विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अष्टावक्रगीता — अवधूतानुभूति किंवा अध्यात्मशास्त्र हा वेदांतविषयक संस्कृत ग्रंथ असून यावर पूर्णानंदतीर्थ भासुरानंद, मुकुंद, विश्वेश्वर (अध्यात्मप्रदीप), विज्ञानेश्वर (?) वगैरेंनी टीका लिहिल्या आहेत. (आफ्रिकटचा कॅटलॉग) तंजावरच्या ‘सरस्वती महाल’ नांवाच्या सर्वश्रुत ग्रंथालयांत यावर पुढील प्राकृत टीका आहेत. (भा.इ.स.मं. इतिवृत्त शके १८३५)— शिवरामकृत अष्टावक्रटीका (दप्तर १४ वें); वैद्यनाथकृत अष्टवक्री सूक्त टीका, सिद्धत चिंदबरी (दप्तर ३३)