विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलावलपूर - (पंजाब) जालंदर जिल्हा व तहशिलींतील एक गांव. ३१० २६’ उ. अ. ७५० ४०’ पू रे.लोकसंख्या (१९०१) ४४२३. सुशी आणि गाव्रून या कापडाचा व्यापार चालतो. म्युनिसिपालिटीची स्थापना १८६७. सालीं झाली. १९०३-४ मधील उत्पन्न २१०० रू. व खर्च २२०० रू ( इं. गॅ.).