विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अष्टभैरव — भैरव म्हणजे भयंकर. हें शिवाचें नांव आहे. तथापि भैरव ही शिवगणांतील स्वतंत्र देवता धरितत. त्याचे आठ प्रकार आहेत; ते सर्व भयंकर स्वेरूपाचे आहेत हें सांगावयास नकोच. (१) असिताग, काळया अवयवांचा, (२) संहार, नाश, (३) रूरू, कुत्रा; (४) काल; (५) क्रोध; (६) ताम्रचूड, तांबडया तुर्याचा; (७) चंद्रचूड आणि (८) महा. यांतील कांही नांवाऐवजी, कपाल, रुद्र, भीषण, उन्मत्त, कुपति इत्यादि नांवेहि योजिलेली आढळतात. या स्वरूपांत शिव पुष्कळदां कुत्र्यांवर आरूढ होऊन फिरतो, तेव्हां त्याला ’श्वाऽश्व’ (कुत्रा आहे घोडा ज्याचा) असे संबोधितात