प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

अलिगड जि ल्हा.- संयुक्त प्रांत. आग्रा विभागांतील जिल्हा. उ. अ. २७० २९’ ते २८० ११’ आणि पू. रे. ७७० २९’ ते ७८० ३८’. क्षेत्रफळ १९८६ चौरस मैल,

सीमा: - उत्तरेस बुलंदशहर जिल्हा; पूर्वेस आणि दक्षिणेस इटा; पश्चिमेस आणि दक्षिणेस मथुरा. गंगा व यमुना यांच्या आसपासच्या तीरावरील सखल प्रदेशास ‘खादर’ असें नांव आहे. गंगा खादर सुपीक आहे परंतु यमुना खादरवर खुरटें जंगल आहे. इतर जमीन सुपीक आहे. या जिल्ह्यांतून तीन नद्या वहातात. कालीनदी, नीमनदी, खोइआनदी. जमीन मळईची असून कांहीं ठिकाणीं कंकरमिश्रित देखील आढळते. क्षार असल्यामुळें ओसाड पडलेली जमीनदेखील या जिल्ह्यांत पुष्कळ सांपडते. या जिल्ह्यांत जंगल सांपडण्यासारखें नाहीं. मुख्य झाडें-बाभुळ, निंब, आंबा, पळस. रानटी पशू-रानडुकरें, काळवीट इत्यादि. दुआब प्रमाणेंच सामान्यत: येथील हवा असते. पावसाचीं सरासरी २६ इंच.

इ ति हा स - अलीगडचा किल्ला व  स्टेशन हा कोइल नामक अति प्राचीन शहराचा एक भाग आहे. पूर्वी चंद्र वंशांतील कोणा कोशारब नांवाच्या क्षत्रिय राजानें हें शहर वसविलें व त्यास स्वत:चें नांव दिलें. पुढें बळरामानें कोल नांवाच्या राक्षसाचा येथें वध करून या शहरास कोईल असें नांव दिलें असा याचा प्राचीन दंतकथात्मक इतिहास आहे.

मुसुलमानांच्या स्वार्‍या हिंदुस्थानावर सुरू होण्यापूर्वी हा भाग डोर रजपुतांच्या ताब्यांत असून बाराव्या शतकाच्या अखेरिपर्यंत बरनचा राजा येथील कारभार पहात असे. इ. स. ११९४ सालीं कुतुबुद्दीन यानें दिल्लीहून कोईलवर स्वारी केली व हा भाग जिंकला. पुढें मुसुलमान सुभेदार सर्व कारभार पहात. चौदाव्या शतकांत तैमूरच्या स्वारींत या भागाचें नुकसान फार झालें. पुढें इ. स. १५२६ सालीं बाबरनें कचकअली नांवाचा सुभेदार तेथें नेमला होता. त्यावेळच्या पुष्कळ मशिदी अद्यापि अस्तित्त्वांत आहेत. अवरंगजेब मरण पावल्यावर या प्रदेशावर मराठे व जाट यांच्या वारंवार स्वार्‍या होऊं लागल्या. इ.स. १७५७ सालीं सुरजमल जाटानें हें शहर हस्तगत केलें. कारण मथुरा आणि आग्रा ते दिल्ली आणि रोहिलखंड या रस्त्याच्या नाक्यावरील हें ठिकाण असल्यामुळें लष्करी दृष्ट्या यास फार महत्त्व होतें. पण लवकरच (१७५९) येथून जाटाची उचलबांगडी अफगाणांनीं केली. या पुढील वीस वर्षें येथें हिंदु व मुसुलमान यांच्या एकसारख्या लढाया होत होत्या. इ. स. १७८४ सालीं हा भाग शिंद्यानीं जिंकला. तो जवळ जवळ सन १८०३पर्यंत मराठ्यांकडे होता यासंबंधीं मराठ्याच्या इतिहासांत पुढील दाखला मिळतो. १७०६ मार्गशीर्ष शु. ११ चें गोविंदराव पुरूषोत्तमानें नानांस धाडिलेलें पत्र-पाटिलबाबानीं अशफशहाबखानाचा पुत्र हुसेनुद्दौला बहादुर यास सरदारी देऊं करून अलिगडास पैका व वस्त्रें आणावयास माणसें पाठविलीं (रा. खं. १२. ४४,३३). अलीगडचें पूर्वीचें नाव रामगड असून नजीबखान रोहिल्यानें तें बदललें असाहि उल्लेख गोविंदरावाच्या १७०७ अधिक चैत्र वद्य ५ च्या पत्रांत आढळतो:- “नजीबखानानें ज्या रामगडचें अलीकडे अलिगड म्हणोन नांव ठेविले आहे, तेथें जाऊन किल्ला कांहीं खालीं करून पादशाही अंमल बसवावा असा राणेखान व रायाजी पंत यांचा विचार आहे. (राजवाडे खंड. १२. ५०, ३६).” त्यावेळीं अलीगडच्या किल्ल्यास फार महत्त्व होतें व तेथेंच डी ब्वानें हा कवाईती लष्कर तयार करीत असे. इ. स. १८०२ सालीं शिंदे, नागपूरचे भोंसले व होळकर हे ब्रिटिश व निजाम यांच्याविरूध्द असतांना चाललेल्या लढाईंत हा किल्ला शिंद्यांच्या ताब्यांत असून तेथील व्यवस्था फ्रेंच सेनापति पेरन पहात होता. इ. स. १८०३ सालीं ब्रिटिशांनीं हा किल्ला सर केला. त्यामुळें आसपासचा सर्व प्रदेश ब्रिटिशांकडे आला. ब्रिटिशांच्या हातीं हा भाग आल्यावर लगेच त्याची योग्य व्यवस्था लावण्यास प्रारंभ झाला. लवकरच होळकरांशी लढाई सुरू झाली व होळकरांच्या चिथावणीनें येथे बंड झालें. परंतु त्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यांत आला. सन १८१६ पर्यंत लहान लहान बखेडे तेथें होतच होते. पण पुढें १८५७ च्या बंडापर्यंत सर्व स्थिरस्थावर होतें. इ. स. १८५७ च्या बंडाचा परिणाम तेथें झाला होता, व हा भाग बंडवाल्यांच्या ताब्यांत गेला होता. त्यावेळीं लोकांवर बंडवाल्यांनीं फार जुलूम केला. त्यामुळें ब्रिटिश परत या बाजूला आल्यावर ताबडतोब या भागांतील लोक त्यांनां मिळालें. व बंडवाल्यांनीं पळ काढला.

 

बौध्द व हिंदु कालांतील प्राचीन अवशेष येथें जागोजागीं सांपडतात.

येथील लो. सं. ( १९२१ ) १०६१७४५. या  जिल्ह्यांत एकंदर २३ गांवें व १७५३ खेडीं आहेत. इ. स. १८७६-७७ सालीं येथें मोठा दुष्काळ पडला होता. या जिल्ह्यांत कालवे असल्यामुळें हा जिल्हा इ.स. १८९६-९७ च्या दुष्काळांतून वांचला. या जिल्ह्यांत सहा तहाशिली आहेत. त्या अत्रोली अलीगड, इग्लास, हाथ्रस, खैर,सिकंद्रराव या होत.

या जिल्ह्यांत क्षार आलेली ओसाड जमीन पुष्कळ आहे. ती पुन्हां लागवडीस आणण्याचे प्रयोग चालू असून त्यास थोडें फार यशहि येत आहे. मुख्य पिकें-गहूं, सातु, ज्वारी, हरबरा, मका, बाजरी, अरहर, कापूस. दिवसेंदिवस गव्हांच्या लागवडीचें क्षेत्र वाढत आहे. घोड्यांची पैदास बरीच होते. अपर गँजेस कनाल (उत्तर गंगेचा कालवा) या जिल्ह्यांतून जातो. या खाली इ. स. १९०३-०४ सालीं २२९ चौरस मैल जमीन भिजलीं जात होती. विहिरीच्या पाण्यानें सुमारें ५१५ चौरस मैल जमीन भिजली जात होती.

ख नि ज प दा र्थ. - कंकर, रस्त्यावरील खडी यांचा इमारतीकरतां उपयोगी होतो. सिकंद्रराव तहशिलींत क्षारापासून सोरा व कांच तयार करतात.

व्या पा र व उ द्यो ग धं दे.- सुती गालिचे येथें तयार होतात. इं. स. १९०४ सालापासून निळीचा व्यापार अजिबात बसला. त्यापूर्वी येथें निळीचे ७५ कारखाने असून ४५०० लोक काम करीत असत. येथून धान्य व कापूस बाहेर जातो. या जिल्ह्याचा व्यापार कानपूर, मुंबई व कलकत्ता या शहरांशीं फार आहे. येथें रेल्वेच्या सोयी चांगल्या व इतर रस्तेहि चांगले आहेत.

पूर्वी येथें दुष्काळ फार पडले. इ. स. १८३७ व १८७३-७४ चे दुष्काळ अति भयंकर होते. कालवे झाल्यापासून आतां दुष्काळांचें प्रमाण कमी झालें आहे.

कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, तहशिलदार वगैरे अधिकारी कारभार पाहतात.

इ. स. १८२४ सालापासून या जिल्ह्याच्या बाबतींत कांहीं फरक झाला नाहीं. जमीन महसूल २४.५ लाख रूपये आहे. या जिल्ह्यांत चार म्युनिसिपालिट्या आहेत.

त ह शी ल.- ( संयुक्त प्रांत. ) कोईल, अलीगड जिल्ह्यांतील उत्तरेकडील तहशील. उ. अ. २७० ४६’ ते २८० ८’ व पू. रे. ७७० ५५’ ते ७८० १७’. क्षेत्रफळ ३५८ चौरस मैल. लोकसंख्या ( १९११ ) २५७३४१. परगणे तीन आहेत ते:-कोईल, मोर्थल, बरोली. हे होत. तीन गावें व ३४२ खेडीं या तहशिलींत आहेत. तहशिलीच्या पूर्वेस काळी नदी असून ही तहशील फार सुपीक आहे. १९०३-०४ सालीं जमीनमहसूल, ४५७००० रूपये व इतर कर ७६००० रूपये. २४६ चौरस मैल जमीन लागवडीखालीं होती, पैकीं १६७ चौरस मैल बागाइति होती.

श ह र.- ( संयुक्त प्रांत. ) अलीगड जिल्ह्याचें व तहशिलाचें मुख्य ठिकाण. उ. अ. २७० ५३’ व पू रे. ७८० ४’ औध-रोहिलखंड रेल्वे व ईस्ट इंडियन रेल्वे यांचे हें जंक्शन आहे. शहराचें जुनें नाव कोईल अथवा कोल असून हें अलीगड रेल्वेच्या पूर्वेस वसलें आहे. लोकसंख्या ( १९११ ) ६४,८२५

इतिहास.- ( ‘अलीगड जिल्हा’ पहा. ) येथील किल्ल्यास महमदगड असें नाव सोळाव्या शतकात होतें. सन १७१७ च्या सुमारास साबितखान नामक सुभेदारानें साबितगड हें नांव या किल्ल्यास दिलें. पुडें १७५७ सालीं जाटांनीं त्याचें नांव रामगड असें ठेविलें. पुढें नजफखान याच्या हातांत हा किल्ला पडल्यावर त्यानें अलीगड असें नांव दिलें. इ. स. १८५७ च्या बंडांत येथील सैन्य समील झालें होतें. त्या वेळीं शहर लुटलें गेलें होतें. सुलतान नासिरूद्दीन यास मिळालेल्या विजयाप्रीत्यर्थ सन १२५३ सालीं बांधलेला स्तंभ सन १८६२ सालीं पाडण्यांत आला.

म्युनिसिपालिटीची स्थापना सन १८६५ सालीं झालीं. सन १९०३-०४ सालीं उत्पन्न ९५००० व खर्च एक लाख होता.

येथून धान्य, नीळ व कापूस बाहेर रवाना होतो. कांहीं किरकोळ भांडीं व वाळलेलें मांस येथून ब्रह्मदेशाला जातें. बरेचसे जिनिंगचे व कुलुपें करण्याचे कारखाने चालतात.

येथें दोन इस्पितळें, तीन चार हायस्कुलें व दुसर्‍या कांहीं शिक्षणसंस्था आहेत. मुसुलमानांचें एक विद्यापीठ आहे. येथे पुष्कळ दूरदूरचे विद्यार्थी शिक्षण घेण्यास येतात. ब्रह्मदेश, सोमालीलँड, इराण, बलुचिस्तान, अरेबिया, युगांडा, मारिशस, केप कॉलनी वगैरे ठिकाणचे विद्यार्थी येथे येतात, ‘अलीगड इन्स्टिट्यूट गॅझेट’ व हिंदी अभ्युदय’ पत्र येथें छापलें जातें,

यु नि व्ह र्सि टी.- सर सय्यद अतहमद यांच्या मनांतून पुष्कळ दिवसांपासून मुसुलमान समाजाला उच्च शिक्षण सुलभ रीतीनें घेतां यावें याकरितां कांहीं स्वतंत्र व्यवस्था करण्याचें होतें. १८७६ सालीं अलीगड येथें एक इंग्रजी शाळा स्थापिली गेली, तीन वर्षांनंतर तिचे कॉलेजांत रूपांतर झालें, या कॉलेजाचेंच अध्यापन व निवास यांशीं युक्त असें विश्वविद्यालय ( रेसिडेन्शियल ) करावें, अशी चळवळ गेल्या शतकाच्या शेवटीं शेवटीं सुरू झालीं. १९११ मध्यें मुस्लिम युनिव्हर्सिटी असोशिएशनची स्थापना होऊन जोराची खटपट करण्यात आली. १९२० सालीं अलीगड युनिव्हर्सिटी अँक्ट होऊन युनिव्हर्सिटी अस्तित्वात आली. ही युनिव्हर्सिटी प्रातिक सरकारच्या ताब्यांत नसून गव्हर्नर जनरलच्या देखरेखीखालीं चालते. अलाहाबादच्या हायकोर्टानें वकिलीकरितां या विद्यापीठाच्या पदवीधरानां मान्यता दिली आहे.

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .