प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

अश्वमेध — या नांवाचा एक संवस्तरपर्यंत चालणारा एक यज्ञ आहे. याचा उल्लेख विशेषतः तैत्तिरीय संहितेंत येतो. ॠग्वेदांत प्रत्यक्ष अश्वमेधाचा जरी उल्लेख नसला तरी अश्वमेधांत सोडावयाच्या घोडयाचें वर्णन एका सूक्तांत आलें आहे (१.१३२). तैत्तिरीय संहितेंत (५.४,१२) अश्वमेघासंबंधी एक आख्यायिका आली आहे ती अशीः— एकदां प्रजापतीच्या डोळयांतील बुबुळ कांही कारणानें जमिनीवर गळून पडलें व त्यापासून अश्व जातीची उत्पत्ति झाली. पुढें देवानीं अश्वमेध यज्ञाच्या योगानेंच प्रजापतीचें बुबुळ जाग्यावर बसविलें. तेव्हां जो अश्वमेध यज्ञ करतो तो प्रजापतीला संतुषट करतो. असें तेथें सांगितलें आहे. शिवाय अश्वमेध यज्ञ केल्यानें ब्रह्महत्या पातकाचा नाश होतो असेहि तेथेंच सांगितलें आहे.

अश्वमेध यज्ञांतील कांहीं विशिष्ट गोष्टींचा उल्लेख ज्ञानकोश विभाग दुसरा (वेदविद्या) यामध्यें येऊन गेला आहे. (प्रकरण ४ पृष्ठ ७८).

ऐतरेय ब्राह्मणांत (८.२१-२३) सुमारें आठ नऊ राजांनीं अश्वमेध यज्ञ करून पृथ्वी जिंकिल्याचा उल्लेख आला आहे व त्यांत भरताच्या अश्वमेधाचें  महत्त्व जास्त वर्णिलें आहे. अश्वमेध हा सार्वभौम राजानें करावयाचता असतो; परंतु ऐतरेय ब्राह्मणांत सार्वभौम नसलेल्या राजांनीहि अश्वमेध यज्ञ करून पृथ्वी जिंकिल्याचा उल्लेख आहे.

अश्वमेधाचा उल्लेख व प्रयोगविधि यजुर्वेदाच्या सर्वसूत्रांत आला आहे. त्यांपैकी सत्याषाढ सूत्रांतील अश्वमेधासंबंधीं कांही गोष्टी पुढें दिल्या आहेत.

यज्ञ करणारानें चैत्री पौर्णिमेस ‘सांग्रहणी’ नामक इष्टि करावयाची. वैशाखी पौर्णिमेस प्रजापति देवतेस उद्देशून पशुयाग करावयाचा. दुसरे दिवशी ॠत्विजांचे वरण करून अश्वमेधाचा संकल्प करावयाचा व उक्तलक्षणी असा अश्व अश्वरक्षकांसह सोडावयाचा. त्याच दिवसापासून दररोज सकाळी, मध्यान्हकालीं व सायंकाळी सारस्वतीनामक इष्टि करावयाच्या आणि दररोज यजमानाकडून पारिप्लवनामक आख्यान ऐकावयाचे. (या पारिप्लवांचा उल्लेख ज्ञानकोश भाग तीन पृ. ५१५ येथें आला आहे.)

असा क्रम एक संवत्सरपर्यंत झाल्यावर व सोडलेला अश्व परत आल्यावर यजमानानें दीक्षा ग्रहण करावयाची. या यज्ञांत सुत्याह म्हणजे सोमयाग करावयाचे दिवस तीन असतात. यज्ञांत मारल्या जाणार्‍या अश्वाबरोबर अनेक देवतांनां उद्देशून ग्राम्य व आरण्य पशूंचें उपाकरण केलें जातें. त्यांपैकी ग्राम्य पशु मारले जातात व आरण्य पशूंनां सोडून दिलें जातें. “सुत्येच्या मध्य दिवशीं म्हणजे दुसर्‍या दिवशीं अश्वाचें उपाकरण केलें जातें. त्यापूर्वी त्याला उत्तम शृंगारून एका उत्तम भूषित केलेल्या रथास जोडून यज्ञमंडपाभोंवती फिरविलें जातें व नंतर त्याला उत्तर वेदीच्या उत्तर बाजूच्या  जागेवर (आस्ताव) उभें करतात. ही जागा त्यानें हुंगली अथवा त्या जागेवर तो फिरला तर तें शुभ समजलें जातें. (अश्वाचें सज्ञपन, अश्वाशेजारी यजमानपत्‍न्याचें उपवेशन, ॠत्विजांमधील प्रश्नोत्तरें या गोष्टी ज्ञानकोश विभाग २ पृष्ठ ७८ मध्यें आल्या आहेत.) इतर पशूंप्रमाणें अश्वाला वपा नसल्यामुळें चंद्रनामक (त्याच्या शरीरांतील) मेदाचा वपेच्याऐवजी याग केला जातो. वपायागानंतर ॠत्विजांकडून यजमानाला अभिषेक केला जातो. याप्रमाणें सूत्रांतील अश्वमेध यज्ञाचा प्रयोग  आहे.

पुराणांत जैमिनी कृत अश्वमेध नांवाचा एक ग्रंथ असून त्यांत पंडुपुत्र धर्मराज यानें केलेल्या अश्वमेधाचें वर्णन आहे. त्यांत विधिसंबंधी गोष्टी पुढीलप्रमाणें आहेत. भारतीय युद्धात घडलेल्या हिंसारूप पापक्षालनार्थ त्यानें अश्वमेध केला. त्यानें चैत्री पौर्णिमेस दीक्षा ग्रहण करून अश्व सोडला; संवत्सरानें तो अश्व परत आल्यावर त्या अश्वाला व त्याच्या रक्षकांनां धर्मराज सामोरा गेला. त्याच्या यज्ञांत व्यास ॠषि अध्वर्यु व बकदाल्भ्य ब्रह्मा होता. त्याचा यज्ञमंडप आठ द्वारांचा होता व त्यांत आठ कुंडे व तीन वेदी होत्या. बकदाल्भ्याच्या अनुज्ञेनें धर्मानें अश्वमेधास जोडून श्येन चिति केला. त्याच्या प्रथम प्रस्ताराच्या इष्टका (विटा) चारशें होत्या. श्येनाच्या उजव्या पंखासाठीं एकशें चव्वेचाळीस व तितक्याच डाव्या पंखाकरितां इष्टका मांडल्या होत्या; शंभर विटांनीं पुच्छ बनविलें होतें आणि एकवीस विटांनीं मुख (शीर) बनविलें होतें. याप्रमाणें दर एकाच्या दुप्पट दुसरा असे पांच थर मांडले होते. अश्वाला यूपास बांधण्यापूर्वी व्यासाच्या आज्ञेवरून चौसष्ट दंपतींनीं आणिलेल्या उदकानें त्याला मंगल स्नान घातलें. यूपास बांधलेल्या ठिकाणींच भीमानें अश्वास तरवारीनें मारिलें. अश्वाला मारिल्यावर त्याच्या शरीरांतून मांस न निघतां कापूर निघाला व त्याचें स्रुव्यानें व्यासानें अग्नींत हवन केलें इत्यादि.

वरील विधींत अश्व परत येण्यापूर्वी दीक्षा ग्रहण करणें; यज्ञ मंडपांत आठ अग्निकुंडे व तीन वेदी असणे; चौसष्ट जोडप्यांनीं आणिलेल्या उदकानें अश्वाला मंगल स्नान घालणें; यूपास बांधिलें असतांच अश्वाला तरवारीनें मारणे; अश्व शरीरांतून निघालेल्या (मांसाऐवजी) कापराचें स्त्रुव्यानें हवन करणें इत्यादि गोष्टी श्रौत धर्माशीं विसंगत दिसतात.

जैमिनीय अश्वमेध ग्रंथांत कथेच्या अनुरोधानें पूर्वी दाशरथी रामचंद्रानें केलेल्या अश्वमेधाचा व धर्माश्वमेघाच्या समकालींच मयूरध्वज नामक राजानें केलेल्या अश्वमेधाचा उल्लेख आला आहे. परंतु त्यांत विधिविषयक अशा विशिष्ट गोष्टीचा उल्लेख आलेला नाहीं.

महाभारतांत आश्वमेघिक पर्वांत धर्मराजानें केलेल्या अश्वमेघांत पुढील विधिविषयक गोष्टींचा उल्लेख येतो. चैत्री पौर्णिमेस संकल्प करून अश्व सोडणें व त्याचवेळीं दीक्षा ग्रहण करणे. माघी पौर्णिमेस अर्जुन अश्वासह परत येतो. सद, आग्नीध्रीया, पत्‍नीशाला इत्यादि यज्ञमंडपांतील पोटभाग तयार करणे. यज्ञांतील ‘स्फ्य’ नामक उपकरण सुवर्णाचें प्रवर्ग्य व सोभाभिषव (सोम कुटणें) यांचा उल्लेख, यूपास वस्त्र गुंडाळणें, शोभेसाठीं सुवर्णाचे (जरूरीपेक्षां) जास्त यूप पुरणें, अश्वाबरोबर इतर पशूंचे उपाकरण करणें, श्येन चिती करणें, त्यांतील इष्टका (विटा) सुवर्णाच्या असणें; मृत अश्वाजवळ राजपत्‍नीनें शयन करणें, अश्वाची वपा काढून हवन करणें, अश्वमासांचे सर्व (१६) ॠत्विजांनीं  अग्नीत हवन करणें. यांतील बहुतेक गोष्टी सूत्रांतील विधीशीं जुळण्यासारख्या आहेत. सुवर्णाचा स्फ्य; सुवर्णाच्या इष्टका; अश्वमासाचें सर्व ॠत्विजांनीं हवन करणें. या गोष्टी सूत्रोक्त श्रौत धर्माविरुद्ध आहेत.

 


वाल्मिकी रामायणांत दशरथ राजानें पुत्रप्राप्तीसाठीं अश्वमेध यज्ञ केल्याचा उल्लेख आहे. (१.१३) त्यांतील विधीविषयक गोष्टी भारतांत उल्लेखिलेल्याप्रमाणेंच असून सुत्रोक्त श्रौत धर्माशीं जुळणार्‍या कांहीं जास्त गोष्टीचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ:— सुत्या (सोमाचें हवन) तीन दिवस करणें:— पहिल्या दिवशीं ज्योतिष्टोम दुसर्‍या दिवशीं उक्थ्य व तिसर्‍या दिवशी अतिरात्र या ॠतूंचे अनुष्ठान करणें, राजमहिषीचें मृत अश्वासमीप शयन. राजमहिषींचा सूत्रोक्त नांवानें उल्लेख इत्यादि.


धर्माच्या अश्वमेधावरील ग्रंथांत जैमिनीचा अश्वमेध सुप्रसिद्ध व सुरस कथात्मक असा आहे. भाविक हिंदु लोक हें पुराण मोठया आवडीनें वाचतात. इतर पुराणांप्रमाणें हें भारूड मजकुरानें न भरतां मनोरंजक उपकथा यांत गोंवून तें सामान्य अबालवृद्धांस प्रिय असेंच रचण्यांत आलें आहे. या अश्वमेध पुराणांतील विषय पुढीलप्रमाणें:—

जै मि नी अ श्व मे ध— अध्याय १ ला—गोत्रहत्येचें क्षालन करण्यास उपाय कोणता, असा प्रश्न धर्मराजानें व्यासास केला असतां, त्यांनीं त्यास अश्वमेध करण्यास उत्तेजन दिलें व सर्व शंकांचे निरसन करून ॠतूला योग्य असा अश्व कोठें आहे हेंहि त्यास सांगितलें.

अ ध्या य २-५ — कृष्ण भीमाचें धैर्य पाहण्यासाठी मुद्दाम अश्वमेध न करण्याविषयीं सल्ला देतो व भीमाची विनोदानें हेटाळणी करतो, तेव्हां भीमहि त्यास विनोदी उत्तर देतो. भीम, वृषकेतु (कर्णपुत्र) व मेघवर्ण (घटोत्कच पुत्र) हे यज्ञाश्व आणण्याकरितां यौवनाश्वाच्या राज्यांत गेले व तेथें बलाढय यौवनाश्च राजाला जिंकून अश्व हरण केला.

अ ध्या य ६-७ — यौवनाश्च राजा परिवार व प्रजा यांसहित पांडव व कृष्ण यांच्या दर्शनाकरितां आला. अश्वमेधाच्या समारंभाची तयारी सुरू झाली. धर्मानें व्यासाकडून मरुत्तयज्ञाची माहिती मिळविली.

अ ध्या य ८-९ — व्यासाचा धर्मास आचार्यलक्षणाविषयीं उपदेश. नवव्या अध्यायांत कृष्णाच्या भोजनांतील प्रकार सविस्तर वर्णन केले आहेत. त्या वेळेच्या भोजनांतील पदार्थ थेट हल्लीप्रमाणें होतेसें दिसतें. सत्यभामा व देवकी या सास्वासुनांत कृष्णांच्या गुणावगुणांविषयीं चाललेला वाद मोठा मनोरंजक वाटतो.

अ ध्या य १०—१२ — कृष्णाला यज्ञाला आमंत्रण, त्याचें प्रजापरिवारासहित हस्तिनापुरीं आगमन, त्याचा तेथें सर्व दर्जाच्या लोकांनीं केलेला अपूर्व सत्कार, कृष्णवैरी अनुशाल्वानें हस्तिनापुरांत या पाहुण्यांच्या गडबडीत यज्ञाश्वाचें केलेलें हरण.

अ ध्या य १३-१४ — भीमकृष्णासहि जर्जर करून सोडणार्‍या अनुशाल्वावा जिंकून बाल वृषकेतूनें त्याला कृष्णाच्या पायांवर घातलें, त्या वेळीं त्याची इतक्या वेळ गुप्त असलेली कृष्णभक्ति प्रगट झाली, व तो यौवनाश्वाप्रमाणें पांडवांना मिळाला. विधिपूर्वक घोडा सोडण्यांत आल. अर्जुनाला त्याचा पालक म्हणून सैन्यासह पाठविलें. माहिष्मति नगरींत अश्वहरण.

अ ध्या य १५ — माहिष्मतीच्या नीलध्वज राजाचा पराभव त्याच्या स्त्रीनें गंगेला, अर्जुनानें तुला निपुत्रिक केलें (भीष्म मारून) असें चिथविल्यावरून तिनें अर्जुनाला दिलेला शाप. त्या शापाचा परिणाम असा होतो कीं पुढें बभ्रुवाहनयुध्दंत अर्जुन गतप्राण होतो.

अध्याय १६ — एका शिलेला अश्वाचा स्पर्श होऊन तोतिलाच वज्रालेप होऊन राहिला, तेव्हां अर्जुनानें सौभरी ॠषीला कारण व उपाय विचारला. त्यानें शिलारूपी चंडीची कथा सांगून शिलामुक्त होण्याचा उपाय सांगितला. त्या योगानें अश्व मुक्त होऊन चंडीचीहि शिलारूपापासून मुक्तता झाली.

अ ध्या य १७-२०.— सुधन्व्याची कथा—सुधन्व्याच्या पित्याच्या राज्यांत एकपत्‍नीत्व कडक रीतीनें पाळलें जाई. पितरांचा उद्धर करण्यकरितां स्त्रीला पुत्रप्राप्ति करून देऊन सुधन्व्याला रणांगणांत येण्यास वेळ लागला, तेव्हां सत्यव्रत पाळण्यासाठीं हंसध्वजानें त्याला तापलेल्या तेलांत टाकलें; पण त्याला हरिभक्तीनें तोरले. सुधन्व्याच्या एकपत्‍नीव्रताच्या पुण्याईनें तो कृष्णार्जुनालाहि भारी झाला; पण कृष्णानें आपल्या दैवीशक्तीनें त्याचा वध केला. त्याचा भाऊ सुरथ याचाहि अशाच रीतीनें वध केला.

या कथेंत ही एक मजा वाटते कीं, कृष्णार्जुनाचे शत्रू त्यांच्याविषयीं मनात दृढभक्ति बाळगून लढतात. या कथेंत अर्जुनाचा पराक्रम तर मुळींच दिसत नाहीं; कृष्णमध्यस्थीनें केवळ त्याला विजय मिळतो. उलट त्याच्या शत्रूंच्या शौर्याचें कौतुक करावेंसें वाचकांस वाटतें.

अ ध्या य २१-२२.— स्त्रीराज्यांत अश्वप्रवेश—प्रमिलेंशीं युद्ध—ती स्त्री व तशांतून अंजिक्य म्हणून अर्जुननें तिला वरिलें—भीषण राक्षसाचा पराजय—बभ्रुवाहनाच्या मणिपुरांत प्रवेश.

अ ध्या य २३—२४ —बभ्रुवाहन पितृभक्तीनें अर्जुनापुढें नम्र झाला असतां अर्जुनानें त्याचा अपमान केला, तेव्हां बभ्रुवाहनानें पित्याशीं दारूण युद्ध केलें व पित्याला जर्जर करून सोडिलें.

अध्याय २५-३६ —कु श ल वो पा ख्या न.—रावण वधानंतर रामाचा अयोध्येंत प्रवेश— लोकापवादाकरितां सीतेचा त्याग—वाल्मीकाश्रमीं तिचें गमन—कुशलवजन्म— रामाश्वमेध—लवानें अश्व हरण केला—लवकुशंनी रामसैन्याबरोबर केलेलें घनघोर युद्ध—रामाचा पराभव—सीता व पुत्र यांचा रामानें केलेला स्वीकार.

प्रस्तुतवर्णन वाल्मीकीरामायण कथेशीं विसंगत आहे. पण पुढील काळांत ही कथा फार लोकप्रिय झाली आहे.

अध्याय ३७-४०.—बभ्रुवाहनानें पांडवसैन्याचा नाश करून अर्जुनासहित सर्व योद्धयांनां मारलें. त्याच्या माता चित्रांगदा व उलुपी यांनां भर्तुवधाबद्दल अतिशय शोक होऊन त्या पुत्राला दूषणें देऊं लागल्या. बभ्रुवाहनानें नागांबरोबर युद्ध करून मृतसंजीवकमणि अर्जुनादिकांनां जिवंत करण्यास आणला; पण त्यापूर्वी अर्जुनाचे शीर एका नागानें पळविलें. कृष्णानें आपली ब्रह्मचर्याची (?)पुण्याची खर्च करून तें शीर आणविलें. याप्रमाणे अर्जुनादि वीर जिवंत झाले व पुनः पूर्ववत् अश्वरक्षणार्थ निघाले.

अ ध्या य ४१-४६ —ताम्रध्वजानें अश्वग्रहण करून कृष्णार्जुनांशीं युद्ध केलें, व त्यांचा चांगलाच पराभव केला, तेव्हां कुष्णार्जुन गुरुशिष्याच्या वेषानें ताम्रध्वजाचा पिता मयुरध्वज याच्याकडे जाऊन त्यांनी त्याचें अर्धे शरीर मागितलें व तें मयुरध्वज देऊं लागला, तेव्हां आपलें खरें रूप प्रगट करून त्याच्यावर अनुग्रह केला व अशा रीतीनें घोडा सोडविला.

अध्याय ४७-४९ —वीरवर्म्यानं यज्ञाश्वाचें हरण केले- त्याचा जामात यमधर्म, याजबरोबर, पांडवांचें युद्ध— यमधर्म वीरवर्म्याचा जामात कसा झाला यासंबंधी कथा, या कथेंतच कोणतें पाप केलें असतां कोणात राग होतो व तो कोणतें दान केलें असतां जातो याचें सविस्तर विवरण आहे— वीरवर्म्यानें युध्दंत जय मिळिला व अर्जुन पौरुषरहित झालेला पाहून अश्व सोडून दिला व त्याचा सखा बनला.

अ ध्या य ५०-५८ — चंद्रहासोपाख्यान—चंद्रहासाचा निराथितपणा—वधार्थ योजलेल्या चांडालांपासून मुक्तता—त्याची विलक्षण हरिभक्ति—त्याचा दिग्विजय—त्याचा पूर्ववैरी धृष्टबुद्धि प्रधान याचा पुनः त्याला मारण्याविषयींचा घाट—मोठया चमत्कारिक योगानें चंद्रहास व धृष्टबुद्धिकन्या विषया यांचें लागलेलें लग्न— धृष्टबुद्धीचा पुनः चंद्राहासाला मारण्याचा डाव; पण त्या डावांत त्याचा पुत्र मदन हाच मारला गेला धृष्टबुद्धीचा आत्मवध—चंद्रहास दिव्य करून या पितापुत्रांनां उठविता झाला—चंद्रहासाला राज्यप्राप्ति—शालिग्रामभक्तिमहिमा.

अ ध्या य ५९ —चंद्रहासनें श्रीकृष्णभक्तामुळें पांडवांबरोबर युद्ध केलें नाहीं. त्याचा गौरव करून आपण अश्व रक्षणार्थ बरोबर निघाला.

अध्याय ६०-६४ —सागरांत बकदालभ्यमुनीची भेट—जयद्रथाच्या नगरीस गमन व तेथें दुःशीलेंचें सांत्वन—वर्षभर पृथ्वीभ्रमण केल्यानंतर हस्तिनापुरीं पुनरागमन—यज्ञाला सुरुवात, इष्टिकाचयन, चितिरचना, जलाभरण, अश्ववध व त्याच्या शरीराचें हवन, अवमृथस्नान, पुरोडाशभक्षण इ्त्यादि यज्ञांगे झाल्यावर अश्वमेधाची समाप्ति.

अ ध्या य ६५ —यज्ञानंतर मुनींनां घातलेल्या भोजनाचे वर्णन—कलियुगांत कशा प्रकारची स्थिति असेल याचें वर्णन.

अ ध्या य ६६-६८ — या अध्यायांत एका दाणे वेंचून उदरनिर्वाह करणार्‍या धार्मिक कुटुंबाची कथा आहे. दुष्काळांत कसेतरी शेरभर सातू मिळाले असतां ते परस्परांत वाटून खाणार इतक्यांत एक अतिथि आला. त्याची एका वांटयानें क्षुधा शांत होईना, तेव्हां सर्वांनी आपले वांटे आनंदानें त्यास अर्पण केले यामुळें त्या कुटुंबास दिव्य लोकांची प्राप्ति झाली. शेवटच्या अध्यायांत अश्वमेधफलश्रृति आहे.

म रा ठी अ श्व मे ध ग्रं थ.—मराठी भाषेंत अश्वमेध विषयावर कोणकोणते ग्रंथ आहेत ते महाराष्ट्र सारस्वतकारांनीं दिले आहेत. “नामा पाठकाचा अश्वमेध” ग्रंथ बराच मोठा असून त्यांत ९५ प्रसंग आहेत. याची भाषा व रचना अगदीं साधारण प्रतीची असल्यामुळें हा फारसा प्रचारांत असलेला दिसत नाहीं. हा प्रचारांत नसण्याचें दुसरें कारण श्रीधरानेहि एक अश्वमेध ग्रंथ रचिला आहे व तो फार रसाळ असल्यानें अश्वमेध वाचणारा साहाजिक श्रीधराचाच अश्वमेध वाचतो.

तिसरा अश्वमेध कृष्णदास नांवाच्या एका कवीचा आहे. चौथा ‘दासोसुत—मुद्गल’ याचा आहे. पांचवा ‘नारायण विप्र’ यानें लिहिला आहे. सहावा जगजीवनाचा. सातवा विष्णुदासाचा. आठवा व ननवा रामदासी परंपरेंतील माधवस्वामी व विठ्ठलस्वामी यांचे आहेत. याशिवाय शिवकल्याणाचा एक अश्वमेध आहे असें म्हणतात. वाङ्मय लेखांत दिले आहे.

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .