विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अष्टमंगल — ही संज्ञा श्रौतस्मार्त धर्मातील नसून पौराणिक धर्मातील आहे. अष्टमंगल म्हणजे आठ मंगलदायक वस्तूंचा समुदाय. सिंह, वृषभ, गज, पूर्णो—दककुंभ, व्यंजन, निशाण, वाद्य व दीप. या अष्टमंगल वस्तू राज्याभाषिकेचेवेळीं लागतात. ब्राह्मण, अग्नि, गाय, सुवर्ण, घृत, सूर्य, जल व राजा यांनाहि अष्टमंगल समजतात. (मंगल पहा.)