विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अज्ञानसिध्दनागेश - यांनी आपल्या ग्रंथांत नागनाथ हे आपल्या गुरुंचें नाव म्हणून दिले आहे व हें स्वतःचे नांव नुसतें अज्ञान असें देतात यांनी अविंध भाषेत पंचीकरण प्रमेय रचिलें आहे. यावरून यांचा काल १४००चा सुमार येतो. वरद नागेश व हे एकच असें वाटतें. ग्रंथ-कालज्ञान, पंचीकरण प्रमेय हे आहेत. (.सं.क.का.सू.)