प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

अलाउद्दिनशहा - पहिला ( इ. स. १३४७-१३५८ ) दक्षिणेंतील बहामनी राज्याचा संस्थापक जाफरखान उर्फ हसनगंगू याचेंच हें नांव ( हसनगंगू पहा ).
२. दुसरा ( इ. स. १४३५-१४५७ ).-अहमदशहा वली बहामनीचा पुत्र व बहामनी राज्यांतील आठवा सुलतान. हा अमदाबाद बेदर येथें इ. स. १४३५ सालीं फेब्रुवारी महिन्यांत (हि. स. ८३८) तख्तावर बसला. विजयानगरच्या राजानें पांच वर्षांपासून खंडणी दिली नसल्यामुळें, त्याजवर आपला भाऊ महंमदखान व वजीर ख्वाजाजद्दान याच्या हाताखालीं फौज पाठवून तिकडून ह्यानें पुष्कळ संपत्ति मिळविली. पण परत येत असतां वाटेंत त्याचा धाकटा भाऊ महंमदखान यानें बंड करून विजयानगरच्या राजाच्या मदतीनें मुदकल, रायपूर, सोलापूर, विजापूर, आणि नळदुर्ग हे परगणे आपल्या ताब्यांत घेतले. शहानें आपली सर्व फौज जमविली व बराच पैसा खर्च करून लढाईची जय्यत तयारी करून आपल्या भावाचा बेदरानजीक पराभव केला. तथापि शेवटीं त्यास क्षमा करून शहानें रायचूर परगण्याची त्यास नेमणूक करून दिली. पुढें इ. स. १४३६ त (हि. स ८४० चं १ मोहरम रोजीं,) कोंकणपट्टी जिंकण्यासाठीं शहानें दिलावरखानाच्या हाताखालीं मोठें सैन्य रवाना केलें. रायरी व सोनखेड येथील राजे लवकरच शरण आले, व दिलावरखानानें सोनखेडच्या राजाची सुंदर कन्या शहाकरितां नजर आणिली. तिच्यावर शहाची, अत्यंत मर्जी बसली आणि तीस त्यानें परिचेर ( स्वर्गीची रंभा ) असे नांव दिलें. इ. स. १४३७ (हि. स. ८४१) सालीं खानदेशचा सुलतान नशीरखान यांच्याकडे त्याची मुलगी शहाची पट्टराणी मलिकाजहान हिनें, शहा पेरिचेरेवर मोहित होऊन आपणांस विचारीत नाहीं अशी कागाळी केल्यावरून नशारिखानाने तें निमित्त करून वर्‍हाड प्रांत जिंकण्याचा घाट घातला. त्यानें वर्‍हाड प्रांताच्या कित्येक कामगारास फितूर करून गुजराथच्या राजाचीहि मदत मिळविली. या आणीबाणीच्या प्रसंगीं शहाच्या दरबारांतील लोकांनीं त्यास स्वत: शत्रूशीं लढण्यास जाण्याचा सल्ला दिला. पण शहास आपल्या सरदारांच्या राजनिष्ठेविषयीं संशय असल्यामुळे मलीक –उत तुजार नामक सरदारास शहानें फौजेसह त्याजवर पाटवून त्याचें व बंडखोरांचें पारिपत्य केलें.

विजयनगरचा राजा दुसरा देवराय यास आपला वरचेवर होत असलेला अपमान सहन होईना. कांहीं तरी युक्तीनें मुसुलमानांचा पाडाव करण्याचा त्याचा विचार होता. त्यानें पुष्कळ मुसुलमान लोक आपल्या नोकरीस ठेवले. त्यांच्याकरितां विजयानगर शहरांत एक मशीद बांधिली, व हिंदुराजांस मुजरा करणें मुसुलमानास अशास्त्र वाटेल, ही शंका दूर करण्याकरितां आपल्या सिंहासनापुढें एका उंच पीठावर त्यानें कुराणाचें पुस्तक ठेविलें. त्यामुळें स्वत:चा मान राहून मुसुलमान लोक कुराणास मुजरा करितात असा प्रकार बाह्यत:दिसे. अशा उपायांनीं मोठी फौज जमा करून, सन १४४३ ( हि. स. ८४७ ) त तुंगभद्रा उतरून विजयनगरच्या देवरायानें मुदकलचा किल्ला घेतला. रायचूर व बंकापूर या किल्ल्यांनां वेढा देण्यास कांहीं सैन्य पाठविलें व आपण स्वत:कृष्णेच्या कांठीं छावणी देऊन सैन्याच्या टोळ्या पाठवून सागर-विजापूरपर्यंत मुलूख लुटून उध्वस्त करविला. अलाउद्दीनशहास ही खबर कळतांच तो त्याच्या पारिपत्यास निघाला. प्रथमत: शहाचा सरदार मलिक उततुजार यानें देवरायाच्या वडील पुत्राशीं लढाई देऊन वेढा उटविला. पुढे सुमारें दोन महिन्यांच्या अवकाशांत तीन मोठमोठ्या लढाया होऊन त्यापैकीं पहिलींत हिंदूंनां व बाकीच्या दोहोंत शहास जय प्राप्त झाला. तेव्हां देवरायानें आपल्या मुलुखास उपद्रव देणार नाहीं असें शहाकडून वचन घेऊन पूर्वी ठरलेली खंडणी दरसाल देत जाण्याचें मान्य करून व मागील तुंबलेल्या खंडणीपैकीं कांहीं देऊन शहाशीं तह केला. हा तह अलाउद्दीनशहा जिवंत होता तोपर्येत दोनहि पक्षांकडून अक्षरश: पाळण्यांत आला.

या शहानें पुष्कळ धर्मकृत्यें केलीं. बेदर येथें त्यानें भिक्षागृह स्थापन करून, लोकांस औषधपाणी देण्याकरितां हिंदू व मुसुलमान वैद्य ठेविले. तो स्वत:गृरू पीत असे तरी इतरांस तिवी सक्त मनाई केली होती त्यानें मुलकी व लष्करी खातीं सुधारलीं. तथापि हिंदु लोकांस पुष्कळ जाच होई. ब्राह्मणांशीं शहा बोलत सुध्दां नसे, किंवा त्यांस कामावर नेमीत नसे.

विजयानगरीशीं युध्द झाल्यानंतर शहा पुढें व्यसनासक्त होऊन राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करूं लागला. या समयास मेमून उल्ला दक्षणी यानें समुद्रकिनार्‍यावरील सर्व किल्ले ताब्यांत घेण्याचा बेत केला, व हा बेत सिध्दींस नेण्याकरितां शहानें मलीक उत्-तुजाराबरोबर त्याची फौज, सात हजार दक्षिणी पायदळ व तीन हजार अरबी घोडे देऊन त्यास रवाना केलें (इ. स. १४५३, हि. स. ८५८). तुजारानें चाकणास आपलें मुख्य ठाणें करून जुन्नरशहराजवळचा किल्ला आपल्या ताब्यांत घेतला व तेथून निरनिराळ्या वेळीं त्यानें कोंकणांत टोळ्या पाठवून पुष्कळ राजांस जिंकलें. तुजारनें नंतर शिरके नांवाच्या एका प्रमुख राजास जिंकिलें. ह्या कोंकणच्या स्वारींत कित्येक भानगडी घडून आल्या, त्यामुळें दरबारच्या मंडळींत तंट्याचें बीज पेरिलें जाऊन त्यायोगें अखेरीस बहामनी राज्याचा अंत झाला. तुजारनें शिरक्यास असा आग्रह केला कीं, ‘तूं मुसुलमान हो, नाहीं तर तुझा जीव घेतों’ अशा आणीबाणीच्या प्रसंगीं त्या धूर्त सरदारानें मोठ्या नम्रतेनें संकट टाळून स्वत:चा बचाव केला. खेळगा म्हणून एक परगणा कोंकणांत आहे. त्यांत विशाळगड व त्यांतील सर्व जंगली प्रदेशाचा समावेश होत असे. शंकरराय नांवाचा एक हिंदु राजा या खेळणा परगण्यावर राज्य करीत होता. शंकरराय हा माझा शत्रु आहे, त्यास प्रथम आपण दोघे मुसुलमान करूं व नंतर मी मुसुलमान होईन’ असें शिरक्यानें तुजार यास सांगितलें. खेळणा परगण्यांत जाणें फार अवघड आहे, अशी हरकत तजारानें दाखविली; पण तें काम आपण पतकरितों, असें शिरक्यानें कबूल केल्यावर, तुजार त्या गोष्टीस कबूल झाला. तुजार हा मूळचा परदेशी व्यापारी होता. दक्षिणचे सर्व मुसुलमान लोक मूळचे इराणी व तुर्की होते. पण इकडे आल्यावर त्यांची पुष्कळ वृध्दि झाली होती. तसेंच हबशी लोकहि त्यांच्या पक्षास होते. परंतु परदेशी लोकांस मोंगल अशी संज्ञा त्यावेळच्या इतिहासकारांनीं दिलेली असून, त्यांत बहुतेक सय्यद लोक होते. ते व्यापाराच्या उद्देशानें इकडे आले होते. त्यांचें व दक्षिणच्या मुसुलमानांचें. वांकडें असे. आजपर्यंत अनेक मोहिमांत तुजार ह्यानें दक्षिणी व हबशी यांचीं मदक घेतली नव्हती प्रस्तुत प्रसंगीं खेळण्याच्या अवघड प्रदेशांत शिरण्याचें दक्षिणी व हबशी कामगारांनीं नाकबूल केलें, आणि ते आपल्या फौजांसह तुजारास सोडून मागें राहिले. शिरक्याच्या मसलतीनें तुजार हा अत्यंत अवघड जंगली प्रदेशांतून खेळणा प्रदेशाच्या अगदीं निबिड अरण्यांत शिरला. तेथील हवा अतिशय खराब असल्यामुळें लोकहि पुष्कळ आजारी पडले. अशा स्थितींत शिरक्यानें शंकररायास एकदम येऊन हल्ला करण्याविषयीं खबर दिली. शंकरराय मोठी फौज घेऊन निघाला. व त्यानें एकाएकीं छापा घालून ७००० मुसुलमानांची कत्तल केली. तींत तुजारहि मारला गेला. कांहीं लोक वाचले ते परत जाऊन दक्षिणी फौजेस मिळाले, आणि तेथून सर्व लोक चाकणच्या किल्ल्यावर गेले.

वरील अपजयामुळें दक्षिणी व परदेशी या दोन पक्षांमध्ये जास्तच तंटे माजले. परदेशी लोक आपल्या कुचराईबद्दल शहाकडे कागाळ्या नेतील या भीतीनें परदेशी सय्यद लोकांचा संपूर्ण नाश करण्याकरितां, दक्षिणी कामगारांनीं आपणच उलट शहाकडे भलभलत्या हकीकती लिहून पाठविल्या;आणि तो दारूच्या निशेंत असतांना त्याजकडून सर्व परदेशीं अंमलदारांस पकडण्याचा हूकूम आणिला. हे परदेशी अंमलदार चाकणच्या किल्ल्यांत जाऊन राहिले होते. तेथें त्यांस वेढा देण्यांत आला.

शेवटीं उभयतांचें युध्द होऊन त्यांतून कांहीं मोंगल बचावून शहाकडे गेले. तेथें शहास त्यांनीं खरी हकीकत कळवून त्याजकडून दक्षिणी लोकांचा सूड घेवविला, (सन १४५३). याच वर्षी शहानें आपल्या गुरूच्या उपदेशावरून दारू न पिण्याची शपथ वाहिली व तो राज्यकारभाराचीं कामें नियमानें पाहूं लागला. आतां त्यानें सर्व महत्त्वाच्या कामावरून दक्षिणी लोकांस दूर केलें. इ. स. १४५५ (हि. स. ८५९) मध्यें शहाच्या पायांवर एक भयंकर पुळी उठून तो मेल्याची खोटी बातमी मुलखांत पसरल्यामुळें बंडें उद्भवलीं. नवलगुंद व तेलंगण या सुभ्यांत या बंडखोरांस खानदेशच्या व माळव्याच्या सुलतानांचीं कुमक होती तरी शहानें तीं बंडें मोडिलीं. बहामनी राज्यांतील प्रसिध्द सरदार खाजेखान महंमद गवान प्रथमत: या शहाच्या लष्करांत उद्यास आला.

मृ त्यु.-पायांत व्रण होऊन व तो फार चिघळून त्या योगानें इ. स. १४५७ सालीं (हि. स. ८६२) २३ वर्षें [ चांद ] ९ महिने व २० दिवस राज्य करून अल्लाउद्दीनशहा मरण पावला. [ किंकेड आणि पारसनीस यांचा मराठ्यांचा इतिहास भाग १ यांत ३ एप्रिल १४५८ ही या शहाच्या मृत्यूची तारीख दिली आहे. ] हा मोठा वक्ता, नकल्या, व धूर्त असून त्यास विद्येची फार आवड होती. [ फेरिस्ता: बा. प्र. मोडक बहामनी उर्फ ब्राह्मणी राज्याचा इतिहास. ]

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .