प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

अहमदाबाद -, जि ल्हा. (मुंबई इलाखा) उत्तर भागांतील एक जिल्हा. उ. अ. २१°० २६' ते २३०° ३१' व पू. रे. ७१°० १९' ते ७३°० २७'. क्षेत्रफळ ३८१६ चौरस मैल.

सीमा-पश्चिम व दक्षिण दिशेस काठेवाड द्वीपकल्प, उत्तरेस बडोदें संस्थानचा उत्तर भाग; ईशान्येस महिकाठा एजन्सी; पूर्वेस बालासिनोर संस्थान व खेडा जिल्हा. आग्नेयीस खंबायतचें आखात व संस्थान.
    
स्वरूप.- या प्रांताच्या एकंदर रचनेवरून असें दिसतें कीं, येथें फार पुरातन काळीं नव्हे तर बरेच अलीकडे समुद्र होता. खंबायतचें आखात व कच्छचें रण यांच्यामधील मुलूख अजून भरतीच्या वेळीं पाण्यानें व्याप्त होतो. अगदीं दक्षिणेस आणि उत्तर सीमेच्या जवळ थोडेसे दगडी पहाड आहेत बाकी एकंदर प्रदेश सपाट मैदान असून पूर्व व उत्तर दिशांकडे चढ आहे.

या प्रदेशाचें मुख्य अंग म्हणजे साबरमती नदी. ही ईशान्येस अरवली डोंगराच्या एका टोंकास उगम पावून नैर्ॠत्येस वाहात जाहून खंबायतच्या आखातास मिळते. खारी, मेशवा, आणि माछाम या नद्या हीस मिळतात. काठेवाड कडून पूर्वेस वाहात जाणार्‍या नद्या-भोगाव, भादर, उटावली, निलकी, पिंजरीया, आणि अधिया. खारी नदीचा एक १६ मैल लांबीचा कालवा काढून त्यानें ३००० एकर जमिनीस पाणी पुरविलें आहे. नाल या नांवाचे एक मोठें सरोवर अहमदाबाद शहरापासून ३७ मैलांवर विरमगांव तालुक्यांत आहे. त्याचें क्षेत्रफळ ४९ चौरस मैल आहे. धोलेरा, गोध्रा, व बवलिआरी या तीन महत्त्वाच्या खाड्या आहेत.

या जिल्ह्यांतील जमीन बहुतेक मळईची बनलेली आहे. पण मळई खोलपर्यंत नाहीं. त्या खालील थर बहुधां त्रिस्तर (टर्शिअरी) सितोपल (क्रेटॉसिअस) कालांतील असावेत. दक्षिणेकडचा काळवथरी दगड धंधुका तालुक्यासारख्या ठिकाणीं दृष्टोत्पत्तीस येतो. एकंदरींत सर्व प्रदेश रुक्ष असून झाडी फार थोडी आहे.

मुख्य झाडें - आंबा, मोह, लिंब, हलका सागवान, बांबू तसेंच खैर, बाभूळ, पिंपळ व बोर्डि हीं झाडें मोडास डोंगरावर होतात. यांचा उपयोग खाण्याकडे, औषधीकडे व रंग व कातडीं कमविण्याकडे होतो. खैर, व बाभूळ यांचा डिंक लोक खातात. पिंपळ व बोर्डि या झाडांपासून लाख तयार होते मोहाचीं फळें धान्याबरोबर उकडतात. डोरी झाडाचीं पानें हीं भिल्ल लोकांचें आवडतें अन्न आहे. त्यांच्या बियांपासून निघणार्‍या तेलाचा साबण बनतो.

जंगलांतील वाघ बहुतेक नाहींसे झाले आहेत. मोडासमध्यें चित्ते आहेत व लांडगे, नालसरोवरच्या कांठीं असतात. रानटी कुत्रे पुष्कळ आहेत. मासेहि विपुल मिळतात.

उष्णतापमान किमान ४७० अंशावर येतें व कमाल म्हणजे ११५० °पर्यंत चढतें.
    
पावसाचें सरासरी मान २९ इंच असतें. प्रदेश सखल व सपाट; व नद्यांचे प्रवाह वांकडे तिकढे असल्यामुळें पुरामुळें पुष्कळ नुकसान पोहोंचतें.

इ ति हा स - (इ. स. ७४६-१२९८) अनहिलवाड राजांच्या कारकीर्दींत येथील जमिनींत पाहिल्यानें नांगरून पीक घेण्यास सुरुवात झाली. हे राजे जरी बलवान व संपत्तिवान् होते तरी त्यांच्या कालीं तसेंच गुजराथच्या मुसुलमानी राजांच्या काळीं पुष्कळ प्रदेश भिल्ल नायकांच्या ताब्यांत होते.

जेव्हां अकबरानें गुजराथ आपल्या राज्यास जोडिली तेव्हां या भिल्ल नायकांनीं त्याचें मांडलिकत्व कबूल केलें. मुसलमानी राजांच्या वेळीं अहमदाबाद सरकार हें गुजराथ सुभ्याचें राज्यकारभाराचें मुख्य ठिकाण होतें. सध्याचा अहमदाबाद जिल्हा हा पूर्वींच्या ''सरकार'' एवढाच आहे. इ. स. १७५३ मध्यें मराठ्यांनी हा प्रांत जिंकून घेतला. त्यांनीं मध्य प्रदेशांत राज्यव्यवस्था केली पण बाजूचे संस्थानिक जोपर्यंत मित्रत्वानें वागून खंडणी देण्यास तयार होते तोपर्यंत  त्यांना त्रास पोहचला नाहीं. इ. स. १८०३ मध्यें इंग्लिशांनां हा प्रांत मिळाल्यावर त्यांनीं पूर्वींचे संस्थानिक तसेच ठेवले. फक्त खंडणीची रक्कम पुष्कळ वाढविली.

 

भावनगरच्या राजांनीं धोलेरा भागांत आपणाकरितां मुलूख मिळविण्याची खटपट केली. धोलेरा संस्थानानें मुंबई सरकारनें आपणास आपल्या संरक्षणाखालीं घेऊन जुलुमापासून बचाव करावा अशी विनंती केली. इ. स. १८०२ मध्यें गायकवाडाच्या (पेशव्याच्या मुख्त्यार) संमतीनें तें संस्थान इंग्लिशांनीं आपल्या संरक्षणाखालीं घेतलें. इ. स. १८०३ मध्यें धोलेरा हें तैनातीफौजेच्या खर्चाकरितां इंग्लिशांच्या ताब्यांत देण्यांत आलें.

इ. स. १८०५ पासून ही ठिकाणें खेडा कलेक्टराच्या अंमलाखालीं आलीं. इ. स. १८१८ मध्यें पेशवाई मोडल्या वर अहमदाबाद निराळा जिल्हा करण्यांत आला.

या भागांत कलेच्या दृष्टीनें उत्तम हिंदु व मुसलमानी इमारती, अहमदाबाद शहर व उपांत भाग जो सरखेज व बाटवा, तेथें पुष्कळ आहेत. धंधुका तालुक्यांतील भीमनाथ गांवीं एक शंकराचें देवालय आहे. त्याचा संबंध पांडवाशीं पोहचवितात. अदालज मुक्कामीं अहमदाबाद शहराच्या उत्तरेस १२ मैलांवर एक उत्तम पायर्‍याची विहिर आहे.

लोकवस्ती – इ. स. १८५७ मध्यें या जिल्ह्यांतील लोकसंख्या अजमासें ६५०२२३ होती. इ. स. १८९१ मध्यें ९२१५०७ होती पण १८९१ ते १९०१ या दहा वर्षांत दुष्काळ व महामारीच्या उपद्रवानें पुष्कळ लोक नाहींसे झाल्यामुळें त्या वर्षीं लो. सं. ७९५९६७ होती. यांतील ९०७४५ लोक साक्षर होते; हिंदुलोक शेंकडा ८४ व मुसलमान लोक शेकडा ११ व ख्रिश्चन लोक ३४५० होते. १९२१ सालीं लोकसंख्या ८९०९११ भरली. म्हणजे १९११ सालांतल्या पेक्षां शेंकडा ७.६ नीं वाढली. प्रांताची भाषा गुजराथी आहे.

मुख्य शहरें - अहमदाबाद, विरमगांव, धोलका धुंधुका, प्रांतिज, धोलेरा, मोडास, व सानंद हीं होत. व्यापारी वर्गाचें (बनिया) महत्त्व विशेष आहे. श्रावक अथवा जैन व्यापारी ब्राह्मणानुयायी व्यापार्‍यांपेक्षां जास्त सधन आहेत. जरी अहमदाबाद हें मुंबई इलाख्यांत पहिल्या प्रतीचें कारागिरीचें ठिकाण आहे तरी पुष्कळ लोक शेतकीवर उपजीविका करतात. शेतकरी वर्गांत कुणबी, रजपूत; कोळी, बोहरी व दुसरे मुसुलमान लोक येतात. मुलींचीं लग्नें अतिशय खर्चाची बाब असल्यामुळें मागें मुली मारण्याचा प्रघात होता, तो कायद्यानें बंद करावा लागला.

केडा कुणब्यांत प्रचारांत असलेले विवाह विधी ध्यानांत ठेवण्याजोगे आहेत. जेव्हां चांगलें स्थळ मिळणें अशक्य होतें तेव्हां मुलीचें लग्न एका पुष्पगुच्छाशीं लावितात व तो गुच्छ विहिारींत फेंकून देऊन ती मुलगी विधवा झाली असें समजून मग तिचा कमी खर्चाच्या नात्र पद्धतीनें विवाह लावतात. दुसरा प्रकार म्हणजे विवाहित माणसाशीं पूर्वीं काडी मोडून देण्याचा ठराव करून, मुलीचा विवाह मग नात्र पद्धतीने कोणाशींहि करण्यास मोकळीक होते.

रजपूत शेतकर्‍यांचे दोन भेद आहेत. एक गरासिया किंवा जमीनदार, व दुसरा खंडानें जमीन करणारा. ख्रिश्चन लोकांची संख्या कमी नाहीं. मिशनर्‍यांचा सुळसुळाट इकडेहि बराच आहे.

शेतकी : - जमीन दोन प्रकारची आहे. एक काळी व दुसरी भुरकट पांढरी. साबरमती नदीच्या खोर्‍यांत जमीन मळईपासून झाली आहे. कांहीं ठिकाणीं जमीन बेळगांव जिल्ह्याप्रमाणें तांबूस दगडाची आहे.

जमीनधार्‍याच्या पद्धती दोन प्रकारच्या आहेत. एक तालुकदारी व दुसरी रयतवारी. शेंकडा ६ जमीनी इनाम आहेत.

मुख्य पिकें - गहूं, बाजरी, जोंधळा, कापूस, भात इ.

गुरें.- धंधुका तालुक्यांतील गाई फार दूध देणार्‍या असतात. सर्व इलाख्यांत घोड्यांची निपज चांगली होते. सरकारी वळू घोडे असून काबुली व्यापारी काठेवाड, सिंध, अरब या जातींच्या घोड्यांची पैदास करतात.

व्यापार :- खाराघोडा येथें दोन मिठागरें आहेत. सुती कापड, पितेळीचीं व तांब्यांचीं  भांडीं, मातीचीं भांडी, लांकडांवरील खोदींव काम व जोडे, ब्लँकेटें इत्यादि जिन्नस तयार होतात. हा भाग गुजराथच्या सुलतानांच्या ताब्यांत आल्यापासून येथील कारागिरांची त्यांच्या कौशल्याबद्दल तसेंच जिनसांच्या सुबकपणाबद्दल ख्याति आहे. इ. स. १९०४ मध्यें येथें ३८ सुताच्या गिरण्या होत्या व त्यांत ६३२६३० चात्या व ७८५५ माग चालू होते व ४५०००००० पौंड सूत व २८०००००० पौंड कापड तयार झालें. आज त्यापेक्षां पैदास पुष्कळच वाढली आहे. आणि खेडोंपाडी खादी तयार करणें जोरानें चालू आहे.

येथें व्यापारी संघ इतर ठिकाणापेक्षां जास्त पूर्णावस्थेस पोहोंचले आहेत. प्रत्येक धंद्यांतील कारागीर अथवा व्यापारी यांच्या एखाद्या संघाचा सभासद असतो. अशा संघांत प्रत्येक घराण्यांतील वडील मनुष्य येऊं शकतो. प्रत्येक सभासदाला मत देण्याचा अधिकार असतो व निकाल बहुमतानें ठरतो. जेथें एकाच धंद्याचे पुष्कळ विभाग असतात तेथें प्रत्येक विभागाच्या कारागिरांचा एक स्वतंत्र संघ असतो. या संघाचा उद्देश कामाचे तास व दिवस नियमित ठरवून धंद्यांतील माणसांची आपापसांतील चढाओढीस सुमार ठेवावयचा. संघाचा निकाल मानला नाहीं तर दंड करण्यांत येतो. व दंड न दिल्यास त्या माणसास जातिबाह्य करण्यांत येतें. जर निरनिराळ्या जातींच्या लोकांचा तो संघ असेल तर संघांतील माणसें संघाचे ठराव न मानणार्‍यास काम मिळूं देत नाहींत. दंडाशिवाय धंद्यात नव्यानें शिरणार्‍या माणसाला कांहीं फी द्यावी लागते. ती. रु. ५० पासून ५०० पर्यंत धंद्याच्या महत्त्वाप्रमाणें असूं शकते. या होणार्‍या उत्पन्नांतून जातीचीं जेवणें व धर्मादाय होतो.

इ. स. ७४६ पासून सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत अहमदाबाद व्यापाराचें मुख्य ठिकाण होतें. परंतु पुढें सुरतेचें पाऊल पुढें पडूं लागलें तसें अहमदाबादचें महत्त्व कमी होऊं लागलें.

आयात व निर्गत माल अनुक्रमें :- साखर, लांकूड, धातू, धान्य, नारळ. व निर्यात माल:- कापूस, गळिताची धान्ये.
    
येथील व्यापार धोलेरा व घोगा या बंदरातून मुंबई बेटाशीं चालतो.

दळण वळण :-आगगाडी या भागांत सुरू होण्यापूर्वीं माळवा व मध्यहिंदुस्थानचा व्यापार अहमदाबादमार्फत होत असे. सर्व व्यापार बैलांच्या गाड्या व तांडे यांवरून होई. पन्नास वर्षांपूर्वीं या भागांत सडका नव्हत्या व पावसाचे दिवसांत व्यापार चालणें अशक्य होई. इ. स. १८७० पासून पुष्कळ रस्ते करण्यांत आले आहेत. इ. स. १९०३-०४ मध्यें १२४ मैल सडक व ३३७ मैल कामचलाऊ रस्ते तयार झाले होते. तसेंच बाँबे बरोडा रेल्वे, राजपुताना माळवा स्टेट रेल्वे, मेहसान-विरगांव फांटा वगैरे या प्रदेशांतून जातात.

कारभार :-अहमदाबाद जिल्ह्याचे सहा तालुके आहेत ते असे -दस्क्रोइ, सानंद, विरमगांव, धोलका, धंधुका, परांतीज; कलेक्टरच्या हाताखालीं दोन असिस्टंट कलेक्टर व एक डेप्युटि कलेक्टर हे सर्व व्यवस्था पहातात.

एक जिल्हा व एक सेशन्स न्यायाधीश आहे. त्याला खेडा जिल्ह्यांतील खटले तपासण्याचा अधिकार आहे. त्याच्या हाताखालीं पांच मुनसफ, एक स्माल काझेझ कोर्टाचा जज्ज, एक दुय्यम जज्ज व एक सहकारी जज्ज असतात. अहमदाबाद शहराला एक स्वतंत्र म्याजिस्ट्रेट असतो.

अहमदाबाद जिल्ह्यांत विशेष गोष्ट ही आहे कीं, येथील तालुकदार आणि मेवाशी लोकांच्या ताब्यांत मोठाल्या जमिनी आहेत. हे हिंदू व मुसलमान या दोन्ही जातीचे लोक आहेत. त्यांतील चुडासमा लोक पूर्वींच्या जुनागड येथील हिंदु राजघराण्यांतील वंशज आहेत. वाघेल जातींचे लोक सोळंकी वंशांतील आहेत. गोहेल लोक मारवाडांतून फार पुरातन काळी आलेले आहेत. तसेंच झाल लोक पहिल्यानें मकवाण म्हणून माहीत होते. तसेंच मुसुलमान व हिंदु राजांचे आवडते लोक (कीं ज्यांनां त्यांनीं मोठाल्या जमिनी बक्षीस दिल्या) असें या तालुकादार लोकांत पुष्कळ आहेत. तालुकदार पूर्ण मालक असतात. फक्त त्यांनां सरकारला एक ठराविक रक्कम द्यावी लागते.

इ. स. १९०३ सालचें जमिनीचें उत्पन्न २३,६९,००० व एकंदर उत्पन्न ६७,३४,००० रुपये होते.  

प्रथम गोघा व परांतीज गांवांनां म्युनिसिपालिटीचा हक्क मिळाला. नंतर पुढें पांच वर्षांत धोलका, अहमदाबाद, विरमगांव, मोडास, धंधुका यांनां म्युनिसिपालिटी मिळाली.

इ.स.१९०३ मध्यें साक्षर लोकांचे प्रमाण शेकडां ११.४ होते. पुरुषांचें प्रमाण शेंकडा २०.५ व बायकांचे शेकडां १.७ होते.

इ. स. १९०३-४ मध्यें ४०१ शाळा असून ३१४६० मुलें व मुलीं शिकत होत्या. त्यांत ८ सरकारी, ६१ म्युनिसिपालिटीच्या, १९७ लोकलबोर्डच्या व ४२ सार्वजनिक फंडांतून चाललेल्या आहेत. अहमदाबाद शहरांत एक ''आर्टस कॉलेज'' व दोन शिक्षक तयार करण्याच्या शाळा आहेत. एकंदर शिक्षणाप्रीत्यर्थ ३॥ लाख रुपये खर्च होतात व फीचें उत्पन्न ७००००० रुपये होतें.

पांच खाजगी दवाखाने सोडून आणखी या जिल्ह्यांत ३ इस्पितळें व १८ दवाखाने आहेत व इ. स. १९०४ मध्ये १८४००० लोकांनां औषधोपचार करण्यांत आला व त्यांपैकीं ४३६४ रोग्यांनां इस्पितळांत ठेवून घेण्यांत आलें. एकंदर खर्च ५५५०० झाला, त्यापैकीं १७००० म्युनिसिपालिटी व लोकलबोर्ड यांनीं सोसला. अहमदाबाद शहरीं एक पागलखाना आहे, त्यांत १०८ वेडयांची सोय आहे.

इ. स. १९०३-४ सालांत १९००० लोकांनां देवी टोंचण्यांत आल्या.
    
श ह र.- जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. उत्तर अक्षांश २३°० २' व पूर्व रेखांश ७२० °३५'. हें मुंबईपासून ३१० मैलांवर बाँबे-बरोडा आणि सेंट्रल रेल्वेचें एक स्टेशन आहे.

या शहराच्या भरभराटीच्या काळीं येथें ९ लाख वस्ती होती असें म्हणतात. तसेंच हे संपत्तीचें माहेरघर होतें. १८व्या शतकाच्या उत्तरार्धांत या शहराचा र्‍हास होऊन लोकवस्ती पुष्कळ कमी झाली. मुंबई इलाख्यांत हें दुसर्‍या नंबरचें शहर आहे. इ. स. १९०१ च्या खानेसुमारींत. १,८६,८८९ लोकसंख्या होती. त्यांपैकीं हिंदु लोक शेंकडा ७० म्हणजे १.२९,५०५ असून हाच वर्ग श्रीमान व वजनदार होता महत्वाच्या दृष्टीनें दुसरा वर्ग म्हणजे जैन लोक. त्यांची संख्या १५,४६० आहे. हे सर्व व्यापार व सावकारी करणारे आहेत. कोष्टी व इतर कारागीर लोक कुणबी वर्गांत मोडतात. मुसुलमानांची संख्या ३८१५९ होती. १९२१ सालीं लोकवस्ती २७४००७ होती. ही संख्या १९११ तील पेक्षां ४१२३० नें जास्त आहे. हें शहर गुजराथ जैन पंथाचें मुख्य ठिकाण असून येथें १२० जैन मंदिरें आहेत. वर्षास २४ जत्रा भरतात व दर तीन वर्षांनीं अनवाणी शहर प्रदक्षिणा करण्याचा समारंभ होतो.

गुजराथचा सुलतान अहमदशहा याच्या नांवावरून या शहरास अहमदाबाद हें नांव प्रचारांत आलें. त्यापूर्वीं अनहिलवाडचा सोळंकी रजपूत घराण्यांतील राजा करण याचें अशावल नांवाचें शहर या ठिकाणीं होतें. हें साबरमती नदीच्या पश्चिम तीरावर समुद्रसपाटीपासून १७३ फूट उंचीवर वसलेलें आहे. या शहराचे तट पूर्वपश्चिम असून त्यांची उंची १५ ते २० फूट आहे त्याला १४ वेशी आहेत. नदीचें पात्र ५०० ते ६०० याड रूंद आहे व शहर सपाटीवर वसलें असल्यामुळें पुरापासून पुष्कळ त्रास पोहोंचतो. इ. स. १८७५ मध्यें मोठा पूर येऊन ५ लाखांवर नुकसान झालें.

इतिहास.- पहिल्या सुलतान अहमदनें ४११ त हें शहर राजधानी करून त्याला चार अहमदावरून अहमदाबाद हें नांव दिलें. या शहराच्या इतिहासाचे, दोन भरभराटीचे, दोन उतरत्या काळचे व एक उर्जितावस्थेचा असे पांच भाग पाडतां येतील. १५ व्या शतकांत या शहराची भरभराट होती व त्याचें बरेचसें श्रेय सुलतान महंमद बेंगडा (१४५९-१५११) कडे जातें. त्याच्या मरणानंतर ६० वर्षं अहमदाबादला उतरती कळा लागली; परंतु १५७२ त अकबर बादशहानें हें शहर जिंकल्यापासून १६ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत त्याला पुन्हां पूर्व स्थिति प्राप्त झाली. या सुमारास हें शहर फक्त हिंदुस्थानांतच नव्हे तर सर्व जगांत उत्तम म्हणून त्याची ख्याती होती. १७ व्या शतकाच्या आरंभीं हीच स्थिती होती. इंग्लिश व डच लोकांसारखे परकीय व्यापारी येथें आले व अमदाबाद लंडन इतकें विस्तृत असल्यामुळें त्यावेळच्या आंग्ल व्यापार्‍यांनां तें फार आवडत असे. या सुमाराला कापड विणणें, खोदीव व कांतीव काम करणें, चित्रें काढणें व जरीचीं कामें करणें या सर्व धंद्यांत येथील कारागीर फार कुशल होते. १६९५ त रेशमाच्या व जरीच्या कामावर फुलें व पक्षी यांची वेलबुट्टी काढण्यांत तें व्हेनिस शहराच्या बरोबरीचें होतें असा एके ठिकाणीं उल्लेख आहे.

औरंगजेबाच्या मरणानंतर येथें अंदाधुंदी सुरू झाली व १७३८ ते १७५३ पर्यंत मुसुलमान व गायकवाड यांची दुहेरी सत्ता होती.

बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीनंतरच्या कथेची आठवण देणारीं काहीं पत्रें उपलब्ध आहेत तीं येणेंप्रमाणें:-

वारभार्ईंनीं पुण्यास सवाई माधवरावास गादीवर बसवल्यानंतर राघोबा दादा उत्तरेंत जाऊन इंग्रजास मिळाला. त्यावेळच्या त्याच्या हालचालीसंबंधीं पत्रव्यवहारांत शके १६७२ (इ. सन १७५०) पासून पुष्कळ उल्लेख आढतात.

१६७२ कार्तिकामधील गुजराथपैकीं अहमदाबाद महालाचा भरणा रसद पेशव्याकडे आल्याचा उल्लेखहि एका पत्रांत आढळतो. (रा. खं. ६. २१०, ३०८)

१६७४ शक. या वेळचे पेशवे व गायकवाड यांच्यामध्यें गुजराथ प्रांतांतील परगण्यांचीं वांटणी झाली. त्यांत अमदाबाद पेशवे यांच्याकडे राहिला असें एक पत्र आहे (रा. खं. ६.२७९, ३६९)

''सन ११६४ खमस खमसैन मया व अलफ त्याखालीं अमदाबाज किल्ला येथें श्रीमंतांच्या फौजांचा शाहा बैसोन लढाई मातबर जाहाली. हाला करून अमदाबादचा किला सर केला. ठाणें श्रीमंताचें बैसलें'' (रा. खं. ११ लेखांक ६६ पान ५७. शके १६७७)

''इंग्रजांची उमेद अमदाबाज घेण्याची आहे'' असें बाजी गंगाधर मु॥ बेलापुर; पेशव्यास कळवितो. १६९६ फाल्गुन शुद्ध १२. (रा. खं. १०. १५७, १०१).

राघोबादादा वडोदे अमदाबाद घेण्याची मसलत करीत आहे पण इंग्रजांच्या मध्यस्थीमुळें तसें करितां येईंना म्हणून चुळबुळ करीत आहे. असें एक पत्र १६९७ अश्विन वद्य ५चें आढळते. (रा. खं. १२.१०२.५९-६०)

''अमीनखान अमदाबादेस गेले आहेत त्यास, अमदाबादेचें कामकाज होणार नाहीं व इंग्रजांचा शब्द लागेल ऐसी वर्तवणूक होऊं नये येविसीं अमीनखानास सूचना लिहिणें तैसी ल्याहावी'' असा १६९७ मार्गशीर्ष महिन्यांतील एक अर्धवट सांपडलेल्या पत्रांत मजकूर आहे. यावेळीं बंगालेकर मुंबईकरांचें ऐकून आपला पक्ष घेतील कीं नाहीं ही राघोबास विवंचना दिसते. (रा. खं. १२. १२०, ७२.) याच महिन्याच्या पुढील पत्रांत (लेखांक १२१) अशा अर्थाचा मजकूर आहे कीं, अमीनखानाची रवानगी अमदाबादेस झाल्यावर 'लडाई मौकूफ'' करण्याविषयीं जनरलचें पत्र आलें; तेव्हां त्याला युक्तीनें परत आणण्यास सदाशिवपंतास राघोबानें अमदाबादेस पाठविलें. पण तेथील आपाजी गणेश ऐवज देईना, इकडे अमीनखानाची सिबंदी फार चढली. तेव्हां निरुपायानें अमीनखानाकडे मामलत सांगितली. अमीनखान फार डोईजड झाला होता, तरी त्याची उपेक्षा करणें भाग पडलें.

१६९७ फाल्गुन अखेरच्या पत्रांत मजकूर आहे कीं, हरी फडके व आपा बळवंत अपटणाशीं अमदाबाद, निदान सारी गुजराथ देण्याचा तह करीत आहेत असें वर्तमान राघोबाकडे पोंचलें आहे. (रा. खं. १२. १४०,८८)

बारभाई राघोबाला ''अमदाबाद वगैरे मर्जीचें प्रों॥ पंधरा वीस लक्षा पावेतों देतील असें तर्कानें दिसते.'' अशी 'फितुरियाकडून' बाबूराव बल्लाळ काणे यानें राघोबाकडे बातमी आणली. १६९८ भाद्रपद. (रा. खं. १२.१८०, १२२.)

अहमदाबाद, डभई वगैरे येथील बंदोबस्त तेथें जाऊन करावा कां भडोच्यास राहून विचार करावा हा विचार राघोबा, बारभाई व इंग्रज यांमध्यें तह होण्याच्या सुमारास करीत आहे (अहमदाबाद वगैरे परगणे आपल्याला मिळतील अशी राघोबास अशा वाटत होतीसें दिसतें.) (१६९८ अश्विन शु. १५ (रा. खं. १२.१८५,१२५.)

राघोबानें महादजी शिंद्यास निराशेनें हें पत्र लिहिलें आहे. त्यांत 'बादशहा व असफद्दौले फौजेसुद्धां दक्षिणचे मोहिमेस येणार, अहमदाबाद असफद्दौलास द्यावी' असा बेत आहे. वगैरे मजकूर लिहिला आहे. १६९८ कार्तिक वद्य १. (रा. खंड. १२. १८९, १२७.

''दादासाहेब यांणी अमदाबाद, बडोदे व डभईकडे राजाराम गोविंद याची रवानगीचा विचार ठरविला'' असें फत्तसिंग गायकवाड, पेशव्यास लिहितो. १७०१ अधिक श्रावण शु॥ ११. (रा. खं. १०. २०५, १४२.) व पुन्हां गायकवाड, गाजुदीखानावी अमदाबादेवरची मोहीम तहकूब झाली, असें लिहितो. १७०१ अधिक श्रावण वद्य ९ (रा. खं. १०. २०८, १४५.)

रामचंद्र पवार डभई परगणा जप्त करून पैका मिळवून पुढें अमदाबादेची जप्ती करावी अशा उमेदीनें आले होते, त्यावर पेशव्यांकडील फौजाहि गेल्या होत्या. इतक्यांत त्यानें बोलणें लाविलें कीं आपणांस ''बाहादारी'' दिल्यास माघारें जांऊ. पण कांहीं जमलें नाहीं अशा आशयाचे पत्र १७०१ आश्विन वद्य २ रोजीं नानांस लिहिलेलें सापडतें. (रा. खं. १०. २३२, १६२.)

शके १७०४ (सन १७८२) च्या पत्रांत अमदाबादेनिमित्त (स्वाधीन करून घेण्यास व सिबंदीस) बरीच रक्कम खर्ची पडली आहे. (रा. खं. १०. २७३, २००-१.)
    
एकंदर १७५० पासून १८१७ पर्यंत येथें मराठ्यांचीच सत्ता असून उत्पन्नाची विभागणी पेशवे व गायकवाड यांमध्यें होत असे. मध्यंतरीं १७८० त इंग्लिशांनीं गायकवाडांच्या वतीनें राजकारस्थानांत ढवळाढवळ सुरू करून दोन वर्षेपर्यंत पेशव्यांची सत्ता येथून झुगारून दिली. परंतु १७८३ त सालपेच्या तहाप्रमाणें पेशव्यांच्या उत्पन्नाच्या अर्ध्या हिश्शावरील हक्क इंग्लिशांनीं कबूल केला. १८१४त पेशव्यांनीं त्रिंबकजी डेंगळा यास आपल्या वतीनें अहमदाबादेस सर सुभेदार नेमलें परंतु त्यानें या सत्तेचा बराच  दुरुपयोग केला. पुढें तीन चार वर्षांत कांहीं तहान्वयें व गायकवाडशीं केलेल्या रदबदलीनें या शहरचें स्वामित्व ब्रिटिशांकडे आलें.

येथील इमारतींत हिंदु व सारासिन शिल्पकलेचा मिलाफ उत्तम दिसून येतो. चालुक्यांची शिल्पशास्त्रांत उत्तम प्रगतीहि झाली होती व ते जरी जिंकले गेलें तरी त्यांच्या शिल्पकलेचा पगडा जेत्यांच्या (मुसुलमानांच्या) मनावर बसला होता, यांत शंका नाही. शहरांतील व आसपासचीं प्रेक्षणीय स्थळें पुढीलप्रमाणें आहेत:-

मशिदी :- अहमदशहा, हैबतखान, सैयद अलम मालिक अलम, राणी अस्नी, कुतुबशहा, सय्यद उस्मानि, मियाखान ख्रिस्ती, सिद्धि सयद, सिद्धि बसीर, मुहाफिजखान, अच्युत बिबि, दस्तुरखान.

कबरी - अहमदशहा, अहमदशहाची बेगम, दर्याखान, अझमखान, मिर अबुद वजीर उद्दीन.

किरकोळ :- असावा येथील माता भवानीचें मंदिर, तीन दरवाजा; काकरिया तलाव; अझिमखानाचा राजवाडा; व इतर.

आसपासचीं मुसुलमानी स्थळें –सर्खेज (५ मैल); बाटवा (६ मैल); व शहाअलमची इमारत (३ मैल).

शहर रचनेचा एक विशेष हा आहे कीं, येथें पोळाची पद्धत आहे. एका पोळात १० घरें किंवा जास्त म्हणजे १०००० वस्ती असते. विशेष मोठ्या पोळांतून एक मुख्य रस्ता जातो, व त्याच्या दोन्ही टोकानां एक एक दरवाजा असतो. हल्लीं घराच्या बाबतींत बरीच सुधारणा झाली आहे. शहरच्या भिंती पाडून शहर विस्तृत करावयाची योजना नुकतीच म्युनिसिपालिटीपुढें  होती; पण ती लोकांनां पसंत पडली नाहीं. पहिले हिंदु बोरोनेट सरचिन्नुभाई हे अहमदाबादेसच राहतात.

इ. स. १८५७ सालीं या शहरास म्युनिसिपालिटी मिळाली. इ. स. १९०३०-०४ सालीं तिचें उत्पन्न १० लक्ष होतें. इ. स. १८९१ पूर्वीं विहिरीं, तळीं व नदी यांपासून पाण्याचा पुरवठा होत असें. पण इ. स. १८९२ मध्यें घुघेश्वरचा पाण्याचा साठा तयार झाला व तेव्हांपासून  लोकांना चांगले पाणी मिळूं लागलें.

शहरापासून ३॥ मैलांवर शाहीबाग येथें लष्कराची छावणी आहे.

पुर्वी अहमदाबाद हें जरतारी, रेशमी व सुती कापड, सोनें चांदीच्या वस्तू व दागिने, लांकडी नकशी काम याबद्दल प्रसिद्ध होतें. हें सध्यां कापसाच्या गिरण्यांचें मुख्य ठिकाण आहे. पहिली गिरणी इ. स. १८६१ मध्यें सुरू झाली. इ. स: १९०४ मध्यें येथें ३४ गिरण्या असून ५६९००० चात्या व ७०३५ भाग सुरू होते. म्हणजे १५० लक्षांचें भांडवल या धंद्यांत घातलेलें आहे. त्या सालीं ४२० लक्ष पौंड सूत व २६० लक्ष पौंड कापड तयार झालें. ५० वर कापसाच्या गिरण्या, तीन चार गंजीफ्राक पायमोजे, वगैरे मालाच्या गिरण्या, आठ लोखंडाचे कारखाने, दोन काड्याच्या पेटीचे कारखाने, तीन साबणाचे, चार कातड्याचे व तीन रेशीम विणण्याचे कारखाने, सुमारें ३५ दूध पुरविणार्‍या कंपन्या, यासारखे बरेच धंदे व कारखाने अहमदाबादेस आहेत.

येथें बर्‍याच खाजगी व म्युनिसिपल प्राथमिक शाळा; दोन कॉलेजें व कायदा शिक्षणाचे वर्ग, तसेंच बरींच हायस्कुलें आहेत. येथें एक वैद्यकीची शाळा असून बरेच दवाखाने तसेंच महारोग्याचें इस्पितळ, पागलखाना, डोळ्यांचें इस्पितळ यासारख्या रोगनिवारक संस्था आहेत. येथें पांच पुस्तकालयें आहेत. गुजराथी मासिकें दहाच्या वर प्रसिद्ध होतात. निरनिराळ्या जातीचे व उद्यमांचे संघ येथें असून बलवान आहेत. गुजराथी लोकांचे वाङ्मय, सामाजिक चळवळीं, शिक्षणार्थ प्रयत्‍न यांचे केंद्रस्थान हें शहर असल्यामुळें याचें वर्णन करणें म्हणजे संबंध गुजराथचा इतिहास देणें होय. तर तें विवेचन ''गुजराथ'' या सदराखालीं सांपडेल (इं. गॅ.५-१९०८. मुं. गॅ. ४. अर्नोल्ड -गाईड.)

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .