प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

अवदानें, अवदानवाङ्मय.— जातकें म्हणजेंच अवदानें होत; बोधिसत्त्व हा त्यांचा नायक होय. जाकमालेला बोधिसत्त्वावदानमाला असेंहि म्हणतात;  कारण बोधिसत्त्वावदान व जातक हे शब्द समानार्थक आहेत. सूत्रालंकार व जातकमाला हे ग्रंथ अवदान वाङ्मयांतील धर्मग्रंथांशीं बहुतेक अनुरूप आहेत; व अवदानसमुच्चयामध्येंहि कित्येक जातकें आहेत.

सूत्रालंकार व जातकमाला या कथावाङ्‌मयांतील ग्रंथांप्रमाणेंच अवदानग्रंथाचाहि कांहीं भाग हीनयानपंथी वाङ्‌मयात्मक व काहीं महायानपंथी वाङमयात्मक आहे. जुने ग्रंथ साद्यंत हीनयानपंथाचे आहेत. पालि जातकांमध्यें व अवदानांमध्येहि आढळणारी बुद्धाची आराधना जरी या ग्रंथांतहि आढळते, तरी महायानी पौराणिक कथा व मर्यादातिक्रम यांच्यापासून ते ग्रंथ अगदीं अलिप्त आहेत; परंतु लहान लहान अवदानग्रंथ पूर्णपणें महायानी पंथाचे आहेत.

‘ अवदान ’ या शब्दावरून धार्मिक किंवा नैतिक अचाट कृत्य व अचाटकृत्याचा इतिहास, असा अर्थबोध होतो. आत्मयज्ञ करणें याला अशा प्रकारचें अचाट कृत्य असें म्हणतात. परंतु, धूप, पुष्प, विलेपन, सुवर्ण व रत्‍नें यांचे दान करणें, किंवा पवित्र स्थानीं स्तूप, चैत्य वगैरे उभारणें यालाहि अचाट कृत्य असें म्हणतात. “दुष्कर्मांचा परिणाम वाईटच व्हावयाचा” हें सामान्यतः दर्शविण्यासाठीं या गोष्टी लिहिलेल्या आहेत. परंतु त्यांत कर्माचाहि संबंध असून एका जन्मांतील कृत्यांचा भूत किंवा भविष्य जन्मांतील कृत्यांशीं कसा निकट संबंध असतो हें दाखविलें आहे. एका दृष्टीनें त्या केवळ दंतकथा आहेत. परंतु त्या अगदीं खर्‍या गोष्टी आहेत; व त्या स्वतः बुद्धानें सांगितलेल्या असल्यामुळें बुद्धवचन म्हणून सूत्राप्रमाणें त्या आधारभूत आहेत, असें बौद्ध लोक समजतात.

जातकांप्रमाणें अवदानें हाहि एक प्रकारचा नीत्युपदेश आहे. म्हणून पूर्व वृतान्तापासून कोठें व कोणत्या प्रसंगीं बुद्धानें ती गोष्ट निवेदन केली, हें बहुधा उपन्यासामध्यें सांगितलेलें असतें; व सरतेशेवटीं त्या बुद्धाच्या गोष्टींतील सार काढिलेंले असतें. अशाप्रकारें यथामार्ग अवदानांत पूर्वकालीन वृतान्तावरून सद्यःकालची गोष्ट व भावार्थ सांगितलेला असतो. भूतकालाच्या गोष्टींचा नायक जर बोधिसत्त्व असेल तर अशा प्रकारच्या अवदानाला ‘जातक’ असेंहि म्हणतां येईल. कांहीं अवदानें विशिष्ट प्रकारचीं आहेत. त्यांत बुद्ध पूर्ववृत्तान्तावरून गोष्ट सांगत नाहीं, तर भविष्यार्थ सांगतो. या भविष्यकालीन गोष्टींचा भूतकालीन गोष्टींप्रमाणेंच वर्तमानकालच्या कर्माचें विवरण करण्यास उपयोग होतो. दोन्ही प्रकारच्या गोष्टी ज्यांत एकत्र केलेल्या आहेत अशींहि कांहीं अवदानें आहेत; व कर्माचें चांगलें किंवा वाईट फल याच जन्मी प्राप्त होतें असें सांगणारीहि कांहीं अवदानें आहेत.

हीं सर्व प्रकारची अवदानें विनयपिटकांत व सूत्रालंकारांत निरनिरांळींहि आलेलीं आहेत, परंतु हीं मोठमोठया समुच्चयांत बहुधा एकत्र आढळतात. हीं बहुतेककरून ज्ञानवृद्धीसाठीं किंवा विद्याविषयक महत्त्वाकांक्षेसाठीं रचलेलीं असावी.

अ व दा न श त क.— अवदानशतक किंवा “शंभर अवदानें” हा ग्रंथ पहिल्या प्रकारचा असून सर्वांत जुना असावा असा अंदाज आहे. ज्या अर्थीं तिसर्‍या शतकाच्या पूर्वार्धांत या ग्रंथाचें चिनी भाषेंत भाषांतर झालें होतें व ज्याअर्थी यांत दीनाराचा (नाण्याचा) उल्लेख केलेला आहे, त्या अर्थी तो ग्रंथ इ. सनाच्या दुसर्‍या शतकांत झाला असावा असें जवळ जवळ निःसंदिग्धतेनें म्हणता येईल [रोमन देवरियसचा दीनार असा उल्लेख करणारे ग्रंथ इ.स. च्या दुसर्‍या शतकापूर्वी झालेले नसावेत. कारण हें नाणें ग्रीकांमार्फतच हिंदुस्थानांत  आलें असलें पाहिजे. (जॉली—रेक्टउंड मिट्टे, ग्रुंड्रिस २, ८, पा. २३)] हा ग्रंथ हनियान पंथाचा आहे हें कथानकांच्या स्वरूपावरून व सद्यःस्थितिदर्शक गोष्टींत आलेल्या परिनिर्वाणसूत्रांतील व शाखास्तिवाद्यांच्या संस्कृत धर्मशास्त्रामधील इतर सूत्रांतील उतार्‍यांवरून पूर्वींच सिद्ध झालें आहे (स्पेयर ९. पा. १६ आणि झेड्. डी. एम.जी. ५३, १८, १९, पा. १२० ओल्डनबर्ग, झेड. डी. एम्.जी. ५२. पा. ६७२). या दंतकथामध्यें बुद्ध—उपासना हा मुख्य भाग आहे; परंतु बोधिसत्त्व— संप्रदाय व महायानी तत्त्वज्ञान यांचा या गोष्टींत मागमूसहि नाहीं.


अवदानशतकांत दहा दशकें असून प्रत्येक दशकांत विशिष्ट विषय आलेला आहे. प्रत्येक दहा भागांचा एक वर्ग (वग्ग) अशा प्रकारची ही विभागणी पालि ग्रंथांत फार प्रचलित आहे; व म्हणून ती प्राचीन बौद्ध धर्मांतील असावी असें वाटतें. बुद्ध किंवा प्रत्येकबुद्ध होण्यासाठीं काय करावें लागतें हें पहिल्या चार दशकांतील कथानकांमध्यें सांगितलेलें आहे. वस्तुतः पहिल्या दशकांतील सर्व कथानकें व तिसर्‍या दशकांतील बरींचशीं कथानकें भविष्यकथनाच्या स्वरूपाचीं आहेत. ज्या धार्मिक कृत्याच्या योगानें एखादा मनुष्य (ब्राह्मण, राजकन्या, कुसीदकपुत्र, श्रीमान्, व्यापारी, बागवान्, राजा, नावाडी, लहान मुलगी वगरे) बुद्धाची आराधना करितो व कांहीं चमत्कार घडल्यावर पुढच्या युगांत हा मनुष्य बुद्ध किंवा (तिसर्‍या दशकांत) प्रत्येकबुद्ध होईल असे किंचित हास्य करून बुद्ध मोठयानें सांगतो, त्या धार्मिक कृत्याबद्दलची माहिती एका गोष्टीत सांगितलेली आहे. परंतु दुसर्‍या व चौथ्या दशकांतील गोष्टी जातकें आहेत. पूर्वींच्या एका जन्मीं बुद्ध स्वतः या कथानकांचा नायक असल्यामुळें या जातकांत सांगतिलेलीं धार्मिक, पुण्यशील व अद्भुत कृत्यें घडलीं असें सांगण्यांत येतें. पांचवें दशक हें प्रकारचें प्रेतवस्तु असून पालींतील पेतवत्थु हें त्याच्याशीं अनुरूप आहे. मौद्रल्यायनासारखा साधु प्रेतकोटीचें निरीक्षण करितो, व एखाद्या (पुरुष किंवा स्त्री) प्रेताला होत असलेल्या यातना पाहून तो त्यांचे कारण विचारितो; तें त्याला बुद्धाला विचारिण्यास सांगतें; भिक्षा न घालणें, साधूंचा तिरस्कार करणें वगैरे ज्या गोष्टी त्या प्राण्यानें पूर्वजन्मीं केलेल्या असतात त्याविषयींची  हकीकत बुद्ध त्या साधूला सांगतो. सत्कृत्याच्या योगानें स्वर्गांत देव होऊन राहिलेल्या मनुष्यांच्या व प्राण्यांच्या गोष्टी सहाव्या दशकांत सांगितलेल्या आहेत. शेवटच्या चार दशकांत कोणत्या कृत्यांच्या योगानें अर्हत् होतां येतें, याविषयींची कथानकें आहेत. सातव्या दशकांतील सर्व अर्हत् शाक्यकुळांतील असून आठव्या दशकांतील सर्व अर्हत् स्त्रिया, नवव्यांतील शुद्धाचरणी पुरुष व दहाव्यांतील अर्हत् ज्यांनीं पूर्वीं दुष्कर्में करून त्यांबद्दल शिक्षा भोगिल्यानंतर धार्मिक कृत्यें करून नंतर अर्हत् पदाला पोंचलेले असे पुरुष आहेत.

या समुच्चयांतील कथानकांचे वर्गीकरण वरून एका विवक्षित पद्धतीप्रमाणें हीं रचलेलीं आहेत; एवढेंच नाहीं, तर ती एकाच धर्तीवरहि लिहिलेलीं आहेत. या एकाच धर्तीवर लिहिण्याचा इतका परिणाम झाला आहे कीं, कांहीं ठिकाणीं भाषासरणी व स्थलवर्णनें अगदीं त्याच त्या शब्दांत पुनः पुनः आलेलीं आहेत. प्रत्येक कथानकाचा प्रारंभ असा होतोः—

“राजे, मंत्री, धनवान् लोक, नागरिक, व्यापारी संघ, सार्थनायक, देव, नाग, यक्ष, असुर, गरूड, किन्नर व महानाग यांनीं ज्याला पूज्य मानिलें आहे व ज्याची स्तुति केली आहे आणि देव, नाग, यक्ष, असुर, गरूड, किन्नर व हमा नाग यांनीं ज्यांची आराधना केली आहे, असा प्रसिद्ध पुण्यवान्, गुरू बुद्ध आपल्या शिष्यगणांसह  अन्न, वस्त्र, बिछाना, आश्रय खाद्यपदार्थ, औषध वगैरे सर्व आवश्यक गोष्टी भिक्षारूपानें मिळवून अमुक ठिकाणीं गेला व अमुक स्थळीं राहिला.”

प्रत्येक कथानकाचा उपसंहार खालील शब्दांनीं झालेला आहेः—
“गुरूनें असें संभाषण केल्यावर परमानंदित अंतःकरणानें भिक्षूंनीं त्या गुरुवचनाची प्रशंसा केली.”
एखाद्या गोष्टीचें तात्पर्य काढिल्यानंतर तें पुढीलप्रमाणें नेहमीं व्यक्त केलें आहेः—
“भिक्षू लोकहो, दुष्कर्मांचा परिणामहि अशा प्रकारें वाईटच होतो, अगदीं उत्तम कृत्यांपासून उत्तम फलप्राप्ति होते. व मिश्र कृत्यांचा परिणामहि मिश्र प्रकारचाच होतो. म्हणून तुम्ही भिक्षु लोकांनीं दुष्कर्मांचा व मिश्र कर्माचा त्याग करून सत्कर्म करण्यांत संतोष मानला पाहिजे.”

त्याचप्रमाणें धार्मिक मनुष्य, श्रीमान् मनुष्य, बलिष्ठ राजा, सुखकारक विवाह, तरुण मनुष्यांचे शिक्षण, पूर्वींच्या बुद्धाचें आगमन वगैरे गोष्टींचें वर्णन सर्व ठिकाणीं अगदीं त्याच त्या शब्दांनीं दिलें आहे. कांहीं लहान लहान वाक्यांनांच ही गोष्ट लागू आहे असें नाहीं, तर कित्येक छापील पानें भरून जातील, एवढया लांब लांब उतार्‍यांचीहि हीच स्थिति आहे. कोणी एक मनुष्य बुद्ध होईल हें भविष्य बुद्धानें हास्यवदनानें सांगितलें, त्याचें ज्या भागांत वर्णन केलें आहे, तो भाग लांबलचक ठरींव भागांपैकीं आहे. भविष्यकथनाच्या पूर्वी बुद्ध नेहमी हास्य करीत असे व तो हास्य करीत असतां निळे, पिंवळे व पांढरे किरण त्याच्या मुखापासून निघत असत. यांपैकी कांहीं किरण खालीं पातालांत व कांही स्वर्गलोकांत जात असत व हजारों लोकांमधून हिंडून येऊन पाठीमागच्या बाजूने ते किरण पुनः बुद्धाकडे येत व तें भविष्य ज्या प्रकारचें असें, त्याप्रमाणें बुद्धशरीराच्या कोणत्या तरी भागांत अन्तर्धान पावत, याचें फार सविस्तरपणें वर्णन केलेलें आहे. सामान्यतः अवदानशतकांतील कथानकपद्धतीचे, विस्तृतता व दीर्घसूत्रीपणा हे विशिष्ट गुण आहेत. तथापि सार्वत्रिक व कंटाळवाण्या परंतु बोधप्रक अशा अनेक गोष्टींशिवाय, अवदानशतकामध्यें अनेक महत्त्वाचीं कथानकें व बौद्धकथात्मक वाङमयातील भागांहून भिन्न असलेल्या व इतर ग्रंथांतून परिचित झालेल्या अशा अनेक गोष्टी आहेत. त्या कथासंग्रहाच्या स्वरूपाची कल्पना येण्यासाठी फक्त थोडया गोष्टी सारांशरूपानें देतां येतील.

गोष्ट २८ वीः— एका गरीब मुलीनें बुद्धाच्या पायांनां चंदनाचें विलेपन केलें, त्यामुळें सर्व शहरभर चंदनाचा सुवास सुटला;  या चमत्काराचा त्या मुलीला आनंद वाटून ती बुद्धाच्या पायां पडली व पुढील जन्मी मी प्रत्येकबुद्ध व्हावें, अशी तिनें बुद्धला विनंति केली. गंधमादन या नांवाची एके दिवशी प्रत्येकबुद्ध होशील, असें बुद्धनें हंसून भविष्य केलें.

गोष्ट ३४ वीः— ही सर्वस्वाचा त्याग केलेल्या शिबिराजाच्या गोष्टीचें रूपांतर आहे; परंतु फक्त मनुष्यप्राण्यांनां संतुष्ट केल्यानें त्याचें समाधान झालें नाहीं. लहान लहान प्राण्यांचेहि कल्याण करण्याची त्याची इच्छा होती म्हणून त्यानें आपली त्वचा चाकूनें कापिली व आपल्या रक्ताच्या योगानें डसणार्‍या मक्षिकांनी तृप्त व्हावें म्हणून तो त्यांची वाट पाहूं लागला. शक्राने स्वर्गातून हें पाहिले व त्याची परीक्षा घेण्यासाठी गृधाचें रूप घेऊन त्याच्यावर झडप घालण्याच्या मिषानें तो शिबीजवळ आला. राजानें त्याच्याकडे फक्त दयार्द्रदृष्टीनें पाहिलें व त्यास म्हणाला, “हे मित्रा, माझ्या शरीरांतून जें कांही तुला पाहिजे असेल तें घे, तें मीं तुला देतो.” नंतर त्या शक्रानें ब्राह्मणाचें स्वरूप घेऊन त्या राजाजवळ त्याचे दोन्ही डोळे मागितले. शिबी म्हणाला, “हे थोर ब्राह्मणा, तुला जें पाहिजे असेल तें घे, मीं तुला अडथळा करणार नाही.” नंतर शक्रानें आपलें खरें स्वरूप धारण करून शिबीला पूर्ण आत्मप्रबोधन होईल, असें त्याच्याबद्दल भविष्य केलें.

गोष्ट ३६ वीः— ही मैत्रकन्यकाची असून मित्तविंदकाच्या पालि जातकाचें हें रूपांतर आहे; पण बोधिसत्व हा नायक असल्यानें त्या गोष्टीला या ठिकाणीं पालि रुपांतराहून अगदीं भिन्न वळण मिळालें आहे.त्यानें आपल्या आईचा अपराध केल्यामुळें त्याला नरकवासाची शिक्षा झाली व त्या ठिकाणी त्याच्या मस्तकासभोंवती एक लोखडंचों उत्तप्त चक्र फिरत होतें असें येथें सांगितलेलें आहे; परंतु त्या भयंकर यातना तो भोगीत असतांना अशाच प्रकारचा दुसरा पातकी मनुष्य तेथें येईपर्यंत (६६००० वर्षे) त्याला ते चक्र सहन करावें लागेल असें  त्याला सांगण्यात आल्यावर त्याला प्राण्यांची दया येऊन, तशा प्रकारच्या यातना कोणालाहि होऊं नयेत म्हणून, तें चक्र आपल्या मस्तकावर नेहमीं  धारण करण्याचें त्यानें ठरविलें. या त्याच्या दयाळूपणाच्या विचारामुळें तें चक्र त्याच्या मस्तकापासून नाहींसे झालें.

गोष्ट ५४ वी:— बुद्धानें दिलेल्या केशांवर व काढिलेल्या नखांवर, आपल्या राण्यांच्या सूचनेवरून बिंबिसार राजानें आपल्या राण्यांच्या अन्तपुरांमध्यें एक स्तूप उभा करविला होता. त्या स्त्रिया या स्तूपाची, धूप, दीप, पुष्पें वगैरे साहित्यांनी पूजा करीत असत. परंतु अजातशत्रूनें आपल्या पित्याला ठार मारून जेव्हां गादी बळकाविलीं, तेव्हां कोणीहि स्त्रीनें स्तूपाची पूजा करूं नये, केल्यास मरण्याची शिक्षा देण्यांत येईल असा त्यानें सक्त हुकूम केला, पंरतु अंतःपुरांतील स्त्रियांपैकीं श्रीमती नांवाच्या स्त्रीनें त्या हुकुमाकडे लक्ष न देतां त्या स्तूपाभोंवती एक दीपमाला लावली. राजानें क्रोधाविष्ट होऊन तिला ठार मारिले; मरतां मरतां तिने बुध्दांचें स्मरण केलें; व ताबडतोब देवाच्या स्वर्गात तिनें पुनर्जन्म घेतला.

गोष्ट १०० वी:— इतर सर्व अवदानांचे नायक बुद्धाचे समकालीन होते, परंतु शेवटच्या गोष्टीचा नायक हा अशोक राजाचा समकालीन होता. बुद्धाच्या प्रयाणाची हकीगत अगोदर देऊन बुद्धकालाशीं ही सांखळी जोडून दिली आहे. परिनिर्वाणसूत्रांतील एका भागांत ही हकीकत असून ही पालि महापरिनिब्बान सूत्राशीं बरीच जुळते. ४० व्या गोष्टीच्या प्रस्तावनेंत परिनिर्वाणावर दुसरा एक उतारा आहे. बुद्धप्रयाणानंतर १०० वर्षांनी अशोक राजा होऊन गेला. अशोकाला कुनाल नांवाचा एक पुत्र होता, (अशोक पहा) तो इतका सुंदर होता कीं, सार्‍या जगांत त्याच्या तोडीचा सुंदर पुरुष असणें शक्य नाहीं असें राजाला वाटलें. परंतु याच्याहि पेक्षां एक सुंदर तरुण आहे असें एक दिवशीं गन्धारच्या व्यापार्‍यांकडून त्यानें ऐकिलें. आमच्या गांवी एक सुंदर नांवाचा तरुण पुरुष आहे, त्याचें सौंदर्य दोषहीन आहे, इतकेंच नाहीं तर तो ज्या ज्या ठिकाणीं जातो, त्या त्या ठिकाणीं एक कमल तडाग व उपवन उत्पन्न होतें, असे त्यांनीं सांगितलें. आश्चर्यचकित झालेल्या त्या अशोक राजानें दूत पाटवून या चमत्कारिक गोष्टीबद्दल आपली खात्री करून घेतली. या तरुणाला हें फळ कोणत्या कर्मामुळें मिळालें असा राजानें प्रश्न केल्यावर उपगुप्त (या उपगुप्तानें इतर अवदानांमध्यें बुद्धाची भूमिका अंगीकृत केली आहे) गुरूनें सांगितलें की ज्या वेळीं बुद्धाला पूर्ण निर्वाण प्राप्त झालें तेव्हां हा एक सुंदर गरीब शेतकरी होता; महा—कश्यप व त्याचे अनुयायी ५००  भिक्षू बुद्धाच्या अंत्यविधीसाठीं गेलें असतां आपल्या गुरूच्या प्रयाणामुळें दुःखित होऊन पुष्कळ वेळ परिभ्रमण केल्यामुळें जेव्हां अगदी दमून गेलें, तेव्हां या सुंदरानें श्रम हरण करणारें असें एक अवंगाहनस्थान व भोजन तयार केलें. या सत्कृत्याचें फळ हल्लींतो उपभोगीत आहे.

अवदानशतकांतील कित्येक कथानकें इतर अवदान—समुच्चयांमध्यें  व काही पालि अवदानांमध्यें आलेलीं आहेत. उदाहरणार्थ, राष्ट्रपालाची गोष्ट (नं. ९०) कांहीशी मज्झिम निकायाच्या रठ्ठपालसुत्ताशींव कांहीशीं रठ्ठपालअपदानाशीं अनुरूप आहे; अनेक प्रसंगी फक्त नांवांमध्यें साम्य आढळतें व अपदानामध्यें बरेच फेरबदल आढळतात.

कर्मशतक या प्राचीन ग्रंथाचें अवदानशतकांशी बरेंच साम्य आहे; व त्यांत अवदान शतकांतील कित्येक कथानकेंहि आलेलीं आहेत; परंतु दुर्दैवानें त्याचें फक्त तिबेटी भाषांतर शिल्लक आहे. [असाच दुसरा एक तिबेटी अवदान ग्रंथ आहे; जागतिक वाङ्मयांत ‘संग्लुन’ या नांवानें तो प्रसिद्ध असून त्याचें जर्मन भाषांतर रिच्मट यानें “प्राज्ञ व मूर्ख” अशा नांवानें प्रसिद्ध केलें आहे. (सेंट पीटर्सबर्ग १८४३)]

दि व्या व दा न. — हा अवदानशतकापेक्षां लहान ग्रंथ आहे; परंतु त्यांत कांही फार प्राचीन सूत्रें आहेत. याच्या आरंभीं महायानपंथी स्तवन केलें आहे. “परमबुद्ध व बोधिसत्त्व यांच्या ठिकाणीं पूज्यबुद्धि ठेवा” महायान पंथाच्या धोरणावर यांत कांही माहिती उघडपणें मागाहून घातलेली आहे; (उदा. ३४ व्या प्रकरणाला ‘महायान सूत्रम्’ असें नाव आहे.) परंतु एकंदरीत हा ग्रंथ हीनयान पंथाचा आहे. संस्कृत धर्मशास्त्र व दीर्घागम, उदान, स्थविरगाथा इत्यादि निरनिराळया धर्मग्रंथांचा उल्लेख वारंवार केलेला आहे. कांहीं कथानकांचा आरंभ व शेवट अगदीं अवदानशतकांतील कथानकांप्रमाणेंच असून या संग्रहांतील विशिष्ट ठरीव शब्दप्रयोग व वर्णनें शब्दशः दिव्यावदानामध्येंहि आलेली आहेत. सर्वास्तिवाद्यांच्या विनयपिटकामध्ये बहुधा यांचा प्रथमोद्भव झाला असावा. अर्धी अधिक कथानकें विनयपिटकांतूनच घेतलेलीं आहेत. पंरतु बाकीची अश्वघोषाच्या सूत्रालंकारांतील घेतलेलीं आहेत.

वस्तुतः या ग्रंथाची रचना फार घोंटाळयाची व विसंगत आहे. त्यांत वर्गीकरणाचें एकहि तत्त्व दिसून येत नाहीं. भाषा व पद्धषत यांचे यात्किंचितहि एकीकरण झालेले नाहीं. बहुतेक कथा सुंदर,साध्या गद्यात्मक संस्कृतांत लिहिलेल्या आहेत. फक्त मधून मधून गाथा आलेल्या आहेत. परंतु कांही थोडया भागांत चातुर्ययुक्त वृत्तें व मोठमोठे संधि ज्यांत आहेत, अशी उत्कृष्ट काव्यपद्धति दृष्टीस पडते. संग्रहकर्त्यानें इतर ग्रंथांतून शब्दशः कांहीं उतारे घेतले असावे असें यावरून दिसतें. या ग्रंथाचे निरनिराळे घटकावयव निरनिराळया कालांतील असावेत, असेंहि अनुमान यावरून काढितां येईल. या संग्रहाचें चिनी भाषेंत इ. सनाच्या तिसर्‍या शतकांत भाषांतर झालें होतें. [दिव्यावदानांतील काहीं अवदानांचे इ. सनाच्या तिसर्‍या शतकांत चिनीमध्यें भाषांतर झालें होतें, (कावेल व नील, दिव्यावदान पा. ६५५.) या गोष्टींवरून त्या सर्व संग्रहाचेहि चिनीमध्यें भाषांतर झालेंच असेल, असें म्हणतां येत नाहीं.] अशी कल्पना केली तर यापूर्वी बहुधा त्याचा उद्‍गम झाला नसावा असें म्हणता येईंल. अशोकाचे मागून झालेले शुंग घराण्यांतील पुष्यमित्रापर्यंतचे (सुमारे इ.स. पूर्वी १७८) राजे यांचा उल्लेख आलेला आहे. व ज्यावरून इ. सनाच्या दुसर्‍या शतकाचा बोध होतो, अशा दीनार नाण्याचा उल्लेखहि आलेला आहे, इतकेच नव्हें तर आपल्या अश्वघोषानंतरहि बराच काल लोटला असला पाहिजे म्हणून हा संग्रह दुसर्‍या शतकांत तयार झाला असें म्हणण्यापेक्षां तिसर्‍या शतकांत तयार झाला असावा असें विंटरानेझचें मत आहे.

तथापि दिव्यावदनांतील अतिशय मनोरंजक गोष्टींपैकी, शार्दूलकर्णावदान नांवाच्या फक्त एकाच गोष्टीचें इ.स. २६५ त चिनी भाषेंत भाषांतर झाले होतें ही गोष्ट समजून घेणें महत्त्वाचे आहे. हें अवदान अनेक प्रकारे स्मरणार्ह असून त्याचा सारांश असा आहे.

 

“बुद्धगुरू श्रावस्ती येथें राहत असतांना आनंद रोज शहरांत भिक्षापर्यटन करीत असे. एके दिवशीं शहरांतून परत येत असतांना त्याला तहान लागली, इतक्यांत विहीरीचें पानी आणीत असलेली प्रकृति नावाची एक चाण्डालकन्या त्याच्या दृष्टीस पडली. तो तिला म्हणाला ताई मला थोडें पाणी प्यावयास दे. त्यावर प्रकृतीनें उत्तर दिलें हे ‘पूज्य आनंद मी चाण्डालकन्या आहे.’ आनंद म्हणाला, तुझें कुल किंवा जात मी तुला विचारली नाहीं, परंतु जर तुझ्याजवळ पाणी शिल्लक असेल तर थोडें मला प्यावयास दे. (सेंट जॉनमधील ४,७ जीजस व समारिया स्त्रीच्या कथेशीं असलेलें हे साम्य विलक्षण आहे यात शंका नाहीं; परंतु पुढची सर्व गोष्ट ख्रिस्ती शुभवर्तमानाहून इतकी भिन्न आहे कीं, यांचा संबंध तिच्याशीं जोडणें अगदीं अशक्य आहे.) नंतर त्या मुलीनें त्याला पाणी दिलें व त्या मुलीचें त्या मुनीवर अत्यंत प्रेम जडलें; मला आनंद हा पति मिळाला नाहीं तर मी जीव देईन असें तिनें आपल्या आईला सांगितलें. तिची आई मोठी चेटकी असल्यामुळें तिनें प्रबळ वशीकरण मंत्रानें आनंदाला मारून टाकिलें. तो मंत्र यशस्वी रीतीनें पार पडल्यामुळें त्या चाण्डालाच्या घरीं आनंद आला; त्या हर्षित झालेल्या प्रकृतीनें तेथें शय्येची अगोदर तयारी करून ठेविली होती. परंतु त्या मोठया संकटप्रसंगी आनंदाला रडू आले; व त्यानें बुद्धाची प्रार्थना केली. आपल्या मंत्रासह बुद्ध त्याच्या मदतीला आला. बुद्धाच्या मंत्रांनीं त्या चेटकीचे मंत्र निष्फल झाले. व त्या चाण्डालाच्या घरांतून निघून आनंद परत आपल्या मठांत आला. आपल्या मंत्रापेक्षा गौतमाच्या मंत्राचें सामर्थ्य अधिक आहे असें त्या चेटकीनें आपल्या दुःखी मुलीला समाजावून सांगितलें. परंतु ती चाण्डालकन्या प्रकृति हिची मदनबाधा नाहींशी झाली नाहीं. ती शहरांत जाऊन आनंद भिक्षापर्यटन करीत असतां रोज त्याच्या मागोमाग जाई. या अडचणीच्या वेळीं आनंदानें मदत करण्याची आपल्या गुरूला पुन्हा विनंति केली. बुद्धानें प्रकृतीला बोलावून आणून आनंदाशीं विवाह लावण्याच्या तिच्या इच्छेला आपली संमति आहे असें त्यानें दर्शविलें, परंतु मोठया चातुर्यानें  पतिव्रत्याची शपथ घेवून तिला भिक्षुणी होण्यास भाग पाडिलें. तिनें आपले केशवपन करवून भिक्षुणीचा पोशाख धारण केला, इतकेच नाहीं तर सत्य चतुष्टयत्वें तिला पूर्णपणें समजलें व बुद्धसंस्कृतीचाहि तिला नीट बोध झाला.

परंतु बुद्धानें एका चाण्डालकन्येला भिक्षुणी दीक्षा दिली असें जेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय व श्रावस्तीचे नगरवासी यांस कळलें, तेव्हां त्यांनां फार राग येऊन त्यांनीं ती गोष्ट प्रसेनजित्  राजाला सांगितली. त्या गोष्टीबद्दल बोलाचाली करण्यासाठी तो राजा ताबडतोब बुद्धाकडे गेला. त्या ठिकाणीं कित्येक ब्राह्मण, क्षत्रिय व श्रावस्तीचे रहिवाशीहि जमले होते. नंतर चाण्डालाधिपति त्रिशंकु, याची गोष्ट बुद्धानें सांगितली. पुष्करसारिन्  नांवाच्या गर्विष्ट ब्राह्मणाच्या मुलीशीं, शार्दूलकर्ण नांवाच्या आपल्या विद्वान पुत्राचें लग्न व्हावें अशी त्रिशंकूची इच्छा होती. ब्राह्मणानें तिरस्कारानें त्याला झिडकारून लाविलें. तेव्हां एका अत्यंत मनोरंजक संभाषणांत जातिपद्धति, व ब्राह्मणांचा नीतिपर उपदेश यांवर त्रिशंकूने कडक टीका केली. निरनिराळया प्रकारचे प्राणी व वनस्पती यांमध्ये जसा फरक असतो, तशा प्रकारचा फरक जातीमध्यें दाखवितां येत नाहीं असें त्यानें त्याला सांगितलें, पुनर्जन्म व कर्म यांच्या कल्पनेप्रमाणेंहि जाति असणें शक्य नाही; कारण आपापल्या कर्माप्रमाणें प्रत्येकाला पुनर्जन्म मिळतो. सरतेशेवटी, त्रिशंकूच्या विद्वत्तेबद्दल पुष्करसारीची खात्री होऊन त्यानें त्या विवाहाला आपली संमति दिली. परंतु ती ब्राह्मणकन्या दुसरी कोणी नसून पूर्वजन्मीची चाण्डाल कन्या प्रकृती हीच होती. त्यावेळीं बुद्ध स्वतः त्रिशंकू असून शार्दूलकर्ण हा आनंद होता.

अ शो का व दा न.— अशोकावदान (दिव्यावदान) चक्र (२६—१९) हेंहि प्राचीन आहे, कारण इ. सनाच्या तिसर्‍या शतकांत त्याचें चिनीमध्यें भाषांतर झालें होतें; प्रतापी राजा अशोक हा त्या कथाचक्राचा मध्यबिंदु आहे. या गोष्टींत ऐतिहासिक दृष्टया महत्त्वाची अशी माहिती क्वचितच आहे. तथापि वाङ्‌मयात्मक दृष्टीनें या गोष्टीचें महत्त्व बरेंच आहे. शिवाय उपगुप्त व मार यांची अद्‍भूत नाट्यकथाहि या कथाचक्रांत आहे. सैतान मार याला एका बौद्ध भिक्षूकडून धर्माची दीक्षा देणें ही कल्पनाच फार धाडसी आहे. शंभर वर्षांपूर्वी  निवार्णाप्रत गेलेल्या बुद्धाला प्रत्यक्ष पाहण्याच्या इच्छेनें आपण स्वतः दीक्षा दिलेल्या माराला बुद्धाचा वेश धारण करण्याची उपगुप्त मुनीनें विनंति केली, व मारानें इखाद्या कुशल नटाप्रमाणें हुबेहूब बुद्धाचें रूप इतक्या सुंदर रीतीनें धारण केलें कीं, तो देखावा पाहून तो मुनि प्रार्थनामग्न झाला. ही सर्व गोष्ट तर कल्पनेची फारच मोठी उडी दाखविते. ही सर्व गोष्ट इतकी अभिनयविषयक आहे की, सर्व बुद्धचरित या ठिकाणीं फक्त पुनः सांगितलें आहे असेंच एखाद्याला वाटते. भाषा पद्धति व वृत्ते हीं ठरींव दरबारी काव्याप्रमाणें आहेत म्हणून ह्यूबरनें सिद्ध केलें आहे यावरून दिव्यावदानाच्या संग्रहकर्त्यानें हा सुंदर भाग अश्वघोषाच्या सूत्रालंकारांतून शब्दशः घेतला आहे असें म्हणणें साहजिक आहे.

उपगुप्तानंतरच्या अशोकाचा शिक्षक ज्या मठांत राहांत होता त्याला ‘नट’ (नाटकांतील) आणि ‘भट’ (योद्धा) या भावांनी मदत केली म्हणून त्याचें नांव नटभटिका असें पडावें हें मोठें विलक्षण दिसतें. अशोकावदनाला मथुरेच्या नटभटिका मठाचें माहात्म्य वर्णन करणारा ग्रंथ असें जे लेव्हीनें नांव दिलें. (तौंग पाओ, १९०७ पा. १२०) ते चुकीचें म्हणतां येणार नाही.

दुष्ट सापत्‍न मातेच्या सूचनेवरून ज्याचे डोळे भोंसकलें गेले, परंतु इतकी इजा देणार्‍या ह्या सापत्‍नमातेबद्दल ज्यानें एक क्षणभरहि आपला राग किंवा द्वेष व्यक्त केला नाहीं त्या अशोकचक्रांतील अत्यंत सुंदर परंतु हृदयद्रावक अशा कुनाल नामक अशोकपुत्राच्या गोष्टीचें मूळ कोणतें तें मात्र माहीत नाही.

पालितिपिटक व दिव्यावदान यांमध्यें सामान्य अशा अनेक गोष्टी आहेत. महापरिनिर्वाणसूत्रांतील एक उतारा सतराव्या प्रकरणांत आहे व पूर्णाची गोष्ट परिचित पालि सूत्राशीं अनुरूप आहे. असभ्य व आडदांड अशा श्रोणापरांतकांनीं तिरस्कार केला तरी, मारलें तरी, व त्याचा जीव घेण्याची त्याची इच्छा दर्शविली तरी तें सर्व शांतपणें व सौम्यपणें सोसण्याचा निश्चय करून तो पूर्ण प्रचारक म्हणून त्यांजकडे गेला. उपाशी मारण्याची वेळ आल्यामुळें आपल्या मुलीला खाऊन टाकण्याच्या बेतांत असलेल्या एका बाईचें मांस व रक्त यांच्यायोगानें पोषण करण्यासाठीं जिनें आपले स्तन कापून टाकिले त्या रूपवतीच्या अवदानावरून जातकमालेतींल गोष्टींची आठवण होते. बोधिसत्त्वाचें महायानपंथी ध्येय रूपवतीनें आपल्यापुढें ठेविलें होते; तसें करण्यांत तुझा काय उद्देश होता असें विचारिलें असता ती म्हणालीः—

“मी त्या मुलासाठीं जो आपल्या स्तनांचा त्याग केला तो सार्वभौमत्त्वासाठीं, उपभोगासाठीं, स्वर्गप्राप्तीसाठीं, इन्द्र पद मिळविण्यासाठी, राज्यकरणासाठीं, किंवा अगदीं श्रेष्ठ अशा पूर्ण आत्मप्रबोधनाखेरीज इतर कोणत्याहि कारणांमुळे केला नाहीं, तर उद्धतांस नम्र करण्यासाठीं, जे मुक्त नाहींत त्यांनां मुक्त करण्यासाठीं व पाशबद्ध झालेल्यास पूर्ण निर्वाणप्राप्ति करून देण्यासाठीं मी आपल्या स्तनांचा त्याग केला. हें जर खरें असेल तर माझें स्त्रीत्व नष्ट होऊन मला पुरुषत्व प्राप्त होवो,” (तिनें हे वाक्य उच्चारितांच तिचें रूपवत राजपुत्रामध्यें रूपांतर झालें; तो राजपुत्र पुढें राजा होऊन त्यानें साठ वर्षे राज्य केलें.)

जातकमालेप्रमाणेंच अडतीसावें प्रकरण याच काव्य पद्धतींत लिहिलेंलें असून त्यांत अवदानांचे खुबीदार रूपांतर आहे. अशा  प्रकारच्या भागामुळें दिव्यावदानाला अवदानमालाचें स्वरूप प्राप्त झालें आहे.

कल्पद्रुमानवदानमाला, रत्‍नावदानमाला, अशोकावदान माला:— हीं अवदानांची पद्यात्मक रूपांतांरें असून त्यांपैकी कांही अवदानशतकांतून पद्धतशीर रीतीनें घेतलेली आहेत व काहीं इतर ठिकाणचीं आहेत. अवदानशतकांतील शेवटच्या कथानकाच्या तर्जुम्यापासून कल्पद्रुमावदानमालेला सुरूवात होते, व ज्याप्रमाणें अवदानशतकांतील शेवटच्या कथकानातींल अशोकाच्या संभाषणांत स्थिवर उपगुप्ताचा उल्लेख आलेला आहे. (उपगुप्त हें अशोकचा शिक्षक तिस्स मोग्गलीपुत्त याचें दुसरें नाव आहे) त्याचप्रमाणें अवदामालेतींल सर्व गोष्टी, अशोक व उपगुप्त यांमधील संभाषण रूपानें घातलेल्या आहेत. अशोकावदानमालेच्या पहिल्या भागांत स्वतः अशोकाविषयींच्या कथा असून नंतर उपगुप्तानें अशोकाला केलेला उपदेश गोष्टींच्या रूपानें सांगितलेला आहे. हे तिन्ही ग्रंथ वीरकाव्यांच्या धाटणींत लिहिलेले आहेत याच एका गोष्टीमुळें अवदानशतकाहून ते भिन्न आहेत असें नाहीं, तर ते निःसंशय महायानपंथाचे असून त्यांच्या पद्धतीवरून व भाषेवरून पुराणांची आठवण होते व या विशेष गोष्टीमुळेहि हे ग्रंथ अवदानशतकांहून भिन्न आहेत. ज्या कालामध्यें सांप्रदायिक पुराणें अस्तित्त्वांत आली त्या कालांत (म्हणजे सुमारें इ. स. ६ वें शतक व नंतर) हे ग्रंथ झाले असावेत.

द्वा विं श त्य व दा न.— अवदानशतकांतील बर्‍याचशा गोष्टी ज्यांत घेतल्या आहेत असा द्वाविंशत्यवदान हा दुसरा एक ग्रंथ आहे. या ठिकाणीहि उपगुप्त व अशोक यांचें संभाषण आलेलें आहे. परंतु यांचे संभाषण लवकरच संपून त्याच्या जागीं शाक्यमुनि व मैत्रेय यांचे संभाषण सुरू होतें. परंतु या ठिकाणच्या गोष्टी गद्यात्मक असून (कांहीं पद्यात्मक प्रक्षिप्त भाग आहे) त्यांत दिलेल्या सारांशाप्रमाणें त्या गोष्टींची निरनिराळीं प्रकरणें केलेलीं आहेत. (पुण्यप्रद कर्में, उपदेश— श्रवण, औदार्य वगैरे).

भ द्र क ल्प ना व दा न— भद्रकल्पनावदान हा चौतीस कथांचा संग्रह असून, त्या कथा उपगुप्तानें अशोकाला सांगितलेल्या आहेत. अवदानमालांप्रमाणें हा समग्र संग्रह पद्यात्मक आहे. तथापि याची कल्पना व मजकूर हीं कांहीअंशी विनयपिटकांतील महावग्गाप्रमाणेंच आहेत असें म्हणतात.

व्र ता व दा न मा ला — ज्याप्रमाणें सांप्रदायिक पुरणांमध्यें कांहीं उत्सव किंवा व्रतें यांच्या उपक्रमासाठी शोधून काढिलेल्या कथांसंबंधींची माहिती ज्यांत आहे, अशीं मोठमोठीं प्रकरणें व समग्र ग्रंथ (माहात्म्य) यांत आहेत, त्याच प्रमाणें त्या पुराणांमध्यें तशा प्रकारचे बौद्ध ग्रंथहि आहेत. व्रतावदानमाला हा अशाच प्रकारच्या गोष्टींचा एक समुच्चय असून यांतील उपगुप्त व अशोक यांच्या संभाषणाचें स्वरूप पूर्वी सांगितलेल्या अवदानसमुच्चयांच्या स्वरूपासारखेंच आहे.

वि चि त्र क र्णि का व दा न.— विचित्रकर्णिकावदान नांवाच्या समुच्चयांत भिन्न भिन्न प्रकारचा मजकूर असून यांत ३२ कथानकें आहेत; यांपैकी कांहीं कथानकें अवदानशतकांतून घेतलेलीं असून बाकीचीं व्रतावदानांच्या नमुन्याचीं आहेत. मजकुराप्रमाणेंच कांहीं ठिकाणीं ओबडधोबड संस्कृत कांहीं ठिकाणी सुंदर संस्कृत व कोठें कोठें पालि अशा तर्‍हेची या ग्रंथाची भाषाहि विविध प्रकारची आहे.

सु मा ग धा व दा न.— अद्यापपर्यंत हे सर्व ग्रंथ फक्त थोडयाशा हस्तलिखित प्रतींतच अभिगम्य आहेत. तिबेटी व चिनी भाषांतरामुळेंच बाकीचे ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. हस्तलिखित प्रतींमध्यें व चिनी व तिबेटी भाषांतरामध्यें फक्त अवदानसंग्रहच कायम ठेविलेले आहेत असें नाहीं, तर अनेक बरींच मोठी व निरनिराळी अवदानेंहि कायम ठेविलेलीं आहेत. सुमागधावदान हे वरील गोष्टीचें उदाहरण आहे. अनाथपिण्डद नांवाच्या व्यापार्‍याच्या सुमागधा नांवाच्या मुलीनें जैन भिक्षूंच्या तावडीतून आपल्या पतीची सुटका करून एका अद्भुत चमत्काराच्या योगानें सर्व शहराला बौद्ध धर्मांत घेतलें. पूर्वजन्मी आपल्या दहा अद्‍भूत स्वप्नांमुळे प्रसिद्धीस आलेल्या कृकिन् राजांची ती मुलगी होती.

अ व दा न क ल्प ल ता.— सरतेशेवटी काश्मिरी कवि क्षेमेंद्र (इसवी स. १०४० च्या सुमारास) याच्या अवदान कल्पलता या विस्तृत अवदान समुच्चयाचाहि उल्लेख येथें केला पाहिजे. विशेषतः तिबेटांत हा ग्रंथ फार पूज्य मानिला जातो. क्षेमेन्द्रानें बहुत ग्रंथ लिहिलेले असून याची पद्येंहि विलक्षण प्रकारें कल्पनाप्रचुर आहेत. पुढें कित्येक प्रसंगी आपल्याला याचा परिचय होईल, कारण यानें आपल्याला कार्यशक्तीनें अति विस्तृत अशीं निरनिराळीं क्षेत्रें व्यापून टाकिलीं आहेत, तथापि बुद्धिसामर्थ्य व रसिकता यांपेक्षां आपल्या दृढनिश्चयानेंच तो अधिक प्रसिद्धीस आला. पद्धतशीर काव्याच्या धर्तीवर ज्या कथासमूहांत क्षेमेन्द्रानें बौद्ध अवदानांचें  ग्रथन केलें आहे त्या मोठया कथासमूहांतील गोष्टींतहि बुद्धिसामर्थ्य व रसिकता यांपेक्षा बोधप्रदता अधिक आहे. बौद्धलोकांच्या स्वार्थत्यागाच्या प्रवृत्तीची या ठिकाणीं इतक्या धूर्ततेनें पराकाष्ठा केली आहे, कर्मतत्त्वें इतक्या चमत्कारिकपणें लाविलें आहे व एकंदर सारांश इतक्या अतिशयोक्तीनें सांगितला आहे की, कित्येक प्रसंगीं इच्छित परिणामाच्या विरुद्ध परिणाम दिसून येतो; या समूहांत १०७ गोष्टी असून क्षेमेन्द्रपुत्र, सोमेन्द्र यानें प्रस्तावनेंशिवाय १०८ वी ‘जीमूत वाहन अवदान’ ही गोष्टहि या ग्रंथाला जोडिली आहे. बहुतेक गोष्टी प्राचीन अवदानसंग्रहांत व इतर ठिकाणींहि पूर्वीच आलेल्या आहेत. [पालि टीकांवरून परिचित झालेल्या पद्मावतीच्या (जिच्या पावलाखालीं कमळें उत्पन्न होत असत) गोष्टीशीं पद्मावती— अवदानें (नं. ६८) अनुरूप आहेत. व एकश्रृंग— अवदान (नं. ६५) प्रसिद्ध ॠष्यश्रृंगकथेशीं अनुरूप आहे महावस्तूंतहि हीं दोन्ही येतात; व महावस्तूच्या धर्तीवर क्षेमेन्द्रानें ॠष्यशृंगकथेची रचना केली हें ल्यूडर्सनें (एन. जी. जी. डब्ल्यू १९०१ पा. २६) सिद्ध केलें आहे. हर्मन फ्रँक यानें क्षेमेन्द्राच्य अवदानांचे जर्मन भाषेंत पद्मात्मक भाषांतर (लिपझिग १९०१) केलें आहे.] या विषयावरचे अपदान, तिपिटक (बुद्धपूर्वजग प्र. ११.) हे लेख पहा.


[संदर्भ ग्रंथ.— विंटरनिझ्झचा ‘भारतीय वाङ्‌मयाचा’ इतिहास दुसरा भाग, पूर्वार्ध हा ग्रंथ विशेष महत्त्वाचा व पांडित्य दर्शक आहे. अवदानवाङ्‌मयांतील पुढील भाग उपलब्ध आहेत. १ अवदान शतक— हे स्पयरनें प्रसिद्ध केलें असून (सेंट पीटर्सबर्ग १९०२—९), एल्. फीरनें त्याचें फ्रेंच भाषांतर केलें. (पॅरिस १८९१). दिव्यावदान— कावेल आणि नील, केंब्रिज १८८६. यांतील मोठाले उतारे बर्नोफनें आपल्या भारतीय बौद्ध धर्माच्या इतिहासाच्या प्रस्तावनेंत भाषांतरिले आहेच. बिब्लिओथिका बुद्धिका. ओल्डनबर्ग जे. आर. ए. एस्. १८९३. फीर—ला अवदानाज जातकाज जे. ए. १८८४. राजेंद्रलाल मित्र— संस्कृत बुद्धिस्ट लिटरेचर ऑफ नेपाळ, कलकत्ता १८८२. झेड् डी एम.जी. ५२; १८९८ (ओल्डनबर्गचा लेख). लेव्ही— तौंग पाओ. कर्न मॅन्युअल. र्‍हीस डेव्हिडस— जे. पी. टी. एस. १८९६. ओल्डनबर्ग— बुद्ध हार्डी— अशोक. बेंडाल कॅटॅलॉग— ल्युडर्स— एन्. जी .जी. डब्ल्यू १९०१. बुध्देतर जग (ज्ञानकोश— प्रस्तावनाखंड)]

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .