विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असरळी - जिल्हा चांदा. तालुका शिरोंचा. गोदावरी नदीच्या वामतीरावर शिरोंचाच्या दक्षिणेस सुमारें १९ मैलांवर हें मोठें खेडें आहे. इ. स. १९०१ सालीं येथें ३१२८ लोकांची वस्ती होती. हा गाव बहुतेक शेती आहे. येथें दर शुक्रवारीं बाजार भरतो. व त्या वेळीं बरेच दूरदूरचे लोक बाजाराला येतात. राजू आणि कोमटी लोकांची येथें बरीच वस्ती आहे. पोलिस ठाणें, प्राथमिक शिक्षणाची शाळा व पोस्ट हीं येथें आहेत. (चांदा गॅ. १९०९).