तिकडे वाडे, मशिदी स्नानगृहें, किल्ले, कबरी, विद्यापीठें, वगैरे बांधकामें यक्षिणीनें कांडी फिरविल्याप्रमाणें थोड्या अवधींत दिसूं लागलीं. याच्या कारकीर्दीत विद्वान् मंडळीहि बरीच पुढें आलेली दिसतात. अलाउद्दिनास स्वत:स आरंभीं लिहितां वाचतां येत नव्हतें. तथापि त्यास पुढें ही गोष्ट लांछनास्पद वाढून तो लिहिण्यावाचण्यास शिकून हुषार झाला. त्याच्या पदरीं झियाउद्दिन बराणी नांवाचा इसम होता त्यानें त्याच्या कारकीर्दींचा इतिहास लिहिला आहे.

[ सं द र्भ ग्रं थ:-फेरिस्ता; मुसुलमानी रियासत, बीलची ओएंटल बायॉग्राफी वगैरे ]

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .