विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असई — मोंगलाईत अंजठयाच्या आग्नेयीस २० मैलांवर औरंगाबादच्या ईशान्येस ३४ मैलांवर हा गावं असून असून येथें मेजर जनरल बेलस्ली नंतर डयूक ऑफ वेलिंग्टन यानें शिंदे व नागपूरकर भोंसले यांच्या सैन्याचा १८०३ मध्यें पराभव केला.