विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अश्मा — ब्राह्मणाच्या र्और्ध्वदेहिक कर्मांत प्रायोगिक पद्धतीप्रमाणें प्रेतदहनानंतर घरीं येतांनां श्मशानांतील एक दगड बरोबर आणून त्या दगडावर मृताच्या नातलगांनी मृताच्या पहिल्या दिवसापासून दहा दिवसपर्यंत दररोज तिलांजलि द्यावयाची असते, त्या दगडास अश्मा असें नाव आहे. या तिलांजलि दानाचा सूत्रांत उल्लेख नाही; परंतु प्रेतदहनानंतर मृताच्या सर्व आप्तांनीं प्रथम अश्म्याला स्पर्श करावाव नंतर स्नान करून गृहांत प्रवेश करावा, तसेंच अस्थिसंचयनानंतरहि अश्म्याला स्पर्श करण्याबद्दल लिहिले आहे; परंतु या अश्म्याचा प्रायोगिर अश्म्याशीं संबंध दिसत नाही. सूत्रांतील अश्मा प्रेत समजला जात नाहीं. प्रयोगग्रंथांतील अश्म्याची कल्पना ही मृताचा आत्मा दहा दिवसपर्यंत कोणत्या तरी वस्तूंत राहिलेला असतो, या प्राचीन कल्पनेवरून आली असावी