विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलीगड, जि ल्हा.- ( राजपुताना. ) टोंक संस्थानांतील एक परगणा. उत्तर अ. २५० ३६’ ते २६० २’ व पू. रे. ७६० ३’ ते ७६० २०’. क्षेत्रफळ १५७ चौरस मैल. उत्तरेस, पश्चिमेस आणि पूर्वेस जयपूर; दक्षिणेस व नैऋत्येस बुंदी; आग्नेयीस कोटा. बहुतेक प्रदेश सपाट असून फक्त आग्नेयीकडील कोंपरा थोडा डोंगराळ आहे. लोकसंख्या (१९११) १६२८८. एकंदर खेडीं ८५; शहर एकसुध्दां नाहीं. येथें राहणार्या मुख्य जाती-मिना, चांभार, गुजर, माळी, महाजन. येथील पूर्वीचा इतिहास फारसा उपलब्ध नाहीं. इ. स. १६८८ ते १७४८ पर्यंत हा भाग बुंदीचे हाडा रजपूत यांजकडे होता. पुढें अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत होळकर किंवा जयपूरचे संस्थानिक यांपैकीं कोणी एकाकडे असे. इ. स. १८१८ सालीं महिदपूर येथें होळकरांचा इंग्लिशांनीं मोड केल्यावर हा भार इंग्लिशांनीं खालसा केला. परंतु पुढें सन १८१९ सालीं पुन्हां हा प्रदेश पेंढारी नबाब अमीरखान यास बहाल करण्यांत आला. यांतील अर्धा अधिक भाग जहागीर असून खालसा प्रदेशाचें क्षेत्रफळ ६७ चौरस मैल आहे. ज्वारी, गहूं, तीळ हीं येथील मुख्य पिकें आहेत. जमीन साधारण बरी आहे. एकंदर उत्पन्न ३६००० रूपये आहे.
गां व.- ( राजपुताना) हें जिल्ह्याचें मुख्य ठिकाण टोंक शहराच्या आग्नेयीस २४ मैलांवर आहे. उ. अ. २५० ५८’ आणि पू. रे. ७६० ५’ लोकवस्ती ( इ. स. १९०१ ) २५८४ हा गांव इ. स. १६४४ सालीं कोणी बसंतराय यानें वसविला असून राठोड रजपूत रामसिंग याच्या नांवावरून या गांवास रामपुरा असें नांव होते. पुढें पहिला नबाब अमीरखान यानें तें नांव बदलून अलीगड असें ठेविलें. पावसाळ्यांत येथील हवा बिघडते. गांवाभोंवतीं एक तट आहे.