विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अष्टमी — मुं. इलाखा कुलाबा जिल्हा. रोहा म्युनिसिपल हद्दींत हें गांव आहे. येथें एक सुंदर तळें असून बरेच बेने इस्त्राइल लोक राहतात. रायगडास शिवाजीकडे आलेला ऑक्सडन नांवाचा इंग्रज वकील या गांवाचा एम्थेमी म्हणून उल्लेख करितो (इ.स. १६७३ ऑर्म— हिस्टॉरिकल फ्रॅग्मेंटस, २१५; फ्रायर— न्यू अकाऊंट, ७७) १७७१ त चेऊल नदीच्या किनार्यापासून कांहीशा अंतरावर असलेलें महतत्वाचें नांव (उस्तोभ) म्हणून फोर्ब्सनें आपल्या ओरियंटल मेमॉइर्स (१ २११) मध्यें याचा नाम निर्देश केला आहे.