विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अवनी — हें गांव मद्रास इलाख्यांत कोला जिल्ह्यामध्यें, मुल बागल तालुक्यांत आहे. लोक सं. (१९०१) ९४९. हिंदुस्थानांतील दहा क्षेत्रांपैकी जें अवन्तिका ते हेंच होय असा तिकडील लोक हक्क सांगतात. येथें वाल्मीकि ॠषींचा आश्रम होता व श्रीरामचंद्र लंकेहून परत येतानां येथें उतरले होते अशीहि एक दंतकथा आहे. शिलालेखामध्यें या गांवाला “दक्षिणकेडील गया” असें म्हटलेलें आहे. येथें स्मृति पंथाचे गुरु राहतात व वार्षिक उत्सव होतो. [इं. गॅ. ६]