प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

अल्युमिनियम - (स्फट;स्फ. २७००) रासायनिक धातू रूप मूलद्रव्य. ही धातु शुद्ध स्वरुपांत असंयुक्त अशी कधींच सापडत नाहीं. तर मुख्यतः सिकित (सिलिकेट) रूपानें इतर पदार्थांशीं संयुक्त अशा स्थितींत सर्वत्र आढळून येते. अल्युमेन (तुरटी) या लॅटिन शब्दावरून अल्युमिनियम हें नांव साधलेलें आहे; व त्यास अनुसरून स्फटिकी (तुरटी) या शब्दापासून साधलेला स्फट हा शब्द अल्युमिनियम साठीं मराठींत योजितात. इ.स. १८२७ त गॉटिंजन येथें एफ. व्होलर यानें पाहिल्यानें ही धातु स्वतंत्र स्वरूपांत तयार केली.

अ शो धि त धा तु — स्फटाचे नैसर्गिक मुख्य संयुक्त पदार्थ चार आहेत. प्राणिद (ऑक्साईडें), उत्प्राणिद (हायड्रॉक्साइड), सिकित व प्लविद. प्राणिदांत कुरूंद (स्फ२ प्र३) हा मुख्य असून तो दक्षिण हिंदुस्थानांत व युनायटेडस्टेट्स मध्यें पुष्कळ प्रमाणावर सापडतो. ह्यांत स्फटांचें प्रमाण बरेंच मोठे आहे. (शें. ५२.९) तरी धातु काढण्याकडे याचा उपयोग करीत नाहीत; तरी धातु काढण्याकडे याचा उपयोग करीत नहींत; याचें कारण त्याची भुकटी करणें फार जड जाते, एवढेंच नव्हें तर कुरुंद हा फार कठिण असल्यामुळें त्याचा हत्यारांनां धार लावण्याकरितां फार उपयोग होतो व यामुळें त्याला चांगली किंमत येते. क्रायोलाइट (सफ.प्ल३. ५धुस्प) हाहि स्वाभाविक स्थितींत सांपडणारा संयुक्त पदार्थ आहे. हा स्फट व सिंधु यांचा द्विप्लविद [डबल फ्ल्युओराइड] असून तो फक्त ग्रीनलंडच्या पश्चिम किनार्‍यावर सापडतो. तेथून हा पदार्थ आणण्यास कठीण असल्यामुळें याच्या ऐवजी दुसरे क्षार उपयोगांत येऊं लागले. हल्ली हेरोल्ट— हॉल यांनीं शोधून काढलेल्या रितींत क्रायोलाइटची द्रावक म्हणून जरूर असल्यास तें कृत्रिम रीतीनें तयार करितात. सर्व प्रकारची माती नांवाला मात्र स्फट सिकिताची बनलेली असते. केओलाइन किंवा चिनी माती (स्फ२ प्र३.२ सिप्र२.२उ२प्र) चे थर सर्व जगभर सांपडतात. व त्यांत अजल (अनहायड्रस) स्थितींत शें. २४.४ धातू सांपडते, पण सामान्य मातींत त्या ऐवजीं खट, मग्न व अल्क असून वाळूचें प्रमाण कधीं कधीं शें. ७० पर्यंत असतें. कोणत्याहि खनिज सिकितापासून शुद्ध स्फट भस्म (अल्युमिना) काढण्याची युक्ती अद्याप सापडली नसल्यामुळें स्फट तयार करण्याकरितां केओलिनचाहि उपयोग होत नाहीं. बॉक्साईट (स्फ२प्र३.२उ२प्र) हें स्फटाचें सजल प्राणिद आहे. हें पुषकळ ठिकाणीं सांपडतें, परंतु याचे मुंख्य थर फ्रान्सच्या दक्षिणेस, आयर्लंडच्या उत्तरेस व उत्तर अमेरिकेंत अलबामा जॉर्जिया व आरकानसस येथें आहेत.

वि द्यु द्वि ल श्ले प णा नें स्फ ट क र ण्या ची कृ ति.— विद्युच्छक्तीनें स्फट तयार होऊं लागण्यापूर्वी त्या धातूचें हरिद (क्लोराइड) व क्रायोलाइट या दोन पदार्थांपासून ती धातु तयार केली जात असे. हल्लींच्या पद्धतींचे पेटंट १८८६ व १८८७ या वर्षी अमेरिकेंत सी.एम्. हॉल यानें  व इंग्लंड आणि फ्रान्स या देशांत पी. टी. एल. हेरोल्ट यानें घेतलें. हेरोल्टचा विद्युत्घट लोखंडी किंवा पोलादी चौरस पेटी सारखा असून त्याच्या आंतून कोळशाची पट्टी ठांसून बसविलेली असते. तळाला ओतीव लोखंडाचा पत्रा असून तो विद्युज्जनकाच्या ॠणध्रुवाला लावलेला असतो; [परंतु तो खरा ॠणध्रुव नसून भांडयाच्या तळाशीं पूर्वीं तयार झालेल्या धातूचा वितळलेला थर हें कार्य करतो] घनध्रुव कोळशाच्या जाड पटयांचा केलेला असून तो वरून आंत सोडण्याची व्यवस्था केलेली असते. विद्युतघटांत क्रायोलाइट घालून विद्युत्प्रवाह सुरू करितात. व तें वितळल्यानंतर काम चालू असेपर्यंत वरचेवर स्फटभस्मा (अ‍ॅल्युमिना) ची भुकटी टाकीत जातात. प्रवाहाचा जोर दर घटामागें ३ ते ५ व्होल्ट असून तो १० किंवा १२ घटांच्या मालिकेंतून जातो. विद्युत्प्रवाहाचें काम दोन प्रकारचें असतें. (१) स्फ्टप्राणिदाच्या रासायनिक आकर्षणाला प्रतिरोध करणें, (२) विद्युद्विश्लेषणाचा प्रतिबंध दूर करणें व त्या बरोबर त्याचें उष्णमान वाढविणें. शक्तीचा कांहीं भाग या दुसर्‍या कामाकडे खर्च झाल्यामुळें, फक्त उरलेल्या शक्तीचा रासायनिक कामाकडे उपयोग होतो व क्रायोलाईट मधील स्फटप्लविदांचें विघट्टण करण्याकरितां ४ व्होल्टची जरूर असल्यामुळें भांडयांमध्यें स्फट भस्माचें परिमाण भरपूर असल्यास प्लविदांवर कांहीच परिणाम होत नाहीं यामुळें एक वेळा क्रायोलाइट भरल्यानंतर तें वरचेवर भरण्याची जरूर नसते व त्यांतील सिंधु व इतर परक्या पदार्थांचा संसर्ग स्फटाला लागत नाहीं; व फक्त स्फटभस्मच काळजीपूर्वक शुद्ध करून घेतलें म्हणजे काम होतें. या सर्व क्रियेंत स्फटभस्मा (स्फ२ प्र३) चें विघटन होऊन ॠणध्रुवाजवळ स्फट जमतें आणि प्राणिदाचा धनध्रुवाशीं संयोग होऊन कर्बेंकप्राणिद तयार होतो. त्याचा जाळून कर्बद्विप्राणिद करण्यांत येतो, तंत्त्वंतः ५४ भार स्फट उत्पन्न होतांनां ३६, भार कर्बाचें प्राणिदीकरण व्हावें पण वस्तुतः ज्या प्रमाणांत धातूचा थर बसतो त्याच प्रमाणांत धनध्रुवाचा क्षय होतो. स्फट ही धातु फार हलकी असल्यामुळें ज्यामध्यें ती लवकर बुडेल असें योग्य द्रावक निवडण्याचें काम फार कुशलतेनें करावें लागतें. ह्याकरितां वितळलेल्या धातूचें विशिष्ट गुरुत्व २.५४ व स्फटभस्मानें संपृक्त (सॅच्युरेटेड) अशा वितळलेल्या क्रायोलाइटचे विशिष्ट गुरुत्व २.३५ असल्यामुळें त्याचाच उपयोग करण्यांत येतो.

 

गु ण ध र्म.— स्फट ही कथलासारखी पांढरी धातु आहे. अशुद्ध असल्यास किंवा हवेंत फार वेळ राहिल्यास तिजवर किंचित जांभळी छटा येते. ओतीव धातूचें विशिष्टगुरुत्व २.६ व पत्र्याचें २.७ असतें. स्फट ६२६० शला वितळतें. सर्व धातूंत घनवर्धनीयेतमध्यें याचा तिसरा व ओढून तार काढण्याच्या गुणांत म्हणजे तन्यतेंत (डक्टिलिटि) ६ वा नंबर लागत असून त्याचा •००००२५ इंच जाडीचा पत्रा व •००४ इंच जाडीची तार निघते. अगदीं शुद्ध असतां ते कथलापेक्षांहि कठिण असून ठोकल्यानें त्याचा कठिणपणा वाढतो. ह्या धातूंत चुंबकीय गुण नाहींत. घनतेत याचा अल्क धातूच्या खालोखाल नंबर लागत असल्यामुळें हें अनुकूल परिस्थितींत प्राण व हरवायूंशीं फार जलद संयोग पावतें. त्याचा लांबीचा प्रसरण गुणक दर १० श.ला •००००२२२ (रिचर्ड्स) आहे. ० व १०० च्या दरम्यान त्याची सरासरी विशिष्ट उष्णता ०•२२७ व घनीभूत होण्याच्या वेळची अनुद्‍भूत उष्णता (लेटंट हीट ऑफ फ्यूजन) १०० क्यालरी आहे. सारख्या वजनाचें तांबे व स्फट घेतलें असतां, याची विद्युद्वाहक शक्ति तांब्याच्या दुप्पट व दोन्ही धातू सारख्या आकारमानाच्या घेतल्या असतां सुमारे २/३ पट आहे. दुसर्‍या धातू भारंभार घेऊन त्यांशीं तुलना करितां ताण (टेन्शन) सहन करण्यांत ओतीव पोलाद व स्फट ब्राँझ या दोनच धातू स्फटपेक्षां वरचढ आहेत. हवेंत किंवा पावसांत ठेविली असतां ही धातु कांहींशी गंजते, पण हें गजण्याचें प्रमाण लोखंड, तांबे किंवा पितळ या धातूंपेक्षां फारच कमी असत. (बाजारांत मिळणार्‍या विद्युद्विश्लेषणाप्राप्त स्फटामध्यें शे. ०.४८ सिक (सिलिकन) व ०.४६ लोह असतें. ह्या धातूवर ऊन किंवा थंड पाण्याचा कांहीचं परिणाम होत नाहीं. गंधकयुक्त उज्जापासून त्याला कांही अपाय होत नसल्यामुळें धुकट हवेंत किंवा अशुद्ध धुराचे दिवे असलेल्या ठिकाणीं या धातूचे जिन्नस काळे पडत नाहींत. निरिद्रिय अंम्लांपैकीं  उद्हराम्लखेरीज इतर कोणत्याहि अम्लाची त्यावर म्हणण्यासारखी प्रतिक्रिया होत नाहीं. शिरक्यासारखीं सेंद्रिय अम्लें, मीठ, अन्नाचे घटक पदार्थ, किंवा अन्न चांगलें राहावें व नासूं नये म्हणून उपयोगांत आणले जाणारे पदार्थ या बरोबर ही धातु रासायनिक रीत्या स्वच्छ भांडयांत बराच वेळ उकळली असतां फारच प्रमाणांत द्रवते. पण सामान्य व्यवहारांत स्फटाचीं भांडीं स्वयंपाकाकरितां उपयोगांत आणल्यास त्याचा म्हणण्यासारखा अंश अन्नाबरोबर जात नाही; व गेलाच तरी स्फटाचे क्षार तांबे किंवा शिसें यांच्याप्रमाणें विषारी नसल्यामुळें शरीर प्रकृतीवर त्यांपासून वाईट परिणाम फारच अल्प होतो.

स्फट धातूचा उच्च धनवैद्युत (इलेक्ट्रॉपॉझिटिव्ह) धर्म फार महत्त्वाचा आहे. उष्णमान बरेंच वाढविले असतां ही धातु, बहुतेक सर्व धातूंच्या प्राणिदांचें विघटन करिते, म्हणून तिचा धातुकर्मविद्येंत (मेटॅलजींत) अतिशय उपयोग होतो. लोखंड, पोलाद किंवा पितळ ओततांना, ह्याच्या अत्यंत थोडया मिश्रणानें (शेंकडा ६.००५) सर्व प्राणिदें निघून जातात व वितळलेली धातु चांगली पातळ होऊन पुन्हा घट्ट होतांना तींत छिद्रें राहत नाहीत.  उलट पक्षीं,  ह्याच्या धनवैद्युत धर्मामुळें, त्याचा उपयोग करितांना फार काळजी घ्यावी लागते. ओलाव्यात, खार्‍या पाण्यांत किंवा एखाद्या क्षयकारी (कोरोसिव्ह) पदार्थांत दुसर्‍या धातूबरोबर ही धातू ठेवल्यास, किंवा दुसर्‍या एखाद्या ॠण धातूबरोबर तिचें मिश्रण केलें असतां जोरदार चलविद्युद्विषयक क्रिया सुरू होऊन तें लवकर झिजतें; याकरितां मीठ वगैरे पदार्थ स्फटाच्या भांडयांत ठेवूं नयेत. लोखंडाच्या किंवा तांब्याच्या खिळयांनीं रिबिट केलेल्या स्फटाच्या बोटी खराब होतात याचें कारण हेंच होय. त्याचप्रमाणें लोखंड, तांबे वगैरे धातूंप्रमाणें याला डाक बसत नाही. पण बहुतेक ठिकाणी, दोन तुकडे जोडण्याकरितां दुसरीं साधनें उपलब्ध असल्यामुळें हा दोष विशेष महत्त्वाचा आहे असें मानण्याचें कारण नाहीं.

स्फटापासून पुष्कळ मिश्र धातू बनतात. त्यांपैकी ज्यांमध्यें इतर धातूंचें प्रमाण शेंकडा फक्त १ किंवा २ असतें त्या स्फटाप्रमाणेंच हलक्या पण त्यापेक्षां पुष्कळच जास्त कठिण व मजबूत असतात. पण दुसर्‍या धातूंचे प्रमाण शें. ९० ते ९९ असल्यास, मिश्र धातूंचे गुण सामान्यपंणें त्यांच्यासारखेंच पण थोडे सुधारलेले दृष्टीस पडतात. जडमिश्र धातूंत स्फटब्रांझ (तांबे शें. ९० ते ९७.५ स्फट शें. १० ते २.५) ही मुख्य असून स्फटांचें प्रमाण वाढेल त्याप्रमाणें तिची ताण सहन करण्याची शक्ती (दर चौ. इंचास २० ते ४१ टनपर्यंत) वाढते; व हवेने किंवा खार्‍या पाण्यानें ती खराब होत नाहीं किंवा झिजत नाही. ताम्र मिश्रित हलक्या धातूंत हें प्रमाण अगदीं उलट असतें; व त्यांच्या अंगी चलविद्युद्विषयक क्रियेला प्रतिरोध करण्याची शक्ती नसल्यामुळें, त्यांचा फारसा उपयोगहि नसतो.

उ प यो ग.— स्फटाचे उपयोग इतके आहेत कीं, ते सर्व येथें देणें शक्य नाहीं. याचा सर्वांत मोठा उपयोग लोखंड व पोलाद शुद्ध करण्याकडे होता. त्याची स्वयंपाकाकरितां भांडीं करण्याकडे सामान्य लोकांचीं अतिशय प्रवृत्ति आहे. पण एकदा खराब झाल्यानंतर तांब्यापितळेच्या भांडयाप्रमाणें  स्फटाचीं भांडीं सहज चकचकीत करतां येत नाहींत. चिनी मातीप्रमाणे किंवा ओतीव लोखंडाप्रमाणें तें ठिसूळ नाहीं.

शिशाची जिल्हई दिलेल्या मातीच्या किंवा बिन कल्हईच्या तांब्याच्या भांडयाप्रमाणें तें विषारी नाहीं; त्याला कांचवण्याची (एनॅमल करण्याचीं) जरूर नसते; टिनच्या सवंग भांडयाप्रमाणें त्याला गंज चढत नाहीं किंवा तें झिजत नाहीं; व दुसर्‍या पदार्थांच्या मानानें तें फारच हलकें असतें. उद्योग धंद्याच्या सर्व बाबींत व विशेषतः जेथें नेण्याआणण्याच्या सोयीसाठीं हलकेपणाला महत्त्व आहे अशा सर्व कामांकरितां उ० टॉर्पेडो बोटींतील इंजिनाच्या पायाकरितां, जहाजावर लांकडाच्या ऐवजी आंतल्या कामाकरितां; जहाजावर नेण्याच्या संपूर्ण बोटी करण्याकरितां व मोटारचे भाग, हलवायाच्या कढया यांसाठीं आणि रासायनिक कामांकरितां तांबे व पितळ यांच्या ऐवजीं याचाच उपयोग होऊं लागला आहे. आरमारी व लष्करी खात्यांत वजन कमी करण्याकरतां, शिपायांनां देण्याच्या सरंजामाकरितां, शक्य त्या ठिकाणीं ही धातू वापरतात. सोलेन होफेन दगडाच्या ऐवजी एक प्रकारच्या शिळाछापखान्याकरितां याचा उपयोग होतो. तांब्याची महागाई वाढत चालल्यामुळें स्फटाचे विद्युद्वाहक प्रचारांत येऊं लागले आहेत. तांब्याच्या ०▪१०० इंच जाडीच्या तारेंतून जेवढा विजेचा प्रवाह जातो, तेवढा प्रवाह नेण्याकरितां स्फटाची ०.१२६ इंच जाडीची तार लागते; पण तांब्याच्या मैलभर लांब तारेंचे वजन १६२ पौंड व तेवढयाच लांबीच्या स्फटाच्या तारेंचें वजन फक्त ७९ पौंडच असतें. दोघांचा ताण सहन करण्याची शक्ति सारखीच आहे असें धरून चालल्यास, स्फट वापरल्यानें विद्युद्वाहकाचें वजन शें. ५२ कमी व बळकटी शें. ६० जास्त होण्याचा संभव आहे आणि जाडी शें. २६ नी जास्त होते. अलीकडील काळांत विद्युतंत्रांतील गुंडाळया [कॉइल्स] करण्याकरितां स्फटाच्या अनाच्छादित [नुसत्या] पट्टीचा उपयोग करण्याचा प्रयत्‍न झालेला आहे. दोन पट्टयांच्या दरम्यान असलेलें ह्या धातूचें प्राणिद विद्युद्रोधकाचें काम करितें. स्फटाची किंमत तांब्याच्या दुपटीपेक्षां कमी असल्यास स्फट विद्युद्वाहक तेवढयात लांबीच्या तांब्याच्या विद्युद्वाहकापेक्षां स्वस्त पडतो; पण विद्युद्रोधकाची जरूर असेल तर, जाडी कमी असल्यामुळें, तांब्याची तार वापरणें फायदेशीर असतें. पुष्कळ ठिकाणीं, जड कामावर व टेलिग्राफी आणि टेलिफोनी या कामाकरितां स्फटाचा उपयोग फार समाधानकारक रीतीनें केला जात असून जोड देण्याच्या कामांत प्रथम येत असलेल्या अडचणीहि अनुभवानंतर दूर झाल्या आहेत.

शेवटीं या धातूंसंबंधी दोन महत्त्वाचे मुद्दे सांगणें जरूर आहे. ह्या धातूचा सार्वत्रिक उपयोग होण्याचें मुख्य कारण म्हणजे तिचा हलकेपणा होय; तरी किंमत सांगतांना मात्र त्यासंबंधानें घोंटाळा होण्याचा संभव आहे. कोणत्याहि धातूची आर्थिक किंमत तिच्या वजनावर अवलंबून असते; व औद्योगिक किंमत, बहुतेक ठिकाणी आकारमानावर ठरविली जाते. इंजिनचा पाया (बेड प्लेट) ताठ असेल तर तो १० हंड्रेडवेट वजनाच्या ऐवजीं ३० हंड्रेडवेट असण्यापासून कांहीच फायदा नाही; त्याचें वजन केवळ भारभूत होय. तांबें स्फटाच्या तिप्पट जड असल्यामुळें जेव्हां जेव्हां स्फटाची किंमत तांब्याच्या तिपटीपेक्षां कमी असेल तेव्हा अल्युमिनियम वापरणेंच स्वस्त पडतें. विद्युद्विलेषणप्राप्त स्फटाचा शोध एकोणिसाव्या शतकाच्या शेवटल्या दशकांतच लागलेला असल्यामुळें त्याच्या उपयोगासंबंधी पूर्ण ज्ञान अद्याप झालेलें नसून, दिवसें दिवस ज्यास्त ज्यास्त कामाकडे त्याचा उपयोग होऊं लागला आहे.

स्फ टा चे सं यु क्त प दा र्थ — स्फटभस्म.— (अ‍ॅल्युमिना) किंवा स्फटप्राणिद (स्फ२ प्र३.) हा संयुक्त पदार्थ खनिज कुरुंदाच्या रूपानें आढळतो. तो फार कठिण असून त्यावर दुसरे पदार्थ घांसले असतां ते झिजतात. रत्‍ने, इंद्रनीलमणि, पुष्पराग (टोपॅझ, पीतस्फटिक), नीलमणी व पाच हे त्याचेच स्फटिकमय प्रकार असून त्यांनां निरनिराळया धातूंच्या प्राणिदाच्या योगानें रंग आलेले असतात. स्फटाचे उत्प्राणिद तापविलें असतां स्फटभस्म (अल्युमिना) हा पदार्थ पांढर्‍या भुकटीच्या रूपांत मिळतो. ही भुकटी जाळली असतां घट्ट व कुरुंदासारखी कठिण होते. विजेच्या ज्योतीनें किंवा प्राणोज्जज्योतीनें ती वितळते, व थंड झाल्यानंतर बहुतेक वर दिलेल्या खनिज पदार्थांप्रमाणेंच स्फटिकाकार बनते. स्फटाचे प्लविद (फ्ल्युओराइड) टंकत्रिप्राणिदा (बोरोन टायॉक्साइड) बरोबर तापविल्यानें; स्फटाचें स्फुरित (फॉस्फेट) सिंधुगंधकिताबरोबर वितळविल्यानें; दाबाखालीं असलेल्या उदहराम्लवायूंत मंद तांबडा रंग येईपर्यंत स्फटभस्म तापविल्यानें; व शिशाच्या प्राणिदाबरोबर झगझगीत तांबडा रंग येईपर्यंत स्फटभस्म तापविल्यानेंहि स्फटिकाकार स्फटभस्म मिळतें. या प्रतिक्रिया फार महत्त्वाच्या आहेत कारण या अल्युमिनापासूनच पुढें कृत्रिम माणिक, किंवा इंद्रनीलमणि तयार करितां येतो.

स्फट उज्जित (अल्युमिनियम हायड्रेटस) — स्फट प्राणिदाचे उज्जमय कित्येक पदार्थ माहीत झालेले आहेत. त्यांपैकी गिबसाइट [स्फ (प्रउ)३], डायास्पोर [स्फ प्र. (प्रउ)] व बॉक्साइट [स्फ२ प्र(प्रउ)४] हे खनिज पदार्थांत सांपडतात. स्फटक्षाराच्या थंड द्रावणामध्यें अमोनिया घातल्यास स्फट उज्जित हा पदार्थ धुक्यासारख्या पांढर्‍या सांक्याच्या स्वरूपांत मिळतो. हा स्फट हरिदात विरत नाही, पण पालाश किंवा सिंधु उत्प्राणिदांत (हायड्रॉक्साडमध्यें) विरतो. याचा रंग देण्याच्या कामांत फार उपयोग होतो.

स्फ टा चे क्षा र:— त्रिप्राणिदा (स्फ२प्र३) पासून होणारे क्षार स्फटिकाकारांत व इतर बाबतीत कुम (क्रोमिअम) व लोहिक (फेरिक) लोखंड यांच्या तत्सम क्षारासारखेच असतात.

स्फट हरिद (स्फह३) हें स्फटाच्या कापांस कोरडया हराच्या प्रवाहांत तापविलें असता ऊर्ध्वपातन होऊन बाहेर पडतें. स्फटहरिद हें पांढरें स्फटिकाकाकार घनद्रव्य असून त्याच्या वितळणाच्या बिंदूच्या किंचित् खालींच त्याची वाफ होऊं लागते संयोगीकरणाचा कारक म्हणून याचें सेंद्रियरसायन शास्त्रज्ञास फार महत्त्व आहे. स्फटगंधकित (स्फ२(गप्र२)३ हें ज्वालामुखी पर्वतासंन्निध किंवा स्फटाच्या दगडांत सांपडते.

स्फट सिकितें (सिलिकेटस), खनिज पदार्थांत विस्तृत प्रमाणावर विखरलेलीं असून ती साधे दगड, रत्‍नें, पीतस्फटिक व वैडुर्य (वेरिल) चुनडी (गार्नेट) वगैरेंत सांपडतात  वैडुर्य व समुद्रपार रंग, हे पदार्थ स्फटसिकितें व सिधु सिकितें यांचे बनलेले असतात. सर्व प्रकारच्या मातींत स्फट सिकितच असल्यामुळें, चिनी मातीच्या व इतर मातीच्या भांडयांच्या  कारखान्यांत त्यांचें महत्त्व बरेंच आहे. स्फट दार्वित (अ‍ॅसिटेट) याचा रंगविण्याच्या व जलनिरोधी करण्याच्या कामीं उपयोग होतो.

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .