प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

अलाहाबाद वि भा ग - संयुक्त प्रांताचा नैऋत्येकडील एक विभाग २४०११’ ते २६० ५८’ उत्तर अक्षांस व ७८० १० ते ८२० २१’ पूर्व रे. उत्तरेस इटावा आणि फरूकाबाद जिल्हे; ईशान्येस गंगानदी; पूर्वेस मिर्झापुर जिल्हा; दक्षिणेस व पश्चिमेस मध्यहिंदुस्थान एजन्सीतील संस्थानें. मुख्य ठिकाण अलाहाबाद शहर हें आहे. लोकसंख्या ( १९२१ ) ४७,९५,६६६ आहे. एकंदर क्षेत्रफळ १७२७० चौरस मैल. लोकसंख्येचें दर चौरस मैली प्रमाण १९०१ सालीं ३२१ होतें पण हल्लीं तें त्याहूनहि कमी पडतें. इ. स. १९०१ सालीं हिंदु शेकडा ९० व मुसुलमान शेकडा १० होते. या विभागांत ५१ गांवें व १०९५० खेडीं आहेत. पैकीं कानपूर, अलाहाबाद, झांशी, आणि बांदिया हीं मोठीं आहेत. संयुक्त प्रांतांत कानपुर हें सर्वांत मोठें व्यापाराचें ठिकाण आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांत महोबाच्या चंदेल राजांनीं बांधलेलीं हिंदु देवळें व किल्ले विपुल आहेत. या विभागांत फरूकाबाद, इटावा, कानपूर, फत्तेपूर व अलाहाबाद हे जिल्हे आहेत.

जि ल्हा.-संयुक्तप्रांत अलाहाबाद भागाच्या पूर्वेकडील जिल्हा. उ. अ. २४० ४७’ ते २५० ४७’ पू. रेखांश ८१० ९’ ते ८२० २१’ क्षेत्रफळ २८११ चौरस मैल. उत्तरेस अयोध्येपैकीं प्रतापगड जिल्हा; पूर्वेस जोनपूर आणि मिर्झापूर; दक्षिणेस रेवा संस्थान व बांदा जिल्हा; पश्चिमेस फत्तेपूर, गंगानदी जिल्ह्याच्या कांहीं भागाच्या उत्तरेस व नंतर मधून वाहात जाते; त्याचप्रमाणें यमुनानदी दक्षिणेस वहात जाऊन पुढें गंगानदीस जिल्ह्याच्या मध्यभागीं मिळते या जिल्ह्याचे तीन अगदीं निरनिराळे भाग करतां येतात. ( १ ) गंगा व यमुना यांमधील दुआब ( अन्तर्वेदि ), यांत सुपीक जमीन आहे तथापि काहीं ठिकाणीं ओहोळ पडलेले आहेत, तो भाग ओसाड आहे. ( २ ) गंगेपलीकडील प्रदेश हा सुपीक असून यांत पुष्कळ झिली ( दलदलीची जमीन ) आहेत; तेथें भाताचें पीक येतें. ( ३ ) यमुनेपलीकडील प्रदेश. हा सर्वांत मोठा भाग असून लहान टेकड्या येथें फार आहेत. बुंदेलखंडी भागाप्रमाणें हा भाग आहे.

व न स्प ती. - गंगानदीच्या उत्तरेस आंबराया विपुल आहेत. इतर झाडें:-मोह, पिंपळ, पळस, बाभूळ इत्यादि

रा न टी प्रा णी.- रानडुकर, कोल्हे, लांडगे इ.

ह वा मा न.- हवा निरोगी असते. यमुनेच्या दक्षिणेस उन्हाळ्यांत उष्मतामान फार असतें. अलाहाबाद येथें सावलींतील उष्णतामान ११३० – ११४० पर्यंत चढतें. पावसाची सरासरी ३७ इंच.परंतु यांत फेरबदल नेहमीं होतो. उदाहरणार्थ, स. १८८० सालीं फक्त १७ इंच पाऊस पडला व सन १८९४ सालीं ७६ इंच पडला.

इ ति हा स.-पांडवांनीं आपल्या वनवासापैकीं कांहीं दिवस वारणावतास घालविले तोच अलाहाबादच्या सभोवतालचा प्रदेश असें म्हणतात. राम आणि सीता यांनीं देखीस आपला वनवास कांहीं दिवस या भागांत केला असें म्हणतात. दक्षिणेकडे  असलेलें कोसल हें महाभारत व पुराणें यांत उल्लेखिलेली कौशांबीच होय असा अद्यापि समज आहे.

चवथ्या व पांचव्या शतकांत हा भाग मगधाचे गुप्त राजे यांच्या राज्यांत मोडत होता, व सातव्या शतकांत कनोजचा राजा हर्षवर्धन याच्या राज्यांतील हा भाग होता असें चिनी प्रवाशी प्रसिध्द ह्युएनत्संग यानें लिहून ठेवलेल्या हकीकतीवरून दिसतें.

 

यानंतर इ. स. ११९४ सालापर्यंतचा कांहीं एक इतिहास उपलब्ध नाही. या सालीं शहाबुद्दीन घोरीनें स्वारी केली व हा भाग मुसुलमानांनी जिंकला. त्यावेळेपासून ब्रिटिश अंमल सुरू होईपर्यंत हा भाग मुसुलमानी अमलाखालीं होता. तेराव्या व चौदाव्या शतकांत कडा येथील सुभेदाराच्या हुकमतीखालील हा भाग होता. कडा येथेंच सन १२८६ सालीं मुझुद्दीन आणि त्याचा बाप यांची इतिहासांतील भेट झाली. मुझुद्दीन हा त्यावेळीं बलबनच्या मागें दिल्लीच्या तक्तावर बसला होता व त्याचा बाप या गोष्टीस विघ्न आणण्याकरतां बंगालकडे जात होता. या बापलेकांची भेट कडा येथें झाली व निष्कारण रक्तपात करण्यांत अर्थ नाहीं या सध्देतूंन प्रेरित होऊन गंगा नदीच्या प्रवाहाच्या मध्यभागीं होड्यांमध्यें यांची भेट झाली व दोघांनीं बरोबर दिल्लीस कूच केलें. पुढें तेराव्या शतकाच्या अखेरीस अलाउद्दीनाच्या ताब्यांत हा होता व माणिकपूर आणि कडा यांमधील गंगानदीच्या वाळवंटांत अलाउद्दीनानें आपला वयोवृध्द चुलता सुलतानफेरोजशहा याचा नीचपणानें खून केला. यापुढें या भागांत फार बंडाळी चालू होती. इ. स. १५२९ च्या सुमारास बाबरानें हा प्रदेश पठाणांपासून जिंकला. शहाजादा सेलीम ( जहांगीर ) हा आपल्या बापाच्या कराकीर्दीत येथील सुभेदार होता. त्यावेळीं तो अलाहाबाद येथें रहात असे. अठराव्या शतकाच्या प्रारंभीं बुंदेल्यांनीं छत्रसालराजाच्या निशाणाखालीं जमून मोगलांची सत्ता उलथून पाडण्यास आरंभ केला होता, आणि त्यावेळीं बुंदेले व मराठे यांनीं हमीरपूर आणि बांदा जिल्हे ज्या भागांत येतात तो भाग लुटला होता. पुढें कधीं हा भाग अयोध्येच्या नबाबांकडे तर कधीं मराठ्यांकडे असे. सन १७६५ सालीं ब्रिटिशांनीं पुन्हां हा प्रदेश दिल्लीचा नामधारी बादशहा शहाअलम यास परत मिळवून दिला. कांहीं वर्षें मोंगल बादशहाचा दरबार अलाहाबाद येथेंच भरत असे. परंतु इ. स. १७७१ सालीं शहाअलम पुन्हां दिल्लीस गेला व मराठ्यांच्या तंत्रानें वागूं लागला; म्हणून ब्रिटिशांनीं पूर्वेंकडील प्रदेश खालसा करून तो परत अयोध्येच्या नबाबास ५० लाख रूपयांस विकला. स. १८०३ पर्येत शहाअलम हा मराठ्यांच्या ताब्यांत होता.त्या सालीं लॉर्ड लेक यानें त्यास मराठ्यांच्या हातून मोकळें केलें. मध्यंतरी अयोध्येच्या नबाबानें कबूल केलेली खंडणी ब्रिटिशांस न दिल्यामुळें अडचणी उपस्थित झाल्या होत्या. पण इ. स. १८०१ सालीं गंगा व यमुना यांमधील प्रदेश ब्रिटिशांस देण्याचें अयोध्येच्या नबाबानें कबूल केल्यामुळें तो तंटा विकोपास गेला नाहीं याचवेळीं अलाहाबाद जिल्हा ब्रिटिशांकडे आला. इं. स. १८५७ च्या बंडांत अलाहाबादचे शिपाई बंडांत सामील होऊन त्यांनीं आपल्या अधिकार्‍यांची कत्तल केली. पुढें लवकरच मदत आल्यावर सर्वत्र शांतता झाली.

या जिल्ह्यांत प्राचीन वस्तू विपुल आहेत. ख्रिस्ती शकापूर्वी तिसर्‍या शतकांत बांधलेल्या अशोकाच्या वेळच्या स्तंभापासून तों मोगलांच्या वेळीं बांधलेल्या भव्य इमारती प्रेक्षणीय आहेत. कोसम, झुसी आणि गर्व्हा येथें गुप्तांच्या वेळचे शिलालेख सांपडले आहेत.

लोकसंख्या ( १९२१ ) १४०४४४५ आहे. एकंदर खेडीं ३४७३ व गांवें १३. या जिल्ह्यांत नऊ तहशिली आहेत.-अलाहाबाद, सिराथू मंझनपूर, सोरान, फूलपूर, हंडिआ, कर्चना, बार, आणि मेजा.

एकंदर लोकसंख्येपैकीं हिंदु शेंकडा ८६; मुसुलमान शेंकडा १३; आणि ख्रिश्चन ६८००; पूर्वेकडील व पश्चिमेकडील भागांत हिंदी भाषा बोलतात. गंगानदीचे कांठच्या प्रदेशांत चांगलीं पिकें येतात. पावसाळ्यांत येथें पुराचें पाणी असतें. उंसाची लागवड या जिल्ह्यांत बरीच होते. झिल नांवाच्या जमिनींत भात पिकतें. गळिताचीं धान्यें मोठ्या प्रमाणावर पिकतात. यमुनेच्या आसपासचा कांहीं भाग तालूकदारी पध्दतीवर आहे. मुख्य पिकें-ज्वारी, बाजरी, सातु, गहूं, गळिताचीं धान्यें, अफू, ऊंस, ताग, इत्यादि, गुरांची अवलाद साधारण असून घोड्यांची पैदास कोणी या जिल्ह्यांत करीत नाहींत. खनिज पदार्थ-सँडस्टोन, कंकर हे आहेत. या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर असे कांहीं उद्योगधंदे चाललेले नाहींत. ईस्ट इंडियन रेल्वेचा मुख्य रस्ता या जिल्ह्यांतून जातो. या जिल्ह्यांत अलाहाबाद येथेंच फक्त म्युनिसिपालिटी आहे. तिचें उत्पन्न ( १९०३-४ ) १-७ लाख खर्च १.६ लाख रूपये होतो.

त ह शी ल.-( संयुक्त प्रांत.) अलाहाबाद जिल्ह्यांतील तहशील. उत्तर अ. २५० १७’ ते २५० ३५’ व पूर्वरेखांश ८१० २८’ ते ८१० ५५’ क्षेत्रफळ २९६ चौरस मैल. हींत दोन गांवें व ३०८ खेडीं आहेत. लो. सं. ( १९०१ ) ३,३८,८२० जमीनमहसूल ३०७००० रू. इतर कर ५१०००. इ. स. १९०३-४ सालीं होता. २१० चौ. मैल जमीन लागवडीस, पैकीं ४५ चौरस मैल पाटाच्या पाण्याखालीं होती. विहिरीच्या पाण्यावर सुमारें दोन तृतीयांश जमीन भिंजते.

श ह र.- ( संयुक्त प्रांत. ) अलाहाबाद जिल्ह्याचें मुख्य शहर. संयुक्त प्रांताचें सरकार येथेंच असतें. उ. अ. २५०  २६’ व पूर्व रे. ८१ ५०’ यमुनेच्या वामतीरावर हें शहर वसलें असून जवळच गंगायमुना या नद्यांचा संगम झाला आहे. हें शहर आगगाडीनें कलकत्त्यापासून ५६४ मैल व मुंबईहून ८४४ मैल आहे. लोकसंख्या ( १९२१ ) १५७२२०.

इतिहास. - या शहरचें हिंदु नांव प्रयाग असून गंगायमुनांचा संगम झाल्यामुळें हें तीर्थाचें स्थान समजतात. पंजाबच्या नैऋत्य प्रदेशांतील वाळवंटांत गुप्त झालेल्या सरस्वती नदीचें याठिकाणीं पुन्हां तिचें दर्शन होऊन येथेंच तीन नद्यांचा त्रिवेणीसंगम होतो अशी श्रध्दाळु लोकांची समजूत आहे. प्रयागास मुख्य तीर्थें पुढील होत:-त्रिवेणी, माधव, सोमेश्वर, भारद्वाजेश्वर, वासुकीश्वर, अक्षय्यवट, शेष, प्रयाग, वेणीमाधव, भागीरथी, सरस्वती, यमुना. या क्षेत्रीं सर्वांनीं ( जीवतपितृकांनीं देखील ) मुंडन करावें अशी रूढी आहे. सौभाग्यवती स्त्रिया वेणीदान करतात. दक्षिण हिंदुस्थानांतील ( द्रविडी ) स्त्रिया तर सर्वच केशभार काढून टाकितात ! वपनाला पुराणांर्गत म्हणविणार्‍या प्रयाग नहात्माचा आधार आहे या क्षेत्राला तीर्थराज असें म्हणतात. व याचा महिमा पुराणांत बराच वर्णिलेला आढळतो.

पुराण वस्तु: - खिस्ती शकाच्या पूर्वी तिसर्‍या शतकांत उभारलेला एक स्तंभ हल्लीं किल्यांत असून त्यावर अशोकाच्या वेळचा लेख कोरलेला आहे. तसेंच चवथ्या शतकांतील समुद्रगुप्ताच्या वैभवाचें वर्णन खोदलेला असा एक स्तंभ आहे. त्याचप्रमाणें जहांगीर बादशहाच्या वेळचा एक स्तंभ आहे. परंतु हा अशोकाच्या वेळचा असावा असें वाटतें कारण त्यावर कौशांबीच्या राजांनां उद्देशून मजकूर खोदलेला आहे. सातव्या शतकांत या शहरांत ब्राह्मणानुयायी लोक फार रहात असून ते ही जागा फार पवित्र मानतात असें चिनी प्रवासी ह्युएनसंग यानें लिहून ठेविलें आहे. एका देवळासमोर एका जुनाट वृक्षावरून मोक्ष मिळण्याकरतां म्हणून धर्मभोळे लोक उडी घेत असत असें त्यानें वर्णन केलें असून हीच गोष्ट सोळाव्या शतकांतील मुसुलमानी इतिहासकारांनीं वर्णन केली आहे. पुढें हा वृक्ष जहांगिरानें पाडून टाकला असें म्हणतात. हल्ली मूम्यंतर्गत देवळासमोर एका वृक्षाचें खोड यात्रेच्या वेळीं तेथील पुजारी दाखवितात व त्यास ‘अक्षय्य वट’ असें म्हणतात. फा-हिआन ( इ. स. ४१४ ) या चिनी प्रगाश्यासहि प्रयाग माहीत होते मुसुलमानी अमलाच्या पूर्वकाळांत कडा सुभ्यामध्यें प्रयाग मोडत असून त्यावेळीं तें महत्त्वाचें मानलें जात नव्हतें पुढें अकबरानें येथील किल्ला बांधला ( १५७२ ) त्यावेळेपासून यास अलाहाबास, इलाहाबास, अशीं नांवें पडलीं व ते सुभ्याचें मुख्य ठिकाण झालें. ( अलाहाबाद जिल्हा पहा. ) इ. स. १७३९ सालीं मराठे अलाहाबादपर्यंत येऊन भिडले होते. इ. स. १८०१ सालीं हा भाग ब्रिटिशांकडे आला. इ. स. १८३४ सालीं या प्रांताचें मुख्य ठिकाण आग्रा येथें नेमण्यांत आलें. तथापि बंडानंतर तें पुन्हां अलाहाबाद येथें आणण्यांत आले.

इ. स. १८५७ च्या बंडांत अलाहाबाद येथें ठेवलेलें सैन्य बंडांत सामील झालें होतें. जो सांपडेल तो यूरोपियन ठार करावयाचा असें चाललें होतें. त्यावेळीं कोणी एका मौलवीनें आपल्या हातीं सत्ता घेऊन मोगल पातशहाच्या नांवानें द्वाही फिरविली. या खंडांत सर्व शहर बंडवाल्यांनीं लूटलें. अशी अंदाधुंदी फक्त सहाच दिवस होती ( जून ६ ते जून ११ ). ब्रिटिशांचे सैन्य आल्यावर पुन्हां स्थिरस्थावर झालें व बंडवाला मौलवी पळून गेला. त्यानंतर शहरांत कांहीं गडबड झाली नाहीं.

प्रयाग यमुना नदीवर वसलेलें असून किल्ला गंगायमुना यांच्या संगमावर आहे. गांवांतील इमारती विशेष चांगल्या नसून रस्ते फार अरूंद आहेत. बंडानंतर जो दारागंज म्हणून कँप बसविला आहे. तेथील रस्ते रूंद असून कांहीं श्रीमंत व्यापार्‍यांचें बंगले तिकडे झाले आहेत. किल्ल्यांत पुष्कळ फेरबदल झाल्यामुळें पूर्वकाळचें काम त्याच स्थितींत पहावयास मिळत नाहीं, म्हणून त्या दृष्टीनें किल्याचें महत्त्व कमी झालें आहे. किल्ल्याखालीं विस्तृत वाळवंट असून तेथें मोठी यात्रा भरते. सन १८९४ सालीं मुख्य दिवशीं दहा लाख लोक स्नानाकरतां जमले होते असें म्हणतात. दरवर्षी येथें माघ-मेळा भरतो; दरसहा वर्षांनीं अर्धकुंभ मेळा व बारा वर्षांनी कुंभ-मेळा भरतो. तेव्हां लाखों यात्रेकरून त्रिवेणीसंगमावर स्नानास जमतात. येथील प्रयागवळ इतर क्षेत्रींच्या भिक्षुकांप्रमाणेंच यात्रेकरूंशी वागतात. प्रयागच्या पश्चिमेस खुश्रु बाग असून त्यांत त्याचें, त्याच्या आईचें व बहिणीचें अशीं तीन थडगीं आहेत. हा बाग जहांगिरानें तयार केला होता. या खुश्रूनें अकबर मरण पावल्यावर दिल्लीचें तख्त मिळविण्याचा घाट घातला होता, परंतु त्यास यश आलें नाहीं व कैदेंत पडावें लागलें. सरकारी कचेर्‍या, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, म्यूर सेंट्रल कॉलेज, मेयो मेमोरियल हॉल वगैरे इमारती अलीकडील असून चांगल्या आहेत. यमुनेच्या दक्षिण तीरावर नैनी येथें मुख्य तुरूंग आहे.

इ. स. १८६३ सालीं येथें म्युनसिपालिटी स्थापन झाली. सन १९०३-४ मध्यें उत्पन्न ४.५ लाख व खर्च ४.५ लाख. रूपये होता. अलाहाबादेस पाणी पुरवठा उत्तम आहे. यमुनेचें पाणी १७.२ लाख रूपये खर्चून गांवांत आणलें आहे. पाणी फिल्टर केलेले असतें.

व्यापार: - येथें मोठ्या प्रमाणावर असा व्यापार होत नाहीं, पण येथें बाजार मात्र मोठा भरतो. ईस्ट इंडियन रेल्वेचें हें एक मुख्य स्टेशन असून दुसर्‍या छोट्या लाईन्स येथूनच निघत असल्यामुळें त्या टापूंत यास महत्त्व आलें आहे. येथून धान्य व गाळिताचीं धान्यें बाहेर जातात. व धान्य, साखर, तूप, व इतर माल या जिल्ह्यांत येतो. सरकारी छापखान्यांत १९०३ सालीं १०३१ लोक कामावर होते. शिवाय दुसरे लहान मोठे असे ३६ छापखाने त्यावेळीं होते. विटा व कौलें यांचे मोठे कारखाने येथें आहेत. दोन साखरेचे, तीन कातडीं कमावण्याचे, दोन साबणाचे एक दारू गाळण्याचा, व एक तेलाचा असे कांहीं कारखाने चालतात.

शिक्षण: - हें शहर संयुक्त प्रांतातील केंद्र आहे. येथें अलाहाबाद विश्वविद्यालय आहे. एक कॉलेज व पुष्कळ हायस्कुल व दुय्यम आणि प्राथमिक शिक्षणाच्या शाळा आहेत. १७ | १८ नियतकालिकें येथें प्रसिध्द होतात. गांवांत निरनिराळ्या हिंदी यूरोपियन संस्था आहेत. हिंदी भाषेचा अभिमान धरणार्‍या अनेक संस्था पंडीत मदन मोहन मालवीय यांच्या नेतृत्वाखालीं येथें कार्य करीत आहेत.

त ह शी ल. - (पंजाब) भावलपुर संस्थान व निझामत मधील एक तहशील. उ. अ. २७० ४२’ ते २९० १२’ व पू. रे. ७०० ३८’ ते ७१० ५. क्षेत्रफळ १३५५ चौरस मैल. लोकसंख्या (१९०१) ५७५१७. यांत अलाहाबाद गांव ( लोकसंख्या २८६८ ) खानबेला व जानपुर अशीं दोन म्युनसिपालिट्या असलेलीं गांवें व ६५ खेडीं आहेत. येथील जमीन अत्यंत सुपीक आहे परंतु प्रदेश फार सखल असल्यामुळें अति रोगट आहे. उत्पन्न (एकंदर) सन १०९५-०६ मध्यें २ लाख रूपये होतें.

गां व - (पंजाब ) भावलपुर संस्थानांतील अलाहाबाद तहशिलीचें मुख्य ठिकाण. उ. अ. २८० ५७’ पू. रे. ७०० ५३’ हा गांव भावलपुर गांवाच्या नैऋत्येस ५६ मैलांवर आहे. लोकवस्ती सन (१९०१) २८६८ हा गांव भावलपुरचा नबाब सादिक अहमदखान (पहिला) यानें इ. स. १६६० सालीं वसविला. येथें तांदुळ व खजूर यांचा मोठा व्यापार चालतो. म्यु. पा. चें उत्पन्न (इ. स. १९०३-४) ३१०० रूपये ( इं. गॅ. ५-१९-८).

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .