विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलेक्झान्डर्सबाद.- बव्हेरियाच्या राज्यांतील जर्मनीचें एक आरोग्यकारक ठिकाण हें समुद्रसपाटिपासून १९०० फूट उंचीवर एका फारच मनोहर ठिकाणीं वसलेलें आहे. लोकसंख्या (१९०५) १२००. येथील पाण्यांत लोहांश असून बराच कर्बाम्ल वायु (कार्बानिक ऑसिड गॅस) हिविद्रुत झालेला असतो. तें मज्जाविकारांवर व संधिवातावर गुणकारी समजलें जातें. या गांवाच्या आसमंतात लुइसेन्बर्ग नांवाची वज्रंतुड (ग्रानाइट) खडकाची बनलेली एक टेंकडी आहे. तिच्यावरून सभोंतालच्या प्रांताचा देखावा फारच बहारीचा दिसतो.