विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आक्टरलोनीखोरें - मद्रास, इलाख्यांतील निलगिरी जिल्ह्याच्या गुदलुर तालुक्यांतील एक रमणीय खोंरे, याचें क्षेत्रफळ ३९ चौ.मैल व समुद्रसपाटीपासून सर्वसाधारणपणें ३००० फूट उंची आहे. ह्या खोऱ्यांत काफी, चहा व सिन्कोनाची लागवड होते. १९०१ साली लोकसंख्या ५२६५ होती.