प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

अस्पृश्यता -  भारतीय समाजांत एक असा वर्ग आहे कीं, ज्यास शिवलें म्हणजे विटाळ होतो. समाजांतील अस्पृश्यवर्ग आणि ब्राह्मणवर्ग हे एकदम निराळे वर्ग नसून ब्राह्मण व अस्पृश्य यांच्यामधील जी जातीपरंपरा आहे त्यांत एक दुसर्‍याहून कमीं पवित्र आणि त्या कमी पवित्राहून दुसरा एक वर्ग अधिक कमी पवित्र अगर अधिक विटाळाचा अशी सोपानपरंपरा समाजात आढळून येते. जेव्हां समाजांत दोन निरनिराळ्या जाती असतील आणि त्यांत लग्नव्यवहार नसेल तेव्हा त्या जातींत उच्च नीच भाव असावयाचाच. हा एक जागतिक नियम आहे. भारतीयांत जें काय अधिक आहे तें हेंच कीं हा उच्चनीच भाव स्पर्शास्पर्शतेच्या व सोंवळें ओंवळेपणाच्या नियमांत व्यक्त झाला आहे. अशा सामाजिक स्थितीचा आणि हिंदूंतील दैवतें किंवा अद्वैतासारखीं मतें यांचा अर्थाअर्थीं संबंध नाहीं. धर्मशास्त्रीय ग्रंथांत सामाजिक पायर्‍यांस मान्यता दिली आहे आणि सोंवळ्या ओवळ्याच्या कल्पना त्यांत अधिकाधिक व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळें स्पृश्यास्पृश्यतेस हिंदूधर्मशास्त्रांत स्थान आहे, एवढेंच नव्हे तर हिंदुधर्म म्हणजे स्पृश्यास्पृश्य विचार होय अशी लोकांची समजूत झाली आहे. भारतीय धर्मशास्त्रीय इतिहासांत स्पृश्यास्पृश्यतेच्या कल्पनांस म्हणजे त्याच्या होत चाललेल्या विकासास एक लांबलचक इतिहास आहे असें आढळून येईल. (स्पर्शास्पर्शविचार पहा.) सोंवळ्या ओंवळ्याचे विचार प्रत्येक देशाच्या प्राचीन संस्कृतींत दृग्गोचर होतात. माणसामाणसांतील उच्चनीचता व्यक्त करावयाची त्याचीं साधनें अर्वाचीन जगांत निराळीं आहेत. राजा हा महत्त्व देणारी व्यक्ती असल्यामुळें उच्चनीच भाव अन्यरूपानें व्यक्त होतो.

बौद्धांनीं किंवा जैनांनीं अस्पृश्यता कमी केली नाहीं. सिलोनमध्यें रोडे यांची स्थिति महारासारखी होती आणि जपानांत अस्पृश्य वर्ग अजून जिवंत आहे ही गोष्ट प्रसिद्धच आहे. जैनांच्यामुळे स्पृश्यास्पृश्यतेच्या कल्पना वाढल्या. यूरोपांत अस्पृश्यता नव्हती असें नाहीं. फ्रान्समध्यें डोकीं मारणाराचा म्हणजे फांशी देणार्‍यांचा वर्ग जातिस्वरूप पावला.

समाज सुसंघटित स्थितींत असला म्हणजे असें होतें कीं, व्यक्तीच्या सामाजिक स्थितींत फरक झाला म्हणजे त्या फरकास मान्यता देण्यास समाजांतील नेता (मग तो धर्माध्यक्ष असो अगर राजा असो) असतो. हिंदुसमाजाची सुसंघटित स्थिति नसल्यामुळें अस्पृश्यांपैकीं जे मनुष्य निराळ्या आचरणाचे बनतील त्यांस मान्यता देण्यास जागा नाहीं. जातिभेद विनाशास (जातिभेद पहा) ज्या अडचणी आहेत त्याच अस्पृश्यतानाशास आहेत. तथापि त्याबरोबर हेंहि सांगितलें पाहिजे कीं, समाजकेंद्र जिवंत असला तरी तो बदललेल्या स्थितीस मान्यता देईल एवढेंच, समाजांतील विशिष्ट वर्गाची सांपत्तिक स्थिति किंवा त्यांचें श्रमविभागांतील स्थान हीं बदलू शकणार नाहीं. सामाजिक स्थिति सुधारली आणि सामाजिक श्रमविभागांत विशिष्ट अस्पृश्य जातीस अधिक व्यापक स्थान मिळालें म्हणजे बदललेल्या परिस्थितीस शास्त्राधार काय तो राजा किंवा धर्माध्यक्ष देऊं शकेल. अस्पृश्यतेचा पूर्ण नाश व्हावयास जें करावयास पाहिजे तें म्हणजे बर्‍याच व्यापक कार्यास प्रवृत्त व्हावयाचें. त्यांचें स्वरूप पुढें येईल. प्रथम अस्पृश्यता विनाशनासाठीं अर्वाचीन प्रयत्‍न व्यक्त करून दाखविण्यासाठीं शिंदे यांचा लेख दिलां आहे (संपादक).

''अ स्पृ श्य ता नि वा र णा चा आ धु नि क इ ति हा स. '' उ त्प त्ति.- अस्पृश्यतेचा इतिहास निदान हिंदुस्थानांत तरी आर्यन् लोकांच्या आगमनाइतकाच जुना आहे. चांडाल हा शब्द वैदिक वाङ्मयांत आणि बौद्ध ग्रंथांतून आढळतो. बुद्धाच्या वेळेच्या पूर्वींपासून तरी निदान चांडाल आणि इतर जित राष्ट्रें अस्पृश्य गणलीं जात होतीं असे उल्लेख आढळतात. इराणांतील झरथुष्ट्र पंथी आर्य हिंदुस्थानांतील देवयज्ञी व इतर दैवोपासक आर्यांनांहि अस्पृश्य आणि तिरस्करणीय सजमत असत, असें पार्श्यांच्या जुन्या व अर्वाचीन ग्रंथांत पुरावे मिळतात. आर्यांचा हिंदुस्थानांत कायमचा जम बसल्यावर त्यांनीं येथील दस्यु उर्फ शूद्र नांवाच्या जित राष्ट्रांनां आपल्या वस्तीजवळच पण बाहेर राहावयास लावून त्यांच्या व आपल्या संस्कृतींत भेसळ होऊं नये म्हणून त्यांनां अस्पृश्य ठरविलें. ज्याअर्थी जपानांत हटा, हीना नांवाच्या अस्पृश्य जाती अद्यापि आहेत त्याअर्थी अस्पृश्यता ही संस्था आर्यांनीच निर्माण केली नसून तिचा प्रादुर्भाव मोंगल लोकांतहि पूर्वीं होता हें सिद्ध होतें. हैटा किंवा ऐटा ही जात फिलीपाईन बेटांतून जपानांत गेलीं असावी. अथ्रवण (ब्राह्मण), रथेस्ट्र (राजन्य), वस्ट्रय (वैश्य) आणि हुइटी (शूद्र) असे झरथुष्ट्राच्या वेळीं इराणांत चार भेद होते. वेदांत शुद्र हा शब्द आढळत नाहीं; पण महाभारतांत अमिर व शूद्र ह्यांचा उल्लेख असून सिंधू नदीच्या मुखाजवळील भागांत त्यांची वस्ती असावी असें दिसतें. [ॠग्वेदांत पुरुषसूक्तांत शूद्र शब्द आला आहे व शुक्ल यजुर्वेदांत ८ वेळां या शब्दाचा उल्लेख आला आहे. (२३. ३०,३१ इ) संपादक-ज्ञानकोश ] कास्टस ऑफ इंडिया या पुस्तकांत वुइल्सननें म्हटलें आहे कीं, कंदाहार प्रांतांत शूद्रोई नांवाचें प्राचीन राष्ट्र होतें आणि सिंधू नदीवर शूद्रोस नांवाचें शहर होतें. (रसेल ह्यांचें कास्टस अँड ट्राईब्स ऑफ सी.पी. हें पुस्तक पहा). इराणांतील हुइटी अथवा शूद्रोई आणि फिलीपाईन बेटांतील ऐटा ह्या जातीचा संबंध असल्याचें सिद्ध करतां आल्यास अस्पृश्यतेच्या उत्पत्तीवर बराच प्रकाश पडण्यासारखा आहे.

 

आर्यांचा विस्तार उत्तर हिंदुस्थानांत होऊन आर्यावर्ताची स्थापना झाल्यावर शूद्र राष्ट्रांचा आर्यांच्या वर्णव्यवस्थेंत समावेश होऊन पुढें दुसरीं जी कोणीं जंगली जित राष्ट्रें आर्यांच्या खिदमतीस राहण्यास कबूल झालीं, ती हळू हळू अस्पृश्य गणलीं जाऊन गांवाच्या शिवेबाहेर राहूं लागलीं अशी उपरिनिर्दिष्ट रसेलच्या ग्रंथांत उपपत्ति आहे. मनुस्मृतीच्या काळानंतरची अलीकडच्या अस्पृश्य जातीची माहिती चांगली मिळण्यासारखी आहे. मनुस्मृतींत ब्राह्मण स्त्री आणि शूद्र पुरुष यांमधील प्रतिलोम संततीस चांडाल अशी संज्ञा आहे.

इंग्रजी शिक्षणामुळें हिंदुस्थानांत जी आधुनिक सुधारणेची प्रवृति सुरू झाली, तिच्यामुळें वरील अस्पृश्यतेच्या निवारणार्थ केवळ हिंदु लोकांकडून जे प्रयत्‍न होत आहेत, त्यांचा संक्षिप्त इतिहास एवढाच प्रस्तुत विषय आहे.

ह्या विषयाचे दोन मुख्य भाग पडतात ते असे. इ. स. १९०६ मध्यें भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी (डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया) मुंबई येथें स्थापन झाली. हिचा पूर्वकाळ आणि उत्तर काळ असा:-पूर्वकाळीं अनुक्रमें महाराष्ट्र, बंगाल, बडोदें आणि मद्रास प्रांतीं कांहीं उदार व्यक्तींनीं थोडेसे प्रयत्‍न केलें; पण त्यांच्यांत सत्यता, संघटना, परस्पर संबंध नसल्यामुळें त्यांना यावी तशी दृढता आली नाहीं, पण ही मंडळी मुंबईंत स्थापन झाल्यावर सर्व हिंदुस्थानभर हिच्या शाखा झपाट्यानें पसरल्या. त्यांच्यांत कमी अधिक परस्परसंबंध जडल्यामुळें व त्यांच्या द्वारा सर्वत्र लोकमताचा विकास झाल्यामुळें शेवटीं सन १९१८ सालीं कलकत्त्याच्या काँग्रेसनें मंडळींचे जनरल सेक्रेटरी रा. शिंदे ह्यांच्या पत्रावरून अस्पृश्यतानिवारणाचा ठराव सर्वांनुमतें पास केला व पुढें लवकरच महात्मा गांधी ह्यांच्या पुरस्कारामुळें ह्या प्रयत्‍नाला आतां अखिल राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालें. कलकत्त्याच्या काँग्रेसमध्यें मिसेस बेझंट या अध्यक्ष होत्या व त्यांचा ह्या मंडळींशीं बराच परिचय होता म्हणून त्यांनीं आपल्या अनुयायांच्या जोरावरच हा ठराव पास केला.

रा. फु ले यां चा प्र य त्‍न.- इंग्रजी विद्येचा उगम एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीं तरी प्रथम बंगाल्यांत झाला, आणि तेथें राजा राममोहन राय ह्यांनीं इ. स. १८३१ त ब्राह्मसमाजाच्या रूपानें सर्व आद्य प्रगतीची ध्वजा उभारली तरी अस्पृश्यता निवारणाचा अग्र आणि अंतिम मान महाराष्ट्रासच आणि विशेषत: जोतीबा फुले ह्या महात्म्यानेंच मिळविला. ह्यांचा जन्म पुणें येथें फुलमाळी जातींत झाला. सन १८४८ पर्यंत ह्यांचे मराठी आणि इंग्रजी बरेंच शिक्षण मिशनरी शाळेंत झालें. रा. लहूजी नांवाच्या एका तालीमबाज मांगजातीच्या गृहस्थाच्या आखाड्यांत ह्यांचे शारीरिक शिक्षण झालें होतें. तेव्हांपासून अस्पृश्योद्धाराकडे ह्यांचे लक्ष वेधलें होतें. पुढें बंगाल्यांत बाबू शशिपाद बानर्जी ह्या गृहस्थांनीं स्त्रीशिक्षण, विधवाविवाह अस्पृश्योद्धार वगैरेसंबंधीं सामाजिक प्रगतीचीं जीं कामें चालविलीं ती त्याच्या पूर्वींच २० वर्षें आधीं महाराष्ट्रांत ह्यांनीं चालविलीं. ''डेक्कन असोसिएशन'' नावाची एक प्रागतिक विचारप्रसारक संस्था पुण्यास होती. तिच्या वतीनें सरकारांनीं जोतीबास २०० रुपयांची शाल मोठी जाहीर सभा करून सन १८५२ सालीं नजर केली. त्यांचें कारण १८४८ सालीं ज्योतीबांनीं मुलींची पहिली शाळा स्थापन केली. आणि १८५२ सालच्या आरंभीं महारमांगांच्या मुलांसाठीं पहिली शाळा स्थापन केली. ही शाळा मुंबई इलाख्यांतच नव्हे तर अखिल जगांत अस्पृश्यासाठीं हिंदु लोकांनीं उघडलेली पहिलीच खासगी शाळा होय. सरकारी इन्सेक्टर मेजर कँडी साहेबांनीं हिची पहिली परीक्षा ता. २१ मार्च १८५२ रोजीं शुक्रवार पेठेंतील शाळेंत घेतली असें त्या दिवशीं प्रसिद्ध झालेल्या ज्ञानप्रकाशाच्या अंकांत नमूद झालें आहे. ''त्या वेळेस शुद्ध लिहिणें व वाचणें वगैरे गोष्टींत ह्या शाळेंतील मुलांनीं विश्राम बागेंतील (वरिष्ट वर्गांच्या) किती एक विद्यार्थ्यांपेक्षांहि उत्तम परीक्षा दिली असें मेजर साहेबांनीं म्हणून दाखविलें; असें ज्ञानप्रकाशनें त्याच अंकांत प्रसिद्ध केलें आहे. ता. ५ डिसेंबर १८५३ च्या ज्ञानप्रकाशांत शाळेत पहिल्या वार्षिक रिपोर्टासंबंधानें संपादकांनीं जें स्पष्ट व सविस्तर मत दिलें आहे त्यांतील खालील उतारे विशेष लक्षांत घेण्यासारखे आहेत. ''एक मुलीची शाळा आपल्या घराजवळ घातली त्या कालावधींत व पुढेंहि त्यास त्यांच्या जातीच्या लोकांकडून फार त्रास सोसावा लागला. त्यास शेवटी तीर्थरूपांनीं घरांतून त्याच कारणावरून काढलें. आपल्या नीच बंधुजनास अज्ञानसागरांतून काढून ज्ञानामृताचें सेवन करण्याकरितां त्यांनीं संकटें भोगिली हा त्यांचा त्या जातीवर मोठा उपकार आहे. आम्हीहि त्यांचे आभार मानितो. ब्राह्मण लोकांमुळें अतिशूद्रांचें ज्ञानेंकरून व द्रव्येंकरून बिलकूल बरें होऊं नये, अशी उंच जातीची इच्छा खरी; परंतु त्यांत ब्राह्मण कायते अग्रेसर असा ह्यांचा लिहिण्याचा हेतु कळून येतो. त्याविषयी पिष्टपोषण करण्याचें कारण नाहीं. प्राय: आम्ही ही गोष्ट खरी समजतों, असें फुलेराव जाणत असतां ज्या ब्राह्मणांनीं अशाच कामांत द्रव्याची वगैरे मदत केली त्यापेक्षां त्यांची स्तुतीतर इतरांपेक्षां जास्त केली पाहिजे व त्यांचे स्मरण सर्वांस राहावें यास्तव त्यांचीं नावें जोतीरावांनीं (रिपोर्टोत) अवश्य लिहावीं असें आह्मांस वाटतें.'' ह्या शाळेंत चांभाराच्या मुलींस जोतीबा स्वत: व त्यांची बायको किती कळकळीनें शिकवीत असत ह्याविषयीं एक पत्र ज्ञानप्रकाशांत प्रसिद्ध झालें आहे. ह्यांचे तीन मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे, सदाशिवराव बल्लाळ गोवंडे ह्यांची ज्योतीबांनां बरीच मदत असें. ''महारमांगाच्या शाळांत बरीच गर्दी होत असें. ह्या लोकांस त्यांनीं आपल्या राहत्या घराच्या विहिरीवर पाणी भरण्यास परवानगी दिली. '' (अ. ए. गवंडीकृत फुले यांचें अल्प चरित्र पान ८) ता. ४ सप्टेंबर १८५६ च्या ज्ञानप्रकाशाच्या अंकात खालील मजकूर आहे. ''गेल्या शुक्रवारीं येथील अतिशूद्रांच्या शाळांची परीक्षा झाली. मुख्य स्थानीं मिस्तर स्विससाहेब रिविन्यू कमिशनर हे बसले होते, यूरोपीयन, नेटिव्ह बरेच आले होते आरंभी कमिटीनें रिपोर्ट इंग्रजींत व नंतर मराठींत वाचला व त्यावरून असें समजतें की एकंदर शाळा तीन आहेत व त्यांमध्यें मुलांची संख्या सुमारें ३०० वर आहे. परंतु महारमांग आदिकरून नीच जातीखेरीजकरून इतर मुलें पुष्कळ होतीं. शिक्षक सुमारें ८ आहेत, ह्या शाळांत मुली मुळींच नाहींत. गेल्या दोन वर्षांत मुली असत; परंतु एक शाळा ह्या वर्षी जास्त वाढविली आहे. स्थापन झाल्यापासून दिसत आहे कीं, त्या शाळाच्या अभ्यासाची धांव पलीकडे जात नाहीं व ह्याचें कारण काय तें कळत नाहीं. कमिटी असें म्हणतें कीं शिक्षक चांगले मिळत नाहींत.''

सन १८७५ सप्टेंबर ता. २४ च्या मुंबई सरकारच्या रेव्हिन्यु खात्याच्या नं. ५४२१ च्या ठरावावरून जोतीबांच्या ह्या शाळांविषयीं खालील ठराव -''१८५५-५६ च्या सुमारास महारमांगाच्या मुलांच्या शाळेसाठीं इमारत बांधण्याकरतां सरकारांनीं पुणें येथे एक जागेचा तुकडा दिला असें दिसतें व तसेंच इमारत खर्चासाठीं दक्षिणा फंडातून ५००० रुपये देण्याचें सरकारानी वचन दिलें. ही रक्कम वसूल करण्यांत आली नाही. तरी ह्या जागेवर एक झोंपडी उभारण्यात येऊन तिच्यांत गेल्या वर्षांपर्यंत महारांसाठीं एक शाळा भरत होती. आतां शाळा बंद आहे ह्या शाळेच्या मंडळीचें सेक्रेटरी रावबहाद्दूर सदाशिवराव बल्लाळ त्यांच्या ताब्यांत ही जागा आहे. शाळेला लागणार्‍या जागेखेरीज इतर भाग एका मांगाला लागवडीनें सेक्रेटरी देत आहेत तिचें लावणी उत्पन्न दरसाल ८० ते १०० रुपये येत असतें, रावबहादूर सदाशिव ह्यांच्या मनांत ही जागा व शाळा सरकारास द्यावयाची आहे . ही जागा लोकलफंडं कमिटीस द्यावयाची आणि शाळा तिच्या उत्पन्नांतून सदर कमिटीनें पुढें चालवावी. दक्षिणाफंडांतून ८०० रुपयें ग्रँट देण्यास सरकारांना हरकत वाटत नाहीं.'' मुंबई सरकारच्या विद्याखात्याचा तारीख १३ नोव्हेंबर १८८४ नंबर १९२१ चा ठराव झाला, त्यावरून ही शाळा लोकलफंड कमिटीकडून पुणें म्युनिसिपालिटीकडे येऊन सरकारांतून वेगळी ग्रँट मिळण्याची तजवीज झाली. येणेंप्रमाणें महारमांगासाठीं ज्योतीबांनीं जी प्रथम संस्था काढली तिच्या मिळकतीची हकीकत आहे. भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळींनें नानाच्या पेठेंत पुणें म्युनिसिपालिटीकडून सन १९१४ तारीख १८ माहे जून रोजीं भोकरवाडीजवळील ७ एकर जागा आपल्या प्रशस्त इमारतीकरितां ९९ वर्षांच्या कौलानें घेतली आहे. ती हीच मिळकत होय. सरकारकडून म्युनिसिपालिटीला जी शाळा मिळाली ती देखील हल्लीं ह्या मंडळीच्या शाळांतच सामील झाली आहे.

श शी पा द बं दो पा ध्या य जीं चे प्र य त्‍न.- बंगाल्यांत अस्पृश्यतानिवारणाचा प्रथम मान वरील ब्राह्मण गृहस्थाकडे आहे. हे कलकत्त्याजवळील बारानगर गांवीं सन १८४० त कुलीन ब्राह्मण जातींत जन्मले. १८६६ सालीं ब्राह्मधर्मी झाले. तेव्हांपासूनच ते अगदीं खालच्या जातीशीं मिळूनमिसळून जेवूंखावूं लागले. सन १८६५ च्या नोव्हेंबरच्या १ल्या तारखेस ह्यांनीं बारानगर येथील गिरणींतील मजूरवर्गाची एक सभा भरविली. त्यांत ठराव होऊन त्यांच्यासाठीं रात्रीच्या आणि दिवसाच्या शाळा काढल्या. हा अनाचार, टवाळ लोकांस न खपून त्यांनीं त्या उठविल्या; पण ह्यांनीं स्वत:च्या खर्चानें इमारती बांधून त्या कायम केल्या. इकडील चोखामेळ्याप्रमाणें बंगाल्यांतील कर्ताभजापंथी चांडालवर्ग भजनाचा शोकी आहे. त्याचा बिहालपारागांवीं एक उत्तम सारंगी तयार करण्याचा कारखाना आहे. तेथें बाबूजी जावून चांडाळांचें कीर्तन ऐकत. सन १८७० च्या आगस्ट महिन्यांत त्यांनीं अशा मजूरवर्गाचा एक क्लब काढिला. त्याच्या द्वारा त्यांनां वाचनाची गोडी लाविली आणि मद्यपान वगैरे दुष्ट चाली सोडविल्या. वेडींवांकडीं गाणीं सोडून ही मंडळी सात्विक कीर्तनें करूं लागलीं. १८७१ त जेव्हां बाबूजी विलायतेस निघाले तेव्हां ह्या गरीब मजुरांनी त्यांनां अत्यंत कृतज्ञतापूर्वक मानपत्र दिलें. ह्या दीनांच्या सेवेबद्दल बाबूजींचा सत्कार ते विलायतेस गेल्यावर ब्रिस्टल शहरां एका मिशनरी संस्थेनें त्यांना एक मोठें मानपत्र देऊन केला. परत आल्यावर गरिबांसाठी एक पैशाचें एक मासिकपत्र काढिलें. त्याच्या दर महिन्यास १५००० प्रती खपूं लागल्या. त्यांत पंडित शिवनाथशास्त्रांसारख्यांनीं लेख लिहिले व श्रीमंतांची चांगली मदत असे. बारानगर समाचार नांवाचें साप्ताहिकहि काढलें. ते चांडालाबरोबर जेवीत, मेहेतरांच्या मुलांची शुश्रूषा करीत. सरकारनें नुकत्याच उघडलेल्या सेव्हिंग बँकेत त्यांचे पैसे ठेवून त्यांनां काटकसर शिकवीत. बारानगर येथें ब्राह्मसमाज स्थापन झाल्यावर ह्या लोकांसाठीं बरेंच काम होंऊ लागलें. ह्या मजुरांच्या संस्थेच्या २३व्या वार्षिक उत्सवाचें वर्णन १८८९ सालच्या सप्टेंबर महिन्याच्या २० ता. च्या 'इंडियन डेली न्यूज' नांवाच्या इंग्रजी पत्रांत सविस्तर आलें आहे. बक्षीस समारंभांत १०० वर मुलांस व गड्यांस बक्षिसें दिली. बड्या मंडळींनीं सहानुभूतीचीं भाषणें केलीं. याशिवाय बंगाल्यांत दुसरे कोणते प्रयत्‍न झालेले ऐकिवांत नाहींत. हल्लीं जें डिप्रेस्ड मिशनचें गांवोगावीं काम चाललें आहे त्याचें मूळ महाराष्ट्रांतील मिशनमध्यें आहे. वरील माहिती सितानाथ तत्वभूषण यांनी निवेदिलेल्या शशिपाद बाबूंच्या चरित्रावरून व इतर साधनांवरून मिळविलेली आहे.

श्री मं त स या जी रा व गा य क वा ड यां चे प्र य त्‍न.- महाराजांनीं आपल्या राज्यांत वेळोवेळीं कानाकोंपर्‍यांत स्वत: जाऊन अस्पृश्य जंगली, गुन्हेगार जातींची स्थिती स्वत: निरखिली. नवसारी जवळ सोनगड म्हणून महाराजांचा एक जंगली मुलूख आहे तेथें ढाणका नांवाची जंगली जात आहे. तेथें महाराज गेले तेव्हां हे सर्व लोक वानराप्रमाणें झाडावर चढून बसले ते कांहीं केल्या खाली उतरेनात. महाराजांनी ३० वर्षांपूर्वी या लोकांच्या १०० मुलांमुलींसाठीं दोन बोर्डिंगें आणि शेतकीची नमुनेदार शाळा काढलेली मी स्वत: १९०५ सालीं पाहिली तिचा उत्तम परिणाम दिसून आला. तेथील सुपरिंटेंडेंटनें ह्या लोकांसाठीं एक प्रार्थनासमाज चालविला होता, तो मी दोनदां पाहिला. त्याच्या द्वारां मुलांस उच्च धर्मांचीं तत्त्वें शिकण्याची सोय होती. गुजराथी व इंग्रजी शिकलेले प्रौढ मुलगे व मुली बोर्डिंगांत मी पाहिल्या त्यांच्यांत लग्नें लावून कायमची सुधारणा करण्याची कल्पना महाराजांची घेण्यासारखी दिसली. थक्क झालों.
    
अस्पृश्यांच्या शिक्षणाचें खातेंच एक निराळें आहे. त्याचे मुख्य अधिकारी पंडित आत्माराम ह्यांनीं पाठविलेल्या रिपोर्टांचा अल्प सारांश खाली दिला आहे:-

सन १८८३ सालापासून ''अस्पृश्या'' करितां निराळ्या मोफत शाळा उघडण्यास सुरुवात झाली. १८८४ त ७, व १८९१ त १० शाळा झाल्या व हिंदु शिक्षक मिळणें अशक्य असल्यामुळें मुसलमानावरच काम भागवावें लागे. अधिकार्‍यांतहि सहानुभूति कमी असल्यामुळें फार अडचणी आल्या.

ह्याचसाठीं मुंबईत नि. सा. मंडळी स्थापण्यांत आली आणि बडोद्यांत सक्तीच्या शिक्षणाचा ठराव पास होऊन शिक्षणाचा प्रसार झपाट्यानें चालला.

वर्ष मुलामुलीं च्या
मिश्र शाळा
मुलींच्या
निराळ्या
शाळा
वसतिगृह  वसतिगृहांतील
विद्यार्थी
एकंदर
विद्यार्थी
१८८४
१८९१ १० ३९० ७८४
१८९३ १२९३
१८९६ २१
१९०६ २२ ५० १५००
१९१० २८७ १३७०३
१९१५ १९७८७
१९२१  १७०००

 

 

 

 

 

 

 

 

    

               

अंत्यजांच्या धर्मशिक्षणार्थ १९२३ सालीं त्यांच्या पुरोहितांनां संस्कृत शिकविण्यासाठीं एक खास संस्कृत पाठशाळा उघडली व तींत प्रत्येकीं ८ रु प्रमाणें २५ गारोड्यांनां विद्यार्थिवेतनें दिलीं. पेटलादच्या रा. शिवराम नांवाच्या अंत्यज व्यापार्‍याला धारा सभेचे सभासद नेमिलें. त्यांच्या मृत्यूनंतर मुंबईचे बी. ए. महार गृहस्थ रा. आंबेडकर यांनां नेमण्यांत आलें. १९११ सालीं शिक्षणखात्यांत २००, लष्करांत १९, म्युनिसिपालिटींत १०, पोलिसांत ७, सर्व्हेखात्यांत ३ आणि इतर ३ असे एकंदर २४२ अस्पृश्य इसम सरकारी नोकरींत होते. बडोदा कालेजांत स्कालरशिपा ठेविल्या. अंत्यज बोर्डिगांत वैदिक पद्धतीचें संस्कृतांत धर्मशिक्षण देण्यांत येतें. मुलांनां राजवाडयांत जमवून सर्वांसमक्ष्य समारंभ करण्यांत येतात.

१७ वर्षांच्या एका अंत्यज अनाथ मुलींचे लग्न एका वरिष्ठ स्पृश्य वर्गांतील मुलाशीं १९१९ सालीं करण्यांत आले. वसतिगृहांतील सर्व मुलींनां शिवण आणि गृहोपयोगी सर्व कामें शिकविण्यांत येतात. रा. आंबेडकर ह्यांनां अमेरिकेंतील कोलंबिया युनिव्हर्सिटींत ४ वर्षे ठेवून पीएच. डी. करविलें आणि एकाला मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्यें एल. एम्. एस. करविलें. त्या सर्व सत्कार्यांत लोकांकडून नेहमीं टीका आणि पुष्कळ वेळां उघड विरोध सहन करावा लागला. वसतिृहांतील प्रौढ विद्यार्थ्यांकडून आता बडोदें राज्यांत आत्मोद्धाराच्या चळवळीला चांगली मदत होऊं लागली आहे. महात्मा गांधींनां हल्लींहि विरोध होत आहे. मग नि. सा. मंडळीला पूर्वी गुजराथसारख्या सोंवळ्या प्रांतीं किती विरोध झाला असेल ह्याची कल्पनाच करावी लागणार !

क र्न ल ऑ ल्कॉ ट (थिऑसोफिकल सोसायटी मद्रास) – कर्नल ऑल्कॉट थिऑसोफिकल सोसायटींचे अध्यक्ष ह्यांनीं १९०२ साली 'पुअर पराय'' नांवाची एक लहानशी चोपडी प्रसिद्ध केली. तिच्यांत पान १७-२३ मध्यें खालील हकीकत आहे. अस्पृश्यता निवारणाचा उत्तम उपाय म्हणून मद्रास शहरीं त्यांनीं आपली पहिली शाळा सन १८९४ सालीं एका झोपडींत काढली. दुसरीं १८९८ त व तिसरी १८९९ त उघडली. १९०१ च्या रिपोर्टांत सर्व शाळांतून मिळून त्या सालच्या २० डिसेंबर रोजीं ३८४ मुलगे व १५० मुली आणि १६ शिक्षक होते. ४ इयत्तेपर्यंत तालीम, हिशेब, व्यावहारिक इंग्रजी हें शिकविण्यांत येतें. त्यांच्या धर्मांत मुळींच हात घालण्यांत येत नाहीं. शिक्षणापलीकडे विशेष कांहीं करण्याचा सोसायटीचा उद्देश ऐकिवांत नाहीं. १९०३ सालीं मी स्वत: मद्रास शहरीं या सोसायटीच्या चार शाळा पाहिल्या. तेथें किंडरगार्डन पद्धतीचें नमुनेदार शिक्षण मी पाहिलें. एक स्विस बाई फारच कळकळीनें देखरेखीचें काम खुषीनें करीत होती. ह्या शाळांचे काम अद्यापि चालत आहे.

रा. सा. के. रं ग रा व मं ग ळू र.- मद्रास इलाख्यांत विशेषत: पश्चिम किनार्‍यावर अस्पृश्यांचे हाल कल्पनेच्याहि पलीकडे आहेत. ''अस्पृश्यांची गोष्टच नको पण वरिष्ठ जातींच्या व्यक्तीपासून ६०-७० फुटांच्या अंतरांत येण्यास त्यांनां अद्यापि मनाई आहे. म्हणून त्या प्रांतीं सर्वांच्या मागून ह्या कामीं सुरवात झाली हें लंक्षांत आणून मंगळूर ब्राह्म समाजाचे सेक्रेटरी रावसाहेब के. रंगराव ह्यांनी मंगळूर येथें १८९७ सालीं आपली पहिली शाळा काढली ही मोठी स्तुत्य गोष्ट आहे. ह्या कामीं त्यांनां लोकांचा छळ सोसावा लागला. पुढें १० वर्षांत ह्या छळाला न जुमानतां बरीच प्रगति करतां आली. सरकारच्या मदतीनें त्यांनां त्या अवधींत ह्या संस्थेसाठीं स्वत:ची विस्तीर्ण जागा व इमारत, उद्योगशाळा आणि वसाहती साठीं सुमारें २० एकर शेतकीची जागा इतकी सामुग्री संपादन करतां आली. मुंबईस रा. शिंदे ह्यांनी १९०६ सालीं आपली भारतीय नि. सा. मंडळी स्थापिली. तिला ही संस्था जोडण्यांत आल्यापासून हिची भरभराट होत आहे.

ब्रि टि श स र का र आ णि ख्रि स्ती मि श नें. - यांनीं अस्पृश्यांची स्थिती सुधारण्यांकरितां जें काहीं केलें आहे तें प्रसिद्ध आहेच. त्याचें सविस्तर वर्णन करण्याचें हें स्थळ नव्हे. ह्यांच्या मार्गांत अडथळा कायंतो नोकरशाहींची नबाबी पद्धति आणि धर्मांतराचें वेड एवढाच होता. हे अडथळे नसते तर दोघांच्या हातून निदान हिंदुस्थान सरकारच्या एकाच्या हातून हा अस्पृश्यतेचा प्रश्न ह्यापूर्वीच सुटावयाला पाहिजे होता. मद्रासेकडील ख्रिस्ती मिशनांच्या विशेषत: रोमन कॅथोलिक पंथाच्या पद्धतींत तर उघड उघड दोष दिसत आहेत ते हे कीं, जातिभेदाचें निर्मूलन करण्याचें त्यांच्या धर्मांत सांगितलें असूनहि केवळ आपली संख्या वाढावी ह्या हेतूनें त्या लोकांनां ख्रिस्तीं धर्मांत घेऊन पुन्हा त्यांचा दर्जा खालचाच ठेवला आहे. त्यामुळें त्यांनां आतां दोन्ही वाटा बंद झाल्या आहेत. ह्याचे पुरावे मी स्वत: दक्षिण देशीं जागजागीं पाहिले. ख्रिस्ती लोकांत हल्लीं जी राष्ट्रीय चळवळ चालू आहे ती कायम राहिली आणि काँग्रेसची चळवळ शब्दांपलीकडे जाऊन कृतींत उतरली तर लवकरच हे लोक पुन: धर्मांतर करून हिंदूधर्मांत येतील असें वाटतें.
इंग्रज सरकारनें सक्तीचें शिक्षण देऊन सरकारी नोकरींत घेण्याच्या बाबतींत त्यांनीं या लोकांवर आजवर जो अक्षम्य अन्याय केला आहे त्यांचे निराकरण करतील तरी ताबडतोब अस्पृश्यतेला ओहोटी लागेल. तथापि अशा बाबतींत परकीय नोकरशाही आणि परधर्मी ब्राह्मणशाही ह्यांनां नांवें ठेवण्यापेक्षां सर्व दोष स्वकीयांनींच पत्करावा हेंच योग्य आहे.
वि ठ्ठ ल रा म जी शिं दे.- ह्यांचा जन्म कर्नाटकांतील जमखिंडी येथें ता. २३ एप्रील १८७३ रोजीं झाला. ह्यांचे पूर्वज सन १२ व्या शतकांत प्रसिद्ध असलेल्या सिंदा नांवांच्या मांडलीक राजघराण्याचा अवशेष म्हणून विजापूर जिल्ह्यांतील १८ व्या शतकाच्या शेवटीं जे सुरापूर नांवाचें संस्थान होतें त्यांतील जहागिरदार होते. हे फर्ग्युसन कॉलेजांतून बी. ए. ची परीक्षा १८९८ त पास झाले आणि विलायतेहून ऑक्सफर्ड विद्यालयांतील आपला धर्म आणि समाजशास्त्राचा अभ्यास संपवून स्वदेशीं १९०३ सालीं सप्टेंबर महिन्यांत परत आल्यावर ''डिप्रेस्डक्लासेस मिशन सोसायटी आफ इंडिया'' अथवा भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीच्या स्थापनेस लागले. लगेच १९०३च्या आक्टोबर-नवंबर मध्यें ह्यांनीं बडोद्यांतील कामाची प्रगति महाराजांच्या आज्ञेवरून पाहून रिपोर्ट आणि सूचना केल्या. पुढें तींन वर्षें मुंबई प्रार्थना समाजाच्या प्रचारकाच्या कामानिमित्त ह्यांनीं सर्व हिंदुस्थानांत प्रवास केला. तेव्हां विशेषत: प्रांतोप्रांतीच्या अस्पृश्य, गुन्हेगार आणि जगंली जातींची स्थिति समक्ष पाहिली. १९०५ पासून हिंदुस्थानांतील सेन्सस रिपोर्टावरून ह्या लोकांच्या संस्थेची वट्ट अजमावणी करून लेखाच्या व व्याख्यानाच्या द्वारें आपले अनुभव आणि सूचना ते प्रसिद्ध करूं लागले. प्रार्थनासमाजाचे अध्यक्ष सर नारायणराव चंदावरकर आणि उपाध्यक्ष शेट दामोदरदास सुखडवाला यांनीं आपल्या वजनाच्या आणि द्रव्याच्या द्वारें साह्य केल्यावर मुंबई येथें तारीख १८ आक्टोबर १९०६ कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या सुमुहूर्तावर सकाळी १० वाजतां मंडळींची स्थापना परळ येथें पहिली शाळा उघडून केली. पुढें १९०७ पासून १९१२ अखेर काँग्रेसच्या सभा अनुक्रमें सुरत, मद्रास, कलकत्ता, लाहोर, बांकीपूर आणि कराची येथें झाल्या. त्यावेळी अस्पृश्यता निवारणार्थ लोकमत तयार करण्याकरतां त्या त्या सर्व ठिकाणीं रा. शिंदे ह्यांनीं त्या विषयीं स्वतंत्र परिषदा भरविल्या आणि शक्य त्या ठिकाणीं स्थानिक मदत घेऊन आपल्या मिशनच्या स्वतंत्र शाखाहि उघडल्या. मात्र प्रत्यक्ष कार्य उत्तर हिंदुस्थानांत आर्यसमाजानें व बंगांल्यांत ब्राह्म समाजानें आपल्या अंगावर घेतल्यामुळें संस्थेशीं पुढें ह्या कामाचा प्रत्यक्ष संबंध उरला नाहीं. पण दक्षिणेंत व पश्चिमेकडे मुंबई इलाख्यांतील मूळसंस्था ही कोणत्याहि समाजांत आपलें कार्य स्वतंत्र चालवून मुंबईतील मध्यवर्ती कमिटीच्या विद्यमानें ठिकठिकाणीं प्रांतिक शाखा व जिल्ह्याच्या ठिकाणीं तिच्या पोट शाखा उघडण्यांत आल्या. १९१२ पर्यंत साधारणपणें घटनेची रूपरेखा आकारण्यांत आली. पैशाच्या व स्थानिक मंडळीच्या कळकळीच्या मानानें ठिकठिकाणच्या कामांत विषमता राहिली. आणि पुढें तर मद्रास इलाख्यांतील ठाणीं मूळसंस्थेपासून स्वतंत्रहि झालीं. हल्लीं ह्या भारतीय मिशनच्या मूळ मध्यवर्ती कमिटीच्या ताब्यांत खालील पांच मु्ख्य शाखा तिच्या देखरेखी खालीं चालू आहेत. त्यांचा प्रत्यक्ष कारभार स्थानिक कमिट्या चालवीत आहेत. मुंबईशाखा (परळ), महाराष्ट्र (पुणें, भोकरवाडी), कर्नाटक शाखा (हुबळी), मध्यप्रांत वर्‍हाड शाखा (नागपूर पांचपावली), तामील शाखा (बंगलूर कँटोनमेंट) ह्यांची कामें व रिपोर्ट वेळोवेळीं प्रसिद्ध होत असतात. ह्या मिशनच्या कार्याला आतां राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालें आहे व ह्याचें व्यवस्थित कार्य सर्व हिंदुस्थानभर चालू झालें आहे. जनरल सेक्रेटरी रा. शिंदे ह्यांनीं राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता येथील अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. बेझंटबाई यांनां निकडीचें पत्र पाठवून त्याच्या मान्यतेचा ठराव पास झाल्यावर पुढें नागपूरच्या सभेंत महात्माजींनीं अस्पृश्यांचा प्रश्न नॉन कोऑपरेशनच्या मुख्य ठरावांत ठेवून दिला. त्यावेळीं सबजेक्टस कमीटींत रा. शिंदे होते त्यांनीं अस्पृश्योद्धाराचा प्रश्न नॉन कोऑपरेशनच्या चळवळीपासून काँग्रेसमध्येंच पण स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्‍न केला. पुढें गोद्रेज नांवाच्या उदार पार्शीं गृहस्थानें दीड लाख रुपयांची देणगी अस्पृश्यता निवारणाच्या खास कामाकारतां काँग्रेसला दिली. तिच्या मदतीनें ठिकठिकाणच्या प्रांतिक व जिल्ह्याच्या कमिटींच्या द्वारां प्रयत्‍न चालू आहेत. विशेषत: चरके चालविणें व ह्या लोकांचा पाठिंबा राष्ट्रीय सभेस मिळविणें ह्या शिवाय अस्पृश्यता निवारणाच्या प्रत्यक्ष कामाला काय मदत होत आहे हें कळत नाहीं.
का मा ची दि शा.- येथवर डिप्रेस्डक्लास मिशनच्या स्थापनेच्या पूर्वींच्या चळवळी आणि डि.सी. मिशनची प्रत्यक्ष स्थापना ह्या संबंधीं माहिती सांगितली. पूर्वीच्या कामांची मुख्य दिशा शिक्षणाचा प्रसार करून तद्वारां ह्या वर्गांची उन्नति करण्याची सोय येवढीच होती. पण ह्या मिशनची दिशा अथवा उद्देश मुख्यत: अस्पृश्यतेचें निवारण हेंच असून त्याप्रीत्यर्थ ह्या वर्गांत शिक्षणाचा प्रसार, स्वाभाविक आणि वैयक्तिक सुधारणा उदार हिंदू धर्मतत्त्वांचा प्रचार, औद्योगिक उन्नति, राजकीय हक्कांची योग्य जाणीव इत्यादि वेळोवेळीं सुचतील ते सर्व उपाय करून पाहाण्याचा आहे. येणेंप्रमाणें मिशनचा पाया खोल आणि पद्धतशीर घातला गेल्यानें आणि त्याच्या प्रत्यक्ष कार्याचा प्रसार सर्व देशभर संस्थांच्या रूपानें विस्तार झाल्यानें त्याला लवकरच सरकार, परोपकारी मंडळ्या आणि शेवटीं राष्ट्रीय सभेचीहि मान्यता आणि सहकार्य मिळूं लागलें. इतकेंच नव्हे तर जुन्या व नव्या विचारांच्या सर्वच लहनथोरांची अस्पृश्यतानिवारण हें एक राष्ट्राचें आणि स्वराज्यसंपादण्याचें आद्य व आवश्यक कर्तव्य आहे अशी जाणीव होऊं लागली. ह्या स्थूल दृष्टीनें मिशनच्या कार्याला यश आलें असे म्हणतां येईल. पण तपशिलांत अद्यापि यश येण्याला बरेंच झगडावें लागेल. शाळांतून, पाणवठ्यांवर, हिंदूंच्या देवळांतून ह्या निराधार लोकांना मोकळी वाट मिळण्यासाठी काँग्रेस, कौन्सिलें, म्युनिसिपालिट्या, हिंदूसमाज, धर्मपरिषदा आणि एतदेशीय संस्थानें ह्यांनीं हल्ली पेक्षां जास्त आणि कळकळीचे प्रयत्‍न करावयाला पाहिजे आहेत.
मि श न चा वि का स-वरील प्रयत्‍न व्हावेत म्हणून मिशननेंहि आपल्या कार्याचा प्रसार आणि पद्धति वेळोवेळीं कालानुसार बदललेलीं आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. इ. स. १९१२ सालच्या आक्टोबर महिन्याच्या ता. ५ ते ७ रोजीं पुणें येथें सर डॉ. भांडारकर ह्यांच्या अध्यक्षतेखालीं ह्या मिशननें जी पहिली मोठी अस्पृश्यता निवारण परिषद भरविली तिच्यांत मोठमोठे प्रांतिक पुढारीच नव्हते तर डॉ. कुर्तकोटीसारखे जुन्या विचाराचे गृहस्थ आणि इचलकरंजी संस्थानाधिपतीसारखे ब्राह्मण रजवाडे ह्यांनींहि सहानुभूतीनें भाग घेतला; सर्व जातींच्या धर्माच्या लोकांनीं फंडास मदत केली आणि तरुणांनीं तीन दिवस जिवापाड स्वयंसेवा केली. महार, मांग, चांभार, ढोर, भंगी, ब्राह्मण, मद्रासी, ब्राह्मो. ख्रिस्ती, मुसलमान अशा १० समाजाचे मुंबई इलाख्यांतून बाहेरच्याहि निरनिराळ्या १७ जिल्हयांतील ५४ गांवातून २३० डेलीगेट्स् अथवा प्रतिनिधीनीं परिषदेंत भाग घेतला. जें मुख्य सहभोजन झालें त्यांत सुमारें ३५० 'अस्पृश्य'' वर्गाचे आणि ५० निरनिराळे ब्राह्मदि  ''वरिष्ठ'' वर्गांचे पाहुणे एकाच पंक्तीस होते. जनरल सेक्रेटरी रा. शिंदे ह्यांनीं आपल्या मुख्य भाषणांत तेव्हां मिशनच्या प्रत्यक्ष देखरेखी खालीं असलेल्या संस्थांचा गोषवारा सांगितला तो परिषदेच्या रिपोर्टांत असा नमूद केला आहे:- मुंबई, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजराथ, खानदेश, कोंकण, कानडा, मद्रास वगैरे भागांतील - ''एकंदर १४ ठिकाणीं २३ शाळा, ५५ शिक्षक, २१०० मुलें, ५ वसतिगृहें, इतर १२ संस्था आणि ५ आजन्म वाहून घेतलेले प्रचारक असून एकंदर वार्षिक खर्च २४४८५ रुपये आहे.'' ह्याशिवाय बंगाल्यांत ब्राह्मसमाजानें चालविलेल्या संस्थांशीं अप्रत्यक्ष संबंध होता तो निराळाच.

ह्यानंतर सुमारें ६ वर्षांनीं म्हणजे ता. २३-२४ मार्च १९१८ रोजी मुंबई येथें श्री. सर सयाजी महाराज गायकवाड ह्यांच्या अध्यक्षत्त्वाखालीं मिशनची दुसरी म्हणजे अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारण परिषद भरली त्यावेळीं लो. टिळक, मिसेस बेझंट, महात्मा गांधी, सर नारायण चंदावरकर, नामदार परांजपे वगैरे मंडळींनीं भाग घेतला होता. प्रेक्षकसमूह तर रोज साजसकाळ ५ पासून ७ हजारापर्यंत लोटत होता. मुख्य काम, अस्पृश्यता प्रत्यक्ष जातीनें मोडू असा व्यक्तिविषयक प्रतिज्ञेचा एक राष्ट्रीय जाहीरनामा काढून त्यावर निरनिराळ्या गांवांतील व हिंदू जातींतील ३८० प्रमुख पुढार्‍यांच्या दस्तुरखुद्दच्या सह्या मिळविण्यात येऊन जाहीरनामा प्रसिद्ध करण्यांत आला. पण खेदाची गोष्ट ही कीं लो. टिळकांनीं आपल्या कांहीं अनुयायांच्या भिडेला पडून आपली सही देण्याचें नाकारिलें. तथापि ह्या परिषदेत स्वत: लोकमान्यांनीं जो ठराव मांडला कीं, राष्ट्रीय सभेनेंच हा प्रश्न आपल्या हाती घ्यावा त्यामुळें थोडा तरी परिणाम झाला. आणि त्याच वर्षीं कलकत्त्यास काँग्रेस भरली असता मिसेस बेझंट ह्या अध्यक्ष असल्यामुळें रा. शिंदे ह्यांच्या आग्रहावरून त्यांना अस्पृश्यता निवारणाचा ठराव काँग्रेसच्या कार्यक्रमांत घेऊन पास करतां आला. १९२० साली नागपूरच्या काँग्रेसमध्यें महात्मागांधींनीं ह्या विषयास सर्वमान्यता देण्याचें श्रेय घेतलें.
अ स्पृ श्य व र्गां ती ल जा णी व- ह्याप्रमाणें मिशनच्या परिषदांचा परिणाम घडला तरी प्रत्यक्ष ह्या वर्गांतच जाणीव झाल्याशिवाय कार्यभाग होणार नाही अशी रा. शिंदे यांची खात्री होती. म्हणून राष्ट्रीय सभेचें लक्ष्य अस्पृश्यवर्गांकडे ओढण्याची अधिक जोराची चळवळ केली ती विशेष ध्यानांत घेण्यासारखी आहे. पण ह्या प्रयत्‍नात रा. शिंदे ह्यांना मुळींच यश न मिळता उलट अस्पृश्यवर्गांचा जोराचा विरोध सहन करावा लागला. तथापि त्यामुळें अस्पृश्य वर्गांच्या पुढार्‍यांत कांहीं अंशीं एक प्रकारची जागृति झाली हा एक फायदाच समजावयाचा.
रा ज की य च ळ व ळ- लखनौच्या काँग्रेसमध्यें हिंदी राज्यसुधारणेची उर्फ स्वराज्यसंपादनाची चळवळ प्रथम हिंदी-मोस्लेम-स्कीम पास होऊन सुरू झाली. तिला हिंदुस्थानातहि सर्व जातीचा पाठिंबा पाहिजे होता. ह्या योजनेला सर्व ब्राह्मणेतरांचा विशेषत: अस्पृश्य वर्गांचा पाठिंबा मिळवून देण्यासाठीं रा. शिंदे ह्यांनीं जिवापाड मेहनत केली. सन १९१७ च्या नवंबर महिन्यांत पुणें येथें रा. शिंद्यांनीं जो मराठा राष्ट्रीय संघ म्हणून स्थापिला त्याचा उद्देश केवळ मराठ्यांतच राष्ट्रीयनिष्ठा उत्पन्न करण्याचा नसून अस्पृश्यदि सर्वच मागासलेल्या जातीमध्यें स्वराज्याची नवीन उत्कंठा पसरविण्याचा जास्त होता म्हणून गुरुवार तारीख ८ नवंबर १९१७ रोजीं सायंकाळीं रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीं पुणें येथें शनिवार वाड्यासमोर जी ८००० पुणेकर निरनिराळ्या जातींच्या लोकांची प्रचंड जाहीर सभा भरली होती, तिच्यांत अस्पृवर्गांच्याहि महार, मांग, चांभार, वगैरे जातींच्या दोन दोन प्रतिनिधीनीं लखनौ हिंदी-मॉस्लेमस्कीमला इतरांबरोबर पाठिंबा दिला होता, इतकेंच नव्हे तर त्याच दिवशीं मुंबईसहि एक जंगी जाहीर सभा खास अस्पृश्यवर्गांची सर नारायणराव चंदावकर ह्यांच्या अध्यक्षतेखालीं रा. शिंदे यांच्या प्रयत्‍नानें भरण्यांत आली. स्वराज्यप्रीत्यर्थ ठराव पास करण्यांत आले. पण कदाचित ही चळवळ सरकारास आवडणारी नसल्यामुळें म्हणा किंवा त्याचवेळीं ब्राह्मण ब्राह्मणेतर ही चळवळ दुसर्‍या बाजूनें सुरू झाल्यामुळें म्हणा पुढील पांच वर्षांत अस्पृश्य वर्गांतील कांहीं पुढार्‍यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विरोध रा. शिंदे ह्यांनां सहन करावा लागला; सर्व ब्राह्मणेतर समाजांत अप्रिय व्हावें लागले. तरी त्यांनीं आपली चिकाटी सोडली नाहीं.

माँ टे ग्यू चे म्स फ र्ड सु धा र णा.- पुढें लवकरच हिंदी राज्यसुधारणेचा पहिला हप्ता कसा द्यावा हें ठरविण्यासाठी साऊथबरो कमिटी हिंदुस्थानांत आली. तिच्या पुढें रा. शिंदे ह्यांची महत्त्वाची साक्ष झाली. तिच्यांत त्यांनीं मुंबई इलाख्याच्या कायदेकौन्सिलांत अस्पृश्यांसाठीं त्यांच्या संख्येच्या मानानें नऊ जागा मागितल्या. तरी शेवटीं एकच मिळाली म्हणून त्यांची निराशा झाली. इतरांकरितां जातवार प्रतिनिधींच्या तत्त्वाच्या जरी ते उलट होते तरी अस्पृश्यांसाठीं निराळे मतदार संघ घडवून देणें अशक्य नसून त्या कामीं मदत करण्याचेंहि त्यांनी वरील कमिटीस सांगितलें होतें. त्यावेळीं सरकारनें पत्करलेल्या धोरणाउलट त्यांनीं जोराची टीका केली. मध्यप्रांतांत दोनच जागा आणि मद्रासेंत ह्या वर्गांची प्रचंड संख्या असूनहि पांचच जागा सरकारनें दिल्या म्हणून रा. शिंदे ह्यानीं बेंगलूर येथील आपल्या जाहीर भाषणांतहि नापसंति दर्शविली.

मि श न म ध्यें अ स्पृ श्यां ची भ र ती.- येणेंप्रमाणें काँग्रेसकडून नाउमेदीचा आणि सरकारकडून जवळजवळ निराशेचा अनुभव येऊं लागल्यामुळें प्रत्यक्ष आपल्या मिशमध्यें तरी अस्पृश्यानीं अधिक जोराचा भाग घ्यावा असा रा. शिंद्यानीं प्रयत्‍न चालविला. अस्पृश्यांचीं कामें सरकाराकडून करून घेण्यासाठीं १९२० त स्वत: कौन्सिलांत जाण्याचाहि त्यांनी प्रयत्‍न केला. पण एकीकडे काँग्रेसच्या असहकार्याचा प्रयत्‍न तर दुसरीकडून स्वत: अस्पृश्यांचाच विरोध ह्या कातरींत राजकीय चळवळींत त्यांनां म्हणण्यासारखें यश आलें नाहीं. तरी सामाजिक बाबतींत मिशनच्या परिषदांमुळें जें यश आलें तें वर सांगितलें आहे. महायुद्धाच्या कटकटीचा काल, राजकारणाची गुंतागुंती, भयंकर महागाई, मिशनच्या स्थानिक शाखांचीं सर्व कामें कर्ज होऊं न देतां जोमांत ठेवणें वगैरे कामांस वाहून घेऊन काम करणार्‍या माणसांचा तुटवडा इत्यादि अनेक अडचणी येऊं लागल्या. मदतीपेक्षां मिशन वर टीकेचाच भडिमार जास्त होऊं लागला. अशा परिस्थितींत पुणें येथील इमारती उभारण्याचें काम उरकावें लागलें. १९२१ सालीं सप्टेंबरच्या ५ व्या तारखेस पुणें भोकरवाडी येथील मुख्य शाळागृहाची कोनशिला म्हैसूरचे युवराज एच्. एच्. सर कांतिराव नरसिंहराज वडियार बहादूर ह्यांच्या हस्तें बसविण्यांत आली. त्यावेळीं अस्पृश्य वर्गांतील पुढार्‍यांनीं मिशनच्या कारभारांत अधिकाधिक भाग घ्यावा अशी रा. शिंद्यांनी विनंती केली. त्या पूर्वीहि मिशनच्या कांहीं शाखांचा कारभार ''अस्पृश्य'' वर्गांच्या माणसांकडून चालविण्याचा उपक्रम चालू होता. पुढें ठिकठिकाणच्या स्थानिक कमिट्यांतून ''अस्पृश्यांचे'' लायक सभासद घेण्यांत आले. १९२३ सालच्या मार्च अखेरीस रा. शिंद्यांनीं 'ज्ञानप्रकाश'' (ता. २९-३-२३) आणि 'केसरींतून'' (ता. ३ एप्रील १९२३) आपलें स्पष्ट मत आणि सविस्तर निवेदन जाहीर केलें. त्यांत अत:पर सर्वस्वीं जबाबदारी 'अस्पृश्य'' वर्गांनीं आपल्यावरच घ्यावी आणि आपण स्वत: केवळ सामान्य देखरेखीपलीकडे अंतर्व्यवस्थेची जबाबदारी आपल्याकडे ठेवणार नाहीं असें म्हटलें आहे.

ए त द्दे शी य सं स्था नि कां ची स हा नु भू ति, म्हैसूर.- डी. सी. मिशन निघण्यापूर्वीपासूनच बडोद्याच्या श्रीमंत गाइकवाड महाराजांची पुढाकार घेऊन ह्या बाबतींत कसें स्तुत्य उदाहरण घालून दिलें हें वर सांगितलें आहे. इ. स. १९१२ चे सुमारास:-इंदूरचे सर सवाई तुकोजी महाराज होळकर ह्यांनीं रा. शिंदे ह्यांनां मुद्दाम बोलावून नेऊन त्यांनीं केलेल्या पुणें येथील इमारतीच्या योजनेप्रीत्यर्थ वीस हजार २०००० रुपयांची उदार देणगी दिली. संस्थानांतूनहि अस्पृश्य वर्गांच्या शिक्षणासाठीं मदत व इतरहि सवलती बर्‍याच देण्यांत येत आहेत. विशेषत: म्हैसूरच्या मुख्य विद्याधिकार्‍याच्या जागीं मिस्टर रामलिंग रेड्डि हे प्रागतिक, आणि हुषार गृहस्थ असतांना ह्या प्रश्नाची बरीच प्रगति झाली. अस्पृश्य वर्गांच्या दोन परिषदा झाल्या. संस्थानाच्या शाळांतून इतर 'स्पृश्य'' वर्गांच्या मुलांबरोबरच 'अस्पृश्य'' मुलांनां बसविण्यांत यावें असे कडक हुकूम सुटले. ह्या सुधारणेंस श्री शंकराचार्यांकडून विरोध होऊं लागला तरी धोरणांत माघार घेण्यांत आली नाहीं. म्हैसूर येथें ''अस्पृश्यां'''' साठीं सुमारें ५० विद्यार्थ्यांचें नमुनेदार फुकट वसतिगृह आहे. तेथें उत्तम प्रकारचें औद्योगिक उच्च शिक्षण दिलें जातें. याशिवाय दुय्यम व उच्च शिक्षणासाठीं स्कालरशिप्सची चांगली योजना आहे. इतर सुधारणांकरतां खटपट ''सिव्हील अँड सोशल प्रोग्रेस असो.'' च्या साहाय्यानें चालविण्यांत आली आहे. तिचे अध्यक्ष स्वत: महाराजांचे बंधु हिज हायनेस युवराज सर कांतिराव नरसिंहराव वाडियार बहादूर हे आहेत. शिवाय लोकांनीं आपल्याच बळावर हिंदू डिप्रेस्ड क्लासेस मिशन नांवाची एक निराळी संख्या काढली आहे. तिच्या कित्येक वाङमय व औद्योगिक शाळा रा. शिंदे यांनीं चांगल्या स्थितींत पहिल्या. तूर्त याच मंडळीकडे त्यांनीं आपल्या भारतीय नि. सा. मंडळीची बंगळूर येथील शाखा सोंपवून दिली आहे.

त्रावणकोर- शिक्षणसंबंधीं या संस्थानची फार प्रसिद्धि आहे. पण अस्पृश्यांच्या बाबतींत सबंध मलबार अथवा केरल देशांत फार शोचनीय स्थिति आहे. तथापि कित्येक सार्वजनिक रस्त्यानें फिरण्याची देखील मोकळीक पुलया, चिरुमा, परय्या, नायाडी वगैरे ''अस्पृश्य'' जातींनां नाही. पुष्कळ वेळां मुख्य रस्त्यांत फिरल्याबद्दल या गरीब जातींनां वरिष्ठ हिंदूंकडून मार बसल्याची व कोर्टांत खटले झाल्याबद्दलची रा. शिंद्यानीं स्वत:ची ब्रिटिश हद्दींतील मॅजिस्ट्रेटकडून खात्री करून घेतली आहे. आपल्या भारतीय मिशनकडून रा. शिंदे हे दरवर्षी पत्रें पाठवून मोठमोठ्या संस्थानिकांकडून माहिती मागवीत असत. त्याचा परिणाम त्या त्या संस्थानांतील शिक्षण खात्यावर १९१४ सालापासून होऊं लागला आहे असें दिसतें. पुढील तीन सालीं त्रावणकोर येथील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची खालीलप्रमाणें वाढ झाल्याचें त्या संस्थानच्या रिपोर्टांत नमूद आहे.
अस्पृश्यवर्गांचें     विद्यार्थ्यांची संख्या    दरवर्षी झालेली वाढ

नांव सालवार 
सालवार
१९१४ १९१५ १९१६ १९१४ १९१५ १९१६
 पुलया  २०१७ ४२५६ ८४९४ ८२६ २२३९ ४२३८
 परया १८१६ २६५२ ७१९ ८३६

 

              

तथापि रस्त्यांतून फिरण्याच्या हरकतीमुळें वरचेवर दंगे व मारामार्‍या अलीकडे देखील ऐकिवांत येत आहेत. विशेष चमत्कारीक गोष्ट शिक्षणखात्याच्या रिपोर्टावरून दिसते ती अशी कीं, ब्रिटिश राज्यांत ज्याप्रमाणें ''अस्पृश्या'' साठीं आणि युरोपीयनासाठीं शिक्षण खात्यामार्फत खास संस्था चालविण्यांत येत असलेल्या या खात्याच्या रिपोर्टांतून नमूद झाल्याचे उल्लेख आढळतात व त्याप्रमाणें त्रावणकोर शिक्षणखात्याच्या रिपोर्टांत मलबार ब्राह्मणाकरितां एक खास शिक्षणखातें असल्याचें आढळतें. पण जी प्रगति अस्पृश्यांच्या शिक्षणात वर दाखविल्याप्रमाणें नमूद झालेली दिसते तसा ब्राम्हणांसंबंधीं उल्लेख नसून उलट तें खातें नीट न चालल्यामुळें शिक्षणखात्याला १९१६ साली मलयाळी ब्राह्मणांची एक खास परिषद भरवावी लागली. आणि पुष्कळशा सवलती एक खास अधिकारी नेमून द्याव्या लागल्या इत्यादि उल्लेख त्या वर्षाच्या रिपोर्टाचें पान ५१ वर आढळतो ! हें एक गूढच आहे म्हणावयाचें.
नि जा म है द रा बा द.- ह्या संस्थानच्या शिक्षण खात्याच्या रिपोर्टांत ''अस्पृश्य'' ह्या नांवाचा उल्लेखच कोठें आढळत नाहीं. पण सन १९११ सालच्या रिपोर्टांत (पा.१४२) वर जी जातवारी दिली आहे त्यांत चक्कलन, चांभार, मादिग, महार, माल व मांग, ह्या सहा 'अस्पृश्य' मानलेल्या जातींचा उल्लेख असून त्यांची एकंदर लोकसंख्या ४७९१८५ इतकी दिली आहे. संस्थान मुसुलमानी असल्यानें कदाचित् दरबाराकडून  ''अस्पृश्यता'' मानली जात नसेल. तरी कांहीं खात्री सांगवत नाहीं. ''अस्पृश्य'' वर्गांतील जे लोक आपली आर्य किंवा ब्राह्मसमाजांत गणना करून घेतात त्यांनां लष्करी व मुलकी खात्यांत नोकर्‍या मिळण्यास फारशी अडचण पडत नाहीं हें खरें. सन १९१५ सालच्या सुमारास रा. शिंदे ह्यांनी हैदराबादच्या ब्राह्मसमाजास भेट दिली व अस्पृश्यता निवारणासंबंधीं त्या शहरांत जाहीर व्याख्यानें दिलीं. त्यावेळीं तेथील ब्राह्मसमाजांत बहुतेक मूळच्या तेलगू 'अस्पृश्य' वर्गाचाच भरणा त्यांनां दिसला व त्यांचा सामाजिक दर्जा व सांपत्तिक स्थिति बरीच समाधानकारक दिसली. सन १९११ सालच्या रिपोर्टांत जरी अशा ब्राह्म सभासदांची संख्या ३६ च दिली आहे. तरी रा. शिंदे यांनीं आपल्या भेटीच्या वेळीं पुष्कळच जास्त ब्राह्म आणि इतर उच्च दर्जाला पोंचलेल्या लोकांनां प्रत्यक्ष पाहिलें.

को ल्हा पू र.- वरील संस्थानच्या मानाने हे संस्थान जरी विस्तारानें लहान आहे तरी हिंदुपदपादशाही स्थापनकर्ते आद्य छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या अस्सल क्षत्रिय वंशांत जन्मलेले कै. श्री. शाहू छत्रपति हे सर्व मराठ्यांचे मुख्य पुढारी होते म्हणून सहानुभूतीचा व प्रत्यक्ष कृतीनें केलेल्या पुरस्काराचा परिणाम महाराष्ट्रभर व विशेषत: मराठा जातीवर फार इष्ट घडला. तरुणपणीं महाराज जुन्याच विचारांचे होते, पण रा. शिंद्यांचा व त्यांचा बर्‍याच दिवसांचा परिचय असल्यामुळें हा विचाराचा जुनेपणा फार दिवस टिकणें शक्य नव्हतें. सन १९०७ सालींच डी. सी. मिशनची एक शाखामिस क्लार्क विद्यार्थीं वसतिगृहाच्या रूपानें कोल्हापुरास स्थापन झाली. पुढें महाराजांची सहानुभूति ह्या मिशनकडे झपाट्यानें वाढत चालली. महायुद्धांत विलायतेस जाऊन आल्यावर तर त्यांनीं ह्याच विषयाचा ध्यास घेतला. नागपूर येथील अखिलभारतीय ''अस्पृश्य'' परिषदेचे ते अध्यक्ष होते. ते दिल्ली येथील ह्या परिषदेच्या अधिवेशनांत मुद्दाम हजर होते. त्यांच्या राज्यांतच नव्हे तर त्यांच्या राजवाडयांत अस्पृश्यांनां सर्वत्र मुक्तद्वार असे. राजरोस ते ह्यांनां पंक्तीस घेऊन जेवीत. सर्व प्रकारच्या सरकारी नोकर्‍यावर व सार्वजनिक स्थळीं अस्पृश्यांनां मज्जाव न करण्याचें स्वदस्तुरचें फर्मान त्यांनीं स्वत: शिंद्यांनां मोठ्या अभिमानानें दाखविलें. शेवटीं खालील पत्र पाठवून त्यांनां कोल्हापुरास बोलाविलें होतें.

शिरोळ कँप, तारीख १७-७-२१ इ.

रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे यासी:-
मी कोल्हापुरास असतांना आपण एकदां येऊन जावें. हल्लीं कोल्हापूर म्युनिसिपालिटीचे चेअरमन हे अस्पृश्य जातीचे असून म्युनिसिपालिटींत एक व्हटकर नांवाचा क्लार्क तीस रुपये पगारावर अस्पृश्य जातींतील आहे. कम्युनल रिप्रेझेंटेशन अस्पृश्यांनां व ब्राह्मणेतरांनां दिल्यानें हा त्यांनां चान्स मिळाला आहे. सॅनिटेशनच्या पॉंइंटवर आजवर ब्राह्मणांकडून अस्पृश्य मानलेल्यांनां जो त्रास होत असे तोहि आतां नाहींसा झाला आहे. तेव्हां ही सर्व परिस्थिति आपण येऊन अवलोकन करून जाल अशी आशा आहे. कळावें लोभाची वृद्धि व्हावी ही विनंति (सही दस्तुर खुद्द शाहू छत्रपति.)

स्वत:च्या वाडयांत छत्रपति शाहू महाराजांनीं ५० अस्पृश्य विद्यार्थ्यांचें फुकट वसति आणि भोजनगृह काढलें होतें व केव्हां केव्हां ते स्वत:च शिकवीत, असें त्यांनीं रा. शिंद्यास सांगितलें. कांही ''अस्पृश्य'' सुशिक्षित तरुणांस वकिलीच्या सनदा मिळाल्या होत्या. हत्तीवरील मुख्य माहुताचा मान महाराला दिला होता. आपल्या राजवाड्यांतील खास विहिरींतील पाणी भरण्याची परवानगीहि मागांनां दिली होती. ह्याप्रकारें शिक्षणविषयक, सामाजिक व राजकीय इत्यादि सर्व सवलती महाराजांनीं सढळ हातांनीं दिल्या होत्या. त्यामुळें त्यांच्या संस्थानांत अस्पृश्यतेला बराच आळा बसला आहे.

उ प सं हा र.- येणेंप्रमाणें गेल्या ७० वर्षांत हिंदुस्थानांतील अस्पृश्यतेच्या निवाराणार्थ खास हिंदु लोकांकडून कोणते व कसे प्रयत्‍न झाले. ह्यांचा संक्षिप्त गोषवारा देण्याचा प्रयत्‍न केला आहे. ह्या शिवाय परधर्मीय मंडळांनीं व ब्रिटिश सरकारांनीं जे स्तुत्य प्रयत्‍न केले आहेत त्याचें विस्तारभयास्तव वर्णन करतां आलें नाहीं. किंबहुना तो प्रस्तुत विषयच नसल्यामुळें आम्हांस येथें अधिक विस्तार करतां येत नाहीं.

परधर्मीय प्रयत्‍नांची दिशा ह्या वर्गांस आपल्या कळपांत ओढण्याची असणार हें सहाजिकच आहे. पण त्या प्रवृत्तीचा जेथें जेथें अतिरेक झाला तेथें तेथें त्यांची प्रतिक्रिया बारीक निरखून पहाणारास दिसण्यासारखी आहे. ब्रिटिश सरकाराकडून जे प्रयत्‍न झाले ते मात्र अधिक निरपेक्ष बुद्धीनें झालेले दिसतात तरी पण सरकारच्या अगाध साधनसमुच्चयाच्या अपेक्षेनें पाहतां त्यांचे प्रयत्‍न अतिशय कमी आहेत इतकेंच नव्हे तर आलेली संधि सरकारांनीं बरेंच वेळां दवडली आहे. उदाहरणार्थ चालू राजकीय सुधारणेंत ''अस्पृश्यांची'' खडतर निराशा झाली आहे. गेल्या महायुद्धांत रणांगणावर ''अस्पृश्य'' वर्गांची कामगिरी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीची अतिशय नांवाजण्यासारखी झाली असूनहि युद्ध संपल्याबरोबर महाराजांच्या १११ व्या पलटणीचें सरकारांनीं महारांच्या निषेधाला न मानतां विसर्जन केलें हें तर फारच वाईट झालें. पोलीस आणि लष्कर खात्यांत योग्य प्रमाणांत शिरकाव करून घेण्याचा ह्या वर्गांचा प्रयत्‍न निदान गेल्या वीस वर्षांत अविश्रांत चालू आहे. व एका लायक महार गृहस्थाचा पोलीस सब इन्स्पेक्टरसारख्या लहानशा जागेसंबंधीं अर्ज एक मोठ्यांत मोठ्या यूरोपीयन अधिकर्‍याच्या कळकळीच्या जात शिफारशीनें गेला असतांहि ती जागा मिळाली नाहीं; यांत जरी कांही आश्चर्य नसलें तरी उलट कौन्सिलांतील प्रश्नास ह्या लोकांकडून अर्जच येत नसतात अशा अर्थाचीं जी उत्तरें मिळतात तीच मात्र आश्चर्यकारक आहेत. सरकारची अशी हयगय करणारी एक बाजू तर दुसरी बाजू जी आज इतक्या उशीरा जागी झाली, तीहि लवकरच हा प्रश्न उशाला ठेवून झोपी जाईल अशीं चिन्हें दिसत आहेत. म्युनिसिपालिट्या पैकीं पुढारी अशी जी पुण्याची म्युनिसिपालिटी तिनें नु्कतेंच तिला सार्वजनिक पाठबळ असूनहि ''अस्पृश्यांस'' मोकळें करण्याचें साफ नाकारिलें. त्यांत अशिक्षित व हजारों वर्षें चिरडलेले हे जे वर्ग त्यांची अशी पुन:पन: सर्वोकडून निराशा आणि हिरमोड झाल्यामुळें त्यांचा तोल राखला जाणें दिवसेंदिवस अशक्य होऊं लागले आहे. हिंदु धर्मावरील त्यांची निष्ठा जरी अढळ आहे तरी हिंदी राष्ट्राच्या राजकीय महत्त्वाकांक्षांच्या उलट त्याची कमान साहजिकच त्वेषानें चढत चालली आहे. हें महात्मा गांधीसारख्या मोहोरक्यांच्या लक्षांत आलें तरी त्यांच्या अनुयायांच्या लक्षांत येत नाहीं, त्यांत सर्व राष्ट्राला भयंकर धोका पोंचत आहे हें खास !

मोठमोठ्या शहरांतून अस्पृश्यता पुष्क्ळ कमी झाली आहे यांत शंका नाहीं, तरी पण खेड्यापाड्यांतून विशेषत: रेल्वेपासून लांब प्रदेशांत तिचें रामराज्य अद्यापि चालू आहे. दक्षिण देशांत विशेषत: नैर्ॠत्य किनार्‍यावर आणि सर्व मलबारांत ती अमानुष रीतीनें पाळण्यांत येत आहे. स्वतंत्र जमीनी वाहणें किंवा इतर धंदे करणें यास किंबहुना सार्वजनिक रस्त्यानें बिनधोक फिरण्याचीहि सक्त मनाई आहे. फार तर काय, एक समंजस श्रीमंत जमीनदार रा. शिंद्यापुढें आपल्या मालकीच्या जमीनीवरच्या शेंकडों पिढीजाद गुलाम मुलांनां केवळ घोड्याबैलांप्रमाणें दुसर्‍याकडे कामाला लावून त्यांचें वेतन तो बिनदिक्कत आपण हक्कानें घेत होता ! जमीनीबरोबर कुळेंहि जणूं विकलीं जातात. जुलुमाला कंटाळून कोणी मजूर नव्या मालकाकडून जुन्याकडे पळून गेल्यास नव्याची जुन्या मालकाविरुद्ध फिर्याद कायदेशीर कोर्टांत चालू शकतें मग गुलामगिरी ह्याहून निराळी ती कोणती.
अंत्यज अथवा पंचम वर्गांच्या कांहीं मुख्य जातींची सर्व हिंदुस्तानांतील एकूण संख्या पुढीलप्रमाणें:-
(शिरोगणती साल १९०१-)

जात  वसतिस्थान  एकूण संख्या.
चाभांर बहुतेक भाग १,११,३७,३६२
मोची बहुतेक भाग १०,०७,८१२
डोंब बंगाल, आराम, पंजाब ९,७७,०२६
भंगी मुंबई, संयुक्तप्रांत, राजपुताना ६,५६,५८६
ढाणूक बगालं, पंजाब, (बडोदे सं.) ८,७०,५५७
बागेडी बंगाल, आसाम १०,४२,५५०
वळई माळवा, मध्यप्रांत ५,८४,३३४
चूरा उत्तर हिंदुस्थान १३,२९,४१८
नामशूद्र चंडाल उत्तर हिंदुस्थान, बंगाल २०,३१,७२५
राजवंशी  हिंदुस्थान, बंगाल २४,०८,६५४
महार  मुंबई, व-हाड, मध्यप्रात २९,२८,६६६
मांग   मुंबई, व-हाड मध्यप्रात ५,७९,३०६
व्हलिरा (महार)  कर्नाटक ,मद्रास ७,७०८९९
मादिग मांग  कर्नाटक, मद्रास १२,८१,२५२
पारिया  मद्रास, ब्रह्मदेश २२,५८,६११
चिक्लिया  मद्रास, ब्रह्मदेश ४,७८,४९६
माल  मद्रास, बंगाल १८,६३,९०८
इतर सर्व  सर्व भागातील २,०९,९९,४७०
एकूण ५,३२,०६,६३२

हिंदुस्थानच्या एकंदर लोकसंख्येशीं अस्पृश्यांचे प्रमाण समजण्यास पुढील आकड्यांचा उपयोग होईल.
हिंदुस्थानांतील एकंदर लोकसंख्या             २९,४३,६१,०५६
एकूण हिंदू लोकसंख्या     ...    ...    ...    २०,७१,४७,०२६
एकूण अंत्यज लोकसंख्या     ...    ...    ...    ५,३२,०६,६३२
एकूण मुसुलमान लोकसंख्या    ...    ...    ...    ६,२४,५८,०७७
पैकीं हीन मुसुलमान लोकसंख्या    ...    ...    ८६,२८,५६६

वरील आंकडे सन १९०१ च्या इंपीरियल सेन्स-रिपोर्टांतून घेतले होते. त्या नंतरच्या दोन खानेसुमारीच्या रिपोर्टांतून प्रांतवार अस्पृश्यांची गणति दाखविण्याची पद्धत बदलल्यामुळें तुलना करणे कठिण पडलें. तरी एकूण संख्येंत म्हणण्यासारखा फरक पडेल असें वाटत नाहीं. वर मुख्य १८ अस्पृश्य वर्गांचींच नांवें दिलीं आहेत. त्याशिवाय निरनिराळ्या प्रांतांत खालील व इतर बरींच नांवे आढळतात. १९ पुलया, २० चिरुमा, २१ नायाडी, २२ ढोर, २३ पल्ल, २४ हारी, २५ कोरी, २६ रहार, २७ सरेरा, २८ मेघवाळ, २९ मेघ, ३० धेड, ३१ गंड, इ. इ.
गुन्हेगार जाती-मांग, रामोशी, मांग गारुडी, बेरड वगैरे कित्येक ''अस्पृश्य'' किंवा ''अस्पृश्यवजा'' मानलेल्या जातींची गणना  सरकारदृष्ट्या गुन्हेगार जातींत होत आहे. ह्या बाबतींत डि. सी. मिशनच्या पुणें शाखेकडून १९१४ सालीं जे प्रयत्‍न झाले त्यांचा अहवाल मिशनच्या त्या वर्षाच्या ८ व्या वार्षिक रिपोर्टांत पान १७-२६ वर नमूद आहे. सातारा जिल्ह्यांत सुमारें एक हजार एकर पडिक जमीन मुंबई सरकारांनीं देऊं केली होती. रा. शिंदे आणि पुणें शाखेचे तेव्हांचे अध्यक्ष डॉ. मॅन ह्या दोघांनीं सातारा जिल्ह्यांत जमिनीचा एक सोईचा भाग निवडून काढण्यासाठीं दौरा केला. रा. शिंद्यांनीं तर त्या उद्देशानें सातारा जिल्हयांतील बहुतेक खेडयांतून जवळजवळ १००० मैल प्रवास करून गुन्हेगार गणलेल्या मांग लोकांची स्थिति पाहिली व जमिनी तपासल्या. शेवटीं २०००० रु. खर्चाची एक योजनाहि तयार केली होती. पण महायुद्धामुळें एवढी रक्कम जमा करणें झाले नाहीं व शेवटीं जमीनीहि युद्धांत कामगिरी केलेल्या लोकांनां देण्यांत येऊं लागल्या म्हणूनहि या महत्त्वाच्या योजनेंत यश आलें नाहीं. पण सरकार मार्फत विजापूर, हुबळी, वगैरे ठिकाणीं गुन्हेगार जातींसाठीं खास वसाहती स्थापण्यांत येत आहेत. व त्यामुळें ह्या जातींच्या गुन्हेगारीच्या आळा बसत चालला आहे. तथापि गुन्हेगारीच्या सबबीवरून अद्यापि बर्‍याच ठिकाणीं त्या जातीवर जो पोलीसकडून हजेरीचा दाखला लावण्यांत आला आहे. त्यासंबंधीं मात्र तक्रारी मिशनकडे येत आहेत. त्यांचा विचार सरकारकडून लवकर झाला पाहिजे. [ले वि. रा. शिंदे].

वर सांगितलेल्या रा. शिंदे यांच्या चळवळीशिवाय महाराष्ट्रांतील दुसरी चळवळ म्हटली म्हणजे रा. श्रीपाद महादेव माटे यांची होय यांचाहि प्रयत्‍न रा. शिंदे यांच्याप्रमाणेंच शैक्षणिक आहे. यांचा प्रयत्‍न विशेषेंकरून चांभारांमध्यें आहे. आणि अस्पृश्यांनां समाजांत थोडें अधिक मोकळेपणें वावरूं द्यावें, यासाठीं लोकमत जागृक करण्याचा त्यांनीं पुष्कळ प्रयत्‍न केला आहे.
अस्पृश्यांचा प्रश्न पूर्णपणें सुटण्यासाठीं जे प्रयत्‍न झाले पाहिजेत ते अनेकविध आहेत. अस्पृश्यांनां राजकीय अशी अडचण कांहींच नाही. कायद्यानें त्यांची स्थिाति इतरांपेक्षां कोणत्याहि तर्‍हेनें कमी नाहीं. त्यांच्या अडचणी सर्व सामाजिक आहेत. आज त्यांनां मतें मिळालीं आहेत त्यामुळें त्यांनीं प्रयत्‍न केला असतां इतर अनेक जातींस त्यांच्याशीं तडजोड करावी लागेल. अस्पृश्यता म्हणजे ब्राह्मणापासून अतिशय दूरपणा. ब्राह्मणापासून मराठ्यांस थोडा तरी दूरपणा आहेच आणि अस्पृश्यता नाहींशीं झाली म्हणजे मराठे व महार यांची स्थिति जवळ जवळ सारखीच होईल. आणि यामुळें पुष्कळ ठिकाणीं व्यवहारामध्यें महारांच्या विरुद्ध जाणारा वर्ग ब्राह्मणापेक्षां ब्राह्मणेतरच होईल असें वाटतें. आणि याचा अनुभव पुष्कळ ठिकाणीं आपणांस येत आहे. महारांची मिरवणूक आपल्या रस्त्यावरून ब्राह्मणेतरांनीं जाऊं दिली नाहीं पण ब्राह्मणांनीं जाऊं दिली अशा तर्‍हेच्या गोष्टी आपणांस वारंवार दिसून येतात. पुष्कळ ठिकाणीं अस्पृश्यता चळवळीमध्यें पुढारी ब्राह्मण असल्यामुळें ही मराठयांनां खाली पाडणारी चळवळ आहे अशा तर्‍हेचे आक्षेप येतात.

महारांमध्यें बरीच जागृति झाल्याचें कांहीं ठिकाणीं आपणांस दिसून येतें. आणि त्यापैकीं कित्येकांनां ''डिप्रेस्ड क्लास मिशन'' ही कल्पनाच बरोबर वाटत नाहीं. त्यांना असें वाटतें कीं, अगोदर आम्हांस ''डिप्रेस्ड क्लास'' म्हणावयाचें आणि तुमच्या सुधारणेकरितां आम्ही वरचे लोक येतों असा तोरा मिरवावयाचा, असा हा प्रयत्‍न आहे. महारांच्या प्रयत्‍नांत अगोदर ज्या ठिकाणीं जोर दिसून आला तें मध्यप्रांतातील नागपूर विभागांतील मोहपें हे गांव होय. तेथें काम करणारी जी मंडळी आहे त्यांनीं आपणांस महार सुधारक मंडळी असे नांव धारण केलें आहे. मध्यप्रांतांतील महारांचे पुढारी म्हणजे रा. गवई, रा. भटकर व रा फागु किसन बनसोडे हे होत. गवई यांनीं उमरावतीस बहिष्कृत भारत नांवाचे पत्र काढलें आहे. मुंबई इलाख्यांतील महारांचें ''मूकंनायक'' नावाचें पत्र प्रसिद्ध होत असे त्या पत्रासंबंधानें रा. घोलप व डॉ. आंबेडकर यांमध्यें वाद उपस्थित होऊन तो वाद पुण्याच्या एका वर्तमान पत्रांतून दृग्गोचर होऊं लागला.

अ स्पृ श्य व र्ग च रा ज का र ण- अस्पृश्यवर्गाची राजकारणांत प्रवृत्ति बरीच विविध दृष्टीस पडते. रा. गवई यांनीं नागपुरास व रा. मलिक यांनीं बंगालांत व दुसर्‍या एका गृहस्थांनी मद्रास इलाख्यांत देशी लोक जर महत्त्वाच्या जागांवर चढले तर अस्पृश्य वर्गांच्या हितास विरोध करतील अशी सरकारपुढें मांडणी केली आहे, व हिंदुस्थानच्या पूर्ण स्वायत्ततेस या दृष्टीनें विरोधहि केला आहे. परंतु ही प्रवृत्ति सार्वत्रिक कितपत आहे हें सांगतां येत नाहीं. अस्पृश्य वर्गास आपल्या बाजूस वळवून घेण्याची खटपट सर्व प्रकारचे पक्ष करीत आहेत. नागपुरास अस्पृश्य वर्गाचे कांहीं पुढारी व राष्ट्रीय पुढारी यांत बराच सलोखा असल्याचें दिसून येतें. अस्पृश्यांना आपल्या बाजूस ओढण्याची खटपट पुण्याचा प्रागतिक पक्ष व पुण्याचा ब्राह्मणेतर पक्ष हे दोन्ही करीत आहेत. आणि १९२३च्या डिसेंबर महिन्यांत पुण्यास जी अस्पृश्यांची परिषद भरली तिला प्रागतिकांनीं सहानुभूति फारशी न दाखविल्यामुळें ती आयतीच ब्रह्मणेतरांच्या तावडींत सांपडली, आणि त्यामुळें प्रागतिकांचा जो तडफडाट झाला तो ज्ञानप्रकाशच्या ११ जानेवारी १९२४च्या लेखांत व्यक्त होत आहे. सातारा जिल्ह्यामध्यें सत्य शोधक समाजाच्या चळवळीमुळें ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांमध्यें जी तेढ उत्पन्न झाली, त्यावेळेस ब्राह्मणांनीं महारांस हाताशीं धरलें असें दिसून येत आहे. अस्पृश्य वर्गांमध्यें निरनिराळ्या जातींत आपआपसांत चुरस आहेच आणि सरकारनें अस्पृश्यांच्या वतीनें कोणाची निवडणूक करावी या विषयीं १९२३ सालीं ज्या खटपटी सुरू झाल्या. त्यावेळेस अस्पृश्यांचें पुढारीपण महारासच कां असावें अशा तर्‍हेचे प्रश्न उपस्थित झाले होते.

अ स्पृ श्यां च्या उ न्न ती सा ठीं  इ त र प्र य त्‍न - यांतील एक महत्त्वाचा प्रयत्‍न  म्हटला म्हणजे अस्पृश्य हें नांवच वगळावें यासंबंधाचा होय. मद्रासकडे या वर्गानें आपणास ''पंचम'' हें नांव न लावितां 'आदि द्रविड' हें नांव लावावें म्हणून चळवळ करून हें नांव सरकारी दस्तऐवजांत आणवून घेतलें. त्याच प्रकारचा प्रयत्‍न इकडेहि 'आदि हिंदू' हे नांव वापरावें यासाठीं होत आहे. आणि कांहीं पत्रांनीं त्या प्रकारचें नांव वापरण्यास सुरुवातहि केली आहे.

अ स्पृ श्य ता व सां स्का रि क च ळ व ळ- धर्मशास्त्राच्या दृष्टीनें वर्ण चाराहून अधिक नसल्यामुळें शूद्र व अत्यंज यांमध्यें फरक करितां येत नाहीं. तथापि कुणबीमराठ्यांसारख्या वर्गास शूद्रांचे संस्कार होत असल्यामुळें अस्पृश्यांस त्यापेक्षां कांहीं हलक्या प्रकारचे संस्कार करावे अशी प्रवृत्ति होत आहे कांहीं ठिकाणीं महारांचे पौरोहित्य ब्राह्मण करीत नाहींत तर कांहीं ठिकाणीं करितात. आणि त्याचा परिणाम असा होतो कीं कांहीं ठिकाणीं ही जागा आपलें महत्त्व स्थापन करण्यास निर्वेध आहे असें पाहून तेथें लिंगांइतांनीं म्हणजे वीरशैवानीं आपल्या संप्रदायाचा प्रचार केला व अस्पृश्यांचें विधी जंगम करूं लागले. हिंदूंच्या संस्कारधर्माच्या मांडणीत महारांस स्थान द्यावें असें अनेक हिंदूंस वाटूं लागलें व यांस पुराणोक्त विधी तरी द्यावेत, अशी चळवळ मधून मधून दृष्टीस पडते [संपादकीय].

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .