प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

अल्क अथवा अल्कली - अल्क पदार्थांचे विशिष्ट गुणधर्म म्हटले म्हणजे ते पाण्यात विरघळतात, अम्लाचें निर्गुणीकरण करतात, सेंद्रिय पदार्थास जाळतात व लिटमस सारख्या वनस्पतिक रंगास पालटवून टाकतात. या लेखात हिंदुस्थानात जीं सापडतात व ज्याचा या देशांतील शेतीवर परिणाम होतो अशाच काहीं थोड्याशा अल्कद्रव्याचा सामान्यत: विचार करावयाचा आहे.

१ अ म्न ( अ मो नि या ) व त ज्ज न्य क्षा र.- हें अल्कली द्रव्य यूरोप व अमेरिका येथे वायुद्रव्य,” ( गॅसलिकर ) “अस्थिद्रव” ( बोनलिकर ) व ज्वालामुखी पर्वतांवरील क्षार यांपासून तयार होतें, पण हिंदुस्थानांत हे पदार्थ पुरेसे सांपडणें कठिण असल्यामुळें हें द्रव्य इकडे तयार करीत नाहींत.

अमोनियापासून तयार केलेले पदार्थ.- (अ) ( अम्नद्रव लिकर अमोनिया ) या “मद्यार्कयुक्त अमोनिया” चा औषधाकरितां व राळ आणि इतर वनस्पतिजन्य पदार्थ द्रववून वारनिशें व अमोनियायुक्त टिंक्चरें करण्याकरितां उपयोग करतात. उदाहरणार्थ, आल्याचा अर्क. (आ) नवसागर म्हणजे अमोनियाचें हरिद याजपासून अमोनियाचे दुसरे क्षार तयार करतात. कल्हई लावण्यास व विद्युदुत्पादक घटांत हें घालण्याकरितां उपयोगी पडतें. (इ) गंधकित ( सल्फेट ) याचा खताकरितां उपयोग करतात. (ई) कर्बित, ( कार्बोनेट ), गंधकिद (सल्फाइट), स्फुरित
(फॉस्फेट) व स्तंभिद ( ब्रोमाइड ) हीं सर्व द्रव्यें कला व उद्योगधंदे यांत अत्यंत उपयोगी पडतात. हिंदुस्थानांत हीं द्रव्यें परदेशांतून येतात.

२ खा र अ थ वा अ शु ध्द पा ला श क र्बि त. - दाहक पालाश ( कॉस्टिक पोटॅश ) मुख्यत्वें करून यापासूनच काढतात. अशुध्द कर्बिताला इंग्रजींत पोटॅशेस अथवा पर्ल अँश म्हणतात. इतर नावें-बंगाली-सर्तिका, हिंदुस्थानी जोनखार किंवा इवक-चार, संस्कृत-यवक्षार. यांशिवाय दुसरीं नावें आहेत तीं-झार-का-नमक-झाडीचें-मीठ, मारा वप्पु, मनुवप्पु, बुदिद्रेवप्पु, कारम वगैरे.

यूरोपमध्यें हा माल तयार करण्याकरितां लागणारा कच्चा माल पर्लअँश किंवा काष्टभस्म ( वुडअँश ) असून हे पदार्थ अमेरिका, कानडा व रशिया या देशातून आणीत असत. अधिक शास्त्रीय पण कमी वाया जाणार्‍या पदार्थांचा उपयोग होऊं लागल्यामुळें पर्लअँशची पैदास कमी होऊं लागली आहे.

क्षार तयार करण्याची क्रिया. - दाहक पालाश सामान्यत: कर्बितापासून काढतात. कर्बित ज्या द्रव्यापासून तयार करतात तीं द्रव्यें येणेंप्रमाणें:-

(१) वनस्पतीची राख (२) जमीन, (३) पालाशगंधकित (४) मेंढीची धर्मयुक्त लोंकर व (५) बीचच्या मुळाचे पालाश क्षारशेष.

रॉक्सबर्गच्या मतें हिंदुस्थानांतील सर्व जंगलाचा पालाश करण्याकरिता उपयोग करण्यासारखा आहे. पाऊस कमी असल्यामुळें व उष्णता अतिशय असल्यामुळे हा धंदा चांगल्या प्रकारें चालविता येईल असें तो म्हणतो. काष्टभरम ( पर्लअँश ) तयार करण्याकरितां हिंदी जंगल आजपर्यंत कधींच जाळण्यात आलें नाहीं. मोठ्या झाडापेक्षा झुडुपांत व त्यांतहि कोंवळ्या झुडुपांत हें द्रव्य अधिक असतें.

पाइन झाडाच्या १००० भागांत. ४५ भाग, ओक झाडांत.७५. द्राक्षाच्या वेलींत ५.५०, साध्या गवतांत ५.८, फर्न मध्यें ४.२५ ते ६.२६ पर्यंत हा क्षार ( पोटॅश ) असतो. हिंदी धान्याच्या गवतापासून तो १७.५ गव्हाच्या गवतापासून ( कणसें लागण्यापूर्वी )’ ४७ व कडूदवणा ( वर्मवुड ) या झाडापासून ७३ भाग निघतो. यावरून या वनस्पती काष्ठभस्माकरितां अत्यन्त उपयोगी आहेत असें दिसून येतें. अलीकडे बीटरूट ( चुकंदर ) पासून साखर काढण्याचा धंदा वाढला असल्यामुळें पालाशकर्बित हें आडउत्पन्ना ( बाय प्रॉडक्ट ) दाखल तयार करण्यास हरकत नाहीं.

 

क्षारोत्पादक वनस्पती. - काष्ठभस्म तयार करण्याकरितां पुढील वनस्पतींचा उपयोग करण्यांत येतो. आघाडा ( अँचिरान्थेस अस्पेरा ), आडुळसा ( अधतोदा वासिका ), सातवीण किंवा सप्तवर्णीं ( अलस्टोनिया स्कोलॅरिस ), कांटेमाठ ( अँमॅरॅन्टस स्पिनोसस ), बाबू स्पि., ताड ( बोरॅसस फ्लॅबेलिफर ), पळस ( बुटी फॉन्डोसा ), ( सीसॅल्पिनिया बॉन्डुसेला ), मांदार किंवा रूई
(कॅलोट्रोपिस जायगॅन्टी ),बाहवा किंवा गिरमाळा ( कॅसिया फिश्चुला ), देवदार, पांगारा ( इरिथ्रिना इंडिका ), निवडुंग युपोर्बिया नेरिफोलिया, शेर अथवा थोर युफोर्बिया तिरूकल्ली, शिवण (ग्मेलिना आरबोरी ), पांढरा कुडा ( होलॅर्‍हेना अँन्टिडिसेंटरिका ), जव ( हॉर्डियम व्हल्गेर ), नीळ किंवा गुळी ( इंडिगो फेरा टिंक्टोरिया ), दोडका लुफा इजिप्टिआका ), केळ ( मुसा सॉपिएन्टम), कण्हेर नेरियम ओडोरम, पेनिसेटम टॉयफोयडियम, चित्रक ( प्लबॅगो झेलॅनिका ), करंज ( पोगॅमिया ग्लॅब्रा ), शाल किंवा शालपर्णी ( शोरी रोबस्टा ), स्टिरिओस्पेर्मम सुआव्हेओलेन्स, लोध्र किंवा हुरा ( सिस्प्लोकॉस रेसमोसा ) बेहेडा (टर्मिनालिया बेलेरिका), व्हॅलॅरिस हेनी आणि कात्री किंवा निर्गुंडी ( व्हिटेक्स निगंडो ).

वरील झाडापासून काढलेल्या अशुध्द भस्मापासूनच हिंदुस्थानांत पालाश काढून त्याचा कला, शास्त्रीय प्रयोग व औषधें यांजकडे उपयोग करतात.

उपयोग :- साबण, कांच, रंग, वगैरे कामांकरितां यांचा उपयोग होतो. यूरोपमध्यें कांहीं प्रकारचे साबण करण्याकरितां दाहक पालाशची मागणी असते. त्याचप्रमाणें पालाशकांच (पोटॅश ग्लास) करण्याकरितां व लालतुकीं ( टर्की रेड ) व आर्नोट्टो बिक्सा ऑरेल्ला हे रंग देतांना याचा कोणत्या तरी स्वरूपांत उपयोग होतो. गढवालमध्यें यांत खळ देण्यापूर्वी सणाचे तंतू उकळतात. हिंदुस्थानांत अशुध्द पालाशकर्बिताचा उपयोग कल्पानातीत होतो चांगल्या वनस्पतींची निवड व काष्ठभस्म तयार करण्याच्या पध्दतींत सुधारणा या दोन गोष्टी अत्यन्त महत्त्वाच्या आहेत. हिंदुस्थानांतील डोंगराळ प्रदेशाचा बराचसा भाग कडू दवणा ( वर्म वूड ) उर्फ आर्टेमिसिआ या जातीच्या झाडांनीं व्यापलेला असून या झाडांच्या राखेचा खतापलीकडे दुसरा कोणताच उपयोग करीत नाहींत. यांत पालाशाच्या कर्बिताचें प्रमाण बरेंच असल्यामुळें नवीन धंदा म्हणून यांपासून काष्ठभस्म काढण्यास समशीतोष्ण प्रदेशांतील लोकांस उत्तेजन देण्यास कोणतीच हरकत नाहीं; मुंबईकडे विशेषत: जेथें पाऊस बराच पडतो अशा प्रदेशांत निराळीच पध्दति अस्तित्वांत आहे. या भागांत लांकूड, झाडांच्या फांद्या व शेण जमिनींत पुरतात व त्यावर मातीचा पातळ थर करून तें पेटवून देतात. या पध्दतीमुळें मातींत राख मिसळली जाते व राखेंत अशुध्द पालशकर्बितच जास्त असतो. पोटॅशचा म्हणजे अशुध्द पालाशकर्बिताचा खताकडे उपयोग प्रसिध्दच आहे. उत्तम प्रकारचें भात प्रथम भाजलेल्या जमिनींत पेरून रोप उगवल्यावर दुसरीकडे लावावें लागतें.

३ पा ला श न त्रि त - यास इंग्रजींत पोटॅशियम नायट्रेट अथवा साल्टपेटर म्हणतात. (सोरा पहा.)

४ सिं धु व त्या चे सं यु क्त प दा र्थ, सिंधुकर्बित. - सिंधु यास इंग्रजींत सोडियम म्हणतात. वास्तविकपणें पहातां धातूच्या फक्त प्राणिदास ( ऑक्साइडला )च सोडा असें नांव आहे, पण उत्प्राणिद ( हायड्रोक्साईड ) व कर्बितें यांनांहि सोडाच म्हणण्याचा प्रघात पाडला आहे. कर्बित हें द्रव्य नुसतें व्यापारीदृष्ट्याच महत्त्वाचें नसून त्यापासून दुसरे अनेक प्रकारचे सिंधुक्षार तयार करतात.

सिंधूच्या क्षारांत सिंधुकर्बित हा महत्त्वाचा क्षार आहे. हा निसर्गत: विपुल सांपडतो. हा सामान्यत: सर्वांत मुबलक व शेतकीदृष्ट्या जमिनींतील सिंधुक्षारांपैकीं सर्वांत अधिक हानिकारक आहे.

सज्जीमाती ( रेह किंवा रेज ), य पदार्थापासून हें द्रव्य वेगळें काढून व्यापाराकरितां शुध्द करतां येतें. यापासून एक प्रकारचा अशुध्दक्षार तयार होतो व त्याचा उपयोग विशिष्ट प्रकारचीं अल्कें करण्याकरितां किंवा कांच, साबण व इतर व्यापाराच्या वस्तूंकडे करतां येतो. वर्‍हाडांतील लोणारच्या सरोवराप्रमाणेंच इतर सरोवरांतील खार्‍या पाण्यापासून शुध्द सिंधुकर्बित हें द्रव्य काढतां येईल.

कृति: - पूर्वी यूरोपमध्यें केल्प व बॅरिला या सगरज वनस्पतीपासून सिंदुकर्बित हें द्रव्य काढींत असत; या वनस्पतीच्या राखेपासून चांगल्या प्रकारचा सोडा निघतो. स्पेन बरोबर झालेल्या युध्दामुळें बेरिल्ला वनस्पतीचा नियमितपणें पुरवठा होईना, त्यावेळीं फ्रेंच लोकांनां हें द्रव्य तयार करण्याचे नवीन मार्ग शोधून काढणें भाग पडल्यामुळेंच कृत्रिम सोडा तयार करण्याची लेब्लांकची कृति निघाली. त्यानें साध्या मिठापासून सिंधुकर्बित करण्याचा सनदी हक्क (पेटन्ट) १७९२ सालीं मिळविला. या शोधामुळें यूरोपमधील रासायनिक उद्योगधंद्यांत क्रान्ति घडून आली.

या समुद्रांतील वनस्पतींच्या राखेचा आजकाल सोड्यापेक्षां काष्ठभस्म ( पोटॅश ) काढण्याकरितां जास्त उपयोग करतात; व केल्प हे सामान्यत: वरील अल्कांच्या ऐवजी अद ( आयोडिन ) तयार करण्याचें द्रव्य म्हणून प्रसिध्द आहे. सिसिलींतील महाग गंधकाऐवजीं माक्षिक ( पायराइट ) या गंधकिदापासून गंधकाम्ल काढूं लागले, तेव्हां सोडा करण्याचा धंदा आर्थिक दृष्ट्या अधिक फायदेशीर होऊं लागला. हिंदुस्थानांत विपुल सांपडणार्‍या ताम्रमाक्षिक ( कॉपर पायराइट ) या गंधकिदापासूनहि तांबें व गंधकाम्ल काढण्याचा कारखाना सुरू केल्यास पुष्कळ फायदा होण्याचा संभव आहे.

चांगल्या प्रकारच्या काचेकरितां व दुसर्‍या कांहीं किरकोळ कामांकरितां शुध्द सोडा ( कर्बित ) लागतो.

या करितां राख ऊन पाण्यांत पुन्हां विरघळवावी, व खालीं बसूं द्यावी, मग तें मिश्रण उकळूं द्यावें व पुन्हां भट्टीवर ठेवावे म्हणजे शुध्द कर्बित तयार होतें. सांड्याचे स्फटिक हे विशिष्ट कृतीनें केलेले असून त्यांत दहा भाग पाणी संयुक्त स्थितींत असते.

सिंधुकर्बिताचे उपयोग:-पदार्थ साफ करणें, कपडे धुणें, रंग काढणें वगैरे कामाकरितां अजूनहि करण्यांत येतात. सिंधुकर्बितापासून सिंधुद्विकर्बित व दाहकसिंधु हीं दोन द्रव्यें तयार करतात.

५ रे ह अ थ वा स ज्जी म ट्टी ( सज्जा माती ) : - हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व प्रांतांत सज्जी मातीचा खार फुटून जमिनीच्या पृष्ठावर येतो त्यांत सज्जी ( सिंधुकर्बित ) खारी ( सिंधु गंधकित ) मीठ ( सिंधु हरिद ), याचें मिश्रण असतें असें म्हणण्यास हरकत नाहीं. बहुतेक प्रदेशांत विशेषें करून सज्जी ( कर्बित ) व इतर प्रदेशांत खारी ( गंधकित ) आढळते; गंधकित हें पुष्कळ वेळां पालाशनत्रित ( पोटॅशियम नाइट्रेट ) किंवा खटनत्रित ( कॅलशियम नायट्रेट ) बरोबरहि संलग्न झालेलें असतें. विद्राव्य अल्कद्रव्ययुक्त अशा जमिनीस उसर, भाडी, रेहाल, रहार, रेह, कलाट ( काल्ल ) अशीं नांवें आहेत. ज्याप्रमाणें खारी या नांवानें ज्या जमिनींत गंधकित असतें अशा जमिनीचा बोध होतो त्याप्रमाणें हीं नांवें क्वचित् प्रसंगीं साधें मीठ असलेल्या जमिनीस लावतात. उसर जमिनीवर केलेल्या प्रयोगांवरून गंधकित असतें असें आढळून आलें. व्होएलकरचें मत असें कीं, रेह जमिनींत मुख्यत:अशुध्द सिंधु कर्बित व गंधकित, साधें मीठ, व खट ( कॅलशियम ) आणि मग्न ( मॅग्नेशियम ) यांचे क्षार आळतात.

सिंधु व पालाश यांच्या नत्रितांचें अस्तित्त्व पुष्कळ वेळां अपायकारक मानण्याऐवजीं पायदेशीरच मानतात. कांहीं जमिनींत खार इतका आढळतो कीं त्यामुळें पुष्कळ जमीन पडीत पडते. कांहीं ठिकाणीं खार जमिनीवर येऊन जमीन पांढरी दिसते परंतु इतर ठिकाणीं तो वर दिसत नाहीं; तरी जमिनीचा सुपीकपणा कमी करण्यास तो पुरेसा असतो. कपडे छाटण्याच्या खार्‍यामातील ( फुल्लर्स अर्थ ) चुकीनें सज्जी माती असें म्हणतात; परंतु तींत सोडा मुळींच नसतो.

उसरची उत्पत्ति : - जमिनीवर खार कसे उत्पन्न होतात यासंबंधी निरनिराळीं मतें आहेत. जमिनीवरील खाराचा पहिला उल्लेख स्लीमननें केला आहे. त्याचें मत आधुनिक मतांहून फारसें भिन्न नाहीं. रॉईल यानें यासंबंधीं कांहीं उल्लेख केला नाहीं ही आश्चर्याची गोष्ट आहे. यमुनानदीच्या पश्चिम कालव्याच्या बाजूच्या जमिनींत खार उत्पन्न होऊन ती शेतीला निरूपयोगी झाल्यामुळें खार कसा तयार होतो व कालव्याशीं त्याचा कांहीं संबंध आहे कीं काय हें पाहाण्याकरितां १८७६ सालीं एक कमिशन बसलें होतें. त्या कमिशनच्या रिपोर्टांत पुढील माहिती आढळते-: वनस्पतीची वाढ व नांगरटीमुळें जमिनींतील द्रव्याचें विघटन होऊन क्षार तयार होतात. सिकितांवर ( सिलिकेट ) उष्णता, हवा, पाणी व कर्बाम्ल यांचें कर्य होऊन त्यांचें पृथक्करण होतें व पुनर्रचना होतांना अल्कयुक्त क्षार बनतात. जमीन सुपीक करीत असतांना किंवा तिची सुपीकता टिकवीत असतांना इतर द्रव्यांची वाढ होत जाते तेव्हां सिंधुकर्बित हें द्रव्य नाश पावतें. चुना असतांना ही गोष्ट विशेषेंकरून दिसून येते. बहुतेक सर्व सुपीक जमिनींत कर्बितांचें शेंकडा प्रमाण कमी सांपडतें. चांगल्या जमिनींत द्रवणशील सिंधुक्षारांचें प्रमाण शेंकडा १. पेक्षां क्वचितच जास्त असतें. व ह्या पैकीं निम्में कर्बित असतें. धान्याचें पीक शेंकडा.१ सिंधुकर्बित असणार्‍या जमिनींत येऊं शकतें. याचे प्रमाण जर शेंकडा. २ असलें तर पिकांचा नाश जरी झाला नाहीं तरी तें द्रव्य अपायकारक होतें. कांहीं खार्‍या वनस्पतींस मात्र हें अपायकारक होत नाहीं कित्येक वेळां जमिनीच्या पृष्ठभांगावरील थरांत शेंकडा २ ते ६ किंवा याहून जास्त क्षार असतो. पवसाच्या किंवा पाटाच्या पाण्यानें हीं पाण्यांत विरघळणारीं अल्कें खालील जमिनींत जातात. व त्यांपैकीं कांहीं भाग एखाद्या वेळीं रहातो. जेथें पाणी खालीं जाणें कठिण असतें तेथें पृष्ठभाग नुसता धुवून निघाला तरी त्यापासून तात्पुरता फायदा होतो. यासाठीं चर किंवा खळगे खोदून ठेवतात; पृष्ठभागावरील पाण्यांत हीं अल्कें विरघळतात व पाण्याबरोबर तीं या खळग्यांत येऊन पडतात. यामुळें उंच जमिनींत अल्क कमी प्रमाणांत राहतें. जमिनींतून पाणी खालीं जात नसल्यास केव्हां केव्हां मोठें नुकसान होण्याचा संभव आहे. उदाहरणार्थ, ( १ ) मधूनमधून येणारे उष्ण वारे, ( २ ) जमीनीवर झाडें वगैरे आच्छादनाचा अभाव असणें, व ( ३ ) नांगरण्याची दोषी पध्दति, उदा. जोराचा पाऊस पडत असतानां वरवर नांगरणें यांस ( अ ) जमिनीतील मूळ द्रव्याचें रासायनिक गुणधर्म, ( आ ) जमीनीची नैसर्गिक स्थिति ( उदाहरणार्थ पुष्कळ माती-विपुल वाळू किंवा चुना वगैरे ) व ( इ ) जमीन तयार होत असतांना व नंतर अगणित काळांत पाणयाच्या झालेल्या परिणामामुळें ( अ ) व ( आ ) ची आकस्मित अनियमितपणें झालेली वाटणी या तीन गोष्टींची मदत होऊन रेहचे धातुक थर बनतात.

अभिसरण व केशाकर्षण यांमुळें होणारी क्रिया: - पहिल्याप्रथम क्षार जमिनींत पसरतात व नंतर केशाकर्षण होऊन ते पृष्ठभागावर येतात. पाणी बाहेर काढून देण्याची नीट व्यवस्था नसणें व पृष्ठभागावरील ओलावा लवकरच वाळणें यांमुळें ही क्रिया होण्यास संधि मिळते.

खत व नांगरटी : - डॉ. ब्राउन यानें रेह जमिनींत खत म्हणून चुन्यांच्या क्षारांचा उपयोग करण्याच्या बाबतींत शोध लावला. ज्यावेळीं अपायकारक गंधकितें व कर्बितें चुन्याच्या कोणत्याहि विरघळणार्‍या क्षारांत मिसळतात ( उदाहरणार्थ चुन्याचें नत्रित ) त्यावेळीं पृथक्करण होऊन चुन्याचें कर्बित व गंधकित होत असतांना सिंधुनत्रित तयार होतें. चुन्याचें कर्बित पाण्यांत विरघळत नाहीं व तें वनस्पतीस अपायकारकहि नाहीं. सोड्याचे व चुन्याचें नत्रित ( सिंधु व खटनत्रित ) यापासून वनस्पतींस नत्राचा पुरवठा करण्याच्या कामीं ते फायदेशीर होतात सिंधु नत्रितामुळें क्षाराचें पृथक्करण होऊन खटगंधकित हवेंतून अम्न घेतें व त्यावेळीं नत्र तयार होतो. सिधुकर्बित सेंद्रिय द्रव्याचा या द्रव्याशीं संयोग होऊन खटनत्रित तयार होते. डॉ. ब्राउन यानें रूईच्या ( कॉलोट्रॉपिस जायगॅन्टी ) झाडाचा शेतांतील खत व हिरवे खत म्हणून उपयोग करतां येतो असा शोध लावला; कारण यांतील नत्राचा चुन्याशीं ( हा चुना काळ्या जमिनींत असतो ) संयोग होऊन सिंधुकर्बित हा निरूपद्रवी पदार्थ बनतो. सेन्टर यास खटनत्रितासंबंधीचें ब्राउनचें म्हणणें मान्य आहे. उसर जमिनींतील सिंधुकर्बित हें द्रव्य निरूपद्रवी करण्यास खटगंधकित ( जिप्सम ) उपयोगी पडतें अशी पुढें लवकरच प्रसिध्दि झाली. रेह जमिनींत जर सिंधुगंधकित असलें तर खटगंधकितापासून फायदा होण्याच्या ऐवजीं तोटाच होण्याचा अधिक संभव आहे. निरनिराळ्या वनस्पतींची कुंड्यांत लागवड करून त्यावर अनेक प्रयोग करून लेदर यानें इतर कोणत्याहि सिंधुक्षारांपेक्षां सिंधुकर्बित वनस्पतीस अधिक अपायकारक आहे असें सिध्द केलें. वनस्पतींवर अपायकारक रासायनिक परिणाम करणार्‍या सिंधुकर्बित या द्रव्याचे गुणधर्म दाखविणारा प्रयोग त्याच्या शोधांत अत्यन्त बोधप्रद आहे. कित्येक प्रकारची माती पाण्याबरोबर गाळतां येत नाहीं. फडक्यांतून थोडेसें गढूळ पाणी खालीं पडतें पण लवकरच या फडक्यावर मातीचा थर बसतो व नंतर पाणी गळेनासें होतें. ज्या मातींत सिंधुकर्बित विशेषेंकरून असतें त्या मातीचा असा गुणधर्म दिसून येतो. यावर उपाय म्हणून प्रयोग करून पाहिले तेव्हां असें दिसून आलें कीं, पांढर्‍या अल्काचें काळ्या अल्कांत रूपान्तर करणें व मातींतील न गाळण्याचा दोष काढून टाकणें, या दोन गुणांमुळें ‘उसर’ जमीन लागवडीस योग्य करण्याकरितां रासायनिक खत म्हणून कुलनार ( जिप्सम ) द्रव्याची प्रसिध्दि झाली आहे. हवेच्या व मातीच्या परिस्थितीमुळें जर रेहमध्यें सिंधुकर्बित असलें तर त्यामुळें ज्यांतून पाणी गळणार नाहीं असा मातीचा थर अवश्य तयार होईल. या जलरक्षक थराची दृष्टिगोचर होण्याइतकी वाढ झाली नसली तरी तो जर पृष्ठभागावर असला तर लवकरच क्षारांचा कठिण थर दिसून येईल; रासायनिक घटनेंप्रमाणेंच जमिनीच्या स्वाभाविक स्थितींतहि बदल होणें अत्यन्त अवश्य आहे.

यांवरून असें दिसून येतें कीं, या कांही विरघळणार्‍या खट ( चुन्याच्या ) क्षारांचे जमिनीवर रासायनिक प्रयोग केल्याशिवाय किंवा झाडें लावण्याकरितां खोल खड्डा खणून त्यांत दुसरी माती भरली असल्याशिवाय, या अच्छिद्र थराच्या खालून पाणी बाहेर घालविण्याची अपेक्षा करणें व्यर्थ आहे.

झाडें चांगलीं लागल्यास त्यांच्याजवळ इतर वनस्पतीची चांगली लागवड होते, असें जें म्हणतात, याचें असें कारण असावें कीं, झाडाकरितां खोदलेल्या खड्ड्यांचा, पृष्ठभागावरील विरघळणारे क्षार वाहून नेणार्‍या पाण्यास मार्ग म्हणून उपयोग होत असावा.

कर्बिताचा दुष्परिणाम नाहींसा करण्यास त्याच्या निर्गुणीकरणास आवश्यक असलेलें ठराविक वजनाचें कुलनार ( =जिपिप्सम=खटगंधकित ) सगळेंच्या सगळें खत म्हणून घालण्याची जरूर नाहीं. कारण एक तर पाण्याशिवाय कुलनार निरूपयोगी असतें व जेथें कर्बित नसेल तेथें तें अनवश्यकच असतें. त्याचा फायदा जमिमींतून पाणी पाझरूं लावण्याच्या त्याच्या क्रियेमुळें होतो. जमिनीच्या खालच्या भागांतून स्वाभाविकपणें पाणी वाहून जात नसल्यास कुलनाराचा खत म्हणून उपयोग करून बराच खर्च सोसण्यापूर्वी तें वाहून जाईल, अशी अगोदर तरतूद करून ठेवली पाहिजे. कुलनार घातलेल्या जमिनींत खार्‍या वनस्पती ( साल्टवोर्ट ) किंवा जीं झाडें तेथें लागणें अशक्य होतें असल्या वनस्पतींची लागवड करावी. अशा वनस्पतींची वाढ झाल्यास जमिनींतून अपायकारक क्षार काढून लावण्याची तजवीज झाली आहे असें समजावें व महाग कुलनार अधिक घालण्याच्या भानगडींत पडूं नये.

अमेरिकेंतील अनुभव. - या बाबतींत अमेरिकेंत अनेक प्रयोग होऊन त्यांनांहि हिंदुस्थानांतील तज्ज्ञांच्या प्रमाणेंच अनुभव आला आहे; पण या दोन्ही देशांतील अनुभवांत इतकाच फरक आहे कीं, अमेरिकेंतील तज्ज्ञ हेच सरकारी अधकारी असून त्यांनां अल्कांमुळें निरूपयोगी झालेल्या जमिनी लागवडीखालीं कशा आणतां येतील हें पहावयाचें होतें. त्याचे प्रयोग निव्वळ तत्त्वशोधनार्थ असून प्रयोगापासून मिळालेल्या शहाणपणाचा लागलाच व्यवहारांत उपयोग करण्यांत आला. याचा असा परिणाम झाला कीं ओसाड पडलेली बहुतेक जमीन खरामुळें तेथें लागवडी खालीं आणण्यांत आली.

खारी जमीन सुधारणार्‍या वनस्पती : - येथें खारी जमीन लागवडीखालीं आणण्याकरितां कांहीं प्रकारच्या वनस्पतींचा उपयोग करतां येण्यासारखा आहे. जी खारी जमीन इतर वनस्पतींस अपायकारक होते तिजमध्येंच कित्येक झाडें वाढतात, इतकेंच नव्हे तर फोंफावतात; खार्‍या वनस्पती या यांपैकींच होत. साधें पीक किंवा मोठीं झाडें जमिनीवर लावण्यापूर्वी खार्‍या वनस्पतींनीं जमिनीचे उन्हापासून रक्षण करतां येईल व अशा झाडांची तात्पुरती लागवड करून विषारी खारहि काढून लावतां येईल.

कित्येक वर्षें, दरसाल पावसाळ्याच्या अखेरीपासून सर्व उन्हाळ्यांत जर खार्‍या जमिनीत गुरें चरूं दिली नाहींत, तर ह्या जमिनीवर पावसाळ्यांत उगवणारी वनस्पति वाचूं शकेल. इतर प्रकारची वनस्पति किंवा झाडें देखील या संरक्षित प्रदेशांत उगवतील व कांहीं वर्षांत या जमिनीवर खार येणार नाहीं. अशा प्रकारचे प्रयोग झाले असून त्यांत यशहि मिळालें आहे. या संरक्षित जमिनीवर पहिल्याप्रथम खार-उसर ( स्पोरोबोस अँरॅबिकस ) नांवांचें गवत उगवलें. याच्या नांवावरून ही गवताची जात क्षारप्रिय असावी हें दिसतेंच आहे. भुरबुरोइ गवतहि पावसाळ्यांत येथें उगवतें. उन्हाच्या उष्णतेपासून जरी हें जमिनीचें रक्षण करीत नसलें तरी याचा गुरांनां खाण्याकरितां बराच उपयोग होतो. जमीन अर्धवट सुधारली म्हणजे डाब ( एरॅग्रोस्टिस सायनॉ सुरॉइडेस), ढुब ( सायनॉ डॉन डॅक्टिलॉन ), बट ( डायप्लेक्ने फुस्का ), जानेवा ( अँड्रॅपोगॉन अँनुलॅटस ) व इतर दुसर्‍या जाती उगवूं लागतात. गुरांनां चार्‍याची अत्यंत अवश्यकता असल्यामुळें जमीन लागवडीस योग्य करीत असतांनां पहिल्या प्रथम कोणत्या गवताचा उपयोग करावा हें कळणें अत्यंत जरूर आहे. हिंदुस्थानांत खार्‍या वनस्पतींसंबंधीं कळकळीनें शोध झाला नाहीं ही खेदाची गोष्ट आहे. कारण इतर कोणत्याहि गवतांपेक्षां जमीन सुधारण्याच्या कामीं ही वनस्पति उपयोगी पडण्यासारखी आहे. आस्ट्रेलियन खारें झुडूप येथें स्थायिक करण्याच्या प्रयत्‍नासंबंधीं कांहीं तुरळक उदाहरणें सांपडतात; पण खुद्द हिंदुस्थानांतच इतर ठिकाणापेक्षां विपुल व अनेक प्रकारच्या स्थानिक खार्‍या वनस्पती आहेत इकडे आमचे शेतकी खात्याचे अधिकारी लक्ष देत नाहींत.

अशुध्द सिंधुकर्बिताच्या ( ‘बरिला’ ) उत्पत्ती करितां पंजाबमध्यें यांपैकीं कांहींची व्यवस्थेशीरपणें लागवड करण्यांत आली आहे; पण ‘उसर’ जमीन लागवडीखालीं आणण्याकरितां म्हणून त्यापैकीं एकाचाहि उपयोग करण्यांत आलेला दिसत नाहीं. ज्या जमिनींत अतिशय खार असतो अशा जमिनीवर उगवणार्‍या खार्‍या वनस्पती व मामूल जमिनींहून यत्किंचितहि अधिक खार असला तरी न उगवणार्‍या वनस्पती यांच्या दरम्यान किती तरी वनस्पती असूं शकतील. या वनस्पतींवर काळजीपूर्वक प्रयोग करून कोणत्या वनस्पतींनां खार सर्वांत जास्त लागतो व त्याहून कमी कोणत्या वनस्पतींनां हें सर्व ठरविलें गेलें पाहिजे, व त्यावरून खारी जमीन सुधारण्याकरितां कोणत्या वनस्पतींची कशा अनुक्रमानें लागवड करीत जावयाचें हें निश्चित करून सारखा खार लागणार्‍या वनस्पतींपैकीं फक्त उपयुक्त वनस्पतींचीच लागवड झाली पाहिजे. प्रयोगावाचून केवळ एकाच जातींच्या वनस्पतींस सारखा खार लागत असेल असा तर्क करतां येत नाहीं. उदाहरणार्थ बाभूळ ( अँकॅशिया अरेबिका ), पळस ( ब्यूटिआ फ्राँडोसा ), शिसू ( डॅल्बर्जिया सिसू ), वगैरे झाडें उपयुक्त असल्याबद्दल प्रसिध्द आहेत; पण हीं झाडें ज्या जातींचीं आहेत त्या जातीच्या झाडांस इतर कोणत्याहि जातीच्या झाडांपेक्षां खारांची नावड अधिक आहे. हीं झाडें खारी जमीन सुधारण्यास उपयोगी असतील पण ज्या झाडांतून आपणांस निवड करतां येते त्यांत उत्तम आहेत काय ? त्याचप्रमाणें हीं जर सोईस्कर व उपयुक्त असतील तर त्यांची लागवड केव्हां करावी व त्यांच्या अगोदर, बरोबर व मागाहून कोणतीं झाडें लावावीं हे हिंदुस्थानच्या हिताच्या दृष्टीनें अत्यन्त महत्त्वाचे असे प्रश्न आहेत, पण त्यांची समाधानकारक उत्तरें देतां येत नाहींत जमीन लागवडीखाली आणतांना किंवा जंगलांची पुन्हां लागवड करतांना हिंदी प्रयत्‍नांचा सर्वांत मोठा दोष असा दिसून येतो कीं उत्पन्न थोडें आलेलें पुरवलें परंतु पीक लवकर हातीं यावें अशीं दृष्टि असते.

सोड्याचे औद्योगिकदृष्ट्या उपयोग : - सर्व हिंदुस्थानांत सोडायुक्त माती धुवून कमीजास्त प्रमाणांत शुध्द कर्बित तयार करतात. दक्षियण हिंदुस्थानांत ( सालेम, म्हैसूर वगैरे ) हा धंदा बर्‍याच मोठ्या प्रमाणांत सुरू होता व याच्या वाढीसंबंधीं बरीच आशा होती. खार्‍या जमिनीपासून सज्जी किंवा रासी सिंदुकर्बिताच्या दोन जाती तयार करण्याकरितां बिहार, संयुक्तप्रांत व इतर ठिकाणीं परवाने देण्यांत येत असतां सरकारी वसुलास धक्का बसूं नये म्हणून परवाने देण्यांत येत असत. कारण सोरा काढण्याच्या व शुध्द करण्याच्या कारखान्यांत साधें मीठ पुष्कळ निघतें. वर्‍हाडमधील लोणारच्या सरोवरांतून शुध्द सिंधुकर्बित काढतात. सरोवराच्या कांहीं भागांत बुड्या मारल्यास मिश्रक्षारांचे खडे सांपडतात; पण सरोवराचें पाणी सुकविलें असतां क्षारांचे जे प्रकार मागें राहतात त्यांत सिंधुकर्बित मुख्य असतो. या प्रकारास निरनिराळीं स्थानिक नांवें आहेत. दोन संहत पृष्ठभागांत सुयांच्या आकाराचें स्फटिक असतात त्यास डल्ला म्हणतात. ‘कुप्पल’ हा पातळ ‘डल्ला’ असून तो लाल रंगाचा असतो. पापडी किंवा पाप्री हा पांढर्‍या रंगाचा खारा फेस असतो. जमिनीच्या खारापासून किंवा खार्‍या तळ्यांतील पाण्यापासून गंधकाम्लाचा उपयोग करून काढलेल्या मिश्रित क्षारांपासून ( यांत जास्त भाग गंधकाचाच असतो. ) साल्टकेक म्हणजे सिंधुगंधकित तयार करतां येतें. व चुन्याबरोबर व कोळशाबरोबर भट्टींत घालून त्याचें सोडाभस्म ( सोडा अँश ) तयार होतें. संयुक्त प्रान्तांतील आवा येथें रेह जमिनीच्या थराचा कांच किंवा कांचेचे मणी तयार करण्याच्या कामीं उपयोग करतां येतो किंवा नाहीं यासंबंधीं १८८० सालीं प्रयत्‍न करण्यांत आला. वेनीस येथून या कामाकरितां उपकरणेंहि आणण्यांत आलीं. त्यावेळीं अल्कांचा कांचकामांत उपयोग करण्याच्या बाबतींत खालील अनुभव आला:-

( अ ) अल्कांमधील अशुध्द द्रव्यांमुळें चांगल्या प्रकारची पांढरी कांच करण्यास अडथळा येतो; ( आ ) करितां शुध्द अल्क काढण्याकरितां रासायनिक कारखाने काढणें अवश्य आहे;( इ ); चांगले मणी तयार करतां येतात, पण ते परदे शांतून येणार्‍या मण्यांपेक्षां स्वस्त पडतील किंवा नाहीं या संबंधीं संशय आहे. मोठ्या प्रमाणांवर धंदे निघाल्यास व उत्तम देखरेख असल्यास कांचेच्या धद्यांची सुधारणा होणें शक्य आहे. जेथें जेथें सोड्याचा थर आढळतो तेथें तेथें कांचेचा विषेषत: कांचेच्या बांगड्या करण्याचा देशी कारखाना कमीअधिक प्रमाणांत आढळतोच; एतद्देशीय लोक रेह व सज्जी यांचा अनेक प्रकारें उपयोग करतात. लाख व कमला विरघळविण्याकरितां, रेशमी व कापसाच्या कपड्यास रंग देण्याकरितां व कुसुंब्याच्या फुलांपासून कुसुंबी रंग काढण्याकरितां याचा उपयोग करतात. रेशमी, सुती व लोंकरी कपडा धुण्याकरितांहि ह्याचा उपयोग केला जातो. फरूकाबाद येथें तागापासून देशी कागद तयार करण्याकरिताहि याचा उपयोग होतो. या दोन्ही क्षारांचा देशी साबण करण्याकरितां उपयोग होतो. साखर करण्याकरितां उसांचा रस उकळताना त्यांतील सेंद्रिय अम्लांचें निर्गुणीकरण करण्यासाठीं पांढरा रेह शिंपडतात. तंबाखूत भेसळ म्हणून वजन वाढविण्याकरितां त्यांत रेह मिसळतात. शिवाय आर्यवैद्यकांत हे क्षार पाचक मानले आहेत. हिंदुस्थानांतील कुलालकलेंत सुधारणा कशी करतां येईल याबद्दल जरी संशोधन झालें आहे तरी मृत्पात्रें घडविण्याच्या कामीं सिंधुकर्बितयुक्त मातीचा उपयोग करण्याकडे अजून पुरेसें लक्ष गेलें नाहीं सुमारें ७५ वर्षांपूर्वी बंगालमधील कालगांग खारी, साबन मिटी, रोटसमाती, मौलमेन व सिंगापूर माती यासंबंधीं बरीच चौकशी व प्रयोग झाले; व त्याचप्रमाणें मातीच्या भांड्यावर जिल्हई बसविण्याच्या बाबतींतहि प्रयोग करण्यांत आले होते.

६. का ळें मी ठ. - स्थानिक बाजारांत यास थोडेंसें महत्त्व आहे. उत्तर हिंदुस्थानांत भिवानि व हिस्सर येथें हें तयार करतात.

आंवळा व हिरडा यांजबरोबर साधें मीठ व सज्जी वितळल्यासारखें दिसेपर्यंत भाजतात. अशा तर्‍हेनें तयार केलेल्या पदार्थाचा औषधाकरितां उपयोग होतो. डॉ. वार्थ याच्या मताप्रमाणें सिंधुगंधकित हें याचें अवश्यक घटक द्रव्य आहे. साधें मीठ, सिंधुगंधकित, सिंधुकर्बित व सेंद्रिय द्रव्याच्या ऐवजीं साखर या पदार्थांचें मिश्रण वितळून त्यानें नमुने तयार केले. अनार्द्र सिंधुगंधकिताचें प्रमाण शेंकडा १ पासून ३ पर्यंत जसें वाढत जातें तसे औषधी दृष्ट्या अधिक गुणकारक क्षार तयार होऊन त्यांचा रंग गुलाबीपासून बदलत बदलत हिंगुळी होत गेला. शेंकडा १५ गंधकितापासून जांभळ्या रंगाचा क्षार तयार झाला. या सर्व गंधकयुक्त उज्जाचा अपानवायूसारखा वास येतो. व देशी क्षारासारखेच याचे रासायनिक धर्म असतात. एकद्देशीय लोक याच्या भट्टींत जीं जंगलांतील फळें घालतात त्यांचा विशेष कांहींच उपयोग नसतो; कारण तीं भाजलीं जात असतांना त्यांचें शुध्द कर्बांत रूपांतर होते व त्यांच्या गंधकितास प्राम वायुहीन करून त्यांचें गंधकिद बनविण्याकडे उपयोग होतो. हेंच या रीतीनें तयार केलेल्या काळ्या मिठांतील मुख्य द्रव्य असतें.

७. फु ला : - हा सिंधुकर्बिताचा प्रकार आहे. या द्रव्याची लेह येथें, लडखमधील चंगठण, रूपशु व नुब्रा येथून आयात होते. येथें चहा कडक करण्याकरितां याचा बराच उपयोग करतात. काश्मीर, कुल्ल व दक्षिण हिंदुस्थान इकडे हें पाठविलें जातें. भोतिये लोक कपडे धुण्याकरितां व लोंकरीस रंग देण्याकरितां याचा उपयोग करतात. साधारणपणें ५० ते १२० टन या मालाची आयात असून त्याची सरासरी किंमत ( १५ वर्षांपूर्वी ) ६१० रूपये मण होती.

८. स ज्जी खा र ( बॅरिल्ला ). - हा अशुध्द सिंधुकर्बित होय. यावर स्वतंत्रच लेख दिला जाईल.

९. टां क ण खा र. - यास इंग्रजीत बोरॅक्स अथवा सोडियम बाय-बोरेट म्हणतात व याची घटनादर्शक संज्ञा सिंधुद्विटंकित ( सोडियम बायबोरेट ) आहे. यावरहि पुढें स्वतंत्र लेख येईल.

१०.  दा ह क सिं धु - कॉस्टिक सोडा. आजकाल या द्रव्याचा पुरवठा परदेशांतून होतो. एका कागदाच्या गिरणींत हें द्रव्य ‘रेह’ पासून तयार करण्याचा प्रयत्‍न करण्यांत आला होता असें कळतें. तो प्रयत्‍न कितपत यशस्वी झाला, ह्यासंबंधीं माहिती नाहीं.

विजेनें साध्या मिठाचें दाहकसिंधु व हरवायु यांत पृथक्करण होतें, असा शोध लागल्यापासून यूरोपमध्यें व अमेरिकेंत या बाबतींत फारच उत्साह उत्पन्न झाला आहे. अशा रीतीनें साध्या मिठाचें पृथक्करण झाल्यामुळें हें अल्कद्रव्य साबणाच्या व कागदाच्या कारखानदारांच्या दाराशीं थोडक्या किंमतींत येऊन पडणें शक्य झालें. कारण मिठाचा ( सिंधु हरिदाचा ) हवा तितका पुरवठा होऊ शकतो. हिंदुस्थानच्या दृष्टीनें या शोधाचा असा फायदा आहे कीं, या पध्दतींत गंधकाम्ल मुळींच लागत नाहीं. गंधकाम्लाशिवाय लेब्लँकच्या सोडा-भस्म करण्याच्या पध्दतींत साधें मीठ किंवा रेह यांचा उपयोग होऊं शकत नाहीं. यामुळें हा शोध लागण्यापूर्वी रासायनिक उद्योगधंद्यांत हिंदुस्थानला पुढें येण्याची मुळींच आशा नव्हती.

११. सिं धु ह रि द किं वा मी ठ. - स्वतंत्र लेख पहा.

१२. सिं धु गं ध कि त. - हा क्षार इंग्रजीमध्यें ग्लॉबर्स सॉल्ट नावानें प्रसिध्द असून हिंदुस्थानांत खारि किंवा खारिनम या नांवानें ओळखला जातो. हा रेहचा घटक क्षार आहे. सिंधुकर्बित तयार करण्याकरितां याचा उपयोग होतो. लेब्लँकच्या सोडा तयार करण्याच्या पध्दतींत ह्याची उत्पत्ति ही पहिली पायरी आहे. अर्थात ज्या ठिकाणीं वरील थरांत हा क्षार सापडतो त्या ठिकाणीं गंधकाम्लाच्या खर्चाशिवाय लेब्लँकपध्दतींतील पहिल्या पायरीपर्यंत पोचल्यासारखें होतें.

हिंदुस्थानांत हा क्षार उन्हांतील बाष्पीभवनाच्या किंवा कृत्रिम उष्णतेच्या साहाय्यानें अशुध्द सोरा तयार करतात तशाच पद्धतीनें रेह मातीपासून काढतात.

या दोहोंत मातीच्या गुणधर्मांत मात्र फरक असतो. बाकी गाळणीं, बाष्पपात्रें ( बॉइलर्स ) थाळे वगैरे सर्वांचें स्वरूप सारखेंच असतें. क्षारयुक्त पाण्याची वाफ करून क्षार वेगळा करण्याकरितां बाष्पपात्रें व चुन्याचे थाळे या दोहोचाहि उपयोग करण्यांत येतो. बाष्पपात्रांचा उपयोग बहारमध्यें व चुन्याचा थाळ्यांचा संयुक्त प्रांतांत करतात. कारण बहारपेक्षां संयुक्त प्रांतांत कोरड्या व उष्ण हवेवर अधिक बिनधोकपणें अवलंबून राहतां येतें.

औद्योगिक कामाकरितां उपयोग : - पाटणा खारीचा ( बहारच्या खारीस पाटणा खारी म्हणतात ) कच्चीं कातडीं खारविण्याकरितां व गुरांचें रेचक म्हणून उपयोग करतात. तींत सिंधुहरिद ( साधें मीठ ) फारच थोडें असतें. पूर्वेकडील प्रदेशांतील पाणी उन्हानें आटवून काढलेल्या खारीचाहि गुरांनां रेचक म्हणून उपयोग करतात पण तींत शेकडा २० ते ३० ( किंवा केव्हां केव्हां अधिक ) साधें मीठ असतें. सिंधुहरिदापेक्षां म्हणजे साध्या मिठापेक्षां सिंधुगंधकित हें कच्चें कातडें खारविण्याकरितां अधिक उपयुक्त आहे. कारण साध्या मिठांत हवेंतील पाणी शोषून कातडीं नरम करण्याचा दोष आहे. यामुळें बिहारमधील खारीची ( चमडा खारीची ) संयुक्त प्रांतांतील खारीपेक्षांहि अधिक मागणी असते दत्त यांच्या मताप्रमाणें उत्तरकालीन संस्कृत ग्रंथकारांनीं ‘क्षारि लावणें’ हा शब्द तिच्यासाठींच वापलेला आहे. हिंदुस्थानांत तयार होणारा क्षार अशुध्द असतो.

वरील माहितीवरून असें दिसून येईल कीं एकंदरीतं हिंदुस्थानांत अल्कली तयार करण्याचे अथवा शुध्द करण्याचे आधुनिक शास्त्रीय पध्दतीनें चालविलेले कारखाने मुळींच नाहींत; जे थोडेबहुत कारखाने आहेत ते आधुनिक पध्दतीच्या मानानें एक शतक मागें आहेत व त्यांत सोरा वगैरे पदार्थ तयार होतात.

संकुचित अर्थी अल्क या नांवानें वर आलेल्या अम्न ( अँमोनिअम ), पालाश ( पोटॅशिअम ), सिंधु ( सोडिअम ), व प्राव ( लिथिअम ) यांच्या उज्जितांचा बोध होतो; पण विस्तृत अर्थी अल्कमृत्तिका म्हणजे भार ( बेरियम ), खट ( क्याल्शम ), स्त्रांत ( स्टॉन्शिअम ), यांच्या उज्जितांचाहि त्यांतच समावेश होतो ( अल्कमृत्तिका पहा ). त्याचप्रमाणें कित्येक वनस्पती जाळल्या असतां त्यांची राखहि अल्कधर्मी असते. अँकोनिटाईन, मॉर्फाईन, क्विनाईन वगैरे अल्कोदांनां सेंद्रिय अल्कें’ म्हणतात. अल्कलोंचे मुख्य गुण असे आहेत कीं ते पाण्यांत विरघळतात, अम्लांचें निर्गुणीकरण करतात, सेंद्रिय पदार्थांना जाळतात व लिटमससारख्या वनस्पतींपासून तयार केलेले रंग बदलतात [ वॅट, क. प्रॉ. ]

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .