विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असुंदी - (मुंबई इलाखा) धारवाड जिल्हा. गदगच्या नैर्ऋत्येस तीन मैलांवर असलेलें लहानसें खेडें लोकवस्ती (सन १८८१) ८४८. येथें बोम्मप्पाचे देऊळ असून त्यांत सन १०२७ चा शिलालेख आहे व हनुमंताच्या देयळांत सन १०५३ चा शिलालेख आहे. (धारवाड गॅ.)