विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अल्कांतारा - हें ब्राझिलचें लहानसें बंदर मॅरानहाव संस्थानात, साव मारकॉसच्या उपसागराच्या पश्र्चीम तीरावर मेरानहाव शहरापासून जलमार्गाने सोळा मैल आहे. येथें चागलें बंदर आहे, येथे उत्तम कापूस व तांदूळ पिकतात व जहाजांतून बाहेर रवाना होतात.