प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

अलेक्झांडर दि ग्रेट ( उर्फ शिकंदर ख्रि. पू. ३५६-३२३ ) बा ळ प ण.-हा मॅसिडोनचा राजा दुसरा फिलिफ व एपिरोटची राजकन्या ऑलिंपियस हिचा मुलगा होय. त्याच्या बापाची व्यवहारचातुर्याबद्दल ख्याती आहे; पण त्याची आई मात्र अर्ध-सुसंस्कृत, चेटकी, तामसी स्वभावाची होती व ती मनोराज्यांत नेहमीं गर्क असे. अलेक्झांडरच्या लहानपणीं त्याच्या बापाच्या दरबारांत युध्दाविषयीं व राज्यकारस्थानांविषयीं अत्यंत महत्त्वाच्या उलाढाली चालू होत्या. ग्रीक संस्थानाचें आधिपत्य मॅसिडोनकडे घेऊन महान पराक्रम करून दाखविण्याच्या गोष्टींनीं वातावरण भरून गेलें होतें. एकंदर हेलेनिक संस्कृतीचा प्रत्यक्ष पुतळा जो आरिस्टॉटल त्याला अलेक्झांडरच्या १४ व्या वर्षी त्याचा शिक्षक नेमण्यांत आलें. तथापि तत्वज्ञानापेक्षा होमरच्या कल्पनांचा आरिस्टॉटलवर अधिक परिणाम झालेला असल्याचें त्याच्या समग्र चरित्रावरून दिसून येतें. शिवाय अलेक्झांडरचें शिक्षण केवळ पुस्तकी नव्हतें. फिलिफच्या दरबारांत येणार्‍या ग्रीक व पौरस्त्य वकिलांच्या सहवासानें जगांतील प्रत्यक्ष परिस्थितीचीहि त्याला ओळख होत गेली. एकदां बापाच्या गैरहजेरींत डोंगरी लोकांच्या टोळ्याचीं बंडें त्यानें मोडलीं होतीं. नंतर लवकरच कौटुंबिक कलह उत्पन्न झाले. फिलिफनें पहिली बायको सोडून देऊन क्लिओपाट्रा नावाच्या दुसर्‍या स्त्रीशीं विवाह केला. तेव्हां अलेक्झांडर आपल्या आईबरोबर बापाचें घर सोडून निघून गेला. पुढें अलेक्झांडरला सावत्र भाऊ झाला व त्याला राज्य मिळविण्याच्या मार्गांत अडचण उत्पन्न झाली. इतक्यांत ख्रि. पू. ३३६ मध्यें फिलिप मारला गेला. अलेक्झांडरवर त्याबद्दल संशय घेण्यांत आला होता. तथापि त्याच्या एकंदर चरित्रावरून असलें नीच कृत्य त्याच्या हातून घडलें असेल, असें म्हणवत नाहीं.

रा ज्या रो ह म व व र्च स्व स्था प न.- लष्करच्या अनुकूलतेनें अलेक्झांडर राज्यावर आला. त्यानें आपला सावत्र भाऊ व चुलत भाऊ यांनां मारून टाकविलें, व आपल्या बापानें आरंभिलेलें काम शेवटास नेण्याच्या तो उद्योगास लागला. हेलेन लोकांनीं त्याला आपला पुढारी म्हणून मान्य केलें. प्रथम भोंवतालच्या डोंगरी लोकांच्या टोळ्यांनीं केलेलीं बंडें त्यानें मोडलीं. नंतर पश्चिमेस दान्यूब नदीकडील प्रदेश त्यानें स्वारी करून जिंकून घेतला. इतक्यांत थीबी लोकांनीं बंड केले. पण तेहि त्यानें अचानक हल्ला करून मोडलें व त्यांची राजधानी जमीनदोस्त करून टाकिली. तेव्हां सर्व ग्रीसवर त्याचा दरारा बसून अथेनियनांसुध्दां सर्व ग्रीक लोकांनीं त्याला आशियांतील इराण वगैरे देशांवर स्वारी करण्याच्या कामीं मदत करण्याचें कबूल केलें.

द रा य स चा पा डा व.- ख्रि. पू. ३३४ मध्यें मॅसिडोनियन, इलिरियन, थ्रेसियन व इतर ग्रीक संस्थानांतील लोक यांच्या सुमारें ४०,००० सैन्यासह अलेक्झांडर आशियाच्या स्वारीवर निघाला. प्रथम तो ट्रॉयल गेला, तेथें त्यानें होमरच्या काव्यांतील मृतजीवांचा यथाविधि सन्मान केला; व नंतर पुढें निघाला. अलेक्झांडरला तोंड देण्याकरितां इराणच्या राजानेंहि आशियामायनरमध्यें सैन्य पाठविलें होतें. हें सैन्य अलेक्झांडरच्या सैन्यापेक्षां संख्येनें थोडें अधिक होतें असें म्हणतात. ग्रॅनिकसच्या तीरावर दोन्ही सैन्याची गांठ पडली. दोन्ही पक्षांतील घोडेस्वाराचें सायंकाळपर्यंत युध्द चाललें.सायंकाळच्या सुमारास अवशिष्ट इराणी सैन्यानें पळ काढिला व अशा रीतीनें सर्व आशियामायनगरमधील रस्ते अलेक्झांडरच्या ताब्यांत आले. त्यानें तेथील ग्रीक शहरांनां स्वतंत्र केलें; व बाकीच्या प्रांतांत आपले सुभेदार नेमून आपल्या नावानें राज्यकराभार सुरू केला. हा भाग काबीज करण्यास अलेक्झांडरला मुळींच प्रयास पडले नाहींत. कारण येथील ग्रीक शहरांचा ओढा मुळी त्याच्याकडेच असून जेथें शिबंदी ठेवून शहरांचे रक्षण केलेलें होतें तेथेंहि त्या शिबंदीत भाडोत्री ग्रीक शिपायांचाच विशेषत: भरणा होता. पुढल्या वर्षी त्यानें उत्तर फ्रिजियांतील गॉर्डियमचें राज्य जिंकून घेतलें. येथें तो असतांना प्राचीन फिजिअन राजा गार्डिअस याच्या रथावरील ‘गार्डियन नॉट’ याने तोडल्याबद्दलीची दंतकथा प्रसिध्द आहे.

 

येथपर्यंत हेलेस्पाटमध्यें आणलेल्या आपल्या आरमाराच्या मार्फत त्यानें स्वदेशाशीं दळणवळण चालू ठेविलें होतें, पण आतां तें आरमार त्यानें परत पाठविलें. त्याचा फायदा घेऊन इराणच्या आरमारानें ग्रीसवर हल्ला करण्याचा घाट घातला. तें संकट टाळण्याकरितां अलेक्झांडर सिरीयाचा किनारा जिंकून घेण्याच्या उद्योगास लागला. इतक्यांत सिरियामध्यें दरायस बादशहा मोठ्या सैन्यानिशीं लढाई देण्यास स्वत:आला. तेव्हां इसस येथें दोन सैन्यामध्यें मोठें युध्द झालें. ( ख्रि. पू. ३३३ त्यांत दरायसचा पराभव होऊन त्याचें सैन्य इराणाकडे धूम पळत सुटलें. दरायसचा जनाना अलेक्झाडरच्या हातीं सांपडला; पण अलेक्झांडरनें त्या वेळीं मोठें स्त्रीदाक्षिण्य दाखविलें. दरायस अर्धराज्य देऊन तह करण्यास तयार झाला, पण अलेक्झांडरनें सर्व साम्राज्य मागितलें. पुढें फिनिशिया घेण्याकरितां टायरला सात महिने वेढा घालून तें त्यानें घेतलें. नंतर गाझा घेऊन तो इजिप्तमध्यें शिरला, तेव्हां इराजच्या अंमलाखालून आपणांस स्वतंत्र करणारा म्हणून ईजिप्शियन लोकांनीं त्याचा सत्कारच केला. ख्रि. पू. ३३२-३१ चा हिंवाळा अलेक्झांडरनें इजिप्तमध्यें काढला.

तेथें त्यानें सुप्रसिध्द अलेक्झांड्रिया शहर वसविलें. याप्रमाणें भूमध्यसमुद्राचा सर्व पूर्व किनारा जिंकून त्यानें नंतर खुद्द इराणाकडे मोर्चा वळविला. ख्रि. पू. ३३१ सालीं सप्टेंबरच्या २० तारखेस अलेक्झांडरनें तैग्रीस नदी ओलांडली. तो मेसापोटेमियांतून पुढें आल्यावर गॉगमीलनजीक दरायसनें त्याशीं पुन्हां जंगी लढार्ह दिली. पण तीतहि पराभव पावून दरायस मीडियांत पळून गेला. या लढाईस गॉगमीलची लढाई किंवा लढाईच्या ठिकाणापासून ६० मैल असलेल्या आरबेला गांवावरून आरबेलाची लढाई असें नांव पडलें आहे. नंतर अलेक्झांडरनें इराणच्या साम्राज्यांतील अत्यंत संपन्न असा बाबिलोनिया हा प्रांत घेतला. पुढें त्यानें खुद्द इराणमध्यें शिरून राजधानीचें पर्सेपोलिस शहर लुटलें व तेथील राजवाडा जाळून टाकिला. क्सक्सींझनें पूर्वी ग्रीक देवालयें जाळिलीं होतीं त्याचा हा त्यानें सूड उगविला असें म्हणतात. पुढें यानंतर दरायस उत्तरेकडे पळ काडूं लागला त्याचा पाठलाग सुरू होऊन ही बादशहाची बादशहाकडून शिकारच सुरू झाली. सरते शेवटीं एके दिवशीं दरायस अलेक्झांडरच्या दृष्टिपथांत आला. यावेळीं दरायसबरोबर त्याचा चुलत भाऊ बेसम व कांहीं थोडकेसे सरदार यशिवाय कोणी राहिले नव्हते. अलेक्झांडरनें पाठोपाठ येऊन आतां दरायसला कैद करणार इतक्यांत दरायसच्या बरोबरच्या मंडळींनींच त्याला ठार मारलें व त्याचें प्रेत अलेक्झांडरच्या ताब्यांत दिलें. [ ( ख्रि. पू. ३३० चा उन्हाळा.) [बुध्दोत्तर जग पृ. ६४ व पुढील पानें पहा. ]

हिं दु स्था नां ती ल मो ही म.- नंतर कास्पियनकांठचा सर्व डोंगराळ प्रदेश जिंकून अलेक्झांडर कंदाहारकाबूलला गेला. आतां बहुतेक तो मॅसिडोनियन रितिरिवाज टाकून पौरस्त्य अरेरावी राजाप्रमाणें वागूं लागला होता. तो दरबारांत पर्शियन पोशाखानेंच येत असे. यामुळे बर्‍याच दिवसापासून त्याच्या पदरच्या मॅसिडोनी लोकांचीं मनें त्याच्याविषयीं कलुषित होत चाललीं होतीं. शेवटीं सीस्तानमध्यें प्रॉफथेशिया येथें घोडदळाचा कमांडर फिलोटास याला व इतर कित्येकांस राजाचा जीव घेण्याचा गुप्तकट केल्याच्या आरोपावरून फांशीं देण्याची पाळी आली. ख्रि. पू. ३२८ च्या वसंत ऋतूंत त्यानें हिंदूकुश ओलांडून बॅक्ट्रियाचा सर्व प्रदेश जिंकून घेतला. याच सुमारास त्याच्या सैन्यांत पुष्कळांनां गुप्तकटाच्या आरोपावरून ठार मारण्यांत आलें, व याच प्रदेशांत असतां ऑझक्टोअझची मुलगी रोक्झाना त्याच्या हातीं पडली. तिच्याबरोबर त्यानें विवाह लावला. तेथून हिंदुस्थानांत शिरत असतां काबुली पठाणांनीं त्याला हल्लीं इंग्रजांनां होतो याच प्रकारचा अतिशय त्रास दिला.

या वेळीं अलेक्झांडरनें विसा नांवाचा पवित्र डोंगर व डायोनायसच्या खुणा शोधून काढल्या असें म्हणतात. पुढें सिंधुनदीवर पूल बांधण्यांत येऊन अलेक्झांडरनें ससैन्य पंजाबांत अटकेच्यावर सोळा मैलांवर छावणी दिली. या प्रदेशावर तीन राज्यें होतीं. एक आंभीचें झेलमनदीवर, याची राजधानी तक्षशीला; दुसरें पोरस राजाचें राज्य चिनाबनदीकांठीं होतें; व तिसरें काश्मीरच्या बाजूस अभिसारांचें राज्य होतें ( राजतरंगिणी ग्रंथ पहा ). तक्षशिलेचा राजा व पोरस ह्यांचें शत्रुत्व होतें, म्हणून पोरसच्या विरूध्द आंभी आपणास मदत करतील अशी अलेक्झांडरची खात्री होती. तिसरे अभिसार लोक तटस्थच राहिले. शेवटीं चिनाबनदीवर समोरासमोर दोन्हीं सैन्यें आलीं. पोरसचें सैन्य मोठें असून त्यांत २०० हत्ती होते. पाऊस जोराचा पडला होता. अशा स्थितींत अलेक्झांडरनें हीं आशियांतील चवथी व शेवटची लढाई दिली. तींत मॅसिडोनियन सैन्याचें युध्दसामर्थ्य. सर्वांत अधिक कसास लागलें, पण शेवटीं अलेक्झांडरचाच जय झाला. पोरस राजा जखमी होऊन अलेक्झांडरच्या हातीं लागला. अलेक्झांडरनें त्याच्याशीं स्नेह करून पुढील मोहिमींत त्याची मदत घेतली. यानंतर रावी व बिआस नद्यांपर्यंत शत्रूंचा मोड करीत तो गेला. पण पुढें त्याच्या सैन्यानें जाण्याचें नाकारिलें. तेव्हां अलेक्झांडरचा मोठा हिरमोडा झाला. गंगाकांठचा व पुढील रमणीय प्रदेश जिंकून घ्यावा असें त्यांच्यां मनांत फार होतें; तीन दिवस त्याचा सैन्याशीं वाद विवाद होऊन अखेर हार खाऊन त्याला आपल्या सैन्याच्या इच्छेनुसार मागें परतावें लागलें. त्यानें जातांना सिंधूनदीच्या पूर्वेकडील प्रदेश पोरस वगैरे राजांनां परत दिला व पश्चिमेकडील मुलुखावर सर्वत्र आपले मॅसिडोनियन सुभेदार नेमले. नंतर सिंधूच्या मुखापर्यंत जाण्याकरिंतां तो निघाला. वाटेंत मल्लीनगर लागलें, पुढें मुसिकेनस, ऑक्झिकेनस व संबू या लोकांनीं एकत्र होऊन मॅसिडोनियन सैन्याचा प्रतिकार केला. या राष्ट्रकार्याला मूळ उठावणी ब्राह्मणांनीं दिली होती. तथापि शेवटीं अलेक्झांडरच्या पराक्रमी सैन्यापुढें त्यांनां नेमावें लागले.

स्व दे शा क डे कू च व मृ त्यु.- नंतर सिंधूच्या मुखापासून इराणच्या आखातापर्यंतचा जलमार्ग शोधण्याकरितां त्यानें एक आरमारी ताफा रवाना करून स्वत: तो ससैन्य बलुचिस्तानामधून परत येण्यास निघाला. रासमलन, पास्नीपर्यंत तो आला; तेथें कडक उन्हाळ्यानें त्याच्या सैन्याचे पार हाल झाले. पुढें गेड्रेसिआहून तो कार्मेनियांत गेला. तेथें त्याचें आरमारी लोक व काटेरॉसच्या हाताखालील सैन्य त्यास येऊन मिळालें. या जिंकलेल्या प्रांतांत त्यानें नेमलेल्या सुभेदारांनीं त्याच्या गैरहजीरींत अयोग्य वर्तणूक केली होती, करितां त्यांनां काढून दुसरे चांगले सुभेदार त्यानें नेमिले. त्यानें पौरस्त्य व मॅसिडोनियन लोक यांचा मिश्रसमाज बनविण्याच्या हेतूनें मिश्रविवाह सुरू केले. स्वत:त्यानें इराणच्या दोन राजकन्यांशीं विवाह लावला व आपल्या सेनापतींना इतर राजकन्यांशीं विवाह करण्यास लावून सामान्य सैनिकानां आशियांतील बायका करण्यास उत्तेजन दिल. तथापि मॅसिडोनियन सैन्यांत असंतोष पसरलेला होताच, आणि ख्रि. पू. ३२४ मध्यें मीडियाप्रांतांत तो असतां एक बंडहि झालें. तेव्हां आपल्या लोकांस हाकून देऊन पौरस्त्य लोकांचें नवें सैन्य उभारण्याचा त्यानें धाक घातला. व बंड मिटविलें ख्रि. पू. ३२३ मध्यें तो बाबिलोनला पोंचला [ अलेक्झांडरच्या स्वारीच्या मार्गासाठीं बुध्दोत्तरजग पृ. ६१ समोरील नकाशा पहा ]. बाबिलोन येथें पृथ्वविरील दूरदूरच्या  अनेक ज्ञात ठिकाणच्या राजाचे वकील या अलौकिक अलेक्झाडर बादशहाच्या दरबारीं आले होते. पुष्कळ राजे त्याच्या पराक्रमामुळें थक्क होऊन गेले होते व कित्येक घाबरले होते हें खरें आहे. रोमहूनहि वकील आले होते असें जें म्हणतात तें संशयित आहे. त्यानें बाबिलोनपासून अरबस्तानला वळसा घालून जलमार्गाने इजिप्तबरोबर दळणवळण सुरू केले. व पुढें सैन्यांत सुधारणा केल्यावर त्यानें पुढें कूट करण्याचा दिवस ठरविला. त्याच्या आधीं दोन दिवस त्यानें आपल्या प्रिय मेडियसच्या घरीं यथेच्छ सुरापानांत घालविले. तिसर्‍या दिवशीं त्याला ताप आला. दहा दिवसांनीं त्याची वाचा बंद झाली आणि ख्रि. पू. ३२३ जून २८ रोजीं त्याचें प्राणोत्कमण झालें. थोड्या महिन्यांनीं त्याच्या राणीला एगस नांवाचा मुलगा झाला. पण पुढें तीं दोघें मायलेक कॅसँडरच्या हातीं पडून मारलीं गेलीं.

स्व भा व व धो र ण.- अलेक्झांडरचा स्वभाव व धोरण यांबद्दल फार मतभेद आहे. त्याच्या अंगीं दांडगें धैर्य, विलक्षण उत्साह, व तीव्र कल्पनाशक्ति होती याबद्दल मतभेद नाहीं. तो युध्दकलेंत निपुण होता हें त्याच्या निंदकांनांहि कबूल आहे. पण ह्याबद्दल देखील मतभेद आहेच. त्याचे खरे बेत काय होते त्याबद्दल एकावाक्यता नाहीं. कोणी म्हणतात. सर्व जग जिंकावें व सर्वांनीं आपल्याला देवाप्रमाणें भजावें, अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. परंतु नीसे नांवाचा ग्रंथकार म्हणतो कीं, फक्त इराणचेंच साम्राज्य जिंकण्याचा त्याचा बेत होता, व देवपणाला पोहोंचण्याची आकांक्षा धरण्याच्या त्याच्या विषयींच्या गोष्टी साफ खोट्या व कल्पित आहेत. ग्रीक लोक व पौरस्त्य लोक यांचा मिक्षसमाज बनविण्याच्या त्याच्या धोरणावरहि निरनिराळ्या प्रकारचीं मतें पडलीं आहेत.

त्याचे पुतळे व वर्णनें यांवरून त्याचें शरीरमानहि कळतें. त्याचें शरीर चांगलें कमावलेलें असून तो मध्यम उंचीचा, गोरा व तांबूस वर्णाचा होता. त्याच्या डोळ्यांतील चमक दिपविणारी होती व कपाळाच्या वरच्या बाजूस सिंहासारखे केस होते. पुढें पुढें तो साफ हजामत करूं लागला; व ती पध्दत त्यानें ग्रीकोरोमन लोकांत पाडली व पुढें ती ५०० वर्षें चालू होती.

अदभुतरसपूर्ण असें वाङ्मय अलेक्झांडरच्या चरित्रावर पुष्कळ झालेलें आहे. तथापि खुद्द हिंदुस्थान व इराण यांत त्याची आठवण पांच शतकानंतर बहुतेक बुजून गेली व पवित्र ग्रंथ जाळणारा असुर येवढीच कल्पना त्याच्याबद्दल अवशिष्ट राहिली. या भागांबाहेर मात्र हिंदीमहासागरापासून तों अटलाटिकमहासागरापर्यंत सर्व देशांतील भाषांत त्याच्या विषयीं गोष्टीं रचल्या गेल्या आहेत. अलीकडे इंग्लिश, फ्रेंच, जर्मन व इतर यूरोपीय भाषांत त्याच्याविषयीं ग्रंथ झालें आहेत.

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .