विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अहोबिलम् - (मद्रास) करनूल जिल्हा. शिरवेल तालुक्यांतील एक खेडेगांव व मंदिर. उत्तर अक्षांश १५० ८' व पूर्व रेखांश ७८० ४५. ' हें सदर्न मराठा रेल्वेच्या नंद्याल स्टेशनापासून ३० मैल आंत आहे. इ स. १९०१ मध्यें लोकसंख्या १५१ होती. हें मंदिर म्हणजे या भागांतील वैष्णवांचें फार फार मोठें क्षेत्र समजलें जातें. या ठिकाणीं तीन यात्रेचीं ठिकाणें आहेत. एक डोंगराच्या पायथ्याशीं, दुसरें वराच्या बाजूस ४ मैलांवर मध्यभागीं व तिसरें डोंगराच्या माथ्यावर यांपैकीं पहिलें फार महत्त्वाचें आहे. कारण त्याच्या भिंतीवर व मंडपांवर रामायणांतील पुष्कळ देखावे कोरलेले आहेत. येथें होळी पौर्णिमेला जत्रा भरते. सध्यां हें मंदिर व चिंगलपट जिल्ह्यांतील तिरुवेलूर येथील याचाच मठ, हीं पुष्कळ उत्पन्न असूनहि अव्यवस्थित स्थितींत आहेत. (इं. गॅ. ५).