प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
 
अहमदनगर (जि ल्हा) .- (मुंबई इलाखा) मध्य भागांतील एक जिल्हा. उत्तरअक्षांश १८°० २०' ते १९० °५९' व पूर्व रेखांश ७३० °३७' ते ७५० °४१' क्षेत्रफळ ६५८६ चौ. मै.

सी मा.- उत्तरेस व वायव्येस नाशिक जिल्हा; इशान्येस गोदावरी नदी, पूर्वेस निझामचें राज्य, आग्नेयीस व नैर्ॠत्येस सोलापूर व पुणें जिल्हा. पश्चिमेस सह्याद्रि पर्वताचा कांहीं भाग. या पर्वताचे तीन फांटे पूर्वेस या प्रदेशांत शिरलेले आहेत व त्यांच्या योगानें प्रवरा व मुळा या नद्यांचीं खोरीं बनलीं आहेत. वायव्य भागांत पर्वतशिखरें बरींच आहेत. त्यांतील कळसुबाईचा डोंगर समुद्रसपाटीपासून ५४२७ फूट उंच आहे. दुसरी उंच ठिकाणें पट्टा व हरिश्चंद्र गड हे डोंगरी किल्ले होत. पारनेरचें डोंगरपठार सपाटी पासून पाचशें फूट उंच आहे आणि समुद्रसपाटीपासून त्याची उंची ३२४० फूट आहे. प्रवरा व मुळा या दोन नद्यांचा संगम होऊन नंतर १२ मैलांवर त्या गोदावरीस मिळतात. दक्षिण भागांत सिना आणि घोड या नद्या वाहतात. या मुख्य नद्यांशिवाय दुसर्‍या कांहीं लहान नद्या आहेत.

भू व र्ण न.- अहमदनगर जिल्ह्याचे भूस्तर कशा प्रकारचे आहेत. याबद्दल बरोबर परीक्षण झालें नाहीं. परंतु मुख्यत: दख्खनच्या काळवथरी मालिकेंतील बॅसाल्ट दगडाचे आडवे थर या भागांत आहेत असे ब्लॅन्फर्डनें निरीक्षण करून ठरविलें आहे. (रेकॉर्डस ऑफ जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, १८६८).

व न स्प ति.- या जिल्ह्यांत विशेषत: यांतील अकोला तालुक्यांत पुष्कळ तर्‍हेचीं झाडें दृष्टीस पडतात. कोंकणांत होणारीं झाडें घाटांत होतात. आणि दक्षिणेमध्यें होणारीं झाडें पूर्वेकडील टेंकड्या व मैदानांत होतात. वड, नान्द्रुक, बाभुळ, निंब आणि आंबा हीं झाडें रस्त्याच्या बाजूंनां पुष्कळ आहेत. नाना तर्‍हेचीं रानटीं फुलझाडें येथें उगवतात. या प्रदेशांत डाळिंबें व कलिंगडें उत्तम प्रकारचीं व पुष्कळ होतात.

प्रा णी.- या भागांत वाघ क्वचितच दृष्टीस पडतो. पण चित्ता पुष्कळदां भेटतो. लांडगेहि बरेंच आहेत. मैदानांत सांबर पुष्कळ आहेत. तित्तिरपक्षी लावापक्षी हे बरेच आढळतात. ससे पुष्कळ आहेत.

ह वा मा न.- साधारणपणें हवा निरोगी आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंतचे थंडीचे दिवस कोरडे व उत्साहजनक असतात. नंतर उष्ण वारे सुरू होतात. मेच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून जूनच्या १५ तारखेपर्यंत उष्मा अतिशय त्रासदायक असतो. आक्टोबर अखेरपर्यंत पुन्हां हवा सौम्य होऊन चांगली होते. जानेवारीमध्यें उष्णता ४५ अंशावर असते ती मेमध्यें १०६ अंशापर्यंत चढते. पावसाचें सरासरी मान वर्षास २३ इंच असतें. गारांचा वर्षाव पुष्कळ वेळा होतो.

इ ति हा स. -इ. स. ५५० ते ७५७ पर्यंत हा मुलूख बदामांच्या चालुक्य राजांच्याकडे होता. नंतर तो राष्ट्रकूट राजांच्या हस्तगत होऊन इ. स. ९७३ पर्यंत त्यांच्या ताब्यांत होता. त्यांच्या मागून इ. स. ११५६ पर्यंत कल्याणीचे चालुक्य आले. इ. स. ११८७ पर्यंत कळचुरी व देवगिरीचे यादव यांची सत्ता होती. इ. स. १२९४ मध्यें मुसलमानांनीं हा जिंकला. तरी पण इ. स. १३१८ पर्यंत त्यांची सत्ता नाहींशीं झाली नाहीं.

 

१३४६ साल मोठ्या अंदाधुंदीचें होतें; दिल्लीच्या सुभेदाराच्या हातून सर्व सत्ता बहामनी सुलतानांच्या हातांत गेली. व त्यांनीं दौलताबाद, नंतर गुलबर्गा आणि बेदर आपली राजधानी केली. इ. स. १४९० मध्यें सुभेदारानें बंड उभारून आपण स्वतंत्र झाला व त्यानें निजामशाई घराण्याचा पाया घातला. व जयस्थानावर अहमदनगरचें शहर व किल्ला बांधला. सोळाव्या शतकांत कोंकणांत कल्याणपर्यंत या राज्याचा विस्तार झाला होता. परंतु विजापूरचे बादशहा व दुसर्‍या बाजूस खानदेशमधील फरुकी घराणें यांनीं त्याची वाढ खुंटविली. इ. स. १६०० पर्यंतचा या राज्याचा इतिहास म्हणजे आत्मसंरक्षणार्थ व राज्यविस्तारार्थ केलेल्या लढायांची हकीकत होय. ह्या वेळेस मोंगल लोकांनीं तें जिंकले. मलिकंबरने पुन: स्वातंत्र्य मिळविलें व तें इ. स. १६३५ मध्यें शहाजहाननें जिंकून घेई तों पर्यंत टिकलें. अवरंगजेबाच्या कारकीर्दींत मराठ्यांच्या हल्ल्यास सुरुवात झाली व मोंगल सत्ता नष्ट झाल्यावर इ. स. १७५९ मध्यें किल्ला मराठ्यांच्या हस्तगत झाला. इ. स. १७९७ मध्ये पेशव्यांनीं तो प्रात शिंद्यानां दिला व इ. स. १८१७ मध्यें पेशवाई बुडल्यावर तो इंग्लिशांच्या हवाली झाला. गेल्या बोअर युद्धांत येथें बोअर कैदी आणून ठेविले होते.

या प्रांतांत डोंगरातील कोरीव देवळें व हेमाडपंती इमारतींचे अवशेष पुष्कळ आहेत. ढोकेश्वराची पारनेर येथील कोरीव देवळें सहाव्या शतकांतील असावीं. हरिश्चंद्रगड येथील देऊळ हेमाडपंती कालातील आहे. मुसुलमानी अमदानींतील कांहीं इमारतींचे अवशेष दृग्गोचर होतात. वरील हेमाडपंती देवळें देवगिरीच्या यादवांच्या वेळचीं असावीं. पेडगांव येथील लक्ष्मी नारायणाचें देऊळ सुंदर नकशीकाम करून सुशोभित केलेलें आहे व बाहेरच्या भिंतीवरहि पुष्कळ खोदीव चित्रें आहेत. या प्रांतांत प्रसिद्धीस आलेले किल्ले बरेच आहेत. अहमदनगरच्या उत्तरेस डोंगरगांव  टेंकड्यावर मांजरसुंबा नांवाचा किल्ला फार पुरातनकालीं वाल्मिकी ॠषीचें निवासस्थान होता असें सांगतात. अकोल्याच्या पश्चिमेस १८ मैलावर रतनगड नांवाचा किल्ला आहे. सिद्धटेक व मिरी येथें महत्त्वाचीं मंदिरें आहेत.

शहरें व खेडी मिळून १३४९ आहेत. इ. स. १९२१ मध्यें लोकसंख्या ७,३१,५५२ होती.

मुख्य शहरें - अहमदनगर (जिल्ह्याचें मुख्य ठिकाण;) संगमनेर, पाथर्डी, वांबोरी व खर्डा. शेंकडा ९० लोकांची भाषा मराठी आहे. भिल्ल, लोक मराठीपासून झालेली एक भाषा बोलतात. इ. स. १९०१ मध्यें शेंकडा ९० हिंदू शें, ५ मुसुलमान, शें २ ख्रिश्चन. १६२५४ जैन होते. परंतु विशेष वस्ती मराठ्यांची आहे. हा शेतकरी व कारागीर वर्ग आहे. महार, मांग, चांभार, तसेंच वंजारी, कैकाडी, कोल्हाटी, या लोकांची वस्तीहि बरीच आहे. डोंगरी जातींपैकीं भिल्ल, ठाकूर आणि काथोडी हे नांवें घेण्याजोगे आहेत. कांहीं वस्ती ब्राह्मण, कोळी, माळी यांची आहे. इंग्रजी राज्यापासून मारवाडी लोकांचा भरणा बराच होऊं लागला आहे.

शेंकडा साठ लोक शेतकीवर उपजीविका करणारे आहेत. उद्योगधंदे व व्यापार करणारे लोक अनुक्रमें शें. १८ व १ आहेत. अमेरिकन मिशन नांवाची एक ख्रिस्ती संस्था आहे. इ. स. १९०१ मध्यें एकंदर २०००० ख्रिस्ती लोक होते. या लोकांच्या बर्‍याच शाळा व प्रार्थना मंदिरें आहेत.

शेतकी: - जमीन तीन प्रकारची आहे. काळी, तांबडी बरड व पांढरी. उत्तर व पूर्व भागांत इतर भागांपेक्षां जमीन, जास्त सुपीक आहे. शेतकर्‍याजवळ सरासरी एक बैलजोडी असते व बाकीचे बैल उसने मागून आणून वेळ मारून न्यावी लागतें इतका शेतकरी वर्ग निकृष्ट स्थितींत आहे.

बहुतेक जमीन रयतवारी आहे व फक्त शेंकडा १३ या प्रमाणांत जमीन इनाम किंवा जहागीर आहे. इ. स. १९०३-०४ मध्यें ४८७१ एकर जमीन पिकास आली होती. व ९८ एकर जमीनीस बाहेरून पाणी मिळत होतें; ८५ एकर पडीत होती व ८४९ एकर जंगल होतें.

जवारी आणि बाजरी हीं खाण्याचीं धान्यें आहेत. येथें पिकणारीं धान्यें व त्यांसाठी लागवडीस येणार्‍या जमीनीच्या चौरस मैलांचे आंकडे पुढें दिले आहेत. ज्वारी १०६४ बाजरी १५५६, गहूं ३२९, चणे १२३, तूर १०५ मठ १०३, कुळिथ ११५, कापूस २२५, सण ४०, तीळ ५७, जवस ५०. थोडासा ऊंस, तंबाकु आणि भाजीपाला हीहि पिकतात.

सरकारचा अस्सल भिमथडी घोड्याची पैदास करण्याचा प्रयत्‍न चालू आहे.

८४९ चौरस मैल जंगलापैकीं ४५८ चौरस मै. जंगल खात्याच्या ताब्यांत आहे. व खात्याचें वार्षिक उत्पन्न सुमारें २५००० रुपये आहे. मैदानांत बाभूळ, बोर, निंब, तिवस, करंज, हिवर हीं झाडें होतात. टेंकड्यांवर सागवान, धावडा व खैर होतात.

जंगलांत अंजन, जांभूळ, बेहडा, ऐन, आणि करवंद ही झाडें असतात.

खनिज संपत्ति - चुनखडी सर्व जिल्ह्यांत विपुल सांपडते. अहमदनगराजवळ निळा बसाल्ट दगड चांगला तयार होतो. रांगोळीचा दगड, शिवधातु, गोमेद व स्फटिक श्रीगोंदे तालुक्यांत आणि व अकीकासारखे दगड नगर शहराजवळच्या डोंगराळ प्रदेशांत सांपडतात.

व्यापारधंदे - साड्या, पागोटीं, आणि पितळेचीं व तांब्याचीं भांडीं होतात. पूर्वी कागद व सतरंज्या होत असत. परंतु ते धंदे सध्यां बुडाले आहेत. या भागांत कांहीं जिनिंगचे कारखाने आहेत व त्यांत कांहीं लोकास काम मिळतें.

पूर्वी वंजारी लोकांच्या मार्फत उत्तर हिंदुस्थान व समुद्रकिनारा याशीं व्यापार चालत असे. परंतु आगगाडी सुरू झाल्यापासून सर्व व्यापार रेल्वेनें चालतो. ह्या भागांतून ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वे व निझामची हैद्राबाद गोदावरी व्हॅली रेल्वे या गेल्या आहेत.

या भागांत अवर्षण पुष्कळदां पडतें. नुकताच १९२१ सालीं या जिल्ह्यांत मोठा दुष्काळ पडला होता.

या जिल्ह्याचे एकंदर अकरा - तालुके केलेले आहेत. ते असे:- अहमदनगर, पारनेर, श्रीगोंदे, करजत, जामखेड, शेगांव, नेवासा, राहुरी, कोपरगाव, संगमनेर आणि अकोला. कलेक्टरच्या हाताखालीं दोन असिस्टन्ट व एक डेप्युटिकलेक्टर असतो.

ब्रिटीश अंमलाच्या अगोदर येथें तीन प्रकारच्या जमीनधार्‍याच्या पद्धती होत्या. एक भुंड, दुसरी कास आणि तिसरी टिकास. हे शब्द द्रविड भाषेंतून आले आहेत. भुंड म्हणजे मोठाल्या जमिनी; या जमिनीवरील सारा एकदाच ठरविण्यांत आलेला होता. दुसर्‍या जमीनी आकाराने लहान असत. ही पद्धत राष्ट्रकूट, चालुक्य व यादव राजाच्या वेळेस होती. नंतर मलिकंबरानें नवी पद्धत सुरू केली. त्यानें योग्य, बेताचा व निश्चित सारा ठरवून शेतकर्‍याचा जमिनींत प्रत्यक्ष हितसंबंध उत्पन्न केला. सगळा मालकी हक्क राजाकडे न ठेवतां त्यानें जमीन करणार्‍यास काहीं हक्क दिले. त्यानंतर मराठ्यांनीं आपली पद्धत सुरू केली. परंतु मध्यंतरीं घोटाळे उत्पन्न होऊन नाना फडणवीसास त्यांत बराच बदल करावा लागला. इ. स. १८९० च्या सेटलमेंटप्रमाणे कोरडवाहू जमिनीवर १० आणे, भातखाचर जमिनीवर रु.१-९-० आणि बागाईत जमिनीवर रु. १-८-० प्रमाणें दर एकरी सारा बसविण्यात आला.

इ. स. १९०३ -०४ मध्यें जमीन उत्पन्न रु. १५४१००० व एकंदर उत्पन्न रू.१८९२००० होतें.

या जिल्ह्यांत अहमदनगर, भिंगार, संगमनेर, वांबोरी आणि खर्डा या ठिकाणीं म्युनसिपालिट्या असून एक जिल्हा बोर्ड व ११ तालुका बोर्डें आहेत. लोकलबोर्डांचें सालीना सरासरी उत्पन्न दोन लक्षाचें आहे व म्युनसिपालिटीचें उत्पन्न १॥ लक्ष आहे. दरवर्षी ७०००० रुपये रस्ते व इमारती प्रीत्यर्थ खर्च होतात.

जिल्ह्याला एक पोलीस सुपरिन्टेडेन्ट आहे व त्याच्या हाताखालीं दोन इंस्पेक्टर्स आहेत. १६ पोलीस चौक्या आहेत. पोलीसची संख्या ७७२ आहे. अहमदनगर येथें मुख्य तुरुंग असून बाहेर अकरा लहान तुरुंग आहेत.

इ. स. १९०१ मध्यें शेंकडा ४.७ लोक शिक्षित होते. इ. स. १९०३ -०४ मध्यें या भागांत ४१२ शाळा होत्या व त्यात १४८८४ मुलें व मुली शिकत होतीं.

अहमदनगर येथें इस्पितळ सोडून ९ दवाखाने आहेत. यावर १७२१९ रुपयें खर्च झाला. त्यांतून १००२४ रुपये म्युनसिपालिटी व लोकलबोर्ड कडून मिळाला.

इ. स. १९३-०४ मध्यें २३३५४ लोकांना देवी टोंचण्यांत आल्या.

ता लु का.- अहमदनगर जिल्ह्यांतील एक तालुका उत्तर अक्षांश १८० °४७' तें  १९० °१९'  आणि पूर्व रेखांश ७४० °३२' त ७५० २' क्षेत्रफळ ६२४ चौ. मै. यांत अहमदनगर, जिल्ह्यांचे मुख्य ठिकाण (लो. सं. ३५७८४) व भिंगार (लो. सं. ५७२२) हीं दोन शहरें व ११७ खेडीं आहेत. इ. स. १९११ मध्यें लोकसंख्या १२९१०९ होती. इ. स. १९०३-०४ मध्यें जमिनीच्या सार्‍याचें उत्पन्न १.७ लक्ष होतें आणि इतर करांचें उत्पन्न रु. १३५०० होतें. हा तालुका भीमा व गोदावरी या दोन नद्यांमधील एक डोंगरपठार आहे. या भागांत जंगल वगैरे फार थोडें आहे व जमीन हलक्या प्रतिची आहे. जरी पाऊस फार बेताचा पडतो तरी हवा निरोगी आहे. सरासरी पाऊस २२ इंच पडतो.

श ह र.- जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. उत्तर अक्षांश १९० °५' व पूर्व रेखांश ७४० °५५' हें पुणें शहरापासून ७२ मैलांवर दौंड मनमाड रेल्वेवर सिना नदीच्या उत्तर तीरावर वसलेलें आहे. याचें क्षेत्रफळ २ चौरस मैलापेक्षा काहीं जास्त आहे. लोकसंख्या (१९११) ४२९४०. इ. स. १९०१ मध्यें कान्टोंनमेंट धरून लोकसंख्या ४२०३२ होती. त्यापैकीं हिंदु ३१०३०, मुसुलमान ५९६८ आणि ख्रिश्चन ३५७२ होते. काहीं ब्राह्मण लोक दुकानदार आहेत. मुसुलमान लोक बहुतेक आळशी व अशिक्षित आहेत. त्यांचा धंदा-कापड विणणें, कापूस पिंजणें व श्रीमान हिंदु लोकांच्या घरीं नोकरी करणें हा आहे. शहर दिसण्यांत साधें आहे. शहरासभोंवार हुसेन निझामशहानें बांधलेला तट आहे. तो हल्लीं बहुतेक पडला आहे.

हे शहर इ. स. १४९० च्या सुमारास अहमद निझाम शहानें बसविलें. (अहमद निझामशहा पहा) व त्यास त्यानें आपलें नाव दिलें. हा ब्राह्मणी राजांच्या वेळीं एक सुभेदार होता व तें राज्य मोडल्यावर यानें स्वतंत्र राज्य स्थापिलें. याच्यावेळीं उत्तरेस दौलताबाद व खानदेशचा काहीं भाग येथपर्यंत राज्याचा विस्तार झाला. इ. स. १५०८ मध्यें त्याच्यामागून त्याचा मुलगा बुर्‍हाण निझामशहा राज्यारूढ झाला व त्याच्या मरणांनंतर इ.स. १५५३ मध्यें त्याचा मुलगा हुसेन निशामशहा गादीवर आला. याच्यावेळीं इ. स. १५६५ मध्यें विजापूर गोवळकोडा, बेदर अहमदनगरचे राजे एकत्र जमून त्यांनीं विजयनगरचा रामराजा याशीं तालिकोटचा संग्राम केला. याच्यापूर्वीं विजापूरकरांनीं अहमदनगरवर स्वारी करून पुष्कळ लूट नेली होती. त्यांत सध्यां विजापूर येथें असलेली ''मुलूख मैदान'' तोफहि नेली. याच्यामागून मूर्तिजा निझामशहा गादीवर आला. पण इ. स. १५८८ मध्यें त्याच्या मुलानें त्याचा खून करून गादी बळकाविली. मिरान स्वत: लवकरच मारला गेला व त्याचा चुलत भाऊ इस्माइल निझामशहा तख्तावर आला. पण त्याच्या बापानें त्याला पदच्युत करून तो बुर्‍हाण निझामशहा (दुसरा) या नांवानें राज्यारूढ झाला. तो. इ. स. १५९४ सालीं मेला. नंतर इब्राहिम निझामशहा हा गादीवर आला पण थोडयाच दिवसांत विजापुरकरांशीं झालेल्या युद्धांत तो मरण पावला. तेव्हां त्याच्या अल्पवयी मुलाच्या नांवानें चांदबिबीनें राज्य चालविलें. इ. स. १५९६ पासून १६३५ पर्यंत मोंगलांनीं अहमदनगरचें राज्य बुडविण्याचा प्रयत्‍न केला व शेवटीं शहाजहाननें तें राज्य आपल्या राज्यास जोडिलें (निझामशाही पहा.). इ. स. १७५९ मध्यें तें पेशव्यांच्या हातांत गेलें.

मराठ्यांशीं अहमदनगरचा संबंध बरेच वेळां आला असल्यामुळें त्यांच्या पत्रव्यवहारांत अहमदनगरसंबंधीं बातम्या अनेक वेळां आढळतात. उदाहरणार्थ शिवाजीनें राघोपंताबरोबर बादशहाकडे जुन्नर व अहमदनगर येथील देशमुखीविषयीं पत्र पाठविलें होतें. त्याला उत्तर ''आम्हीं हुजूर गेल्यानंतर हा मजकूर घडोन येईल.'' असें बादशहा देतो. ३० नोव्हेंबर १६४९ (रा. खं. ८.४,३.)

हा किल्ला कांहीं दिवस अमात्याकडे असावा असें दिसतें. रामचंद्र पंडित अमात्य यांच्या संरजामयादींत नगरहवेलीचा उल्लेख आहे. १७३१ (रा. खं ८.१२२,१४८).

अहमदनगरशीं संबंध प्रामुख्यानें बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दींत आला. नबाब सलाबत जंगाचें अहमदनगरास युद्धाचें बरेंच साहित्य होतें अशी ७ सप्टेंबर १७५१ च्या पत्राच्या शेवटीं बातमी आहे; (रा. खं. १ ४, १८). निझाम केदल पावळहून अहमदनगरास जाणार आहेत असें रघुनाथ गणेश पेशव्यास ता. १३ नोव्हेंबर १७५१ रोजीं लिहितो (रा. खं. १. १३, ३७.).

शहानवाजखाननें अहमदनगरचा किल्ला पेशव्यांस पाहिजे असें पाहून गुप्तपणें नजर केला पण ''परवाने जागिरीचे झाल्यानंतर'' ही गोष्ट उघड करावी त्यापूर्वीं माहसरा न करावा असें कृष्णाजी त्रिंबक पेशव्यास लिहितो २७ जून १७५७ (रा. खं. १. ६८,१३२ टीप-पेशव्यांच्या दरबारी असलेला निजामाचा वकील कविजं यानें उदगीरच्या लढाईच्या अगोदर हा किल्ला उघडपणें पेशव्यांनां दिला].

उदगीरच्या स्वारीच्या धामधुमींतहि नगर हें महत्त्वाचें ठाणें होतें. तें 'नगरच्या किल्ल्याभोंवतीं चौक्या बसवून रसद बंद केल्याचें' वर्तमान दत्ताजी शिंदे ता. २२ आगष्ट १७५७ रोजीं पेशव्यास लिहितो (रा. खं.१.७३, १४२).

निजामानें नगर पेशव्यास द्यावें यासंबंधीं जीवनराव-खासगीवाल्यानें लिहिलेल्या पत्राचा कृष्णाणी त्रिंबक केवळ उल्लेख करितो. २५ सप्टेंबर १७५७. (रा. खं. १.८०,१५२)

अखेर पेशव्यांनीं येथील किल्ला घेतला तें वर्तमान २१ डिसेंबर १७५९ च्या पत्रांत गोविंदपंत बुंदेले लिहितो कीं ''कार्तिक वद्य ५ श्रीमंत स्वामींनीं अहमदनगरचा किल्ला घेतला. (रा. खं. १. १४७,२३४.) (कविजंगानें १० आक्टोबर १७५९ रोजीं किल्ला पेशव्यांच्या हातीं दिला.]

१३ जानेवारी १७६० रोजी सदाशिवराव भाऊ गोविंदपंतास लिहितात कीं, निजाम अल्ली कराराप्रमाणें दहा लाखाची जागीर व नगर व परांडा असे दोन किल्लें सरकारांत देईना तेव्हां फौज जमा करून नगरचा किल्ला घेतला.-(रा. खं. १. १५४,२४३; १६६,२५८)

नानासाहेब आमदानगराहून कूच करून पडदुरास गेले असें बाबूराव गोविंदपंतांनां कळवितो. १६ मार्च १७६०. (रा. खं.१.१६८,२६६)

राघोबादादा व थोरले माधवराव यांच्यामधील कलह चालला असतां या किल्ल्याच्या आसपास सैन्याच्या हालचाली चालू होत्या. ''दादासाहेबांचें कूच नगराहून होऊन चारोळ्यास मु॥ आले'' असा मजकूर १६८४ कार्तिक वद्य ४च्या पत्रीं आहे. (रा. खं. १० ६,३.)

माधवराव बल्लाळ पेशवे महादजी नारायण गोसावी यांस लिहितात कीं, ''तालुके अमदानगर येथील सालमजकुरींचा बेहेडा झाला आहे.-तरी....कागद बेहेड्याचे उपयोगी पाठवून द्यावे. १६९३ आश्विन.व॥(रा. खं.१०.७६,४१)

नरसिंगराव धायगुडे चारशें राउतानिशीं नगरास दाखल झाल्याचा उल्लेख आहे. १६९६ चैत्र वद्य ८ (रा. खं. १०.१२४,७९)

दादासाहेब नगरावरून टोंक्यास गेल्याचें लिहिलें आहे. १६९६ अधिक वैशाख शु॥ १. (रा. खं. १०.१३०,८२)

निझामानें हा किल्ला घेण्याची खटपट चालविलेलीहि दिसून येतें.

जावीतजंग हरि बल्लाळजवळ पूर्वीं कबूल केल्याप्रमाणें नगर व अशेरी हे दोन किल्ले मागतात पण हरि बल्लाळ त्यानें एखादी लढाई मारल्याशिवाय देण्याचें नाकारतात असा मजकूर १६९७ फाल्गुन शु॥ ८ च्या पत्रांत आहे. (रा. खं. २.१३३,६८४.)

पुढें या किल्ल्याचा उपयोग राजकीय कैदी ठेवण्याकडे केला जात असे. मोरोबादादास नगरच्या किल्ल्यांत ठेविलें. पत्र १७०० अश्विन शु॥१. (रा. खं. १०.१९४,१३४.)

किल्ले नगरची असामी दूर करून दुसरीकडे सांगितली आहे. २ नोव्हेंबर १७८१. (रा. खं. १०.२६९,१९५.) वरील प्रमाणेंच १७०१ वै. शु.२ (रा. खं. २०.२९९,२२३.)

हा किल्ला पुढें दौलतराव शिंद्यास पेशव्यांनीं दिला त्या संबंधीं दौलतराव शिंद्यानें सरकारांत निकड लाविलेली पुढील पत्रांत दिसते. ''नगरचा किल्ला व दौलताबादचा किल्ला, महाल सरंजामी सुदामतपासोन आहेत. त्यासुद्धां दोन्ही किल्ले द्यावे'' १७१८. (रा. खं. १०,४६०,३६९.)

या बाबतींतच नगरांहून बक्षी व बाळोबा तात्यास आणावयास श्रीमंतांनीं सांगितलें. पत्र १७२१ (रा. खं. १०.४९१३,८६.)

दौलतराव शिंदे स्वत: नगरास गेल्याचाहि उल्लेख एका पत्रांत आहे. १७२२ पौष वद्य १० (रा.खं १०.५१५,४०२.)

''आज वर्तमान ऐकिलें कीं, किल्ले नगर शिंद्यांनीं सरकारांत श्रीमंतास दिल्हे. काम काज किल्ल्याचे सरकारांतून रा. यशवंतराव सुभेदार यांजकडे सांगितलें म्हणोन, आज तिसरे प्रहरापासून वदंता आहे, '' असें परशराम भट धर्माधिकारी नानांस लिहितो. १७२२ माघ वद्य १ (रा. खं. १०.५१८,४०४).

पेशवाईच्या अखेरीच्या धामधुमींतहि नगरच्या किल्ल्यानें भाग घेतला होता. 'डाल-टन कंपू पलटण अहमदनगर' याचा मुक्काम कायगांवीं झाल्या वेळचा प्रकार वर्णिला आहे. १७२३ भाद्रपद वद्य. ५ (रा. खं. १०.५४०,४१९.)

'पुण्याकडील सखाराम घाटग्या नगरास दो चौ दिवशीं येतील. पुण्यास नाकेबंदी श्रीमंताची बसली' असें बापू गोखले लक्ष्मीनारायण दीक्षितास लिहितो. १७२४ वैशाख वद्य ९ (रा. खं. १०.५६६,४३२)

पेशव्यांनीं अहमदनगर १७९७ मध्यें दौलतराव शिंद्यास दिलें. ते इ. स. १८१८ मध्यें पेशवाईचा अंत झाल्यावर इंग्लिशांच्याकडे आलें.

शहराच्या पूर्वेस अर्धामैल अंतरावर अहमदनगरचा किल्ला आहे. हा वर्तुलाकार असून त्याचा परिघ १॥ मैल आहे व त्याच्या सभोंवार एक रुंद व खोल खंदक आहे. हा किल्ला इ. स. १५५९ मध्यें हुसेन निझामशहानें एका पूर्वींच्या मातीच्या किल्ल्याच्या ठिकाणीं बांधला. गांवांत पुष्कळ उत्तम मशिदी आहेत. त्यांचा सध्यां सरकारी कचेर्‍या व अधिकार्‍याचे राहण्याचे बंगले म्हणून उपयोग केला जातो. शहराच्या पूर्वेस ६ मैलांवर चांदबिबीचा महाल म्हणून एक इमारत आहे. दगडी मशीद, करिबाग, अहमद निझानशहाची कबर आणि अलमगीरचा दर्गा हीं दुसरीं कांहीं प्रेक्षणीय स्थळें आहेत.

अमेरिकन मराठी मिशनचा बराच मोठा व्यापार या ठिकाणीं दृष्टीस पडतो. महाराष्ट्रीयन ख्रिस्ती येथें पांच सहा हजार आहेत.

इ. स. १८५४ मध्यें या शहरास म्युनिसिपालिटी मिळाली. इ. स. १९०१ मध्यें सरासरी उत्पन्न १ लक्षाचें होतें.

अहमदनगर हें मुख्य लष्करी ठिकाण आहे. येथे गेल्या महायुद्धाच्या वेळी जर्मन कैदी ठेवले होते.

मुख्य उद्योगधंदे:- लुगडीं विणणें व तांबें पितळेचीं भांडीं करणें. मिशनच्या एका कारखान्यांत उत्तम सतरंज्या तयार होतात. एक कापसाचा, एक कातड्याचा व एक निळीचा असे तीन व्यापारी कारखाने आहेत.

दोन इस्पितळें, पांच हास्कुलें, दोन औद्योगिक शाळा, दोन वाचनालयें व इतर शिक्षणसंस्था आहेत.

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .