विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अली मसजीद - (वायव्येकडील प्रांत) खायबर खिंडींतील खेड्याचें व किल्ल्याचें नांव. जमरूड आणि लंडीकोटल यांच्या दरम्यान अली मसजीद हें ठाणें आहे. याच्या सभोंवतालचा प्रदेश आफ्रिडी लोकांनीं व्यापला आहे. हा किल्ला या भागांतील इतर किल्ल्याप्रमाणें लहानसाच आहे.