विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलीगड, त ह शी ल. - (संयुक्त प्रांत), फरूकाबाद जिल्ह्याच्या ईशान्येकडील तहशील. उ. अ. २७० १४’ ते २७० ४०’ व पू, रे, ७०० ३२’ ते ७९० ४५’. क्षेत्रफळ. १८१ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) ८२७४२. एकंदर खेडी १०३. परगणे-मृतपूर, परमनगर, खाखटमाव. सन १९०३-४ सालीं जमिनीजे उप्पन्न. ११८००० व इतर कर १९००० रूपये होता, लागवडीखालीं क्षेत्र १११ चौरस मैल होतें. पावसाळ्यात फार पूर येतो.