प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

अष्टप्रधान — शिवपूर्वकालीन इतिहास— अष्टप्रधान व शिवाजी या दोन शब्दाचें इतकें साहचर्य आहे की अष्टप्रधानविशिष्ट राज्यपद्धति म्हणताच शिवकालीन राजयपद्धति डोळयांसमोर उभी राहते. अष्टप्रधान या अर्थाची शब्दरचना महाभारतांतहि आढळते. शांतिपर्व अध्याय  ८५ मध्यें अष्टानां मांत्रिणां मध्यें मंत्र राजोपधारयेत असे एक वचन आहे. त्यावरून अष्टप्रधान ही संस्था फार जुनी असावी असें रा. ब. चिं. विं. वैद्य महाभारताच्य उपसंहारात म्हणतात; पण हे आठ मंत्री कोणते हे महाभारतांत कोठेंहि सांगितलेलें नाहीं. सभापर्व अध्याय पांच यांत तर एके ठिकाणीं सांत प्रकृतींचा उल्लेख आला आहे.येथेंहि त्या सात ‘प्रकृति’ कोणत्या त्याचें वर्णन नाहीं; परंतु वैद्यांच्या मतें मुख्य सचिव, सेनापति, पुरोहित, हेर, दुर्गाध्यक्ष, ज्योतिषी व वैद्य हे अधिकारी राजाला असलेच पाहिजेत. कच्चिदघ्यायांतील एका श्लोकांत अठरा अधिकारी सांगितले असून त्यांची नांवे टीकाकारानें (१) मंत्री अथवा मुख्य प्रधान, (२) पुरोहित, (३) युवराज, (४)सेनापति अगर चमूपति, (५)द्वारपाल अथवा प्रतिहारी, (६) अन्तरवेशक किंवा अन्तर्गृहाचा अधिकारी, (७) कारागृहाचा अधिकारी, (८) कोशाध्यक्ष, (९) न्यायाधिकारी, (१०) प्रदेष्टा, (११) राजधानीचा अधिकारी, (१२) काम नेमून देणारा अधिकारी, (१३) धर्माध्यक्ष, (१४) सभाध्यक्ष अथवा न्यायाधिकारी, (१५) दंडाध्यक्ष, (१६) दुर्गाध्यक्ष, (१७) सीमाध्यक्ष,व(१८) अरण्याध्यक्ष, अशी दिलीं आहेत. दुसर्‍या एके ठिकाणीं १४ च अधिकारी सांगितले आहेतः— (१) देशाधिकारी, (२) दुर्गाधिकारी, (३) रथाधिपति, (४) गजाधिपति, (५) अश्वाधिपति, (६) शूरसैनिक (पदातिमुख्य), (७) अंतःपुराधिपति, (८) अन्नाधिपति, (९) शास्त्राधिपति, (१०) सेनाराणूक, (११) आयवययाधिपति, (१२) धनाधिपति, (१३) गुप्तहेर, (१४) मुख्यकामगार अशी त्यांची नांवहि दिली आहेत. (महाभारतात उपसंहार, पान २९२).

महाभारताप्रमाणें मनुस्मृतीतहि राजानें सात किंवा आठ सचीव नेमून त्यांच्या सल्ल्यानें चालावें असें नुसतें मोघमच म्हटलें आहे. (अध्याय ७. श्लोक ५४—५७) त्यानंतर मुसुलमानी अमदानींतहि, त्यांच्या राज्यपद्धतीचें जें स्वरूप साधारणतः ग्रंथकारांनीं दिलें आहे त्यावरून तेव्हां शिवाजीसारखे प्रधानमंडळ नव्हतें असें दिसून येतें. प्रधानमंडळ स्थापन केल्याबरोबर त्याच्या वागणुकीसाठीं कांही नियम बांधून राजानें स्वतःच्या अधिकारांपैकी कांही विशिष्ट अधिकार पृथकपणें व एकवटून त्या प्रधानमंडळास द्यावे लागतात. परंतु अशा रीतीने आपली सत्ता कमी करून आपल्या अनियंत्रित वर्तनावर प्रधानमंडळाच्या जुटीचा दाब बसवून घेण्याइतके उदार राज्यकर्ते मुसुलमानांत झालेले दिसत नाहींत. या सर्व गोष्टींचा विचार करतां शिवाजीनें आपली अष्टप्रधानांची व्यवस्था प्राचीन हिंदु कल्पनांवर बसवून तींत स्वतःच्या अकलेनें व जवळच्या मंडळींच्या सल्ल्यानें कालदेशवर्तमानास जरूर ते फेरफार करून नवीनच केली असावीसें वाटतें.

शि वा जी ची व्य व स्था — अष्टप्रधानांची नेमणूक शिवाजीनें केव्हां केली हें निश्चित सांगतां येत नाहीं. स्वराज्याचा उद्योग आरंभल्यावर जसजशी जरूर भासत गेली तसतसे अधिकार निर्माण केलेले दिसतात. इ.स. १६४० पासून १६४५ च्या दरम्यान  मावळांतील राज्यव्यवस्था करतांना कांही अधिकारी निर्माण झाले. देशमुखांनां अनुकूल करून घेण्यांत जो फार उपयोगी पडला, त्यास डबीर म्हणजे उत्कयभिज्ञ हा हुद्दा देण्यांत आला; ज्या हुद्देदारानें देशमुखांस दस्त केलें— म्हणजे त्यांनां आपल्याशीं बांधून घेतलें— त्यास पेशवाई म्हणजे मुख्य प्रधानकी मिळाली; व ज्या सैन्यानें पुंडानां जमीनदोस्त केलें त्याची व्यवस्था ठेवण्याकरितां एक सबनीस नेमावा लागला. पुढें मुलुख ताब्यांत आलयामुळे जमाखर्चाचें काम पडूं लागलें. तेव्हा मुज्मुदाराची जरूर लागली. अशा रीतीनेंच सुरनीस सरनोबत, चिटणीस, फडनीस, इत्यादि अधिकारी अस्तित्त्वांत आले. आरंभी ह्या अधिकाऱ्यांचीं नांवे फारसी होतीं,परंतु काहीं काळानें आपल्या राज्याचें पूर्ण हिंदी स्वरूप दाखविण्याकरिता शिवाजीनें संस्कृत नांवे प्रचारांत आणलीं. अष्टप्रधानांतील अधिकाऱ्यांची फारसी व संस्कृत नांवे, त्यांची कर्तव्यें व त्यांचे पगार पुढें दिल्याप्रमाणें होतेः—

 

 पेशवा संस्कृत नांव.   कर्तव्य. 
वार्षिक वेतन
 पेशवा. पंतप्रधान. मुख्य दिवाणगिरी. १५००० होन.
 मुज्मुदार  पंत अमात्य. मुलकी हिशेब १२००० होन
 सुरनीस. पंतसचिव दफ्तरांचा सांभाळ १०००० होन
 वाकनीस मंत्री.  खासगी कारभार. १०००० होन
 डबीर. सुमंत. परराज्यव्यवहार  १०००० होन
 सरनोबत सेनापति. फौजेची व्यवस्था १०००० होन
 सरनोबत न्यायाधिश न्यायकरणें. १०००० होन
 सरनोबत पंडितराव शास्त्रार्थ व दानधर्म १०००० होन

 

 

 

 

 

 

 

 

                            
वर दिलेल्या प्रधानांपैकी पंडितराव व न्यायाधीश ह्या प्रधानद्वयाखेरीज बाकीच्यांस लष्करी नोकरींतहि निष्णांत असावे लागें. ह्या सर्व प्रधानांस एक एक मुतालिक दिलेला असे. प्रधान स्वारीवर गेले म्हणजे त्यांच्य मागें त्यांच्या सगळया कामाची व्यवसथा ह्या मुतालिकांनीं प्रमुखपणें पहावी असें असे. मुतालिक सरकारांतूनच नेमून दिलेले असत व त्यांच्या धन्यांचे शिक्के मोर्तब त्यांच्या हातीं असत. परंतु एखादें तसेंच महत्त्वाचें काम असलें तर त्याचा निकाल त्यांनीं आपल्या वरिष्ठांच्या अनुमतीवांचून लांवू नये असें असे. प्रत्येक खात्यांत पुन्हा आठ दुय्यम कामगार असत. त्यांची नावें येणेंप्रमाणेः— १) कारभारी, हा आपल्या खात्याचा एकंदर कारभार पाहत असें. (२) मुज्मुदार ह्याच्यापाशीं जमाखर्चाचे काम असे; (३) फडणीस, हा मुज्मुदाराचा दुय्यम असे; (४) सबनीस किंवा दफ्तरदार, याजपाशीं दफ्तर ठेवम्याचें काम असे; (५) चिटणीस ह्याजपाशीं सर्व पत्रव्यवहाराचें काम असे; (६) कारखाननीस, ह्याच्या पाशीं सगळया कोठीची व दाण्यागल्ल्याची व्यवस्था पहाण्याचें काम असे; (७) जामदार, याजकडे नगदी खेरीज करून एकंदर चीजवस्तीचा संग्रह करण्यांचे काम असे; आणि (८) पोतनीस ह्याच्या ताब्यांत सर्व रोकड असे. ह्या सर्व कामदारांच्या हाताखालीं अर्थात कामाच्या मानानें कमीजास्त कराकून असत. ह्याशिवाय खुद्द खाशांच्या तैनातीस एक चिटणीस, एक फडणीस, एक पारसनीस व एक पोतनीस असे स्वतंत्रच असत.

प्र धा न मं ड ळा त प्र त्ये का चा द र्जा — अष्टप्रधानांत पेशवा हा मुख्य असून त्याची हुकमत इतर सर्व प्रधानांवर होती. त्याची पायरी राज्याच्या खालची असून त्याची बसण्याची जागा सिंहासनाच्या नजीक उजव्या बाजूस पहिली असे. मुलकी व लष्करी ह्या दोनहि कामांवर त्याची संपूर्ण देखरेख असून राज्याच्या सर्व घडामोडींची जबाबदारी त्याजवर होती. सेनापतीकडे सर्व लष्कराचा ताबा असून त्याची बसण्याची जागा डाव्या बाजूस पहिली होती. अमात्य, सचिव, मंत्री हे पेशव्याच्या खाली अनुक्रमानें बसत. व सुमंत, पंडितराव व न्यायाधीश हे डाव्या बाजूस सेनापतीच्या खालीं अनुक्रमानें बसत. असें रियासतकारांनीं दिलें आहे. परंतु मल्हाररामरावकृत राजनीतीमध्यें प्रधानांच्या बसण्याचा अनुक्रम निराला दिला आहे. उजव्या बाजूस मुख्य प्रधान, अमात्य, सचिव व सुमंत यांनी व डाव्या बाजूस पंडितराव, सेनापति, मंत्री व न्यायाधीश यांनी बसावें असा ह्या पुस्तकांत दिलेला अनुक्रम आहे.

अष्टप्रधान संस्थेचा राज्याभिषेकविधींत समावेश करून तिला धार्मिक स्वरूप कसें देण्यांत आलें होतें हे शिवाजीच्या राज्याभिषेकासंबंधी उपलब्ध असेलल्या वर्णनावरून चांगलें दिसून येतें. ह्या राज्याभिषेकसमयीं सिंहासनाच्या सभोंवार हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान अष्टदिक्स्थानापन्न झाले होते. पूर्वेस मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हाती सुवर्णकलश घेऊन उभा राहिलेला होता. दक्षिणेस सेनापति हंबीरराव मोहिते दुग्धपूर्ण रौप्यकलश घेऊन उभा राहिला होता. पश्चिमेस रामचंद्र नीलकंठ पंडित अमात्य दधिदुग्ध पूर्ण ताम्रकलश घेऊन उभा राहिला होता. उत्तरेस छांदोगामात्य प्रधान रघुनाथ पंडितराव मधुपूर्ण सुवर्णकलश घेऊन उभा राहिला होता. ह्याजपाशीं मृन्मय कुंभात समुद्रजल व महानद्यांचें जल भरून ठेविलें होतें. उपदिशांच्या ठायीं क्रमेंकरून आग्नेयीस अण्णाजी दत्तो पंडित सचिव छत्र घेऊन उभा राहिला होता, नैर्ॠत्यभागीं जनार्दन पंडित सुमंत व्यजन घेऊन उभा राहिला होता, वायव्यभागीं दत्तो त्रिमल मंत्री चामर घेऊन उभा होता व ईशान्यभागीं बाळाजी पंडित न्यायाधीश दुसरें चामर घेऊन उभा राहिला होता ‘मल्हाररामराम’ कृत राजीनीतीमध्यें मुख्य प्रधान ब्राह्मण, सेनापति क्षत्रिय व अमात्य वैश्य असावा असा एक नियम सांगितला आहे.

न वी न अ धि का ऱ्यां ची भ र .— निरनिराळया कामांची वांटणी होऊन त्याची जबाबदारी ठरली जावी, व प्रत्येकानें एका कामात प्रवीणता संपादून तें काम उत्कृष्ट रीतीनें तडीस न्यावें हें तत्त्व साधण्यासाठीं शिवाजीनें हें प्रधानमंडळ अस्तित्त्वांत आणलें होतें. ह्या संस्थेतील दूरदृष्टीच्या धोरणामुळें स्वसंरक्षण व स्वराज्यसंवर्धन ही दोन कामें महाराष्ट्रीयांस करितां आली. औरंगजेबाच्या प्रचंड शक्तीशी झगडा करून विजय संपादण्यास ही संस्था फार उपयोगी पडली. शिवाजीनंतर संभाजीनें अष्टप्रधानांत फिरवाफिरव केली नाहीं. मात्र संभाजीपुढें जावयास छंदोगामात्य कलुशा यांशिवाय दुसरा कोणी धजत नसल्यामुळें बहुतेक कामें कलुशाच्याच तंत्रानें चालत. राजारामाच्या वेळच्या धामधुमीच्या कारकीर्दीत अष्टप्रधानांशिवाय आणखी कर्ती माणसें पुष्कळ निपजल्यामुळें त्यांचा योग्य सन्मान करतांना अष्टप्रधानांत आणखी दोन अधिकाऱ्यांचा समावेश करावा लागला. यापैकी एक पंतप्रतिनिधि व दुसरा हुकुमतपुन्हा. प्रतिनिधीचा अधिकार सर्व प्रधानांवर चालावयाचा असून त्याची नेमणूकहि सर्वात जास्त म्हणजे १५००० होन होती. हुकुमत पुन्हा हा हुद्दा राजारामानें जिंजीस असतांना महाराष्ट्रांत कुल राज्यव्यवस्था पाहणार्‍या अधिकाऱ्यांस दिला होता. त्याची योग्यता एवढी होती की, त्याजकडून जे हुकूम येतील ते छत्रपतींनींहि मोडावयाचे नव्हतें.

ना म धा री ज हां गी र दा रां त रू पां त र — तथापि राजरामाच्या कारकीर्दीत अष्टप्रधानव्यवस्थेंत झालेला महत्त्वाचा फेरफार म्हटला म्हणजे स्वराज्य संरक्षणाच्या कामीं हुरूप चढावा म्हणून राजारामास इतरांबरोबर अष्टप्रधानांसहि जहागिरींचे आमिष दाखवावें लागलें. याचा परिणाम असा झाला की, पुढें पेशव्यांच्या हातीं सत्ता गेली तेव्हां राज्यकारभाराच्या कामाची वांटणी करण्याच्या उद्देशानें अस्तित्त्वांत आणलेल्या प्रधानमंडळाचें लहान मोठया व कमी अधिक स्वतंत्र अशा मनसबदारांत रूपांतर झालें. शाहूच्या हयातींतच ह्या संस्थेस बरेचसें औपचारिक स्वरूप आलें होतें व त्याच्या मरणानंतर तर ती अगदींच नामशेष झाली.

अष्टप्रधानांच्या व सरदारांच्या नेमणुका पूर्वी चालत आल्याप्रमाणेंच पुढें चालवाव्या, असें शाहूच्या आज्ञापत्रांत होतें. वास्तविक त्यांची आतां नांवे मात्र राहिली होती. अधिकार सर्व गाजवील त्याच्या म्हणजे पेशव्याच्याच हातीं होता. सचिव, प्रतिनिधि, अमात्य व सेनापति हें निर्वार्थ झाले होते; इतर प्रधानांस तर त्यापूर्वीच महत्त्व नव्हतें. शिवाय नवीन सरदार उत्पन्न होत होते, तेव्हां पूर्वीची व्यवस्था आहे तशीच पुढें चालविणें शक्य नव्हतें. शाहूच्या आज्ञापत्रांतला हा भाग अशक्य कोटींतला होता, ही गोष्ट त्याच वेळीं पेशव्यांच्या किंवा इतरांच्या लक्षांत आली नसेल, हें संभवत नाहीं; परंतु शाहू मुमुर्षु असतां त्याजबद्दलची जास्त वाटाघाट करणें शक्य नव्हतें. शाहूच्या आज्ञेचा अर्थ अरेरावी कारभार करून कोणासहि दुखवूं नये किंवा कोणाची उत्पन्नें खालसा करूं नयेत एवढाच घ्यावयाचा होता, व त्याच अर्थाने पेशवेहि हल्लीची व्यवस्था करीत होते. पूर्वीच्या घराण्यांत आता कर्ते पुरुष निघत नाहींत एवढयाच सबबीवर सरसहा सर्वास पदभ्रष्ट केल्यास एकदम मोठा गिल्ला होऊन पेशव्यांचीच उचलबांगडी झाली असती. तेव्हां असा प्रसंग येऊ न देतां, पचेल तितकाच फेरफार पेशवे करीत चालले.

(सं द र्भ ग्रं थ — मराठी रियासत; महाभारत उपसंहार; मल्हाररावकृत रारजनीति; मनुस्मृति; पारसनीस आणि किंकेड हिस्टरी ऑफ दि मराठाज, भाग १)

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .