प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   सर्वच शिया लोक अवतारतत्त्व मानीत नाहींत हे खरें तथापि खलीफाचा वारसा अल्लीच्या वंशजांस ईश्वरी कायद्याप्रमाणें व  रक्तसंबंधानें पोहोचतों आणि सुनीपंथी लोकांप्रमाणें लोकनियुक्त खलीपाकडे पोहोंचत नाहीं हे जें शिया पंथांच्या लोकांचे तत्त्व आहे. त्याचें अवतार कल्पनेशीं साम्य आढळून येते. इमामसंबंधाचा सिद्धांतहि पुष्कळ आधारावर अवलंबून आहे. या इमामांचा ईश्वरदत्त वारसा, त्याच्या, धर्मगुरूपासूनच्या उत्पत्तीमळें, त्यांच्या अतिमानुष कृत्यांमुळें व दैवी तेजामुळें शाबीत केला जातो. आडामपासून पुढें झालेल्या विभूतिमालिकेमध्यें जें तेज परंपरेने उत्पन्न झालें होतें, जें तेज महंमदाच्या आणि अलीच्या आज्याच्या जंघेंतून शिरलें, आणि त्यांतील भाग अबदल्लाला, त्याच्या मुलाला (महंमदाला), नातीला म्हणजे फतिमेला व अबुतालीब व त्याचा मुलगा अली यांना मिळालें व अलीफतिमा दंपत्यापासून त्यांच्या मुलाला (करबेलाच्या धर्मगुरूला) मिळालें तें दैवी तेज महंमदाच्या वंशजाना शेवटपर्यंत मिळत राहून प्रलयकालीन शेवटच्या इमामापर्यंत (प्रच्छन्न) चालू राहील. अशी याइमामांची श्रद्धा आहे.

सुनी लोकामध्यें देखील नूरमहंमद म्हणजे महंमदाच्या दैवी तेजाविषयींचा एक सिद्धांत आहे. त्या तेजापासून सर्व धर्मगुरू उत्पन्न झाले. हें तेज सार्वकालिक असून दैवी परंपरा चालविणार्‍यांच्या ठिकाणीं संभवतें व तें तेज महमंदाच्या पूर्वजांच्या ठिकाणी वास करीत होते, पण शिया पंथाच्या लोकांनीं त्या तेजाचें अतिशय तेजःपुंज वलय अलीला मिळालें असें म्हटलें आहे. सृष्टीच्या आरंभापूर्वी १४०००० वर्षे महंमद व अलीची मिश्र तेजें परमेश्वरासमोर चमकली व नंतर महंमदाच्या आजाच्या जघांतून प्रविष्ट झालीं. हें इमामाचा हक्क शाबीत करणारे तेज अवेस्तामधील व्हरेनाहशीं जुळतें व त्याचा पारशी कल्पनेशीं कदाचित ऐतिहासिक संबंधहि असावासें वाटतें. गोल्डझिहरला हा संबंध मान्य नाही. पण महंमदाचे पूर्वास्तित्व व सनातन तेज यामधील संबंध जोरानें प्रतिपादन करून ज्यू लोकांचे विचारांची छटा यामध्यें दृष्टीस पडते असें तो म्हणतो. तरी पण इराणमधील शियापंथाच्या लोकांमध्ये ईश्वरदत्तवारसाचें तत्त्व मूळ इस्लामधर्मांत नसतांनां आलें ही गोष्टहि लक्षांत ठेविली पाहिजे.

प्रत्येक नवीन इमामाध्यें हें दैवी तेज परंपरेने वास करतें याचा संबंध शहरस्तानी पुनर्जन्माच्या सिद्धांताशी लावतो. अवेस्तामध्ये पुनर्जन्मसिद्धांत आढळून येत नाही. प्रत्येक युगाचा निरनिराळा इमाम असतो. त्याला द्यावयाचा मान हा श्रद्धेच्या पांच स्तंभाबरोबरच सहावा स्तंभ म्हणून मानला गेला आहे— या कल्पनेवर निःसंशय तर्‍हेनें अभिनवप्लेटोपंथाच्या विश्वव्यापी शक्तीच्या युगायुगांतील प्रभावाच्या सिद्धांताची व तसेच प्रत्येक युगाला विष्णु आपला नवीन अवतार धारण करतो या हिंदुधर्माच्या सिद्धांताची छाप बसलेली आढळून येते. शेवटच्या इमामासंबंधीचें जें वर्णन आहे त्यांत ज्यूधर्माची छटा दृष्टीस पडते. सकीना हें इमामाला लागणारे विशेषण श्कीनाह या ज्यू शब्दावरून आलें असावें असें दिसते.

घुलात संप्रदायात दैवी तेजाचें तत्त्व मान्य होतें एवढेंच नव्हे तर त्यांनीं अवतारकल्पनेचाहि स्वीकार केला होता. व निदान अलीला ते ईश्वर हें उपपद लावीत. सामान्य शिया पंथीयांनीं हे अवताराचें तत्त्व (हुलुल) अंगिकारलिलें नाहीं. शहरास्तानीनें घुलीय लोकाप्रमाणेंच हुलुलीय लोकांचीहि ख्रिश्चन धर्मीयांबरोबर तुलना केलेली आहे. या अवतार तत्त्वावर विश्वास ठेवणार्‍या लोकांनीं महंमदापेक्षा देखील अलीला अधिक मान दिला; व अशा रीतीनें आर्यन विचारांच्या धर्तीवर ईश्वरासंबंधाची कल्पना त्यांनी वसविली. इराणांतील इस्लाम धर्मामध्यें ईश्वर आणि मनुष्य यांचा निकट संबंध मानला होता. शफीचें देवतेशीं ९ व्या शतकापासून जें ऐक्य मानण्यंत आलें त्याचा व अवतारकल्पनेचा तत्त्वतः कांहीहि संबंध नाहीं. शफीपंथाच्या तत्त्वज्ञानामध्यें  अभिनव प्लेटो पंथाच्या व हिंदु धर्माच्या परमात्मैक्यासंबंधीच्या कल्पना बर्‍याच घुसल्या होत्या हे अलबिरूनीनें सिद्ध केलें आहे. अशा प्रकारचे सर्व व्यापित्त्वाचे विचार हें अतिशययोक्ती पूर्ण होत जाऊन अवतारतत्त्व फारच व्यापक होतें व त्यालाअनिश्चितता प्राप्त होते असें सोडरब्लाम म्हणतो. त्याच्या मतें वाटेल त्या धर्मगुरूला अवतार म्हणणें यामुळें त्या शब्दाचें स्वारस्य जातें.

ख्रिस्ती धर्माचें हें एक विशेष तत्त्व आहे कीं, त्यामध्यें देवाचा एकच अवतार मानण्यांत आला आहे. हिंदुस्थानामध्यें त्याच्या अगदी उलट स्थिति आढळून येते. सर्वात प्राचीन असा कृष्णावतार असून त्यानंतर असंख्य अवतारांपर्यंत मजल गेलेली आहे व त्यामुळें बुद्ध, वगैरे सर्वच धर्मगुरूंना अवतार मानण्यांत येतें. प्रत्येक धर्मगुरू हा अवतार मानण्यांत येतो. व युगें हि असंख्य मानलीं गेल्यामुळें प्रत्येक युगाचा एक अवतार धरला तरी असंख्य अवतार होतात. महायान पंथाच्या कांही शाखांमध्ये प्रत्येक भौतिक बुद्धगणिक मनोमय बुद्ध असतो अशी कल्पना प्रसृत होऊन तिचें पर्यवसान, खरा एकच बुद्ध देव असून त्याचे हे सर्व प्रभव आहेत यांत झालें. शोपेनहार व इतर कांहीं विद्वानांचें मत असें आहे की, अनेक बुध्दंची कल्पना ख्रिस्तांच्या एकावताराच्या कल्पनेपेक्षां युक्तिवादास अधिक धरून आहे.

शिया पंथानें व त्याच्या शाखांनीं मध्यम मार्ग पत्करिला. त्यांच्यामध्यें इमामांच्या संख्येसंबंधानें एकवाक्यता नाहीं. इराणी राष्ट्रधर्म खात्याप्रमाणें अवघे १२ व इमाम असून शेवटचा इमाम महंमद अबुल कासिम हा महदी म्हणून शेवटच्या युगांत अवतरेल; मध्ययुगांत सात इमाम मानण्याची बर्‍याच ठिकाणीं चाल होती. त्यांच्या मतें अडाम, नोहा, अब्राहाम, मोझेस, जीसस, महंमद आणि महंमद महदी असे सात नाटिक (अवतार) होते. ज्याअर्थी बायबल प्रमाणें इस्लामी धर्म हा मानवी इतिहासाला अंत हा आहेच असें मानतो त्याअर्थी त्यांच्या अवतारांची संख्या ही मर्यादित असणें स्वाभाविकच आहे.

अवतार कल्पनेसंबंधीं निरनिराळया धर्मीयांच्या कल्पना पुढें दिल्या आहेत.

हिंदू— पुराणांत व तत्सगृश इतर ग्रंथांत प्रतिपादन केलेलें अवतारतत्त्व हें मध्ययुगीन व अर्वाचीन हिंदूधर्माचें एक प्रमुख तत्त्व आहे. विशेषतः वैष्णवधर्मीय लोकांमध्यें हें अधिक प्रचलित आहे. बहुतेक सर्व वैष्णण विष्णूच्या स्वरूपापेक्षां त्याचे जे शेवटचें अवतार राम व कृष्ण त्यांचेंच पूजन करतात. याच्या उलट शिव हा त्याच्या मूळच्या व इतर स्वरूपांत ज्यांनां तात्विक दृष्टया अवतार म्हणता येत नाहीं— पूजिला जातो. यास्तव हिंदुस्थानांतील अवतारतत्त्वाचें स्वरूप लक्षांत येण्यास व त्यावरील अनेक मतांचा गुंतागुंतीचा इतिहास समजण्यास या विष्णूच्या अवतारांचे नीट पर्यालोचन केलें पाहिजे.

विष्णूच्या अवतारांच्या तत्वविवेचनासाठीं जी गृहीत गोष्ट धरावी लागते ती हीं कीं, विष्णु उर्फ नारायण हा परमेश्वर असून सकल विश्वाचा निर्माता व शास्ता आहे. ज्या वेळेला त्याच्या सत्तेला व जुमानतां दुर्जन जगताला त्रास देतात त्यावेळीं तो जगताचें रक्षण करण्याकरितां पृथ्वीवर अवतार घेतो. ह्यासंबंधीं भगवद्गीतेंत असें म्हटलें आहे कीं:—

“॥यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अब्युत्थानमकस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥

यावरून असें दिसतें कीं, प्रथमतः विष्णूचे अनंत अवतार आहेत. अशी कल्पना होती. पण पुढें ही अवतारांची संख्या मर्यादित करण्याकडे आणि शिवाय अवतारी पुरुषांचा व परमेश्वराचा स्पष्ट तर्‍हेनें संबंध दर्शविण्याकडे तत्त्वज्ञान्यांची प्रवृत्ति होऊं लागली. हें आपल्याला हरिवंश पर्वामध्यें ४१ व्या अध्यायांत विष्णूच्या अवतार वर्णनाच्या प्रसंगावरून पूर्ण दिसून येतें. ४१ व्या अध्यायांतील १७—२० श्लोकांत असें म्हटलेलें आहे.

॥हन्त ते कथायिष्यामि विष्णोर्दिव्यां कथां शृणु॥
यदायदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
धर्मसंस्थापनार्थाय तदा संभवति प्रभुः॥१७॥

तस्य  ह्येका महाराज मूर्तिर्भवति सत्तमा।

नित्यं दिविष्टा या राजस्तपश्चरति दुश्चरम्॥१८॥
द्वितीयाचास्य शयने निद्रायोग मुपायया।
प्रजा संहारसर्गार्थ किमध्यात्मविचिंतकम् ॥१९॥
सुप्त्वा युगसहस्त्रं स प्रादुर्भवति कार्यत:।
पूर्णे युगसहस्त्रे तु देवदेवो जगत्पतिः ॥२०॥

नंतर त्याचे कांहीं अवतार कथन केले आहेत, व ज्याअर्थी दहावा अवतार कल्कीचा मानला आहे, त्याअर्थी विष्णूचे दहाच अवतार मानले गेले असावेत असें उघड दिसतें. या ठिकाणी अवतार हा शब्द न वापरतां प्रादुर्भाव हा शब्द वापरण्यांत आला आहे, ही लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट आहे. सर्वांनां परिचित असे विष्णूचे अवतार म्हणजे (१) मत्स्य, (२) कूर्म, (३) वराह, (४) नरसिंह, (५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण, ९) बौद्ध व १०) कल्कि हे होत.

विष्णूच्या अवतारांचें जर पर्यालोचन केलें, तर  आपल्याला असें आढळून येईल की, ह्या अवतारंचे निरनिराळे वर्ग पडूं शकतील. प्रथम वामनावताराची गोष्ट घ्या. विष्णूनें आपल्या तीन पावलांनी त्रैलोक्य व्यापून टाकिलें हा जो ॠग्वेदांतील उल्लेख आहे, त्यावरून ही कथा रचिलेली दिसते. याचा और्णवाभ व यास्क याचा अर्थ भिन्न आहे. कूर्म व वराह या अवतारात केलेलीं कृत्यें मूलतः प्रजापतीचीं असून ती विष्णूवर लादलेलीं दिसतात. (शतपथब्राह्मण७. ५.१५; १४.१, २.११) तैत्तिरीय संहिता ६.२,४२; तैत्तिरीय आरणयाक १.१३;) प्रजापति हा विशिष्ट कार्याकरिता अशा प्रकारचे अवतार घेत असल्याचें वर्णन आढळून येतें. प्रजावतीनें वराह अगर कूर्म अवतार घेतला याचें कारण त्याच्या पूजकापैकी कांही वर्ग पशुपूजकांचा असावा, असें दिसतें; पण ज्या वेळेला नारायण हा परमेश्वर व जगताचा स्रष्टा असे मानण्यात येऊं लागलें, त्या वेळीं ब्राह्मणकालीन स्रष्टा मानला गेलेल्या प्रजापतीच्या जागी नारायण येऊन प्रजापतीच्या कृत्यांचा अध्यारोप नारायणावर करण्यांत आला. या प्रकारच्या अवतारांमध्येंच मत्स्यावताराचीहि गणना करता येईल. नारसिंहाचा अवतार हा स्वतंत्र वर्गात पडेल अगर वामनावताराच्या वर्गातहि जाऊं शकेल. नारसिंहाची कथा तैत्तिरीय आरण्यकांत एकदां आलेली दिसते.

उरलेले  जे तीन अवतार म्हणजे राम, कृष्ण व परशुराम यामध्यें एक विशेष दृष्टीस पडतो तो हा कीं, याचा वास्तविक पाहता विष्णूशीं मूळांत काहीहि संबंध नव्हता. महाभारतामध्यें परशुरामाविषयीं जी गोष्ट आलेली आहे, तींत त्याच विष्णूच्या अवताराशीं कांहीहि संबध नाही; पण रामायणांमध्यें  जी परशुरामांची गोष्ट आहे, तीमध्यें परशुरामाजवळ विष्णूचें धनुष्य असून त्यानें रामाचा पराभव करण्याचा प्रयत्न केला; पण रामानें तें धनुष्य वाकवून परशुरामाचा तेजोभंग केला असें म्हटलेले आहे. वास्तविक पाहतां दोघेहि जर एकाच विष्णूचे अवतार आहेत, तर एका अवतारानें  दुसर्‍या अवताराचा पराभव करणें म्हणजे स्वतःचा स्वतःकडूनच पराभव करून घेण्यासारखें आहे, पण परशुरामाचा देखील विष्णूशीं व्यवहारामध्यें संबंध आणला जात असावा, हें यावरून उघड होतें.

आतापर्यंत आपण ज्या ज्या अवतारांचा विचार केला, ते ते अवतार म्हणजे मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह आणि वामन हे होत. हे लोकांच्या नेहमींच्या प्रचारांतील नव्हते; पण राम व कृष्ण या दोन अवतारांच्या बाबतींत मात्र तशी गोष्ट नाहीं. हिंदुधर्मामध्यें यांनां फार महत्त्व आहे. यांचे उपासक हिंदुधर्मीयांमध्यें अतिशय आहेत. तेव्हां यांच्यासंबंधी अधिक विचार करणें जरूर आहे. त्रेतायुगाच्या शेवटीं रामाचा अवतार झाला व द्वापारयुगाच्या शेवटी कृष्णाचा जन्म झाला, असा सर्व हिंदूंचा समज आहे. याचें कारण रामायणामध्यें कृष्णाचा उल्लेख आलेला नाहीं, पण महाभारतामध्यें कृष्ण ही प्रमुख व्यक्ति असली तरी रामोपाख्यान स्वतंत्र दिलें आहे हे होय.

राम हा अवतार मागाहून बनविला गेला आहे असें दिसून येतें. कारण मूळ रामायणामध्यें कवीनें रामाला मनुष्यच म्हटलें असावें, पण त्यानंतर रामायणांमध्यें जी भर पडली तीमध्यें मात्र राम हा पूर्णावतार होता, असें मानण्यांत आलें आहे. यावरून मूळ रामायणामध्यें भर पडण्याच्या वेळेला रामाला अवतार मानीत असत हें उघड आहे. त्या वेळेपूर्वी राम हा केवळ काव्याचा नायक होता; पण रामायणामुळें तो लोकांच्या अतिशय परिचयाचा झाला, आणि ज्याअर्थी कवीनें त्याला सर्व मानवांत अग्रगण्य, स्वकर्तव्योन्मुख मुलगा, प्रेमळ प्रियकर, सद्गुणांचें माहेरघर, नीतीचा पुतळा, अशा रीतीनें रंगविलें आहें त्या अर्थी तो लोकांचा फारच आवडता झाला व लोक त्याला फारच मानूं लागले. रामाला अवतारी मानण्याचें आणखी एका दुसरें कारण आहे. रामानें जी साहसें केलेली आहेत, ती मानवाच्या शक्तीबाहेरचीं आहेत. त्यानें वानरांशीं आपली मैत्री जमविली व शंभर योजनें समुद्र ओलांडून वानरांच्या साहाय्यानें रावणासारख्या बलाढय राक्षसाला मारलें. अर्थातच या अलौकिक कृत्याचें लोकांनां फार आश्चर्य वाटलें व त्यांनीं त्याला अवतार मानण्यास सुरुवात केली.

ह्या कल्पनेच्या दोन बाजू आहेत. एक लौकिक व मानसिक अगर अध्यात्मिक. अध्यात्मिक ही बाजू ब्रह्म, विश्वोत्पत्ति वगैरे विचारांवर रचलेली असून लौकिक ही दैत्यांच्या संहारावर उभारलेली आढळून येते. विष्णु हा सर्व दैत्यांचा संहार करणारा असल्यामुळें तशाच प्रकारचा जो कोणी पराक्रम करील त्याचा व विष्णूचा संबंध जोडला जातो. निरनिराळया देशांतील पौराणिक कथांमध्यें अशा प्रकारचा संबंध थोडया चमत्कारिक रीतीनें दाखविला जातो. हा अमक्या कुमारिकेला किंवा स्त्रीला अमक्या देवापासून झाला, अशा प्रकारची ते कल्पना करतात; पण अवताराच्या बाबतींत हिंदूमध्यें अशा प्रकारची अश्लील कल्पना आढळून येत नाहीं. रामाच्या अवतारासंबंधानें खालील प्रकारची गोष्ट आढळून येते. देवांनी रावणाच्या जुलमी कृत्यांबद्दल विष्णूजवळ तक्रार केली. देवांकडून तूं अवघ्य आहेत, असा रावणास वर मिळाला असल्याकारणानें विष्णूनें मनुष्याचें रूप धारण करण्याचें कबूल केलें व दशरथाच्या राण्याच्या पोटीं येण्याचें ठरविलें. दशरथानें ज्या वेळी पुत्रप्राप्तीकरिता यज्ञ प्रारंभिला त्या वेळीं विष्णु स्वतः यज्ञरूपानें प्रगट होऊन त्यानें दथरथाला आपल्या बायकांना वाटून देण्यासाठीं दिव्य पायस दिलें. या नंतर कौसल्या, सुमित्रा व कैकेयी, यानां राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न असे चार पुत्र झाले. या चारींपैकी रामाच्या ठिकाणीं विष्णूचे अधिक तेजाश दिसून येतात. कदाचित् राम हाच मूळ खरा अवतार असून मागून इतर तिघांनाहि अंशावतार म्हटलें असण्याचा संभव आहे. त्याचप्रमाणें सीता ही मागाहून लक्ष्मीचा अवतार मानली गेली असावी. हा तात्त्विक विचाराचा परिणाम दिसतो. राममहत्वास कवीच कारण असे बल्हणहि म्हणतो.

मानवी कथानायकापासून तो विष्णूचा अवतार मानला जाण्याइतका रामाला जी स्थिति प्राप्त झाली, तीवरून एवढी गोष्ट सिद्ध होते कीं, ही अवतारकल्पना त्याच्या अगोदर पूर्णपणें अस्तित्त्वांत होती व तिचा उपयोग कवीनें रामाच्या बाबतींत करून घेतला. रामाच्या अगोदर कृष्णाला अवतारपद प्राप्त झालें असावें असें दिसतें. कृष्णाची देव या भावनेनें जी प्रसिद्धि झाली तीपासून हें अवतारतत्त्व निघालेलें दिसतें व त्यानंतर बर्‍याच शतकांनी रामाचेहि अवतारित्व लोकप्रसिद्ध झालें.  अर्थातच अवतारतत्त्व हें ज्याअर्थीं हिंदु लोकांचें महत्त्वाचें तत्त्व होऊन वसलेलें आहे. त्याअर्थी ज्यामुळें हें अवतारतत्त्व उदयास आलें त्या कृष्णाच्या चरित्राकडे लक्ष पुरविलें पाहिजे.

महाभारतामध्यें, हरिवंशामध्यें व पुराणांमध्यें कृष्ण हा विष्णु होता असें स्पष्ट म्हटलेलें आहे. हल्लींच्या महाभारताची रचना होण्यापूर्वींच्या वाङ्मयांतहि कृष्णाविषयीं थोडा फार उल्लेख येत असे. त्या उल्लेखाकडे पहाणें अत्यंत जरूरीचें व मनोरंजकहि आहे. या उल्लेखांकडे पहातांना एक गोष्ट लक्षांत ठेवणें जरूर आहे ती ही कीं, महाभारतानंतरच्या वाङ्मयांत वासुदेव व कृष्ण हे एकच मानले जात. तशी तत्पूर्व वाङ्मयांत स्थिति नसून वासुदेव व कृष्ण या भिन्न व्यक्ती होत्या. तैत्तिरीय आरण्यकामध्यें (११.१,६) वासुदेवाचा नारायण व विष्णु यांच्यासंह उल्लेख आलेला आहे. यानंतर ‘वासुदेवार्जुनाभ्याम्’ या पाणिनीच्या सूत्रांत वासुदेवाचा उल्लेख असून वासूदेव हा देवकोटींतील आहे, असें पाणिनीचें मत स्पष्ट दिसतें. कृष्णाचें नांव प्रथमतः छांदोग्योपनिषदांत आलेलें असून त्यांत देवकीपुत्र कृष्णाला घोरांगिरसानें मंत्रोपदेश केला; असें म्हटलेलें आहे. या ठिकाणी कृष्णाला मनुष्यच मानलेलें आहे. पण पुढें नारायणाथर्वशिरस् व आत्मबोध या उपनिषदांमध्यें कृष्णाचा व मधुसूदन (विष्णू) चा एकत्र उल्लेख आलेला आहे व त्याच्या पाठीमागे ‘ब्रह्मण्य’ हें विशेषण आहे. ब्रह्मण्य याचा अर्थ कसाहि घेतला तरी या ठिकाणीं कृष्ण हा विष्णूच्या बरोबरीनें मानिला आहे हें उघड दिसतें. सारांश वर दिलेल्या उल्लेखावरून असें अनुमान निघतें कीं, वेदकालाच्या अखेरीस वासुदेव हा विष्णु व नारायण यांच्या बरोबरीनें मानला जात होता; देवकीपुत्र कृष्ण हा ज्ञानी यति मानला जात होता; हे दोघेहि  निराळे होते पण पुढें हे दोघेहि एकच मानले जाऊन त्यानां अवतारस्वरूप प्राप्त झालें.

वासुदेव याचा अर्थ वसुदेववंशोत्पन्न असा सर्व भारतीय ग्रंथकारांनीं केलेला आहे. परंतु बलदेव हा वसुदेववंशोत्पन्न असूनहि त्याला वासुदेव असे म्हणण्यात येत नाहीं. वासुदेव याचें वसुभद्र असें दुसरेंहि नाव आढळतें. वसुभद्र हें वासुभद्राचेच चुकीचें नाव असावें असें वाटतें. आणि हें जर खरें असेल तर वासुदेव नावापासून त्याचा  बाप वासुदेव नावाचा एक राजा होता असें म्हणण्याची रीत पडली असेल. याला एक पुरावा म्हणजे फार प्राचीन वाङ्मयात कृष्णाच्या बापाचें नाव आढळत नसून देवकी पुत्र असें त्याचें वर्णन येतें. याहिं पुढें जाऊन कृष्णाच्या चरित्राचें जर बारकाईने परीक्षण करूं लागलों तर आपल्याला असें आढळून येतें की, त्याच्यामध्यें दैवी व मानवी गुणांचा मिलाफ झालेला आहे. त्याच्या चरित्राचे दोन भाग पडतात. त्याचें बाळचरित्र गोपगोपींच्या बरोबर निगडीत झालेलें आहे.दुसर्‍या भागात वृष्णींचा राजा या नात्यानें व पांडवाचा कैवारी या नात्यानें त्याचे पराक्रम आलेले आहेत. त्यानें बाळपणीं व तारुण्यांत दैत्यसंहारासारखीं अनेक अद्भुत कृत्यें केलीं. बलदेव हा देखील अवतार मानला जात असे. कदाचित कृष्ण व बलदेव हे पूर्वीं दोन देव असून त्यांचा या ठिकाणी मुद्दाम संबंध आणिला असावा. कंसवधापर्यंत या दोघांचेहि एकत्र वर्णन येतें. पण पुढें मात्र त्याचें निरनिराळें वर्णन येतें. कृष्ण हा यादवांचा राजा होतो व त्यांचें अनेक प्रसंगी रक्षण करतो. तो द्वारका नावाची  नगरी स्थापन करितो; पांडवांशी स्नेह करून जरासंधाचा वध करतो; तो शिशुपालाला ठार मारितो. पुढें यादवांमध्यें दुफळी झालेली व त्यांचा नाश झालेला तो स्वतः आपल्या डोळयांनी पाहतो. जरस नांवाच्या एका व्याधानें त्याला चुकून काळवीट समजून बाण मारला व तो त्याच्या पायांत रुतून पुढें त्यामुळें तो वारला. कृष्णासंबंधीं अतिशय वाङमय निर्माण झालें आहे. हरिवशांमध्यें,  पुराणामध्यें व इतर ग्रथांमध्यें कृष्णाचें यश गाईलें गेलें आहे व अशा रीतीनें आबालवृध्दंनां त्यांचे चरित्र माहीत आहे.

महाभारतामध्यें, हरिवंशामध्यें व पुराणामध्यें प्रत्येक वेळी त्याला परमात्मा म्हणण्यांत आले आहे; पण एकंदरीत त्याच्या चरित्रांतील जी वागणूक दिसते ती रामाप्रमाणे केवळ शुद्ध नसून जशास तसें या न्यायानें प्रसंगीं पडेल त्याप्रमाणें कार्यप्राप्त्यर्थ वागावयाचें अशी होती.

अशां स्थिति असतानां कृष्ण हा साधा देवच नव्हे तर परमात्म्याचा अवतार कसा मानण्यात आला हा प्रश्न आहे. कृष्णभक्तीच्या बाबतींत ख्रिश्चन धर्माची छाया दिसून येते असें जे वेबरचें म्हणणें आहे तें स्पष्ट चुकीचें आहे. कारण, जैनांनीं, ख्रिस्ति शकापूर्वींच आपली विचारपद्धति या कृष्णपूजेपासून घेतेलली आहे असे सिद्ध झालेलें आहे.  व त्यावरून कृष्णपूजा त्यावेळीं देखील अतिशय प्रचारांत होती असें दिसतें. डॉ. भाण्डारकरांच्या मतें यादव, वृष्णी अगर सात्वत यांच्या कुळांतील वासुदेव नावाच्या एखाद्या क्षत्रियानें गौतम बुद्धाप्रमाणेंच एखादी आपली विचारपद्धति स्थापन केली असावी. पण याकोबीच्या मतें हे मत चुकींचे आहें; कारण, महाभारतादि ग्रंथांत त्याचें जें वर्णन आलेलें आहे तें योद्धा या नात्यानें असून धर्मसंस्थापक या नात्यानें आलेलें नाहीं. फार झालें तर एवढेंच म्हणता येईल की पूर्वींच्या उपनिषत्कालीन राजाप्रमाणें कृष्णहि तत्त्वज्ञानाच्या बाबतींत फार काळजी घेत असे. डॉ. भांडारकर यांनी आणखी एक मत दिलेलें आहे की, ‘वासुदेव हा सात्वतांचा राजा असून त्याच्या मरणोत्तर लोकांनीं त्याला देव मानून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली. व त्या पूजेबरोबरच कांहीं तत्त्वें प्रचलित होऊन हा सात्वधर्म पुढे सर्व हिंदुस्थानांत प्रसार पावला.’ हे भांडारकरांचे मत जॉकोबीच्या मतें अधिक संभवनीय आहे, पण त्याच्या मतें यांतहि थोडासा फेरफार केला पाहिजे. वासुदेव व कृष्ण हे दोघेहि निरनिराळे असून पुढें पांचरात्र व भागवत यांनीं या दोघांचें ऐक्य करून त्यांची पाजू अंमलांत आणली हें महाभारतांतील नारायणीयाख्यावरून उघड होतें. या आख्यानावरून असें दिसतें की हा नवीन धर्ममूळचा सात्वतांचा असून व सात्वत हे कृष्ण ज्या वंशांतील होता त्या वंशाचे होते. तसेच कृष्णानें जो नवीन धर्म प्रतिपादन केला त्याचें अंधुक स्वरूप छांदोग्योपनिषदांत आपल्याला आढळून येतें. छांदोग्योपनिषदांत आपल्याला आढळून येतें. छांदोग्योपनिषदांत यज्ञ इतकीच जीवाची योग्यता आहे असें म्हटलेलें असून जीवाचें अमरत्व वर्णन केलेले आहे व परमात्म्याशीं त्याचें ऐक्यहि सांगितलेलें आहे. यज्ञाचें महत्त्व कमी करण्याचाही यांत प्रयत्न केलेला आहे. सात्वतधर्मातहि याच गोष्टीवर विशेष भर देण्यांत आलेला आहे. (वि. ४ प्र. ६ पहा) राजारामशास्त्री भागवत यांच्या मतें श्रीकृष्णाची अवतारस्थापना म्हणजे गोरक्षणधर्माचा उदय होय. हें मत त्यांनीं वि विस्तारांत बरेंच सविस्तर मांडलें आहे.

वर सांगितलेल्या हकीकतीवरून याकोबीच्या मतें कृष्णावतारांसंबंधी खालील प्रकारें अनुमान निघतें. ब्राह्मण काळामध्यें प्रजापति हा मनुष्यांचें दुःख निवारण करण्यासाठीं प्रसंगाप्रमाणें निरनिराळे अवतार धारण करतो असें त्यानें म्हटलेलें आहे. त्यानंतर नारायण देवाला महत्त्व आले व दैत्यशत्रु विष्णुशीं त्याचें ऐक्य करण्यांत आलें. वेदकालाच्या अखेरीस वासुदेव नांवाची देवता विष्णूचाच अंश म्हणून मानण्यांत आली. यादवांच्या व सात्वतांच्या काळीं ही देवता बरीच प्रचारांत होती व यादवांनीं व सात्वतांनीं आपला देव मानलेला कृष्ण व ही वासुदेव देवता यांचे ऐक्य जमविलें असावे; व अशा रीतीनें कृष्ण हा विष्णूचा अवतार समजला गेला असावा. अर्थातच पुढें या संबंधीची कथा रचण्यांत आली; ती अशी कीं, देवांनीं दानवांपासून आपलें रक्षण करण्याकरितां नारायणाची प्रार्थना केली, तेव्हां नारायणानें आपल्या जटेमधून दोन केंस एक काळा व एक पांढरा असे— उपटून पृथ्वीवर टाकले त्या दोन केसापैकीं जो काळा केस तो कृष्ण व पांढरा केस तो बलदेव, अशा रीतीनें त्या दोघांची अवतारांत गणना झालीं.

वर सांगितलेंच आहे कीं, पूर्वीं अवतार हा शब्द उपयोगांत नसून ‘प्रादुर्भाव’ असा शब्द वापरण्यांत येत असे. प्रादुर्भाव याचा अर्थ ईश्वर हा स्वतः मनास वाटेल त्या वेळेला विशिष्ट प्रकारचें रूप धारण करीत असे व त्या शिवाय त्याचें स्वतंत्र अस्तित्व असे. पण पुढें अवतार हा शब्द वापरण्यांत आला. तसेंच अंशावतार, अंशांशावतार अशा प्रकारचेहि भेद पाडण्यांत आले. कृष्णाला मात्र पूर्णावतार मानीत असल्याचें आढळून येतें.

यानंतर विष्णुनारायणाशिवाय असलेल्या इतर देवतांच्या अवतारांसंबंधी सांगणें जरूर आहे. शिव हा निरनिराळया स्वरूपांत पूजिला जातो व पार्वती ही निरनिराळया नांवानें पूजिली जाते, पण हे त्यांचे अवतार म्हणतां येत नाहीत. पण इतर देवांचे अवतार अगर अंशावतार आपल्याला प्राचीन ग्रंथांत पहावयास सांपडतात. हिंदुस्थानांतील प्राचीन ऐतिहासिक कथांतील विभूती या देवापासून उत्पन्न झालेल्या आहेत असें मानण्यांत येत असे. रामायणामध्यें हनुमान हा वायुपुत्र, वाली हा इंद्रपुत्र, सुग्रीव हा सूर्यपुत्र, तसेंच महाभारतांत भीम हा वायुपुत्र, अर्जुन हा इंद्रपुत्र, युधिष्ठिर हा धर्मपुत्र व नकुळ सहदेव हे अश्विनीपुत्र असे मानले जातात; ब्रह्मयानें देवांनां ‘अप्सरांशीं क्रीडा करून त्यांच्यापासून वानर उत्पन्न करावे व रामाला त्यांचे सहाय्य व्हावें’ अशी आज्ञा केल्याचा निर्देश रामायणांत आढळून येतो. महाभारतांत सर्व वीर हे कोणत्या ना कोणत्यातरी देवाचे अगर दैत्याचे अंशावतार मानिले गेले आहेत. या ठिकाणीं आपल्याला पुनर्जन्माचेंहि तत्त्व प्रच्छन्न असें दृष्टीस पडतें. राक्षसांच्या बाबतींत देखील तीच गोष्ट लागू पडते, हिरण्यकशिपु हाच रावण म्हणून जन्माला येतो आणि पुनः शिशुपाल म्हणून जन्माला येतो. अर्जुन हा इंद्राचा मुलगा असून नराचा अवतार मानिला गेला आहे.

हे अवतारांचे तत्त्व लोकांनां फार परिचयाचें झालेलें आहे व पुष्कळ ठिकाणीं त्याचा उपयोगहि करण्यांत आला आहे. एखाद्या साधूला त्याच्या हयातींत मान मिळत असला तर त्याला कोणत्या तरी देवाचा अगर ॠषीचा अवतार मानीत असत. संस्कृत आणि प्राकृत कथांमध्यें ही गोष्ट वारंवार नजरेस येते. कथेंतील नायिका अगर नायक यक्षांचे, अगर अप्सरांचे अवतार मानले जातात, यांनां कांहीं कारणांमुळे देवांचा शाप मिळालेला असतो व कांहीं अटीनंतर स्वतःचे रूप धारण करतां येंते. फार काय पण एखाद्या सुंदर पुरुषाला कामाचा अवतार एखाद्या सुंदर मुलीला रतीचा अवतार असें म्हणण्यांत येतें. यावरून हिंदु लोकांमध्यें ही अवताराची कल्पना किती हाडीमासी खिळून गेलेली आहे हेंहि दिसून येतें.

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .