प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

अलास्का - ह्यास पूर्वी रशियन अमेरिका म्हणत असत. अलास्का म्हणजे उत्तर अमेरिकेच्या अगदीं वायव्येस असलेला प्रदेश व त्याच्या सभोंवतालची बेटें मिळून झालेला मुलूख होय. हा पूर्वी रशियाच्या ताब्यांत होता, पण सध्यां अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या अमलाखालीं आहे. अलास्का या नांवाखालीं पू. रे. १४१ च्या पश्चिमेचा मुलूख (१) डायामिड बेट बेहरींग ससुद्रातील बेटें व अल्युशियम बेटांची मालिका (३) अलेकझांड्रियन बेटें व त्या जगतच्या किनार्‍याचा पट्टा, हीं तीन येतात.

सी मा.-उ.-आर्तिक महासागर प.-आर्तिक महासागर व बेहरींगची सामुद्रधुनी. द. व नैऋत्य-अलास्काचें आखात व बेहरींगची सामुद्रधुनी पू-युकाटनचाप्रांत, व ब्रिटिश कोलंबिया. मध्यवर्ती अखंड पठार हेंच मुख्य अंग व त्यास डकविलेले नैऋत्य व आग्नेयेकडे जाणारे खंडित व अर्धखंडित हात असें या प्रदेशाचें सामान्य स्वरूप आहे. या तीन भागांस निरनिराळीं नांवें दिलीं आहेत, तीं अशीं (१) कान्टिनेंटल अलास्का (२) अल्युशियन अलास्का (३) पॅनहँडल. याचें क्षेत्रफळ ५८६.४००. चौ मै किनार्‍याची लांबी २६००० मैल दक्षिणेकडचा किनारा वांकडा असून किनार्‍यालगतची बाजू सुळ्यासारखी उभी आहे. या प्रदेशाचा भाग बेहरगिच्या समुद्रांत दूरवर गेलेला आहे. दक्षिणेच्या किनार्‍यास वालुकामय प्रदेश नाहीं. उत्तरेस व पश्चिमेस जो किनारा आहे तो वांकडा तिकडा नसून त्यास मात्र पुळण आहे. पण येथील समुद्रांत कांहीं भागीं उथळ पाणी आहे.

बे टें.- आग्नेयेकडील मुख्य बेटे-(१) शिकॉगॉफ (२) बारनॉफ ( ३ ) अडमिर्‍यालिटी ( ४ ) कुप्रीनॉफ (५) कुई (६) प्रिन्स ऑफ वेल्स (७) एटोलीन. नैऋत्येस असलेलीं मुख्य बेटें:-(१) कोडियाक (२) अल्युशियन, (३) सेंट लॉरेन्स वगैरे. शेवटीं सांगितलेलीं दोन बेहरींगच्या समुद्रांत आहेत. या बेटापैकीं प्रिन्स ऑफ बेल्स व कोडियाक हीं फार मोठीं आहेत.

दे श वि भा ग.-पश्चिमेच्या संयुक्त संस्थानांतल्याप्रमाणें या प्रदेशाच्या भूपृष्टाच्या रचनेचें अवलोकन करतां, चार भाग पडतात, ते असे:-पॅसिफिक पर्वतप्रदेश; मध्यपठारप्रदेश; रॉकी पर्वतप्रदेश व मैदानप्रदेश. पॅसिफिक पर्वत हे पश्चिम अमेरिकेंत महासागराच्या किनार्‍याशीं समांतर दक्षिणोत्तर पसरलेल्या रांगांचे अवशिष्ट भाग होत. ह्या अलास्काच्या किनार्‍याशीं समांतर पसरलेल्या रांगांचा आकार साधारण घोड्याच्या नालासारखा आहे.

जलचर प्राणी.-कॉड मासे, देवमासे, ऑटर, सील, वालरस वगैरे सांपडतात. या प्रदेशांत मऊ व दाट लव अललेलीं जनावरें फारच आहेत व कातड्यांकरितां त्यांची पारध फार केल्यामुळें बर्‍याच जातीचे प्राणी सध्यां दुर्मिळ झाले आहेत.

व न स्प ती.- येथें पीत सीडर झाडांचीं दाट अरण्यें युकानच्या भागांत व किनार्‍यालगतच्या भागीं आहेत. नदीच्या कांठीं गवताचीं कुरणें आहेत व शैवालिक वनस्पति उन्हाळ्यांत जिकडे तिकडे उगवलेली असते.

ज मी न.- सुपीक आहे पण उन्हाळा थोडा असल्यानें धान्य कमीच पिकविलें जातें.

 

उ द्यो ग धं दा व व्या पा र.- दाट लव असलेलीं कातडीं व मासे यांचा फार मोठा व्यापार चालतो. दक्षिण अलास्कांत कागदाचा मोठ्या प्रमाणावर धंदा सुरू करण्याचे प्रयत्‍न झाले आहेत. त्याकरितां टाँगास जंगलाचे १४ विभाग पाडण्यांत आले आहेत. १९१८ सालीं ४४२८००७५ डालरचा माल युनायटेडस्टेट्सहून येथें आला व ७१५९५४१४ डालरचा माल येथून तिकडे गेला.

ख नि ज सं प त्ति - अलास्कांत खाणींचा धंदा हा सर्वांत महत्त्वाचा आहे. सोनें व तांबें हे मुख्य खनिज पदार्थ असून शिवाय रूपें, प्लॅटिनम, जस्त, शिसें, अँटिमनी, क्रोमाईट, दगडी कोळसा, पेट्रोलियम. संगमरवरी दगड, ग्रफाईट, सल्फर. गंधक वगैरे अनेक पदार्थांच्या खाणी आहेत. मासे पकडण्याचा धंदाहि फार मोठ्या प्रमाणांत चालतो. १९१९ या सालांत ५०२८२००० डॉलर उत्पन्न झालें व याप्रमाणें सालोसाल वाढत्या प्रमाणांत होत आहे.

लो क.- अलास्कांत लोकसंख्येच्या मानानें यूरोपियन वंशाचे लोक अर्ध्यापेक्षां कमी आहेत. १९०० सालीं येथींल लोकसंख्या ६३५९२ होती. तीपैकीं शेंकडा ४८ यूरोपियन, मूळचे रहिवाशी शेकडा ४६ व चिनी व जपानी शेंकडा ६. मानववंशशास्त्रज्ञांच्या मतें या मूळच्या रहिवाशांच्या ४ जाती आहेत. ( १ ) एस्किमो ( २ ) हैडास अथवा काइगानी ( ३ ) ब्लीन-किट ( ४ ) तिन्नेह अथवा अथापास्कन अल्युटस् हे लोक पहिल्या जातीचे आहेत. दुसरी जात प्रिन्स ऑफ वेल्स बेटांत राहते. तिसर्‍या जातीचे लोक पॅनहँडलमध्यें राहतात. चवथी जात अगदीं अंतर्भागांत आढळते. हे सर्व रहिवाशी यूरोपियन लोकांचें अनुकरण करूं लागले आहेत.

न द्या.- कांटिनेंटल अलास्का हा एक मोठा सपाट पठाराचा प्रदेश आहे. या पठाराची उंची पांच हजार ते तीन हजार फूट आहे व त्यास उत्तरेकडे उतरण आहे. यांतून पश्चिमवाहिनी नद्या गेल्या आहेत व हा प्रदेश सपाट असल्यानें नद्यांची प्रवाहगति फार मंद आहे. या प्रदेशांतून वहात जाणार्‍या नद्यांपैकीं यूकॉन व कोयुकुक या मुख्य आहेत. यांत यूकॉन ही फार मोठी नदी आहे. तिची लांबी २००० मैल. ही नदी या पठाराच्या अगदीं मध्य भागांतून गेली आहे. या नद्यांस मिळणार्‍या दुसर्‍या लहान नद्या बर्‍याच आहेत व त्यांचाहि प्रवाह मंद असल्यामुळें या सर्वांचा दळणवळणाचे कामीं फार उपयोग होतो.

प र्व त:- ‘रॉकी’ या पर्वताच्या रांगा अलास्कांत येऊन पूर्व पश्चिम पसरल्या आहेत, पण यांची उंची फार कमी झाली आहे. यांत एनडीकार पर्वत हे मुख्य आहेत. त्यांची उंची सुमारें ८००० फूट आहे या रांगा समुद्रकिनार्‍याच्या बाजूला सपाट होत गेल्या आहेत. ह्या रांगांचे चार भाग आहेत. पहिला भाग ( १ ) पॅनहँडलच्या किनार्‍यालगतची रांग-रूंदी १०० मैल व शिखराची उंची ५००० ते ६००० फूट ( २ ) सेंट एलिसची रांग-या रांगेंत शुगाख, केनाइ, स्कोलाई व नट्झोटिन या पर्वतांचा समावेश होतो. ( ३ ) अल्युशियन रांग-अल्युशियन बेटें हीं ह्याच रांगेचा अवशेष होत. ( ४ ) अलास्कन रेंज ही नट्झोटिन व स्कोलाय पर्वतांमध्यें आहे. अलास्कनच्या व अल्युशियनच्या रांगेंत सुमारें १२ जागृत ज्वालामुखी पर्वत आहेत. दुसरा भाग:-हा कानडांतील “रॉकी” पर्वताच्या पूर्वपश्चिम दिशेंनें पुढे आलेल्या रांगामुळें तयार झालेला आहे, पण ह्या रांगा येथे सपाट झाल्यानें, त्यांची उंची ६००० फूटांवर नाहीं. भाग ३ रा:-वर सांगितलेल्या पहिल्या दोन डोंगराळ प्रदेशांमध्यें असलेलें मध्यवर्ती पठार भाग ४:-पूर्वपश्चिम असलेल्या रॉकी पर्वताच्या रांगा व आर्टिक महासागर यांमध्यें असलेला व किनार्‍याकडे कललेला सपाटीचा प्रदेश.

भू पृ ष्ठ व र्ण न: - पॅनहँडल हा प्रदेश फारच प्रेक्षणीय आहे. ह्यांत शेंकडों बेटांचा समुदाय आहे. हीं बेटें म्हणजे समुद्रांत बुडालेल्या पर्वतांची शिखरें होत. यांचीं समुद्रसपाटीपासून उंची ३००० ते ५००० फूट आहे. या शिखरांवर गर्द झाडी आहे. पण बाजूवर हिमप्रवाहांच्या घर्षणामुळें वनस्पतींचा अभाव असतो. अंतर्भागांतून बरेच जलप्रवाह ह्या भागांतील पर्वत फोडून समुद्रांस मिळाले आहेत, या प्रवाहांत समुद्राचे पाणी दुरवर आंत गेलेलें असतें. या प्रवाहाच्या बाजूनें कांहीं ठिकाणीं ५००० ते ६००० फूट उंचीचे कडे आहेत. यांची शोभा फार अपूर्व दिसते. यांपैकीं पोर्टलंड कनाल व लिनकनाल हे फार प्रसिध्द आहेत. येथल्यासारखे हिमप्रवाह पॅसिफिक महासागराचे कांठीं दुसरे कोठेंहि नाहींत. असल्या शेंकडों प्रवाहांनीं अंत:प्रदेशांतील बर्फाचें पाणी समुद्रास मिळतें. या हिमप्रवाहापैकीं सर्वांत मोठा “मालास्पीना” हा आहे त्यानें १५०० मैल जागा व्यापिली आहे अल्युशियन बेटें हीं देखील समुद्रांत बुडालेल्या पर्वतांचे अवशेष होत. आर्टिक महासागरालगतच्या उतरणीच्या भागाची रूंदी सुमारें ८० मैल आहे. यांतील सर्वांत उंच भागाचीं उंची २५०० फूट आहे.

ह वा मा न. - या प्रदेशाचे एकंदर चार भाग पडतात, व त्यांत हवामान निरनिराळे आहे. यूकॉनच्या पठाराची हवा पॅनहँडलच्या हवेहून फार निराळी आहे. पॅनहँडलपासून तो कुक प्रवाहाच्या मुकापर्यंतच्या भांगांतली हवा समशीतोष्ण आहे. जसजसें पश्चिमेकडे व उत्तरेकडे जावें, तशी हवा फार थंड होत जाते, व हिंवाळा फार कडक असतो व त्याची मुदतहि वाढत जाते. ऐन उन्हाळ्याच्या व हिंवाळ्याच्या हवामानांच्या उष्णणेंत फक्त २५ अंशांचा फरक असतो. डिसेंबरच्या १ तारखेस हिंवाळ्यास सुरूवात होते व मेच्या आरंभीं पर्वंतशिखराशिवाय बाकी इतर ठिकाणीं बर्फ वितळून गेलेलें असतें. उष्णतामापक यंत्रांतील पारा शून्यखाली क्वचितच असतो; पण उन्हाळ्यांत तो ७५ अंशावर जात नाहीं. हिंवाळ्यांत व पावसाळ्यात समुद्रकिनार्‍याच्या भागांत पाऊस व जिकडे तिकडे धुकें पसरतें. बेहरिंग समुद्र सदासर्वकाळ धुक्यानें व्यपिलेला असतो. अन् अलास्का या बेटांत बोटावर मोजण्याइतकेच निरभ्र दिवस असतात. हिंवाळ्यांत बर्फ पडण्यास सुरूवात होते. व ऐन हिंवाळ्यांत तें फार दाट पडतें. उन्हाळ्यांत खाणीचें काम चालूं शकतें. मे व जून महिन्यांत सूर्य १८ ते २० तास क्षितिजावर असतो, याच ऋतूंत वनस्पती सतेज व टवटवीत दिसतात.

प्रा णी व व न स्प ती - प्राणी-उन्हाळ्यांत डांसांचें थवेच्या थवे अंत:प्रदेशांत येतात. जमिनीवरील प्राणी-अस्वल, क्यारिवो, ( हें जनावर हरिणासारखें आहे ) करडें, लांडगे इत्यादि.

इ ति हा स - रशियन कॅप्टन व्हिटसबेरींग व चिरीकोव्ह यांनीं १७४१ त हा अज्ञात प्रदेश शोधण्याचें काम हातीं घेतलें. यांच्या मागून दुसरे पुष्कळ प्रवासी येथें गेले. १७८३ सालीं कोडीयाकचा शोध लागला. १७९३-१७९४ सालीं व्हाँकुव्हर नामक प्रवाशानें दक्षिणेंतील बेटांचा नकाशा तयार केला. पुढें कित्येक वर्षें हें संशोधनाचें काम चालूं होतें व अजूनहि आर्टिक महासागराच्या कांठचा प्रदेश बराच अज्ञात आहे.

१९१० पासून आजपर्येत अलास्कांत महत्त्वाच्या गोष्टी झाल्या त्या: ( १ ) जमीनीची व नैसर्गिक साधनांची पाहणी. ( २ ) जमीनींच्या मालकीसंबंधाच्या धोरणांत फेरबदल. ( ३ ) होमरूलच्या हक्कांची देणगी.( ४ ) दळणवळणाच्या साधनांची वाढ. ( ५ ) उद्योगधंद्यांची वाढ.

मु ख्य श ह रें.- जुनेआउ हें राजधानीचें शहर आहे. अँकरेज, फेअरबँक्स, नोम, स्कागवे, सिट्का वगैरे दुसरींहि कांहीं शहरें अलास्का मध्यें मोठीं म्हणून गणलीं जातात.

अलास्काची लोकसंख्या १९१० मध्यें ६४,३५६ होती ती १९२० मध्यें ५४८९९ भरली; म्हणजे १४.७ कमी झाली. जागतिक युध्द हें त्याचें एक कारण आहे. आणि युनायटेड स्टेट्समध्यें मजुरीचे दर अधिक असल्यामुळें लोक तिकडे जातात हें दुसरें कारण होय. १९२० मध्यें गोरे लोकांच्या ६२ शाळा आणि इंडियन लोकांच्या ७० शाळा होत्या. शेतकीचें व मायनिंगचें कालेज फेअरबँक येथें आहे. १९१० मध्यें अलास्कामध्यें फक्त ३७१ मैल रेल्वे रस्ता होता; त्यांत १९२० पर्यंत ३८३ मैल इतकी अधिक वाढ झाली.

रा ज्य का र भा र - अलास्का हा देश पूर्वी रशियन सरकारच्या ताब्यांत होता १८६७ सालीं अमेरिकेनें ( म्हणजे संयुक्त संस्थानांनीं ) ७२,००,००० पौंडास हा देश रशियापासून विकत घेतला. १९०६ सालीं या देशास अमेरिकेच्या कांग्रेस सभेत प्रतिनिधी पाठविण्याचा अधिकार मिळाला. अमेरिकेच्या अध्यक्षास येथें एक गव्हर्नर नेमण्याचा अधिकार असतो व त्याच्या मदतीकरितां दुसरेहि कामगार त्यास नेमितां येतात. गव्हर्नर व त्याचे मदतनीस त्यांच्या हातीं सर्व राज्यव्यवस्था असते. १८९१ सालापासून या देशाकरतां नवीन कायदे पसार करण्यांत आले. पण या देशाची राज्यव्यवस्था सुरळीत व सुव्यवस्थितपणें चालत नाहीं कारण अधिकार विभागणी फार झाली आहे व कामगार लोकांत शिस्त नाहीं. त्यामुळें बरीच अंदाधुंदी चालते. निरनिराळ्या खात्यांचे कर्तव्यक्षेत्र नक्की ठरलेले नाहीं. येथील लोकांची गरिबी व कायमच्या रहिवाशांचा अभाव हीं देखील येथील ढिल्या राज्यकारभाराचीं दोन कारणें आहेत.

रा ज की य ह क्क. - वाशिंग्टन येथील कायदेमंडळांत अलास्काला प्रतिनिधी पाठविण्याचा हक्क असावा अशी चळवळ प्रथम सुरू झाली. तिला ४० वर्षांनीं यश येऊन १९०६ मध्यें कांग्रेसमध्यें लोकांनीं निवडलेला एक प्रतिनिधि घ्यावा असे ठरलें. होमरूलची म्हणजे स्वराज्याची मागणी सारखी चालू होती. तिला १९१२ मध्यें यश येऊन अलास्कांत स्वतंत्र कायदेमंडळ स्थापण्याचा ठराव झाला. सेनेट उर्फ वरिष्ठ सभा व हाऊस ऑफ रिप्रीझेंटेव्हि उर्फ कनिष्ठ सभा अशा दोन सभा असाव्या, प्रत्येक जिल्ह्यातर्फे सेनेटमध्यें दोनदोन प्रतिनिधी आणि कनिष्ठ सभेंत चारचार प्रतिनिधी असावे, असें ठरलें. प्रतिनिधींची वांटणीं लोकसंख्येनुसार न झाल्यामुळें एकंदर अलास्का देशाचें हित उत्तम प्रकारें साध्य होत नाहीं. शिवाय वाशिंगटनच्या कांग्रेसला अलास्काच्या कायदेमंडळाचा कोणताहि ठराव रद्द करण्याचा अधिकार राखून ठेविला आहे १९१३ पासून देश्य कायदेमंडळ कायदे करूं लागले. स्त्रियांनां राजकीय हक्क देण्याचा कायदा प्रथमच झाला. खाणी, मजूरांच्या कामाचे तास, शिक्षण, बँकिंग वगैरे उपयुक्त कायदे लवकरच करण्यांत आले. १९१७ मध्यें मद्यपान प्रतिबंधक कायद्यालाहि वाशिंगटन कांग्रेसनें परवानगी दिली.

जमीनी खाजगी मालकीच्या करण्यांतच अलास्काचें फार हित आहे अशी प्रथम समजूत होती. परंतु प्रेसिडेंट रूझवेल्टच्या वेळीं ही सर्व समजूत बदलून सरकारी मालकी असल्यानेंच नैसर्गिक साधनांचा उत्तम उपयोग करून घेतां येईल असें युनायस्टेटडस्टेट्स सरकराचें मत बनलें. पण त्यामुळे उद्योगधंद्यांची कुचंबणा होऊन लोकांच्या तक्रारी वाढूं लागल्या. पुढें विल्सन प्रेसिडेंट झाल्यावर त्यानें लोकांनां जमीनी भाडेपट्ट्यानें देण्यास सुरवात केली, व कागद करण्याकरितां सरकारी जंगलांतील लांकूड विकत देण्यासंबंधाचे नियम करण्यांत आले. १९२१ मध्यें यासंबंधानें आणखी नवे कायदे करण्यांत आले आहेत.

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .