विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अवसरी बुद्रुक — (मुंबई) जिल्हा पुणें खेडच्या ईशान्येस १५ मैलावर हा एक लहानसा गांव आहे. लोकवस्ती (सन १८८१) २७७८ सन १८६२ पर्यंत हे पेठ्याचे मुख्य ठिकाण होतें. त्या वेळची जी पेटा कचेरी होती तेथें हल्लीं शाळा आहे. पश्चिम शिवेवर एक भैरवाचें देऊळ असून तें सुमारे १०० वर्षांपूर्वी शंकरशेट नांवाच्या लिंगायत वाण्यानें बांधलें आहे. मंडपाच्या भिंतीवर पुराणांतील प्रसंगाचीं चित्रें रंगविली आहेत. दर्शनी कमानीवर गणपतीची मूर्ती आहे. देवळासमोर दोन दीपमाळा असून पलीकडे नगारखाना आहे. नगारखान्याच्या पायथ्याशीं एक घोडयाची दगडी आकृति आहे. [पुणे. ग्यॅ. पा. १०४, स. १८८५]