प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका 

अक्षांश :- दोन्ही भूध्रुवापासून ९० अंश अंतरावर काढिलेलें महावृत्त जें भूविषुववृत्त त्यापासून स्वस्थळापर्यंत जें गोलीय लंबरूप अंक्षात्मक अंतर त्यास अक्षांश असें म्हणतात.

अर्थात् अक्षांश काढण्याची सरळ रीत म्हटली म्हणजे आपल्या स्थळांतून जाणार्‍या याम्योत्तर वृत्तावरील भूविषुवृत्तापासून आपल्या स्थळापर्यंत अंतर योजनात्मक किती आहे हें प्रत्यक्ष मापून काढावें म्हणजे:-

अ क्षां श का ढ ण्या ची रींत.- परंतु या प्रकारच्या प्रत्यक्ष रीतीनें अक्षांश मोजणें अशक्यप्राय अल्यामुळें तें काढण्यासाठीं ज्योतिषमूलक पद्धतींचाच अवलंब करावा लागतो. अक्षांश काढण्याच्या ज्योतिषमूलक पद्धती भारतीय ग्रंथांत पुढें दिल्याप्रमाणें आढळतात.

( १ ) चापयंत्रानें किंवा चक्रयंत्रानें आकाशांतील ध्रुव तार्‍याचे उन्नतांश जितके येतील तितकेच स्थळाचे अक्षांश असतात. हे सुमारें अक्षांश निघतील. सूक्ष्मत: पाहिजे असल्यास १२ तासांच्या अंतरानें दोन वेळां वेध घेऊन ध्रुवतार्‍याचे उन्नतांश आणून त्यांच्या बेरजेचें अर्ध करावें.

( २ ) तीस घटिकांचें दिनमान व तीस घटिकांचें रात्रिमान असेल त्या दिवशीं (विषुवदिनीं) मध्यान्ह कालीं द्वादशांगुल शंकूची छाया किती पडली आहे, हें प्रत्यक्ष मापून काढावें. नंतर १२ त्रिज्येनें तयार केलेल्या स्पर्शरेषेच्या कोष्टकांत तें छायामान पाहिले असतां अक्षांश येतील. कारण ती छाया अक्षांशांची स्पर्शरेखा असते.

( ३ ) यष्टियंत्रानें ध्रुवतार्‍याचा वेध घेऊन यष्ट्यग्रापासून भूमीवर लंब टाकावा आणि त्या लंबाचें माप घ्यावें. नंतर यष्टीएवढ्या त्रिज्येनें एक वर्तुळ काढून त्यांत अंशादिकांच्या खुणा कराव्या; व अंशचिन्हित वर्तुळात, पूर्वीं घेऊन ठेवलेलें लंबाचें माप अर्धज्येप्रमाणें दिलें असतां वृत्त परि धीवर जितके अंश असतील तितके स्वस्थळाचे अक्षांश आहेत असें समजावें.

( ४ ) सूर्य उन्मंडलावर म्हणजे दोन्ही ध्रुव व पूर्व बिंदू यांतून जाणार्‍या वृत्तावर आला असतां गोलयंत्रानें सूर्याचा वेध घेऊन सूर्य आणि पूर्व बिंदू यांच्यामध्यें उन्मंडलावर जितके अंश असतील तितकी सूर्याची क्रान्ति त्या दिवशीं आहे असें समजेल. क्रान्ति समजल्यावर स्वकीय याम्योत्तर वृत्तावर सूर्य आला असतां चापयंत्रानें किंवा तुर्ययंत्रानें सूयांचे नतांश मापावेत येणेंप्रमाणें क्रान्ति व नतांश काढले म्हणजे, सूर्य खगोलीय विषुववृत्त व स्वस्थळाचें याम्योतरवृत्त यांच्या दरम्यान असल्यास क्रांन्ति व नतांश यांची बेरीज केली असतां व इतर प्रसंगीं वजाबाकी केली असतां अक्षांश निघतात.

रात्रीं कोणत्याहि तार्‍याचा वेध घेऊन गोल यंत्रानें त्या तार्‍याची क्रान्ति आणावी. नंतर त्याच तार्‍याचा वेध याम्योत्तर वृत्तामध्यें घेऊन त्याचे नतांश तुर्यादि यंत्रानें आणावेत. म्हणजे त्या तार्‍याची क्रांन्ति व याम्योत्तर नतांश यांवरून मागच्या रीतीप्रमाणें अक्षांश निघतील.

( ६ ) अथवा इष्ट यष्टिरूप त्रिज्येनें समभूमीवर एक वर्तुळ काढावें, व त्यांत त्या दिवशींचें सूर्याचें उदयास्तसूत्र काढावें. नंतर इष्ट कालीं यष्टीनें सूर्याचा वेध घ्यावा. वेधकालीं यष्ट्यग्रापासून समभूमीवर लंब टाकावा. तो लंब समभूमीवर ज्या ठिकाणीं लागेल त्या बिंदूपासून उदयास्त सूत्रापर्यंत लंबरूप जें अंतर असेल त्याचें माप घ्यावें. मग यष्ट्यग्रापासून समभूमीवर टाकलेला लंब हा भुज आणि उदयास्त सूत्रापर्यंत मापलेलें लंबरूप अंतर कोटि; ह्या भुजकोटीवरून कर्ण काढूंन त्या कर्णानें एक वर्तुळ काढून ते अंशादि चिन्हित करावें. त्या वर्तुळांत कोटिरूप अंतर अर्धज्येप्रमाणें दिलें असतां त्या वृत्तपरिधीवर जितके अंश असतील ते अक्षांश समजले जातील आणि त्याच दिकचिन्हित वर्तुळांत भुजरूप अंतर अर्धज्येप्रमाणें दिलें असतां वृत्तपरिधीवर जे अंश असतील ते लंबांश येतील. लंबांश ९० अंशांतून वजा करून जे शेष राहतील ते अक्षांश होतात. कारण खमध्य व ध्रुव या दोहोंमध्यें जें अंशात्मक अंतर याम्योत्तर वृत्तावर मापलेलें असतें त्यास लंबांश असें म्हणतात. नेहमीं लंबांश व अक्षांश यांची बेरीज ९० अंश असते.

 

( ७ ) अथवा कोणताहि स्वस्थ पदार्थ पूर्वापर वृत्तांत असतां त्याची क्रांति व नतांश गोलयंत्रदि साधनांनीं प्रत्यक्ष वेध घेऊन काढावेत. नंतर क्रांतीच्या भुजज्येस नतांशांच्या कोटिज्येनें भागिलें असतां अक्षांशांची भुजज्या येते. तीवरून अक्षांश निघतील.

वरील रीति पुढें दिलेल्या आकृतीनें स्पष्ट होईल.

अक्षांश काढण्याची रीत दाखविणारी आकृति.

या आकृतींत :उपूदप हें क्षितिज, ध्रु हा ध्रुव, ख हा आकाशमध्य आणि पूखप हें पूर्वापरवृत्त असून पूर्वापर वृत्तामध्यें ग्र ह्या ठिकाणीं खस्थपदार्थ आहे. तेव्हां खग्र=   नतांश; ग्रध्रु= ध्रुवांतर (=९०० क्रांति) आणि खध्रु हे लंबांश =९०० अक्षांश-ह्या तीन बाजूनीं झालेला खग्रध्रु हा त्रिकोण असून त्यांतील ग्रखध्रु हा कोन काटकोन आहे. म्हणून 'मध्य प्रभागीय भुजज्यकासमा स्पार्शीय रेखाहतिस्त्रभागयो:। संलग्नयो र्दूरतर प्रभागयो: कोभुज्यका संहतिरित्युदीरितं' इत्यादि सुत्रानें

( ८ ) अथवा ज्या तार्‍याचें अहोरात्रवृत्त स्वक्षितिजाच्या वरच संपूर्ण निघतें. अशा तार्‍याचे परमोन्नत कालीं व नंतर परमतकालीं उन्नतांश मापावेत. त्या उन्नतांशांची बेरीज करून तिचें अर्ध केलें असतां अक्षांश निघतात.

अ क्षां शां चा उ प यो ग.-(१) अक्षांशाबरोबरच रेखांश दिले असतां त्यांचा उपयोग पृथ्वीवरील कोणत्याहि स्थळाचा निश्चय करण्याकडे होतो. उदाहरणार्थ अ हें एक शहर आहे. त्यांचे अक्षांश ४५ उत्तर आहेत व रेखांश १५ पर्व आहेत तर तें स्थळ भूगोलावर कोठे आहे असा प्रश्न आहे.

आकृति

स्थळ निश्चय मंगि

समजा वरील आकृतिमध्यें पपू हें विषुववृत्त आणि उद ही भूमध्यरेखा (लंकावृत्त) आहे. आणि अ हें शहर विषुववृत्तापासून उत्तरेकडे ४५ अंशांवर म्हणजे यअ इतक्या अंतरावर आहे. तसेंच त्या अ शहराचे रेखांश म्हणजे दऊ ह्या भूमध्यरेषेपासून अंतर १५ अंश आहेत. म्हणजे सअ इतक्या अंतरावर अ शहर आहे म्हणून गोलावर अ शहर कोठें आहे हें दाखवितां आलें.

(२) अक्षांशांचा उपयोग पलभा आणण्याकडेहि होतो. पुढील आकृतीमध्यें अ मध्यबिंदु धरून अब ह्या द्वादशांगुल शंकुत्रिज्येनें बमफ हें वर्तुळ काढिलें आहे. बअम कोन अक्षांशाइतका आहे. मप ही भुजज्या आणि अप कोटिज्या आहे. आणि बक ही स्पर्शरेषा म्हणजे पलभा काढावयाची आहे. आतां अपम आणि अबक हे दोन त्रिकोण समरूप आहेत तेव्हां

पलभानयन भंगि.

(३) अक्षांशामुळें दिनमान व रात्रिमान निश्चित करतां येतें. तें असें:भूविषुववृत्तावरील कोणत्याहि स्थळीं दिनमान ३० घटि व रात्रिमान ३० घटिका नेहमीं असतें. कारण त्या स्थळीं दोन्ही ध्रुव पातळीमध्यें असल्यामुळें उन्मंडल आणि क्षितिज हीं दोन्ही  वृत्तें एकच होतात. सूर्याची अहोरात्र वृत्तें विषृववृत्ताशीं समांतर असून क्षितिजाला लंब रूप असतात; आणि विषुववृत्ताशीं समांतर असून क्षितिजाला लंब रूप असतात; आणि विषुववृत्त हेंच पूर्वापरवृत्त किंवा समवृत्त होतें व त्या अहोरात्र वृत्तांचा निम्मा भाग क्षितिजावर असतो आणि निम्मा भाग क्षितिजाच्या खालीं असतो म्हणून तेथें ३० घटिका दिनमान आणि ३० घटिका रात्रिमान सदैव असतें. अशी स्थिति शून्य अक्षांश असतां होते. परंतु अक्षांश जसससे कमी जास्त असतील; तसतसें दिनमान व रात्रिमान हीं कमी जास्त प्रमाणांत होतील. उदाहरणार्थ आपलें स्थळ भूविषुववृत्ताच्या उत्तरेस असून सूर्य उत्तर गोलार्धामध्यें असेल तर दररोज दिवसमान ३० घटिका पेक्षां जास्त जास्त वाढतच जाईल व ती वाढ सूर्याची परमक्रांति सुमारें २४ अंश होईपर्यंत वाढेल व क्रांति कमी कमी होऊं लागली असतां दिनमानहि कमी कमीं होत जाऊन संपातीं सूर्य असतां ३० घटिका दिनमान व ३० घटिका रात्रिमान होईल, आणि सूर्य दक्षिण गोलार्धांत गेला असतां दिनमान कमी कमी होत जाऊन दक्षिण परमक्रांति सुमारें २४ झाल्यावर पुन्हां वाढत जाईल. दिनमानाची नक्की किंमत काढणें झाल्यास

भुजज्या चर   स्पर्शरेषा क्रांति x स्पर्शरेषा अक्षांश

या सारणीनें चर काढून उत्तर गोलांत सूर्य असतां

दिनमान = २ x चर + ३० घटिका आणि दक्षिणगोलार्धांत सूर्य असतां
दिनमान = ३०घ. २ x चर आणि दिनार्ध = १५घ.-चर याप्रमाणें अक्षांशावरून चर काढून दिनमान व रात्रिमांन निश्चित करतां येतें.

अ क्षां शां चें चं च ल त्व.-पृथ्वीवरील स्थलांचे अक्षांश विषुववृत्तापासून मोजतात. विषुववृत्ताच्या व्याख्येंत असें सांगितलेलें असतें कीं, विषुववृत्ताची पातळी पृथ्वीच्या आंसाशी लंबरूप असतें. तेव्हां पृथ्वीचा अक्ष ज्या ठिकाणीं भूपृष्ठाला छेदितो ते बिंदु म्हणजे पार्थिव ध्रुव जर चल असले तर विषुववृत्तास व त्याचबरोबर भौगोलिक स्थळांच्या अक्षांशासहि चलत्व प्राप्त होईल हें उघड आहे. गेल्या शतकाच्या अखेरीस झालेल्या संशोधनानें असें आढळून आलें आहे कीं, पार्थिव उत्तर व दक्षिण ध्रुव हे स्थिर नसून ते कांहीं नियमित काळांत सुमारें ५० फूट व्यासाच्या वर्तुळांत प्रदक्षिणा करितात, व त्यामुळें भौगोलिक स्थळांच्या अक्षांशांत त्यास अनुसरून फेरबदल होत असतात.

असें होण्याचें कारण पृथ्वीच्या आकृतीचा अक्ष व तिच्या भ्रमणाचा अक्ष हे दोन्ही एक नाहींत हें होय. वरील आकृतींत अ इ हा पृथ्वीसारख्या एका चापट अंडगोलाच्या कक या लघुत्तम अक्षामधून घेतलेल्या कापाचा देखावा आहे असें समजां. आतां या अंडगोलास जर कक या अक्षाभोवतींच भ्रमण करावयास लावलें, तर तो तसाच कांहींहि फेरबदल न होतां अनंत कालपर्यंत फिरत राहील. परंतु तो जर या आकृतीच्या अक्षाऐवजीं त्याच्याशीं खमक एवढा एखादा सूक्ष्म कोण करणार्‍या खख या अक्षाभोंवतीं फिरूं लागला तर खख हा भ्रमणाचा अक्ष कक या आकृतीच्या अक्षाभोंवतीं कांहीं नियमित काळांत प्रदक्षिणा करील. ही गोष्ट युलरच्या काळापासूनच अवगत असून या उपपत्यनुसार पार्थिव ध्रुवाचा भ्रमणकाल गणितानें ३०५ दिवस निघतो.

परंतु १८९० पर्यंत, अक्षांशांत फेरबदल होत असतो असें मानावयास बळकट पुरावा होता तरी, अत्यंत काळजीपूर्वक निरीक्षण व संशोधन करूनहि पार्थिव ध्रुवाचा भ्रमणकाल प्रत्यक्ष सिद्ध करतां आला नव्हता. सरते शेवटीं शंडरल यानें असें दाखविलें कीं, निरीक्षणविषयभूत स्थलांच्या अक्षांशात खरोखरच बदल झाला आहे. परंतु त्यावरून निघणारा पार्थिवध्रुवाचा भ्रमणकाल ३०५ दिवस नसून ४२८ दिवस आहे. गतिशास्त्राच्या नियमानुसार गणितानें काढलेल्या भ्रमणकालांत व प्रत्यक्षावगम्य भ्रमणकालांत असा फरक कां पडतो याचा विचार करतां असें दिसून आलें कीं जुन्या गणितांत पृथ्वी फिरत असतांना तिच्या केंद्रोत्सारी शक्तीमुळें विषुवृत्तावरील फुगीत भागांत होणारा फरक विचारांत घेतलेला नव्हता, थोड्या विचाराअंतीं असें दिसून येईल कीं, मागील आकृतींत दाखविलेल्या अंडगोलाचें द्रव्य, त्यांत थोडासा लवचीकपणा असल्यास तो खख या अक्षाभोंवतीं फिरत असतां केंद्रोत्सारी शक्तीमुळें शरांनीं दाखविलेल्या दिशांस सरकत राहून त्याच्या आकारांत बदल होईल; व या विकृत अंडगोलाचा अक्ष कक न राहतां कक व खख यांच्या दरम्यान असलेली वव अशी एखादी रेषा होईल. हाच नियम पृथ्वीसहि लागू आहे. ती पोलादाइतकी थोडी लवचीक आहे असें जरी गृहीत धरलें तरी या लवचीकपणामुळें व महासाराच्या चांचल्यामुळें ध्रुवाचा भ्रमणकाल. ४५७ दिवस इतका अधिक वाढेल. परंतु केल्व्हिन यानें दुसर्‍याच कांहीं कारणानिमित्त अगोदरच असें दाखविलें होतें  कीं पृथ्वीचें काठिण्य पोलादाहूनहि अधिक आहे. तेव्हां ही गोष्ट प्रत्यक्ष निरीक्षणानें अजमासें ४२८ दिवस हा जो ध्रुवाचा भ्रमणकाल आला आहे त्याशी विसंगत दिसत नाहीं.

एतद्विषयक आजच्या संशोधनाचें फल थोडक्यांत येणें. प्रमाणें देता येईल:-(१) पृथ्वीच्या आकृतीचा अक्ष व भ्रमणाचा अक्ष हे एक नसून एकमेकाशीं सरासरी ०.१५'' चा कोन करतात. यामुळें ध्रुवास १४ महिन्यांचा प्रदक्षिणा काल असलेली वर्तुलाकार गति प्राप्त होते. पृथ्वी जर आहे तशीच तिच्या पृष्ठभागावरील द्रव्यांमध्यें कांहीं हालचाल न होता राहील तर या अक्षभिन्नत्वामुळें एक ध्रुव दुसर्‍या ध्रुवाभोंवतीं ०.१५” ची किंवा अजमासें १५ फुटांची त्रिज्या असलेल्या वर्तुळांत सुमारें ४२९ दिवसांत प्रदक्षिणा करील. (या गतीस ज्या गणित्यानें ती प्रथम शोधून काढली त्याच्या नांवांवरून युलेरियन गति असें नांव मिळालें आहे.) परंतु वातावरणजन्य कांहीं कारणांमुळें या गतींत वार्षिक फेरबदल होत असतो. हीं कारणें स्थिति शास्त्रविषयक व गतिशास्त्रविषयक अशीं दोन प्रकारचीं आहेत.

(२) स्थितिशास्त्रविषयक कारक म्हटलें म्हणजे पृथ्वीवर हिमाचे किंवा बर्फाचे थर सांचून तिच्या ध्रुवांत फेरबदल होत. असतो हें होय. उदाहणार्थ, सैबेरियांत जर बर्फ सांचला तर त्यामुळें पृथ्वीचें विषुववृत्त त्या प्रदेशाच्या किंचित जवळ येईल व तिचा ध्रुव त्यापासून किंचित दूर जाईल. याच्या अगदीं उलट परिणाम अमेरिका खंडांत होणार्‍या बर्फ संचयानें घडून येईल. पण आशिया व अमेरिका या खंडांमध्यें स्थूलमानानें रूपसादृश्य असल्यामुळें बर्फाच्या संचयानें ध्रुवांच्या स्थितींत कळून येण्याइतका फरक होईल असें वाटत नाहीं.

(३) गतिशास्त्रविषयक कारकांमध्यें वातावरणीय व महासागरांतील प्रवाह यांचा समावेश होतो. हे प्रवाह जर नेहमीं ठराविक दिशेनेंच वहात असते तर त्यांचा एवढाच परिणाम झाला असतां कीं, युलेरियन वर्तुळाकार गतीचा केंद्र पृथ्वीच्या आकृतीचा मध्यम ध्रुव न होतां त्याचाच निकटवर्ती दुसरा एक बिंदु झाला असता. परंतु वस्तुस्थिति अशी आहे कीं, या प्रवाहांत वार्षिक फेरबदल होत असतो. यामुळें ध्रुवाच्या भ्रमणामध्यें देखील त्याला अनुसरून फेरबदल होतो. ६९२

पार्थिव ध्रुवाच्या स्थानामध्यें फेरबदल होत असतो ही गोष्ट नक्की ठरली तेव्हां, हा प्रश्न ज्योतिष व भूगोलशास्त्रास महत्त्वाचा असल्यामुळें ठरीव तार्‍याचे वेध घेऊन या फेरबदलाचें निरीक्षण करण्याकरितां इटालींत कार्लोफोर्टे, जपानांत मिझुसावा, मेरिलंडमध्यें गैथर्सबर्ग, कॅलिफोर्नियांत उकिया आदिकरून ठिकाणीं वेधशाळा स्थापन करण्यांत आल्या. या सर्व वेधशाळा जवळ जवळ एकाच म्हणजे ३९० ८' या अक्षांशावर आहेत.

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .