विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अहिरगांव - (मुंबई,) नाशिक जिल्हा. निफाडच्या वायव्येस १० मैल. लोकसंख्या (१८८१) ९४५. या ठिकाणीं सन १९१८ मध्यें ठाण्याच्या तुरुंगांतून पळून गेल्यानंतर त्रिंबकजी डेंगळ्यास पुन: पकडलें (मुं. गॅ. पु. १४ पा. ३५० पहा). येथें कार्तिक शुद्ध ४ स एका मुसुलमान साधूचा उरूस भरतो. (मुं. गॅ. १६,१८८३).