प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

अव्हिसेन्ना — (९८०—१०३७)— अॅव्हिसेन्ना हें इब्नसिंह या अरबी नांवाचें व अव्हेन सिना या हिब्रू नावाचें लॅटिन भाषेंतील रूप आहे. याचें पूर्ण नांव अबु अलि हुसेन इब्न अबदल्ला इब्न सीना हें होतें. अॅव्हिसेन्ना हा बुखारा येथें जन्मला. याचा बाप करवसुलीच्या कामावर होता. अॅव्हिसेन्ना याचा धाकटा भाऊ जन्मल्यावर अॅव्हिसेन्नाचा बाप बुखारा येथेंच राहण्यास आला. या वेळीं बुखारा हें शहर फार महत्त्वाचें गणलें जात असे. लहानपणापासूनच अॅव्हिसेन्नाची तरतरीतपणाबद्दल प्रसिद्धि होती;  व शिक्षकाच्या हाताखाली त्यानें उत्तम शिक्षण संपादन केलें. दहा वर्षांचा असतानांच त्यास सर्व कुराण पाठ होतें. तो एका भाजीवाल्याजवळ गणित शिकला. त्याच्या घरीं राहण्यास आलेल्या नाटिलि नांवाच्या एका साधूपाशीं त्यानें यूक्लिड, तर्कशास्त्र व अल्माजेस्ट यांचें अध्ययन केलें. पुढें पुढें हा साधू यथातथाच आहे असें आढळून आल्यामुळें भूमिति वगैरे विषयांचें त्यानें टीकांच्या सहाय्यानें स्वतःच अध्ययन केलें. सोळाव्या वर्षाचा असतांनाच त्याला वैद्यकीचें पूर्ण ज्ञान होतें, इतकेंच नव्हे तर तो रोगयांनां तपासावयासहि जात असल्याकारणानें त्यानें निरनिराळे उपचाराचे मार्ग शोधून काढले होतें. नंतर एक दोन वर्षेंपर्यंत त्यानें उच्च प्रकारच्या तत्त्वत्रानाचें अध्ययन करण्यांत आपला वेळ खर्च केला. या कामांत त्याला अतोनात परिश्रम करावे लागले. एखादेवेळी न समजल्यामुळें त्याचें डोके भणाणून जात असे; व अशावेळी तो शांत चित्तानें मशिदीमध्यें जाऊन देवाची प्रार्थना करीत असे, तेव्हां त्याला तो विषय समजत असे. रात्रीच्या रात्री अभ्यास करण्यांत तो घालवीत असे. त्यानें अ‍ॅरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान वाचण्यासाठी अतिशय मेहनत केली.

त्यानें बुखारा येथील सुलतानाला मोठया आजारीपणांतून वाचविल्यामुळें राजवैद्याच्या जागीं त्याची नेमणूक झाली. व त्यामुळें सॅमॅनिड येथील ग्रंथ संग्रहालयाचा फायदा त्याला पूर्णपणे घेतां आला. अ‍ॅव्हिसेन्नानें पुढें आपली नोकरी सोडून दिली व एखादा चांगला आश्रयदाता पाहण्यासाठी तो कोरकंज, निशापूर, अबीवर्द वनुस या ठिकाणीं कांही दिवस राहून अखेरीस जोरजान येथें आला व तेथे त्याला अलझुझानी नांवाचा एक शिष्य मिळाला. या शिष्याची त्याला अत्यंत मदत झाल्यामुळें त्यानें महत्त्वाचें ग्रंथ लिहिले; व वैद्यकावरील सिद्धांत ग्रंथाला येथेंच सुरुवात केली. तो पुढें राइ येथें राहण्यास गेला; येथें त्यानें छोटीं छोटीं तीस पुस्तकें लिहिलीं असें म्हणतात. नंतर तो कझवीन व हमदान येथे गेला. हमदान येथें असतांना तेथील अमीराला आजारांतून बरें केल्यामुळें त्यानें त्याला वजीर नेमिले. पण त्याच्यावर काहीं आळ आल्यामुळें तो एका औषधीविक्याच्या घरी छपून राहिला. तरी तेथें त्याचें ग्रंथ लेखनाचें काम चालू होतें. परंतु हमदान येथील अमीराला सुगावा लागल्यामुळें त्यानें त्याला धरून आणून कैद केलें. कैदेत असतांना यानें आपलें लेखन सुरू ठेवलेंच होतें. पुढें फकीराच्या वेषांत त्यानें आपली सुटका मोठया संकटानें करून घेतली व अनेक हाल सोसून तो इस्पाहान येथें आला. तेथील अमीराकडून त्याला मान मिळाला. आपल्या आयुष्याचीं शेवटचीं दहाबारा वर्षे त्यानें तेथील अमीराच्या आश्रयाखालींच घालविलीं. दररोज रात्री तत्त्वज्ञानावर चर्चा करण्यासाठीं तो सभा भरवीत असे. कांही कांही वेळां अमीरहि हजर राहत असे. येथें असतांना तो अतिशय चैनहि करीत असे. तो फार रंगेल होता. तो अतिशय दारू पीत असे; व त्याला बायकांचाहि फार नाद होता. यामुळें त्याची वयोमर्यादा कमी झाली. तो आपल्या वयाच्या ५८ व्या वर्षी मेला व त्याला हमदान येथें पुरण्यांत आलें.

ग्रं थ र च ना.— त्यानें जवळजवळ १०० पुस्तकें लिहिलीं त्यांतील अतिशय प्रसिद्ध अशी ‘अशशिफा’, ‘इशारात’ इत्यादि होत. तर्क न्याय वेदांत इत्यादि  निरनिराळया विषयांवर एकेक तरी ग्रंथ त्यानें लिहिला. किमयाशास्त्रावरहि त्यानें  एक ग्रंथ लिहिल असावा. प्राण्यासंबंधी त्याच्या ग्रंथाचें स्कॉटनें भाषांतर केलें. त्यानें लिहिलेल्या ग्रंथांचे विषय खालील प्रमाणें:— ‘शास्त्रांचा उपयोग व फायदा’— २० पुस्तकें; ‘निरपराधीपणा व गुन्हेगारी’ — २ पुस्तकें;आरोग्य व उपचार – १० पुस्तके; ‘आरोग्य रक्षणांचीं साधनें’ — ३ पुस्तकें; ‘शरीरशास्त्रांची तत्त्वें’ — १४ पुस्तकें, ‘ज्योतिर्निरीक्षण’ — १ पुस्तक; ‘गणितशास्त्र.’ ‘सिद्धांत व त्यांचे प्रयोग.’ १ पुस्तक; ‘अरबीभाषा’ — १० पुस्तकें, ‘शेवटचा निकाल;’ आत्म्याचें मूळ’ ‘अन्त व अनन्तत्व’ ‘पुनरुथान संक्षिप्तयूक्लिड; इ.

 

सं प्र दा य.— अविहसेन्ना हा अलफलासिफा नांवाच्या संप्रदायापैकी होता. ग्रीक ग्रंथांचा विशेष अभ्यास करणार्‍याला हा  किताब देण्यांत येत असे व याच्या पूर्वीं वीस विद्वानाना तरी हा मान मिळाला होता. याच्या पूर्वी अलकिंडी व अलफराबी हे दोघे प्रख्यात होते. अलकिंडी यानें या संप्रदायाला संघटित स्वरूप दिलें होतें. हा संप्रदाय नूतन प्लेटो संप्रदायाचें परिणत स्वरूप होय. अव्हिसेन्नानें आपल्या पूर्वींच्या ग्रंथकारांची माहिती व्यवस्थित रीतीनें पुढें मांडिली.

अव्हिसेन्नानें लेखनांत प्रतिपादिलेल्या मतांचे पांच सहा विषयांखालीं विवेचन करतां येईल. तर्क; पदार्थविज्ञानशास्त्र; मानसशास्त्र; तत्त्वज्ञानशास्त्र; गूढविद्या; आणि नीतिशास्त्र.

(१) तर्कशास्त्र.— अव्हिसेन्ना यानें तर्कशास्त्राला फार महत्त्वाचे स्थळ दिलें आहे. यानें तर्कशास्त्राचें स्वरूप फार व्यापक मानलेलें आहे.अ‍ॅरिस्टॉटलच्या पद्धतीलाच अनुसरून त्यानें तर्कानें ९ निरनिराळे भाग पाडले आहेत. ‘इशारात’ मध्यें तर्कांचे कार्य सांगतांना त्यानें असें म्हटलें आहे कीं, ‘तर्कांचे’ कार्य, मनुष्याच्या विचारसरणीला निर्दोषत्व यावें यासाठी नियम सांगण्याचें आहे. एखादा सिद्धांत सिद्ध करण्याला प्रथमतः स्वानुभव अवश्य आहे. स्वानुभवामुळें वस्तुचें स्वरूप समजून येतें  व त्यानंतर अनुमान मांडतां येतें असें त्यानें म्हटलें आहे. व्याख्या करून मनुष्याला वस्तूंचें व्यवस्थित स्वरूप मांडतां येतें; असे त्याचें मत होतें. अव्हिसेन्नानें व्याख्या व वर्णन यांमधील भेदहि उत्तम रीतीनें मांडला आहे. त्यानें कारणाचे चार प्रकार सांगितले आहेत. उपादान, निमित्त, अंत्त्य व साधक हे चारहि प्रकार लक्षणांत असूं शकतात असें त्यानें दाखविलें आहे.

(२) पदार्थविज्ञानशास्त्र.— पदार्थविज्ञानशास्त्राच्या तात्त्विक प्रकरणांमध्यें शक्ति, काल व गति यासंबंधी विचार अव्हिसेन्ना यानें केला आहे. ‘जडवस्तू ही “द्रव्य व स्वरूप” या दोन तत्त्वांनीं युक्त असते’ व तिचा उपयोग तर्क व तत्त्वज्ञान यांच्या बाबतींत होतो असें  त्यानें म्हटलें आहे. अव्हिसेन्नानें केलेली शक्तिविषयींची  कल्पना गतिशास्त्रांशीं फार जुळती आहे. त्यांतल्या त्यात वस्तूंमध्ये असणार्‍या अंतः शक्तीसंबंधानेच तो अधिक विवेचन करतो. अशाप्रकारची सर्वसामान्य अंतःशक्ति म्हणजे ‘वजन’ होय. ही शक्तीची कल्पना त्यानें मानसशास्त्रांत व तत्त्वज्ञानशास्त्रांत व्यापक केली आहे. शक्तीमध्यें होणारी वाढ वेगामध्यें नाश पावते हा यंत्रशास्त्रांतींल सिद्धांत याला ठाऊक होता. काल हा गतीमुळें समजतो. वस्तू या कालपरिच्छिन्न आहेत याचें कारण त्याच्या द्रव्यांत काल आहे असें नाहीं तर त्यांनां गति आहे व गति ही कालविच्छिन्न आहे हें होय. अॅव्हिसेन्नानें दिक्,  व वस्तुस्थान” या विषयीहि विचार केलेला आहे. त्यांच्या मतें वस्तूला पोकळी मध्यें शिरतां यावयाचें नाहीं कारण  पोकळीमध्यें कोणालाहि शिरतां येत नाहीं. यावरून त्यानें पोकळीच्या अभावाचे अनुमान काढलें आहे.


मानसशास्त्र—अॅव्हिसेन्नानें मानसशास्त्राची फार पद्धतशीर मांडणी केली आहे. प्राणी व त्यांच्या इंद्रियशक्ती यांचे त्यानें पद्धतशीर विवेचन केलें आहे. त्याच्या मतें मनाचे तीन प्रकार आहेत. वनस्पतीचें मन, प्राण्यांचे मन व मानवी मन वनस्पतीच्या मनाचे तीन गुणधर्म आहेत. पोषकधर्म, विकासधर्म व उत्पादक धर्म. प्राण्यांच्या मनाचे दोन गुणधर्म आहेत. प्रेरकधर्म व इंद्रियग्रहणधर्म. यांसबंधींचे सूक्ष्म विवेचन त्यानें आपल्या ग्रंथांत केलें आहे. मानवी मनालाच तेवढी ‘बुद्धि’ असते. या बुद्धीचे व्यावहारिक व ‘अव्यावहारिक’ असे दोन प्रकार आहेत. यासंबंधीं विचार करतानां इंद्रियशक्तीसंबंधानें व इंद्रियवसतीसंबंधानें जे प्रश्न उद्भवतात त्या संबंधीहि त्यानें विचार केला आहे. त्याप्रमाणेंच त्यानें ‘जाति’ संबंधाचा विचारहि केलेला आहे. आत्म्याच्या अमूर्ततेबद्दल अॅव्हिसेन्नानें खालीलप्रमाणें कारणें दिलेलीं आहेत. (१) आत्म्याला स्वस्वरूपाची जाणीव होते. (२) आत्मिक शक्तीमुळें व्यक्तीपासून अव्यक्त कल्पना निराळया ओळखतां येतात. ज्ञेयता ही शरीरांत असूं शकत नाहीं. या आत्म्याच्या अमूर्ततेपासूनच त्याच्या अमरत्त्वाचें अनुमान आपोआप होतें. आत्म्याचें शरीरामधील जीवीत्व हें प्रासंगिक आहे. आत्मा हा शरीराबरोबरच उत्पन्न होतो असें याचें मत होते; व या समकालीन उत्पत्तीमुळें पुनर्जन्माचा वाद याच्या मतें निघतच नाहीं.

तत्त्वज्ञानः— यांतील कांही भाग जुन्या समजुतीप्रमाणें लिहिला असल्यानें तो थोडासा चमत्कारिक वाटतो. या भागांत श्रेष्ठ चिच्छक्तींची उत्पत्ति कथन केलेली आहे; व प्रहोत्पत्ति सांगितली आहे ती येणेंप्रमाणें आहे. “सर्वांत प्रथम सत् हें होतें त्यापासून निरनिराळे श्रेष्ठ आत्मे उत्पन्न झाले (चिच्छत्त्की); व त्यांच्या पासून इतर आत्मे उत्पन्न झालें. आत्मे हे शरीरांत चैतन्य उत्पन्न करतात; व आकाशांतील जी शरीरें आत्म्यामुळें चेतना पावतात त्यानां तारका म्हणतात. अॅव्हिसेन्ना हा तारे स्थिर आहेत या जुन्या मताचा होता. अॅव्हिसेन्नानें कार्यकारणभावाचीहि मीमांसा केली आहे. परमात्मा हाच मूळ कारण आहे. त्यापासून अनुक्रमानें इतर आत्मे उत्पन्न होतात. ईश्वर हा स्वतःच तारे उत्पन्न करतो. कारणांतहि जातिकारण व व्यक्तिकारण असे त्यानें भाग पाडले आहेत. परमेश्वर हा सच्चिदानंद आहे; तो पूर्ण आहे.” एवढा भाग सोडून दिला तर इतर भाग हा अॅव्हिसेन्नानें उत्तम रीतीनें मांडलेला आहे.

गूढविद्या:— धार्मिक दृष्टया याचा जो अर्थ आहे त्यादृष्टीनें अॅव्हिसेन्ना हा गूढविद्या शब्द योजतो किवा नाहीं याबद्दल शंका आहे. परंतु तत्त्वज्ञानाचा एक भाग गूढविद्या ही आहे असें मानण्यांत यानें नूतन प्लेटो पंथाचें अनुकरण केलें आहे. परंतु गूढविद्या अशा दृष्टीनें विचार न करतां दुसर्‍या बाजूनें या तत्त्वाचा विचार करणें जरूर आहे. अॅव्हिसेन्नाचा आशावाद हा लीबीनीटझप्रमाणें आहे. पाप हा परमेश्वराचा धर्म नसून प्रासंगिक आहे. पापें तीन प्रकारचीं आहेतः— शारीरिक दुःख, न्यूनत्त्व आणि असद्धर्माचरण.

नीतिशास्त्रः— अॅव्हिसेन्नानें नीतिशास्त्रावर विशेष विचार केलेला दिसत नाहीं. कांहीं कांहीं तत्त्वें फार सुंदर आहेत नाहीं असें नाहीं; पण पारमार्थिक गोष्टीतच हा विचार करीत असल्यामुळें यानें या बाजूकडे लक्ष दिलेले नाहीं. त्यानें शासनशास्त्रावरहि कांहीं लिहिलें आहे. बायका, मुलें व नोकर यासंबंधांचेहि त्यानें नियम दिले आहेत. कलेचे यानें तीन प्रकार पाडलेले आहेत; बुद्धिगत, शिक्षणगत व शक्तिगत. यांपैकी प्रत्येकानें एखादी तरी कला शिकावी असें त्यानें म्हटलें आहे. ‘चांगली बायको’ ही नवर्‍याची प्रत्येक बाबतींत मदतगारीण असते. उत्तम बायको बुद्धिमान, धार्मिक व प्रेमळ असते. कुटुंबाची व्यवस्था, दर्जा, भय व आस्था यांवर अवलंबून असावी.’ असें ह्यानें लिहिलेले आहे.

अव्हिसेन्नाच्या सम्प्रदायांत विशेष मोठे विद्वान झाले नाहीत. त्याचें तत्त्वज्ञान अलबाझली याच्यासारख्या मुसलमानांनीं खंडण केलें आहे. यूरोपीय विश्वविद्यालयांत ५ शतकेंपर्यंत वैद्यकीवर याचा ग्रंथ प्रमुख मानला जात असे. हल्ली त्याच्यावर पुष्कळच टीका होते; व तो विशेष वाचलाहि जात नाहीं.

[एतद्विषयक वाङमय:— इब्न अबी उशैबिया—‘उयून अल—अनबा’ मुल्लर संपादित, कोनिग्सबर्ग १८८४. कॅरा डि व्हॉक्सा— अॅव्हिसेन्ने, पॅरिस १९००. याचाच अॅव्हिसेन्नावर ए. रि. ए. मध्यें लेख आहे. बोअर—दि हिस्टरी ऑफ फिलॉसॉफी इन इस्लाम, लंडन १९०३.

अव्हिसेन्नाच्या ‘शिफा’ या ग्रंथावर जर्मनींत नुकतीच मोठी महत्वाची ग्रंथरचना चालू आहे. याचा नजात व वैद्यक सिद्धांतावरचा ग्रंथ १५९३ मध्यें रोम येथें प्रसिद्ध झाला होता. लंडन येथें १८९२ त ‘इशारात’ प्रसिद्ध झाला. ए. ब्रि. बीलचा कोश इत्यादि.]

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .