प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

असहकारिता - (नॉन- कोऑपरेशन).- हा शब्द अलीकडेसच प्रचलित झाला आहे. सरकार व प्रजा किंवा समाजातील निरनिराळे अवयव यांपैकीं दुर्बल वर्गानें बलिष्ठास नमविण्याची राजकीय व सामाजिक नीतिशास्त्रांतील पद्धति या दृष्टीनें असहकारितेचे विचार व चळवळ हीं पुढें आलीं आहेत. सहकारिता म्हणजे एकत्र किंवा परस्परांच्या साहाय्यानें कार्य करणें; आणि असहकारिता म्हणजे अशी मदत न करणें. मनुष्यप्राणी एकलकोंडा न राहतां अनेक व्यक्तींचा समाज बनवून राहतो, आणि समाजाचें अस्तित्व व कार्य एकमेकांच्या मदतीनें चालतें. अन्योन्याश्रय हा समाजव्यवस्थेचा  केवळ पाया आहे. सरकार म्हणजे समाजावरचें सर्वसाधारण नियंत्रण करणारी शक्ति; ही सरकार व रयत यांच्या अन्योन्याश्रयामुळेंच उत्पन्न होते. आणि या अन्योन्याश्रयाची जाणीव उत्पन्न करून प्रजेनें स्वत्व स्थापन करणें हें असहकारितेच्या चळवळीचें ध्येय आहे. अन्योन्याश्रय ओळखून स्वत्वस्थापन करणें ही गोष्ट मात्र नवीन नाहीं. रूसो या फ्रेंच तत्त्ववेत्त्यानें ‘सरकार’ या संस्थेच्या उत्पत्तीला ‘सोशल काँट्रक्ट’ (सामाजिक करार) हें आदिकरण सांगून शास्ते व शासित यांच्या सहकार्यावर सरकारचें अस्तित्व अवलंबून असतें असें तत्व लोकांस जाणविलें. रूसोनें सांगितलेलें समाजघटनेचें आदिकरण ऐतिहासिक दृष्ट्या जरी चुकीचें असलें तरी राजकारणांत परिणामकारी झाले. अर्थांत एका पक्षानें सहकार्य न केल्यास दुसर्‍या पक्षाचें चालणार नाहीं. कायदे करणें, न्याय देणें व अमंल बजावणी करणें, हीं सरकारचीं जीं तीन कामें त्यांत सरकारशीं असहकारिता करून म्हणजे कायदेमंडळावर बहिष्कार टाकून कर न देऊन, व न्यायकोर्टाची पायरी न चढून सरकारचा राज्य कारभार बंद पाडावा आणि इच्छित राजकीय हक्क प्रत्यक्ष युद्ध न करतां संपादावे, असा असहकारितेच्या चळवळीचा एकंदर उद्देश असतो. असल्या असहकारितेचे प्राचीन इतिहासांत अनेक दाखले सांपडतील. त्यांपैकीं एक सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजें प्राचीन रोमन इतिहासांतील पॅट्रिशियन व प्लीबियन यांच्या भांडणांचें आहे. प्राचीन रोम येथील समाजाचे दोन भाग असून त्यापैकीं प्लीबियन लोकांनीं पॅट्रिशियन लोकांपासून राजकीय व सामाजिक हक्क मिळविण्याकरितां पॅट्रिशियन लोकांशीं असहकारिता केली; तेव्हां पॅट्रिशियन लोकांनां तडजोड करावी लागली. ग्रीकच्या प्राचीन इतिहासांतील “ऑस्ट्रासिझम” (राजद्रोही माणसाची दहा वर्षें हद्दपारी) हा प्रकार निराळा; “एक्सकॉम्युनिकेशन” म्हणजे धर्मसत्तेनें पापी., माणसावर घातलेला संघबहिष्कार (किंवा जाति) बहिष्कार निराळा;  ‘बायकॉट’ हा प्रकार निराळा आहे. एकाद्याशीं व्यापार विषयक किंवा सामाजिक व्यवहारविषयक संबंध ठेवण्याचें नाकारून त्याला पेचांत आणणें, याला बॉयकॉट किंवा बहिष्कार म्हणतात. हद्दपारी व जातिबहिष्कृतता हे सत्ताधीशानें बंडखोराला करावयाच्या शिक्षेचे प्रकार आहेत. बॉयकॉट हा सामुदायिक नापसंति दर्शविण्याचा मार्ग आहे; आणि असहकारिता हा , स्वातंत्र्याकरितां प्रत्यक्ष युद्ध न करतां स्वतःच्या कृत्यावर ज्या क्रिया अवलंबून असतात त्या ताब्यांत घेऊन राजकर्त्यांस नमविण्याचा मार्ग आहे.

आ धु नि क इ ति हा स.- बलिष्ठ साम्राज्यसत्तेपासून पूर्ण स्वातंत्र्य किंवा मर्यादित राजकीय हक्क मिळविण्याचे शस्त्र म्हणून असहकारितेचा उपयोग १९ व्या व २० व्या शतकांत केलेला विशेष दृष्टीस पडतो. अस्ट्रियन साम्राज्य सरकारशीं हंगेरियन लोकांनीं, आणि ब्रिटिश सरकारशीं आयर्लंड, इजिप्त वगैरे देशांनीं असली असहकारिता केली. पण सर्व ठिकाणच्या लोकांनीं असहकारितेच्या मार्गांत शस्त्रांची मदत घेतली. पण १९२०-२१ मध्यें हिंदुस्थानांत महात्मा गांधींनीं असहकारिता उपदेशिली तिच्यांत अनत्याचारित्व हें प्रधान तत्त्व  होतें, हा हिंदुस्थानच्या व इतर देशाच्या असहकारितेंतील प्रमुख फरक आहे, आणि यांतच अधिक प्रागतिकता दिसून येतो. महात्मा गांधींनीं राजकीय हक्का प्रीत्यर्थ उपदेशिलेल्या मार्गाचा इतिहास पाहतां त्यांत तीन पायर्‍या दिसतात. पहिली निःशस्त्रप्रतिकार (पॅसिव्ह रेझिस्टन्स); दुसरी सविनय कायदेभंग; (सिव्हिल डिसओबीडियन्स) आणि तिसरी पायरी असहकारिता. यांपैकीं असहकारितेचा कार्यक्रम पुष्कळ व्यापक असूनहि असहकारितेला हिंदुस्थानांत अल्प काळांत कल्पनेपेक्षां फार अधिक यश आलें, याचें कारण मनुष्याची कांहीं न करणें ही नैसर्गिक प्रवृत्ति हें एक आहेच ‘अमकें करा’ असें न सांगतां ‘अमकें करूं नका’ असें सांगितल्यास तें बहुजनसमाजास सहज आचरितां येतें. सत्याग्रह, कायदेभंग, यांच्यासारखे प्रत्यक्ष कार्य करण्यापेक्षां कौन्सिलबहिष्कारार्थ मत देण्यास न जातां घरीं स्वस्थ बसणें ही असहकारिता करणें सोपें असतें. तथापि अत्यंत दुर्बलासहि शक्य असा कार्यक्रम या षडक्षरी मंत्रानें दर्शविलीं, त्यामुळें यास अनुयायी पुष्कळ मिळाले आणि केवळ संख्याधिक्यानें हा शब्द महत्त्व पावला. आणि परिणामकारी बनला.

 

हिं दु स्था नां ती ल अ स ह का रि ता.- हिंदुस्थानाला १९१९ च्या कायद्यानें (इंडियन रिफार्म अ‍ॅक्ट) दिलेलें स्वराच्याचे हक्क असमाधानकारक आहेत असें सर्व साधारण मत झालें होतें. त्याच सुमारास पंजाबांत इंग्रज अधिकार्‍यांनीं केलेल्या अत्याचाराबद्दल, व खिलाफतीच्या बाबतींत ब्रिटिश सरकारनें केलेल्या वचन भंगाबद्दल सरकारशीं असहकारिता करून लोकांच्या मागण्या सरकारास मान्य करण्यास  लावण्याकरितां महात्मा गांधींनीं असहकारितेचें तत्त्व राष्ट्रापुढें मांडलें असहकारितेच्या कार्यक्रमांत (१) कौंसिलबहिष्कार, (२) कोर्टबहिष्कार, (३) सरकारी व निमसरकारी शिक्षणसंस्थांवर बहिष्कार, (४) सरकारी पदव्यांचा त्याग, (५) परदेशी कापडावर बहिष्कार, या गोष्टी सांगितल्या. नंतर (१) शुद्ध खादीची (हातसुताच्या व हात मागाच्या) पैदास, (२) अस्पृश्यतानिवारण, (३) टिळक स्वराज्य फंड, (४) वकिलांनीं वकिली आणि विद्यार्थ्यांनीं शाळाकालेजें सोनडू कांग्रेसच्या कार्याचा खेडोपाडीं प्रचार करणें, (५) हरताळ पाळणें, (६) प्रार्थना व उपवास करणें, वगैरें प्रत्यक्ष आचरणाच्या उर्फ विधायक कार्यक्रमाच्या गोष्टी सांगितल्या. या सर्व प्रयत्‍नास कितपत यश आलें ते प्रसिद्धच आहे. सरकारशीं विरोध येईल तेंथे तेथें पूर्ण शांततेनें उर्फ अनत्याचारीपणानें प्रतिकार करणें हे गांधींच्या मार्गांतलें आद्यतत्व होतें. १९२१ सालीं प्रथम कौन्सिल बहिष्कार, नंतर कोर्टे व  शिक्षणसंस्था यावरील बहिष्कार, टिळक स्वराज्यफंड (एक कोटी रुपये,) जमविणें नंतर परदेशी कपड्याची होळी व खादी प्रसार, या गोष्टी एकामागून एक हाती घेऊन पुढें राष्ट्रीय स्वयंसेवकमंडळें स्थापण्याच्या कार्यांस सुरुवात केली आणि सरकारनें त्यास मनाई करतांच त्याच बाबतींत कायदेभंगाची मोहीम सुरू केली. स्वयंसेवकांचा कायदेभंग व तुरुंगवास या गोष्टीनीं १९२१ च्या आक्टोबर नोवंबर महिन्यांत बहुतेक हिंदुस्थान हलवून सोडला आणि डिसेंबरास अहमदाबाद कांग्रेसने बार्डोली तहशींलांत संपूर्ण असहकारितां म्हणजे सरकारचा प्रत्येक बाबतींत संबंध तोडून व कर न देण्याचें कबूल करून त्या तालुक्याचे सर्व व्यवहार तेथल्या लोकांनीं स्वावलंबनानें करावयाचे, असा प्रयोग सुरू करण्याचें काम खुद्द गांधींनीं हातीं घेतलें. पण आयत्या वेळीं चौरीचुरा येथें अत्याचार झाल्यामुळें बार्डोलीचा कार्यक्रम बंद ठेवून पुन्हां खादीप्रसार, अस्पृश्यतानिवारण, हिंदुमुसलमानांची एकी वगैरे विधायक कार्यक्रमावर भर देण्यांत आला. पुढें लवकरच सरकारनें गांधीवर राजद्रोहाचा ‘खटला केला व त्यांत त्यांनां (१९२२) सहा वर्षांची शिक्षा झाली.

या सर्व गोष्टींचें स्वरूप स्पष्ट होण्यास समकालीन राजकारणाच्या व लोकभावनांच्या ठेवणींत असहकारितेची चळवळ मांडली पाहिजे.

१९२० आगस्टच्या पहिल्या तारखेपासून गांधींनीं आपली असहकारितेची चळवळ स्वतःच्या जबाबदारीवर सुरू केली. योग असा आला कीं, जुलैमध्यें तिची कल्पना मांडली गेली आणि १ आगस्ट रोजीं लोकमान्य टिळक परलोकवासी झाले. तथापि गांधीच्या नव्या चळवळीबद्दल पुढार्‍यांत वाटाघाट टिळकांच्या हयातींतच सुरू झाली होती. नवा सुधारणांचा कायदा असमाधानकारक असला तरी कौन्सिलांत शिरून प्रतियोगी सहकारिता करावयाची असें टिळकदासप्रभृति सर्व काँग्रेस पुढार्‍यांनीं ठरविलें होतें. पण गांधींनीं नव्या सुधारणांची सदोषता खिलाफतीच्या बाबतींत ब्रिटिश प्रधान लाईड जॉर्ज यांनीं १९२० मार्चमध्यें हिंदी मुसुलमान शिष्ट मंडळाची केलेली निराशा, व पंजाबांतील अत्याचारांच्या बाबतींत हंटर कमेटीचा रिपोर्ट, व ब्रिटिश पार्लमेंटचें वर्तन यामुळें झालेली निराशा, या गोष्टी विचारांत घेऊन हीं तिन्हीं गार्‍हाणीं दूर करण्याकरितां कौन्सिलांतील प्रतियोगी- सहकारिते ऐवजी असहकारितेची चळवळ करण्याचें ठरविलें. तथापि टिळक हयात होते तोंपर्यंत गांधींच्या मार्गानें  राष्ट्र जाण्यास तयार होईल असें वाटत नव्हतें. तरीहि गांधींनीं १९२० आगष्टपासून असहकारितां पुकारली व त्याच दिवशीं टिळक वारले. १९२० सप्टेंबरमध्यें कलकत्त्याच्या जादा काँग्रेसमध्यें थोडक्या बहुमतानें असहकारिता सुरू करण्याचें व त्यांत पुढील गोष्टींचा अंतर्भाव करण्याचें ठरलें :- (१) सरकारी पदव्या व केवळ मानाच्या जागा तसेंच स्थानिक संस्थांमधील सरकारनियुक्त जागा सोडणें; (२) सरकारी दरबार व इतर निमसकारी समारंभ यांत भागन घेणें; (३) मुलांनां सरकारी व निमसरकारी शाळा व कॉलेजें यांमधून हळूहळू काढणें व राष्ट्रीय शाळा व कॉलेजें प्रांतोप्रांती स्थापणें; (४) ब्रिटिश न्यायकोर्टावर वकीलानीं व पक्षकारांनीं बहिष्कार घालून लवादकोर्टामार्फत दाव्यांचा निकाल लावून घेणें; (५) मेसापोटेमियांत नोकरी लष्कर, कारकुन व मजूर या पेशांच्या लोकांनीं न पत्करणें; (६) नव्या सुधारणांच्या कायद्यानुसार होणार्‍या निवडणुकींत उमेदवार व मतदार या नात्यानें भाग न घेणें. या प्रमाणें कलकत्ता कांग्रेसनें ठराव केल्यावर गांधीं व त्याचें निकट अनुयायी यांनी देशभर फिरून वरील गोष्टींकडें लोकमत वळविण्याचा उद्योग सुरू केला. पदव्या व वकीली सोडण्यास फार थोडे लोक तयार झाले. १९११ फेब्रुवारीपर्यंत ५००० सरकारी पदवीवाल्यांपैकीं फक्त २१ जणांनीं पदव्या सोडल्या. शिक्षण संस्थावर बहिष्कार घालण्याच्या बाबतींत गांधी समक्ष जात तेथें त्यांचे उच्च विचार व स्पष्ट भाषण यांनीं विद्यार्थ्यांच्या मनावर अधिक परिणाम होत गेल्यामुळें या बहिष्काराच्या बाबतींत बरेंच अधिक यश आलें. तथापि बनारसच्या हिंदु युनिव्हर्सिटीत पंडित मालवीय यांच्या नेतृत्त्वाखालीं गांधींनां विरोधच झाला. उलटपक्षीं खिलाफतीच्या अन्यायांमुळें खवळलेल्या मुसुलमानांच्या अलीगडच्या अँग्लो- ओरियंटल कालेजांतून पुष्कळच विद्यार्थी बाहेर पडलें. शिवाय सरकारी शिक्षणपद्धतीवर टीका व राष्ट्रीय शिक्षणसंस्थांची मागणी बरीच वर्षें चालू असल्यामुळें या वेळीं नव्या शाळा व कॉलेजें व युनिव्हर्सिट्या स्थापन झाल्या. पुण्याचें टिळक विद्यापीठ, टिळक महाविद्यालय, व पाठशाळा, मुंबईचें राष्ट्रीय मेडिकल कॉलेज, अहमदाबादेस राष्ट्रीय युनिव्हर्सिटी कॉलेज, शाळा, याप्रमाणें अनेक ठिकाणीं नव्या राष्ट्रीय शिक्षणसंस्था निघाल्या.

पण १९२० नवंबरमध्यें झालेल्या नव्या कौंन्सिलाच्या निवडणुकीवर गांधीच्या उपदेशाचा विशेष महत्त्वाचा परिणाम झाला. कांग्रेसपक्षापैकीं कोणीहि नव्या निवडणुकींत उमेदवार उभा राहिला नाहीं. त्यामुळें मॉडरेट पक्षाला हें क्षेत्र अगदीं मोकळें मिळून सर्व कौन्सिंलाच्या निवडणुकींत या पक्षाचे लोक अनायासें निवडून आले. नव्या सुधारणा यशस्वी करण्याबद्दल ते ब्रिटिश सरकारशीं वचनबद्ध झाले होतेच त्याप्रमाणें सरकारशीं सहकरिता करण्यास त्यांनां पूर्ण संधि मिळाली. गांधींच्या या कौन्सिल बहिष्कारानें हिंदुस्थानचा शासनविषयक इतिहास टिळकांच्या प्रतियोगी सहकारितेमुळें बनला असतां त्याहून फारच निराळा बनला. कौन्सिलच्या जागा निवडणुकींत प्रथम अडवून मग बहिष्कार घालण्यानें काय घडलें असतें तें आयर्लंडच्या किंवा ईजिप्तच्या इतिहासावरून किंवा सांप्रतच्या स्वराज्यपक्षाच्या कामगिरीवरून काढणें योग्य नाहीं. सन १९२० च्या निवडणुकींत मॉडरेट उमेदवार पुढें आल्यामुळें सरकारी दृष्टीनें गांधीचा कौन्सिलबहिष्कार पुर्ण अयशस्वी झाला. कारण एकंदर ६३७ जागांपैकीं उमेदवार उभा नाहीं अशा जागा अवघ्या सहा निघाल्या. मतदानाच्या दृष्टीने खेडयांपेक्षां शहरांत यश अधिक आलें. खुद्द मुंबई शहरांत शेंकडा ८॥ तर मद्रास इलाख्यांतील कांहीं मतदारसंघात शेंकडा ७० मतदारांनीं मतें देण्यांत भाग घेतला. प्रांतवारीनें पाहतां पंजाबांत शेंकडा. ३२ ते ३६ संयुक्त प्रांतात शेंकडा ३३ ते ६० पर्यंत, याप्रमाणें पडलें.

इ. स. १९२० डिसेंबरपर्यंतच्या चळवळीला या प्रकारचें यश आल्यावर त्या महिन्यांत नागपूरला काँग्रेस भरलीं तेथें गांधींच्या चळवळीची पुन्हा चर्चा होऊन ती मोठया बहुमतानें मान्य झाली. मालवीय, जीना, खापर्डे वगैरे कित्येक पुढारी तटस्थ राहिले. या बैठकींत काँग्रेसचें ‘क्रीड’ बदलण्यांत आलें, आणि काँग्रेस ही संस्था निश्चितपणें कौन्सिलाबाहेरील म्हणजे उरलेल्या हक्कासाठीं लोकांनां संघीकृत करून सरकारला होईल तितका विरोध करणारी संस्था बनविण्याचें ध्येय असलेल्यांची जमात व्हावयास सुरुवात झाली आणि यामुळें ती विशिष्ट पक्षाची आहे असें कौन्सिलांत जाऊन काम करूं इच्छिणारे लोक म्हणूं लागले.

असहकारितेच्या आरंभापासूनच तिच्या शक्य परिणामाचें भयावह स्वरूप सरकारच्या लक्षांत आलेलें होतें. केवळ शिक्षितांतच राजकीय चळवळ न राहतां ती खेड्यापांडयांत अशिक्षित समाजांत पसरणार, व त्यामुळें अत्याचार, बंडाळी झाल्याशिवाय राहणार नाहीं, असें सरकारचें मत होतें. अशा स्थितींत सरकार या चळवळीबद्दल काय धोरण स्वीकारणार तें जाहीर होणें जरूर होतें व त्या प्रमाणें नव्या असेब्लीमध्यें व्हाइसरॉय चेम्मफर्ड साहेब  यांनीं असें जाहीर केलें कीं, ही चळवळ बेसनदशीर आहे. कारण सांप्रतचा राज्यकारभार बंद पाडून उलथून पाडणें हा तिचा उद्देश आहे. असें सरकारचें मत आहे; तरी तिच्या पुरस्कर्त्याविरुद्ध सरकारनें खटले केले नाहींत कारण त्यांनीं असहकारितेबरोबर अनत्याचारित्त्वाचा उपदेशहि चालविला आहे, मात्र चळवळे लोक मुख्य पुढार्‍यांच्या उपदेशापुढें जाऊन अत्याचारास भाषणानें किंवा लेखानें उत्तेजन देतील, किंवा लष्कर व पोलीस यांचीं राजनिष्ठा  ढळविण्याचा प्रयत्‍न करतील त्यांच्यावरच फक्त खटले करावे असें प्रांतिक सरकारास कळविलें आहे. एकंदर हिंदुस्थानांतलें सर्व साधारण लोकमत समजूतदार असल्यामुळें तें या चळवळीला अनुकूल होणार नाही असा सरकारला भरंवसा आहे. आणि या भयप्रद चळवळीला ज्या मानानें लोक आळा घालतील त्यावर सरकारचें भावी धोरण अवलंबून राहील.”

असहकारितेची चळवळ थोडक्या वेळांत लोकप्रिय होण्यास गांधीचा चरित्रक्रम बर्‍याच अंशीं कारण आहे. गांधीं हे कौंट टालस्टायचे शिष्य म्हणून भविष्य काळांत मानले जातीलसें वाटतें. असहकारितेचा जो कार्यक्रम गांधींनीं आंखला त्यांत त्यांचा पूर्ण विश्वास व प्रामाणिकपणाच व्यक्त होत असून सर्व राष्ट्राची सामाजिक पुनर्घटना करण्याचाहि हेतु स्पष्ट दिसतो. आधुनिक सुधारणा मानवाचा उदात्त स्वभाव व ध्येयें यांनां घातक आहे. पाश्चात्य शिक्षणानें बौद्धिक गुलामगिरी वाढली आहे; डॉक्टर हे लोकांचा अधिक अधःपात करतात; न्यायकोर्टें व वकील मनुष्याची माणुसकी नष्ट करतात; रेल्वेमुळें मनुष्य देवापासून दुरावतो; पार्लमेंट हें भारी किंमतीचें खेळणें आहे. प्रत्येकानें आत्मिक बळ वाढवणें हें त्याचें खरें ध्येय होय. आपले हेतू साध्य करण्या निःशस्त्र प्रतिकार हें साधन फार जोरदार होय हें गांधींचें मत बनलेलें होतें. दक्षिण आफ्रिकेंतील हिंदी लोकांची गार्‍हाणीं दूर करण्याकरितां त्यांनीं फार मोठया प्रमाणावर निःशस्त्रप्रतिकाराची चळवळ केली. हिंदुस्थानांत आल्यावर हें साधन अधिक मोठया प्रमाणांत वापरण्याचें त्यांनीं ठरविलें. गांधींची कार्यनिष्ठा व स्वार्थत्याग यांचा लोकावर फार परिणाम झाला. तथापि निःशस्त्रप्रतिकार हें हत्यार हिंदुस्थानसारख्या अनेक भाषा, जातीं व धर्म तांनीं भरलेल्या देशांत वापरणें धोक्याचें होय असें जाणून कै. गोखले यांनीं गांधींनां हिंदुस्थानच्या परिस्थितीचें पूर्ण अवलोकन केल्याशिवाय हा मार्ग न स्वीकारण्याबद्दल बांधून घेतलें होतें; पण गोखले लवकरच वारले. तथापि महायुद्ध चालू होतें तोंपर्यंत गांधींनीं केवळ सामाजिक गोष्टींत लक्ष घातलें होतें. १९१९ मध्यें रौलेट अ‍ॅक्टाला विरोध करण्याकरितां त्यांनीं सत्याग्रह उर्फ निःशस्त्रप्रतिकार जोरानें सुरू केला.

दक्षिण आफ्रिकेंतील कामागिरीमुळें, संन्यस्त राहणी, मुळें, गांधींनां पुष्कळ हिंदु लोक महात्मा  मानूं लागले होतेच. पण असहकारितेच्या चळवळीला यश येण्याकरितां मुसुलमानांनांहि त्यांत ओढणें जरूर होते. खिलाफतीच्या गार्‍हाण्यामुळें ती संधि आयती मिळाली. १९१९ नवंबरमध्यें दिल्लीस भरलेल्या खिलाफत परिषदेंत गांधींनीं मुसुलमानांना असहकारितेचा उपाय सांगितला आणि महंमद अल्ली व शौकतअल्ली यांचे मन वळवून मुसुलमानांना असहकरितेच्या चळवळींत सामील करून घेतले. महमदअल्ली व शौकतअल्ली यांनां गांधींच्या पंखाखालीं शिरणें फायद्यांचें होतें. कां कीं, आम्ही अमूक गोष्टी झाल्या नाहींत तर तरवार उपसूं, अशा प्रकारची त्यांनीं मुजोरी बरीच केली होती. अर्थात्  तरवार उपसणें शक्य नव्हतें व न उपसण्यास त्यांना कारण पाहिजे होतें, व आपण गांधीचें अनुयायी बनलों ही सबब त्यांस फायदेशीर झाली.

खिलाफत, पंजाब, व स्वराज्य या तीन गार्‍हाण्यांची दाद लावून घेण्याकरितां सरकारशीं असहकारितां करण्याचा गांधीचा उपाय कलकत्ता व नागपूर दोन्ही ठिकाणच्या काँग्रेसनें मान्य केला. तत्संबंधाचा आरंभींचा कार्यक्रम वर दिलाच आहे. काँग्रेसच्या पुढार्‍यांनीं टिळक स्वराज्यफंड एक कोटी रुपये जमवून ‘राष्ट्रीय स्वयंसेवक’ मंडळें स्थापण्याचें ठरविलें. मध्यंतरीं ड्यूक ऑफ कॅनॅट हिंदुस्थानांत येऊन त्यांनीं नवीं कौन्सिलें सुरू केलीं आणि ब्रिटिश लोक व हिंदी लोक यांनीं एकमेकांच्या चुका व गैरसमज याबद्दल क्षमा करून ते विसरून जावे अशी विनंति केली, आणि लॉर्ड चेम्सफर्डच्या जागीं लॉर्ड रेडिंग हिंदुस्थानचे व्हाईसरॉय झाले; परंतु कौन्सिलमार्फत चालेलल्या सरकारी कारभाराकडे न बघतां गांधींनीं असहकारितेचा कार्यक्रम जोरानें पुढें चालविला. गांधी व अल्लीबंधू असहकारितेचा उपदेश करीत प्रांतोप्रांतीं हिंडू लागले. स्वयंसेवकांची पथकें तयार होऊं लागलीं व काँग्रेसचे प्रचारक गांवोगांव उपदेश करीत फिरूं लागले. त्यांचा पोलीस व इतर सरकारी अधिकार्‍यांशी विरोध येऊं लागला आणि सर्व असहकारितावाद्यांत व सामान्य जनतेंत अनत्याचरित्त्वाचें तत्त्व पूर्ण उतरणें शक्य नसल्यामुळें ठिकठिकाणाहून लहान मोठ्या दंग्यांचा बातम्या मधून मधून येऊं लागल्या. १९११ फेब्रुवारींत व मार्च महिन्यांत मजूरांचें संप पिकेटिंग, वगैरे प्रकरणांत बिहार, नागपूर, आसाम, मद्रास, मुंबई वगैरे ठिकाणीं दंगे झाले. गांधींनीं अनत्याचारीपणाचा व शांतता राखण्याचा उपदेश चालविला आणि एक कोटी रुपये टिळक स्वराज्य फंड जमविणें, एक कोट काँग्रेसचे सभासद मिळविणें,  व वीस लक्ष चरके (हात- रहाट) चालू करणें या गोष्टीकडे लोकांचे लक्ष वळविलें.

लॉर्ड रेडिंग यांनीं अधिकारारूढ झाल्यावर अनेक पुढार्‍यांनां मुलाखतीस बोलावलें व त्याप्रमाणें गांधीशींही मुलाखत झाली. अल्लीबंधूंच्या भाषणांत अत्याचारास उत्तेजन देणारा उपदेश असतो म्हणून त्यांच्यावर खटले करण्याचें सरकारनें ठरविलें, पण अनत्याचारित्त्वच पाळणार असें अल्लीबंधूंनीं सरकारला आश्वासन देऊन एक प्रकारें सरकारची माफी (अ‍ॅपॉलजी) मागतली या कारणात्सव सरकारनें खटला करण्याचा बेत तहकूब केला.

कोर्टबहिष्कार, दारूबंदी व अश्पृश्यतानिवारण या गोष्टीकडे गांधींनीं मार्च, एप्रिल, मे (१९२०) मध्यें विशेष भर दिला; आणि पुढें जुलै अखेरपर्यंत अत्यंत खटपट करून एक कोटी रुपये टिळकस्वराज्यफंड जमा केला. नंतर सप्टेंबर अखेर पर्यंत परदेशी कापडावरील पूर्ण बहिष्कार घालण्याचें कार्य नेटानें हातीं घेतलें आणि चरके, हातमाग व खादीप्रसार या गोष्टींवर भर दिला. १८२१ आगस्टमध्यें मलबरांत मोपला लोकांनीं मोठें बंड करून ब्रिटिश राज्याऐवजीं इस्लामचें राज्य जाहीर केलें आणि जुलमानें अनेक हिंदूंना बाटवून त्यांची देवळें व स्त्रिया भ्रष्ट केल्या. असहकारितेच्या चळवळीचा हा अप्रत्यक्ष परिणाम होय, असा सरकारनें दोष दिला. हें बंड सरकारनें लवकरच मोडलें व नंतर युवराजांनां हिंदुस्थानांत आणण्याचें ठरविलें. अर्थात गांधींनीं या भेटीच्या समारंभावर पूर्ण बहिष्कार घालण्याचें जाहीर केलें. आक्टोबरमध्यें अल्लाबंधूंवर कराचीस खटला करून दोन वर्षांची शिक्षा दिली. नवंबरमध्यें गांधींनीं आनंद व बार्डोली या दोन तालुक्यांत सार्वत्रिक कायदेभंग सुरू करण्याची तयारी करण्याचें कार्य हाती घेतलें. नवंबर १७ रोजी मुंबईस युवराज दाखल झाले व त्यांच्या समारंभावर बहिष्कार घालण्याच्या कार्यांत एकदोन दिवस मोठे दंगे झाले. गाधीं मुंबईस समक्ष होते. त्यांनीं उपवास सुरू करून लवकरच शांतता केली व निरनिराळ्या समाजांत एकी घडवून आणण्याचें पुढार्‍यांकडून अभिवचन घेतलें; शिवाय बार्डोलीचा कायदेभंग तहकूब करून सर्वत्र अनत्याचारित्त्व राखण्याकरितां अधिक नेटाचे प्रयत्‍न चालविले. युवराजाच्या आगमनच्या दिवशीं मुंबईप्रमाणेंच इतर अनेक शहरीं हरताळ पाळले गेले पण त्यात काहीं ठिकाणीं दंगेहि झाले. तेव्हां सरकारनें सभाबंदीचा कायदा कित्येक जिल्ह्यांत लागू केला आणि दारूचीं दुकानें व परदेशी मालाचीं दुकानें यांवरील स्वयंसेवकांच्या पिकेटिंग, व इतर चळवळींना क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्टने बंदी केली. उलट गांधींनी हें कायदे मोडून स्वयंसेवकांनीं तुरुंग भरून काढण्याचा मार्ग स्वीकारला. स्वयंसेवकाच्या या तुरुंगभरतीनें विशेषतः उत्तरहिंदुस्थान बंगालपासून पंजाबपर्यंत हालवून सोडला. लाला लजपतराय, नेहरू, दास वगैरे मोठाले पुढारीहि सरकारचा कायदा मोडून तुरुंगात गेले. सभास्वातंत्र्य व संघस्वातंत्र्य नष्ट केल्याबद्दल सरकारला मॉडरेटपक्षानेंहि दोष देऊन राऊंडटेबल कॉन्फरन्स भरविण्याची सूचना केली; पण स्वयंसेवकांचा कायदेभंग बंद केल्याशिवाय कांहीं करतां येणार नाहीं, असें सरकारतर्फे लॉर्ड रेडिंग यांनीं सांगितलें. अल्लीबंधुंसुद्धां सर्व असहकारितावादी कैदी सोडावे व स्वयंसेवकांच्या भरती चालू ठेवण्यास बंदी नसावी, या अटी गांधींनीं घातल्या, तेव्हां गांधीवरच कॉन्फरन्स फेटाळण्याची जबाबदारी टाकून सरकारनें मॉडरेटपक्षाला स्वपक्षाकडे वळिवलें.
    
दिसेंबरांत युवराजांची लखनौ, अलाहाबाद, बनारस, कलकत्ता वगैरे शहरांनां भेट झाली तेथें हरताळ पाळले गेलें. त्याच महिन्यांत अहमदाबाद येथें कांग्रेस भरून गांधींनां सर्वाधिकारी (डिक्टेटर) नेमण्यांत आले व सार्वत्रिक कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याचें ठरलें. व त्याचा प्रयोग प्रथम एकट्या बार्डोली तालुक्यांत खुद्द गांधींच्या देखरेखींखालीं करण्याचें ठरलें. तथापि एक वर्षांत स्वराज्य मिळवून देण्याची गांधींची प्रतिज्ञा पुरी न झाल्यामुळें गांधींवरील कांहीचा विश्वास डळमळूं लागला होता पण बार्डोलीच्या महत्त्वाच्या प्रयोगाकडे सर्वांचें लक्ष लागलें. जानेवारींत सर्व राजकीय पक्षांची परिषद मुंबईस सर शंकर नायर यांच्या अध्यक्षतेखालीं भरविण्यांत आली पण त्या परिषदेंत  फ्रेंचांनीं सीरीया अगोदर सोडावा तरच आपण राऊंड टेबल कान्फरन्सला तयार होऊं इत्यादि अत्यंत अशक्य अटी मांडल्या, त्यामुळें तीहि कल्पना फलद्रूप झाली नाहीं. १९२२ फेब्रुवारींत गांधींनीं व्हाईसराय साहेबांनां निर्वाणीचा खलिता (अल्टिमेटम) पाठवून भाषण स्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य व संघस्वातंत्र्य हे राष्ट्राचे प्राथमिक हक्क परत मिळविण्याकरितां सार्वत्रिक कायदेभंग करावा लागत आहे, आणि सर्व राजकीय कैद्यांस बंधमुक्त करून असहकारितेच्या अनत्यारी चळवळीस बंद करण्याचें बंद केल्यास कायदेभंगाची चळवळ बंद करूं, असें सरकारास कळविलें. पण सरकारानें उत्तर देऊन तें सर्व अमान्य केलें. तेव्हां गांधींनीं बार्डोलीचा कार्यक्रम नेटानें हातीं धरला व कायदेभंगाला सुरुवात करणार इतक्यांत ४ फेब्रुवारी १९२२ रोजी संयुक्त प्रांतांतील चौरीचुरा येथें स्वयंसेवक व इतर लोकांनीं मिळून पोलीस व इतर सरकारी इसम मिळून एकवीस जणांना ठार मारलें. ही बातमी येतांच बार्डोलीस काँग्रेस वर्किंग कमिटीची तारीख ११ व १२ फेब्रुवारी रोजीं सभा भरवून गांधींनीं तहकूब कायदेभंग केला; आणि (१) एक कोटी काँग्रेसचे सभासद मिळविणें, (२) हातखादीचा प्रसार करणें, (३) राष्ट्रीय शाळा स्थापणें, (४) अस्पृश्यंता दूर करणें, (५) दारूबंदीचा प्रयत्‍न करणें, (६) लवाद कोर्टे स्थापणें या विधायक कार्यक्रमावर भर देण्याचें ठरविलें. लवकरच दिल्लीस ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनें तोच कार्यक्रम पास केला; तथापि गांधींच्या अनुयायांत बरीच फाटाफूट दिसूं लागली.

गांधींचें लोकांवरील वजन कमीं झालें आहे व गांधींच्या अनुयायांचीं कांहीशी निराशा झाली आहे अशी संधि पाहून सरकारनें गांधींनां १० मार्च रोजीं पकडून अहमदाबादेस खटला सुरू केला. गांधींनीं अपराध कबूल केला व जज्जानें त्यांनां सहा वर्षांची शिक्षा केली. तथापि या वेळीं देशांत कोठेंहि दंगाधोपा झाला नाहीं.

गांधी तुरुंगांत गेल्यावर त्याची बहिष्कारचर्या, कायदेभंग वगैरे कार्यक्रमाबद्दल काँग्रेसकमिटीनें देशभर हिंडून लोकमत अजमावलें. कायदेभंगास देश तयार नाहीं असें कमिटीनें एक मतानें ठरविलें आहे. पण बहिष्काराच्या बाबतींत कमिटीचें दुमत झालें. सन १९२२च्या गया काँग्रेसनें कायदेभंगाखेरीज असहकारितेचा बहिष्कारत्रयी, वगैरे सर्व कार्यक्रम बहुमतानें कायम ठेविला पण त्यामुळें कौंन्सिलवादी स्वराज्यपक्ष स्वतंत्र निघाला व त्यानें कौंसिलप्रवेशाबद्दल देशभर हिंडून लोकमत तयार केलें व अखेर १९२३ सप्टेंबरात दिल्लींच्या जादा काँग्रेसमध्यें कौन्सिलप्रवेशास विरोध न करण्याचा ठराव पास करून घेतला. तथापि कौंन्सिलांत शिरून सरकारशीं अडवणूक म्हणजे तत्त्वत: असहकारिताच आम्ही करणार, असें कौन्सिलपक्ष म्हणत आहे. त्यानें १९२४च्या मार्च महिन्यांत मध्यप्रातात द्विदल राज्यपद्धति मोडून टाकण्याचें श्रेय घेतले आहे आणि मध्यवर्ती शासनयंत्राच्या बाबतींत कौन्सिलांत ठराव नापास करून व्हाईसरॉयाच्या सर्टिफिकेशनच्या अधिकारानेंच कार्यक्रम चालविण्यास भाग पाडून तेथेंहि लोकानुवर्ति राज्ययंत्र नसून एकानुवर्तीच आहे. हें सिद्ध केलें. सन १९२४ च्या फेब्रुवारी महिन्यांत गांधींची सुटका झाली; महात्मा गांधींचा कार्यक्रम दोन महिनेपर्यंत निश्चितपणें दृग्गोचर झाला नाही.

असहकारितेची चळवळ कितपत यशस्वी  झाली याचा विचार करतां असें म्हणतां येईल कीं कोणतेहि सामाजिक तत्त्व आत्यंतिकपणें समाजांत प्रस्टत कधींच पावत नाहीं. असहकारितां हें समाजध्येंय नव्हे. समाजांतील दोष दूर करण्यासाठीं उपाय आहे. समाजांतील अन्योन्यश्रम हा राष्ट्रांतील लाखों लोकांस शिकविणें आणि पटविणें हें त्याचें कार्य आहे ज्या समाजांत अत्यंत अज्ञान व संधीकरणाचें कार्य कठिण करणारीं अनेक व्यंगें आहेत, त्यांत अनेक उपाय योजून पहावयाचे असतात. आणि प्रत्येक उपाय कांहीं तरी परिणाम करून जातो. त्या परिणामाची मोजदाज करणें व्यवहारज्ञास जरूर आहे. तसेंच असहकारिता प्रचारांत आणण्यासाठीं जीं कर्मे लावून दिलीं गेलीं तीं कितपत प्रचारांत आलीं हेंहि पहावयाचें असतें.

कोर्टोवर बहिष्कार हा मुळींच पाळणें शक्य झालें नाहीं. सरकारी शाळांवर बहिष्काराच्या पुकारामुळें काहीं विद्यार्थ्यांनीं शाळा सोडल्या व त्यासाठी नवीन शाळा व विद्यापीठें स्थापन करण्यांत आलीं. त्यापैकीं कांहीं संस्था बंद पडल्या आहेत. तथापि तो उपाय देखील जवळजवळ निष्फळ झाला; शाळा सोडणारे विद्यार्थी पुन्हां सरकारी शाळेंत परत गेले. खादीप्रसार हा प्रयत्‍नहि फारसा यशस्वी झाला नाहीं. पद्धतशीर रीतीनें कापूस पुरविण्याचें कामहि काँग्रेस कमेट्यांकडून झालें नाहीं.

आंध्रांनीं खादीची चळवळ इतरापेक्षां अधिक यशस्वी केली. फंड जमविणें व त्यांचा चांगला उपयोग करणें हेहि झालें नाहीं. शिवाय ज्याअर्थी असहकारितावादी कोर्टांत जाऊं शकत नव्हते त्याअर्थी त्या फंडाचे पैसे कोणी दडपून ठेवले तर त्याविरुद्ध उपाय करतां येत नसे व त्यामुळें फंड गुंडांस उत्तेजन मिळालें.

येणेंप्रमाणें जरी चोहोंकडून अपयश आलें तरी त्या चळवळीचे फायदे अनेक झाले. सामान्यजनसमूह अधिक निर्भयपणें वावरूं लागला आणि लोकांमध्यें असहकारितेच्या तत्त्वाची पुसट का होईना पण कल्पना बरीच पसरली. निरक्षर जनसमाजामध्यें कांहींहि पसरविणें अत्यंत कठिण असते, आणि अशा परिस्थितींत सामान्य जनतेंत जी आत्महिताची, कार्यार्थ द्रव्य खर्च करण्याची, वेळेवर तुरुंग पत्करण्याची निदान सरकारला उघडपणें विरोध करण्याची तयारी झाली त्यामुळें असहकारितेचा उपदेश बराच यशस्वी झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं.

जो विरोधाचा वणवा सर्व देशभर पसरला त्याचाच कांहीं अंश पुढें स्वराज्यपक्षाच्या कृतींत निराळ्या प्रकारें उतरला. या दृष्टीनें पहातां स्वराज्यपक्षाच्या अडवणुकीच्या पद्धतीचें श्रेयहि असहकारितावादास दिलें पाहिजे.

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .