विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अहमद खट्टू (शेख) - याचें मूळचें नांव वजीहउद्दीन अहमह [मघ्रिबी]- नागोरमधील खट्टू या गांवीं शेख अहमदाचा जन्म झाला. याचा बाप मलिक इख्तियार-उद्दीन हा दिल्लीचा सुलतान फीरूझ शहा तघलक याच्या दरबारी एक सरदार होता. बापाच्या मृत्यूनंतर अहमदनें सर्व पैसा चैनींत उधळला व पुढें शेख बाबा इस-हाक मघ्रिबी याचा शिष्य होऊन मोठा धर्माचरणी बनला. गजराथेत हा जाऊन राहिला तेव्हां त्याची फार प्रसिद्धि झाली. सुलतान मुझफर गुजराथी हा त्याच्या शिष्यांपैकीं एक होता. शेख अहमद इ. स. १४४६ त वारला. ''मलफझत-शेख-अहमद मघ्रिबी'' या नांवाचे त्याचें चरित्र मुहम्मद अन्सारनें लिहिलें.