विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असींद - (राजपुताना) उदेपूर संस्थान येथील एक जहागीर व तिचें मुख्य ठिकाण. असींद जहागिरींत ७२ गांवें आहेत. उत्पन्न सुमारें एक लाख असावें. उदेपूरपासून असींद गांव सुमारें ९० मैलांवर आहे. लो. सं. (१९०१) २२३७. असींदचे राऊत सिसोदिया वंशाच्या चोंडावत घराण्यांतले आहेत. घराण्याचा मूळ पुरुष, ठाकूर अजितसिंग यानें १८१८ सालच्या ब्रिटिश सरकारबरोबर झालेल्या तहनाम्यावर महाराण्याच्या वतीनें सही केली होती. (इं. गॅ. ६)