प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
 
आकाश, ज्यो ति र्वि ष य क - चर्मचक्षूस आकाश हें क्षितिजापाशीं पृथ्वीवर टेकलेल्या एखाद्या प्रचंड घुमटाप्रमाणें दिसत असल्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या बाल्यावस्थेंत मनुष्याच्या आकाशसंबंधीं बऱ्याचशा अज्ञानमय कल्पना होत्या. प्राचीन मिसरी लोकांनां आकाश ही जड वस्तु आहे असेंच वाटत होतें व म्हणून तें चार दिशांस असलेल्या चार स्तंभांवर आधारिलेलें आहे अशी त्यांनी कल्पना बसविली होती (विज्ञानेतिहास पृ.३२४ पहा). आकाशासंबंधीं खाल्डी लोकांची कल्पनाहि मिसरी लोकांच्या इतकीच अज्ञानमय होती. कारण तें पृथ्वीभोवती असलेल्या पर्वतांच्या तटावर आकाशाचा घुमट बसविला आहे असें कांही तरी समजत होते (विज्ञानेतिहास पृ.३२६ पहा.) तथापि वैदिक काळच्या भारतीय लोकांची आकाशविषयक कल्पना मात्र बरीचशी वस्तुस्थितीला धरून असावी असें वाटतें. निदान मिसरी किंवा खाल्डी लोकांप्रमाणे दृष्टिभ्रमास बळी पडून आकाश हें पृथ्वीवर आधारिलेलें आहे असें तरी ते समजत नव्हते हें खास (विज्ञानेतिहास पृ.२९२) जसजशी ज्योतिषशास्त्राची प्रगति होत गेली तसतसें आकाश म्हणजे केवळ पोकळी आहे हें ज्ञान मनुष्यास आविर्भूत झालें व त्या पोकळींत दृश्य होणाऱ्या सूर्य, चंद, ग्रह, उपग्रह, तारे, धूमकेतु, उल्का, रूपविकारी तारे, तारकायुग्म, तारकागुच्छ, तेजोमेघ, नवे तारे या ज्योतिषचमत्कारांविषयीहि ज्ञान वाढूं लागलें. हें ज्ञान कसकसें वाढत गेलें व त्याची आजची स्थिति काय आहे याबद्दल कांही संक्षिप्त माहिती मागें विज्ञानेइतिहासांतील ज्योतिषशास्त्राचा इतिहास या प्रकरणांत आली आहे व पुढेहि आणखी यथास्थलीं येईलच.

आकाशाच्या पोकळींतील या तेजोमय रहिवाशांचे निरीक्षण मनुष्य फार प्राचीन काळापासून करीत आला आहे. तथापि उपलब्ध माहितीप्रमाणे आकाशांतील तारकांचा व्यवस्थित असा पहिला नकाशा तयार करण्याचा मान बहुधा ख्रि.पु. ३ ऱ्या शतकाच्या सुमारास होऊन गेलेल्या एराटॉस्थिनीझकडे जाईल. एराटॉस्थिनीझनें आपल्या नकाशांत आकाशांतील केवळ तेजस्वी तारेच अंतर्भूत केले होते. यानंतर ख्रि.पू.दुसऱ्या शतकाच्या मध्याच्या सुमारास हिप्पार्कसनें जें तारास्थितिपत्रक तयार केलें तें बरेंच सूक्ष्म असून त्यांत १०८० तारकांचा समावेश केलेला होता. पुढें इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेल्या टॉलेमांनें १०२८ तारकांचे शरभोग इत्यादि दिले आहेत. यानंतरचें तारास्थितिपत्रक  १५ व्या शतकाच्या पूर्वार्धंतील तयमूरलंगाचा नातू उलुगबेग याचें असून त्यातहि केवळ  १०१९ तारकाचीच स्थिति आहे परंतु पुढें सोळाव्या शतकाच्या अखेरीस दुर्बिणीचा शोध लागल्यामुळें हजारों किंबहुना लक्षावधि तारका स्पष्टरूपानें मनुष्याच्या दृष्टिपथाच्या आटोक्यांत आल्या व पुढें प्रकाशलेखनाचा शोध लागला तेव्हा दुर्बिणीसहि अगोचर असलेल्या तारकांचा तारास्थितिपत्रकांत अंतर्भाव करणें शक्य झलें. हल्ली फार सूक्ष्म अशीं तारास्थितिपत्रकें पुष्कळ झाली असून त्यांत सुमारें वीस हजार तारकांची स्थिति आहे. उत्तरध्रुवापासून दक्षिणक्रांति २ पर्यंत असणाऱ्या ९ प्रतींच्या तारकाचें एक स्थूलस्थितिपत्रक झालें आहे. त्यात सुमारें तीन लक्ष तारका आहेत. ही संख्या सुमारें अर्ध्या आकाशातील आहे. नुसत्या डोळयांनी अर्ध्या आकाशांत सुमारे तीन हजार तारका दिसतात. यावरून नुसत्या डोळयांनी जेथें एक तारका दिसते तेथें मध्यम प्रतीच्या दुर्बिणीने १०० दिसतात. दुर्बिणीतून दिसणाऱ्या असंख्य तारकांनी आकाशगंगा झाली आहे. अशा तारका आकाशगंगेपासून दूरच्या प्रदेशांत थोडयाच आहेत. जसजसे आकाशगंगेकडे यावें तसतशा तारका दाट दिसतात. नुसत्या डोळयांनी दिसणऱ्या तारकाहि आकाशगंगेंत जास्त आहेत. आकाशगंगेखेरीज इतर प्रदेशांतहि कोठें कोठें फार दाट तारका आहेत.

आ का शा चा रं ग - भूगोलावरील कोणत्याहि प्रदेशावरील आकाशाकडे पाहिलें असतां आकाशचा रंग निळाच दिसतो. आकाश जरी अगदीं निरभ्र असलें तरी सुध्दं या निळया रंगांत बराचसा फरक दिसतो. स्वस्तिकाच्या जागीं हा निळां रंग जास्त दाट असतो व भूपृष्ठापसून जों जों जास्त उंचीवर जावें तों तों हा निळा रंग जास्त गडद होत आहे. या रंगांत दुसऱ्या शुभ्र रंगाचें मिश्रण असतें हें सांगावयास नकोच. यांबरोबरच हेंहि सांगितले पाहिजे कीं, आकाशापासून येणारा प्रकाश ध्रुवीभूत झालेला असतो. योग्य परिस्थितीमध्यें आकाशापासून येणाऱ्या प्रकाशापैकी निम्याहून अधिक प्रकाश ध्रुवीभूत झालेला असतो. आकाशाला निळा रंग असण्याच्या कारणाविषयी अनेक प्रकारची मतें शास्त्रज्ञ मंडळांत प्रचलित आहेत. कित्येकांचे असें मत आहे की, हवेमुळे किंवा त्यातील ओझोनसारख्या घटकावयवामुळें आकाशास निळा रंग आला आहे; परंतु यावर असा आक्षेप घेता येण्यासारखा आहे की, सूर्योदय किंवा सूर्यास्तच्या वेळी हा निळा रंग जास्त गडद झाला पाहिजे; कारण या वेळी प्रकाशाला फार मोठया अशा हवेच्या थरांतून जावे लागतें व त्यामुळे प्रकाशास हवेचा निळा रंग जास्त प्रमाणावर आला पाहिजे. परंतु असा रंग येत नाही म्हणून ही कल्पना फारशी ग्राह्य नाही.

 

ध्रवीभूत प्रकाश येवो वा अध्रुवीभूत प्रकाश येवो, परंतु हा प्रश्न प्रथमतः उपस्थित होतो की, आकाशापासून प्रकाशच कां यावा? जर वातावरण मुळीच नसते किंवा पूर्णपणें पारदर्शक असते, तर आकाश दिसलेच नसतें; म्हणजे काळया पोकळीतून प्रकाश पृथ्वीवर आला असता, यावरून आकाशांत परावर्तन करणारा कोणता तरी पदार्थ असावा, असें अनुमान काढतां येते.

आकाशाच्या पोकळींत असणारें वातावरण व त्या वातावरणांत असणारे धुळींचे सूक्ष्म कण यांच्या योगानें निळा प्रकाश परावृत्त होत असावा, असें अनुमान शास्त्रज्ञ लोकांनीं बसविलें आहे. शिवाय हवेचे कण आणि धुळीचे कण यांच्या योगाने प्रकाशाचें ध्रुवीभवन होणे अशक्य आहे, असें गणिताच्या आधारे सिद्ध करतां येते. म्हणून या अनुमानास उत्तम प्रकारें बळकटी येतें.

आ का शा च्या भि न्न रं गा ची उ प प त्ति - प्रकाशाचे किरण प्रकाशलहरीच्या लांबीहून लहान असलेल्या कणांवर आदळले म्हणजे त्यांची इतस्ततः फांकाफांक होते. विच्छिन्न किरणाच्या निळया टोकांकडील अत्यंत आखूड असलेल्या निळया व जांभळया रंगांच्या प्रकाशलहरीची लाल व पिवळया रंगाच्या दीर्घ प्रकाशलहरीहून अधिक पूर्णपणे फांकाफांक होते. म्हणून असले कण असलेल्या माध्यमांतून बाहेर पडणाऱ्या प्रकाशांत लाल रंगाचे आधिक्य असतें व बहुतेक निळा रंग बाजूंस फाकला जातो. आकाशाचा बराचसा भाग निळा दिसतो याचे कारण वातावरणातील सूक्ष्म कणांमुळे आजुबाजूंस जो प्रकाश फांकला जातो तोच मुख्यत्वेकरून आपल्या डोळयावर पडतो. जितके हे कण लहान तितका प्रकाश अधिक अंधुक असतो. पण त्यात निळया रंगाचें प्रमाण अधिक असतें. क्षितिजापाशीं आकाश खस्वस्तिकापेक्षां अधिक शुभ्र दिसतें; कारण तेथून येणाऱ्या किरणांस मोठया कणांचे आधिक्य असलेल्या तळाच्या वातावरणाच्या अधिक जाडींतून मार्ग आक्रमण करावा लागतो. सूर्यास्ताचे रंग लाल असतात तेंहि याच कारणामुळें होत. तेथून जे रंग किरण सरळ आपल्याकडे येतात त्यांतील बहुतेक निळा रंग आजुबाजूस फांकाफांक होऊन नष्ट झालेला असतो उंच पर्वतावरून किंवा उंचावर उडत असलेल्या विमानांतून आकाश गहिऱ्या पण शुध्द नीलवर्णाचे दिसतें. कारण त्या वातावरणाच्या भागांत खालच्यापेक्षां मोठया कणांचे प्रमाण बरेच कमी असते.
आ का श दे व ता व ति   ची भि न्न भि न्न स्व रू पे - जगांतील सर्व प्रमुख व सुधारलेल्या धर्मांना आधारभूत असलेल्या गोष्टींत आकाशांतील देवता अनेक भिन्न विकृत स्वरूपांत आढळते. आशियातील प्रमुख धर्मग्रंथांत व कोलंबसपूर्व अमेरिकेंतील अर्ध-सुसंस्कृत धर्मांत या देवतेला एकच विशिष्ट स्थान दिलेले आहे. शिवाय ही देवता असंस्कृत अशाहि सर्व धर्मपंथांत ज्या अर्थी आढळते त्या अर्थी धर्मविषयक भावनेच्या इतिहासांत अत्यंत प्राचीन कालांतहि ही असली पाहिजे असें मानण्यास हरकत नाही. आकाशदेवतेची पूजा करण्याची पद्धति स्वभाववाद(नॅचरॅलिझम)च्या व पशुपूजे (अ‍ॅनिमिझमच्या)च्याहि पूर्वीची आहे की काय हें आज निश्चित सांगतां येत नाही.

सर्वत्र पूज्य मानल्या गेलेल्या या आकाशदेवतेची स्वरूपे, दर्जा व वैशिष्टय अनेक भिन्न प्रकारचें आढळतें. अमेरिकेंतील टोल्टेक लोक, मयलोक, इंकालोक, कॅरिब लोक व अत्यंत उत्तरेकडील एस्किमो लोक, तसेच ब्राझिलमधील व अ‍ॅण्डीज पर्वतभागांतील लोक यांच्यामधील पौराणिक ग्रंथांत ही देवता आहे. उत्तर आशियांतील शामानी पंथांत, व ऐनु लोकांत ही आकाशदेवता चिनांतील धर्मांतल्या व आद्य जपानी शिंतो धर्मांतल्यासारखी आहे. अंदमानांतील प्राचीन पुलुगु नांवाच्या देवतेशी व हिंदुस्थानांतील वरुण देवतेशी आकाशदेवतेचा संबंध आहे. दक्षिणेकडे ऑस्ट्रेलिया, पोलिनेशिया व मलॅनेशिया येथील आकाशदेवतेची विशिष्ट लक्षणें प्राचीन काळांतहि खाल्डिया, सेमॅटिक व मूळसेमेटिक राष्ट्रे यांतील आकाशदेवतेत आढळतात तींच आहेत. परंतु या देवतेचें शरीरवर्णन अफ्रिकेतींल आणि प्राचीन इजिप्तमधील धर्मात व इतर पुष्कळ रानटी लोकांच्या धर्मांत जितके स्पष्ट आढळते तितके इतर कोठेंच आढळत नाहीं. बंगल लोकांतील इबंतझु, बसोंग लोकांतील फिडी, मुकुलु बरेग लोकांतील व लग कुकु लोकांतील उलेटिट गोल्डकोस्ट प्रदेशांतील रोपी, आयव्हरांकोस्टवरील न्यान्मो, किलिमांजारोमधील इतुरी, पूर्व आप्रिकेंतील कोंगोला वगैरे ठिकाणच्या त्या त्या देवता आकाशदेवतेची स्वरूपे आहेत.

आकाशदेवतेचं राज्य सर्वत्र असल्याचें आढळतें व अद्यापहि असंस्कृत अशा भूभागांत या देवतेचे वर्चस्व आहे. आकाशदेवतेचें सार्वत्रिक अस्तित्व व तिच्या विशिष्ट गुणांतील सदृशता याचें कारण एकच आहे व ते विश्वरचनेसंबंधाच्या आद्य कल्पनांत सर्वत्र आढळणारी एकवाक्यता हें होय. आकाश म्हणजे काय याचें वर्णनहि सर्वत्र सारखेंच आढळतें. तें असें कीं, आकाश हा एक द्रवरूप पदार्थाचा मोठा साठा असून त्याला घनरूप पण दृश्य पदार्थाचें अधिष्ठान आहे व त्याच्या खाली हवा, वारे व हें भूपृष्ठ पसरलेलें आहे. समुद्राचा आकाशाशीं संबंध आहे, व मोठमोठया नद्यांचा उगम आकाशांतूनच होतो आणि ढगांतून पडणारा पाऊस हें आकाशांतीलच पाणी होय. पर्जन्यदेवता जलदेवता व इतर अनेक आकाशदेवता यांची कार्ये वरील वर्णनानुसार स्पष्ट करण्यांत येतात. वातावरणांत घडून येणारे इतर अनेक चमत्कारहि आकाशदेवतेंकडून केले जातात अशा समजुतीमुळें प्राथमिक अवस्थेंतील सर्व धर्मांत आकाशदेवतेला प्रमुख स्थान दिलेलें आढळतें.

आ का श दे व ते चा द र्जा व का में: - आकाशदेवतेच्या ठिकाण गुण व तिची कार्ये यांची यादी देणें हें काम सोपे आहे याबाबतींत सर्व ठिकाणच्या वर्णनांत साम्य आहे ही गोष्ट निरनिराळया धर्माच्या तौलनिक अभ्यासानें सिद्ध झाली आहे. आकाशामार्फत होणऱ्या अनेक कार्यांचीं कारणें शोधून काढीत असतां मनुष्यानें आकाशदेवतेवर अनेक गुणांचा अध्यारोप केलेला आहे. पर्जन्य व त्यांचे भूपृष्ठावर होणारे परिणाम हें आकाशदेवतेचें पाहिलें कार्य असल्यामुळें पर्जन्यवृष्टि, वादळ व आकाशांतील वीज व मेघांचे गडगडण वगैरे कार्यें आकाशदेवतेचीं होत असें अनुमान मनुष्यांनी काढलें. पर्जन्यवृष्टीमुळें भूपृष्ठावर अनेक प्रकारची जीवोत्पत्ति होते हें निदर्शनास आल्यावर आकाशदेवता ही प्राणदात्री आहे आणि वीज पडून मृत्यु आल्याचें पाहिल्यावर ती मरण देणारी आहे अशी कल्पना उद्भवली. पुष्कळ धर्मात आकाशदेवतेला उत्पत्तिकार्यांत प्रमुख स्थान देण्यांत आलेलें आहे. कांही धर्मांत आकाशदेवता पुल्लिंगी असल्याचें व कांही धर्मांत स्त्रीलिंगी असल्याचें, व ती एकाकीच उत्पत्तिकाय करीत असल्याचें मानलें आहे; तर इतर कांही धर्मांत आकाशाला देव व पृथ्वीला देवी मानून त्यांच्या संयोगानें जगउत्पत्ति होते असें मानलें आहे. याशिवाय पवित्र अग्नि विद्युत्, आकाशांतून पडणारे जळते. दगड, उल्कापात वगैरे गोष्टी आकाशदेवताच घडवून आणते असा समज पुष्कळ ठिंकाणीं आढळतो (वेदविद्या पा. ३११ द्यौ देवता पहा).

(सं द र्भ ग्रं थ -ब्रिटानिका, एनसायल्कोपीडिया ऑफ रिलिजन अ‍ॅन्ड एथिक्स, मीटिआरालॉजिकल ग्लॉसरी, ज्योतिर्विलास.)

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .