विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अहमदपूर (शरकिया) त ह शी ल-(पंजाब) भावलपूर व निझामत यांत असलेली एक तहशील. ही पंचनद व सतलज नदीच्या दक्षिण व पश्चिम बाजूस आहे. उत्तर अक्षांश २७०° ४६' तें २९० °२६' व पूर्व रेखांश ७०० °५४' ते ७१० °३२'. क्षेत्रफळ २१०°७ चौरस मैल. इ. स. १९११ मध्यें लोकसंख्या ११०९९४ होती. यांत अहमदपूर (तहशिलीचें मुख्य ठिकाण) आणि बाकीचीं १०१ खेडीं आहेत. यांत हक्रा नांवाचा सखल प्रदेश आहे, या प्रदेशावरून पूर्वीं सतलजचा प्रवाह वहात होता असें म्हणतात. या तहशिलीचें उत्पन्न इ. स. १९०५-६ मध्यें २.२ लक्ष होतें.
श ह र (पूर्व) - अहमदपूर तहशिलीचें मुख्य ठिकाण. उत्तर अक्षांश २९°० ८' पूर्व रेखांश ७१°० १६. हें शहर नॉर्थ-वेस्टर्न-रेल्वेवर भावलपूरच्या नैर्ॠत्येस २० मैलांवर आहे. इ.स. १९११ मध्यें लोकसंख्या ४७२ होती.
हें इ. स.१७४८ मध्यें बसवलें गेलें व इ. स. १७८२ मध्यें भावलपूरचा नबाब दुसरा भावलखान यास त्याच्या सासर्याकडून मिळालें.
या शहरांत एक इंग्रजी ४ इयत्तेपर्यंत शाळा व एक दवाखाना आहे. येथें ''सोडा कार्बोनेट'' चा व्यापार मोठा चालतो. तसेंच जोडे व मातीचीं भांडीं बाहेर मोठ्या प्रमाणावर पाठविली जातात. शहराला म्युनिसिपालिटी असून तिचें उत्पन्न इ. स. १९०३ -४ मध्यें १२१०० रुपये होतें व तें सर्व जकातीपासून झालेलें होतें.