प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका  

ऑक्सफोर्ड - ऑक्सफर्ड (?). इंग्लंडमधील ऑक्सफोर्डशायर परगण्यांतील शहर, काउंटीटाऊन, म्युनिसिपल व पार्लमेंटरी बरो. हें शहर विश्वविद्याल्यासाठी प्रसिद्ध आहे. लोकसंख्या (७९०१) ५७०५२. हें थेम्स नदीवर आहे. थेम्स व चेरवेल नद्यांमध्यें प्राचीन ऑक्सफोर्डची जागा असावी.

पूर्वपश्चिम व दक्षिणोत्तर जाणाऱ्या मुख्य रस्त्यांचा मिलाफ जुन्या ऑक्सफोर्डच्या केंद्रावर झाला आहे. याला कॅरफॅक्स असें नांव असून येथून हायस्ट्रीट, क्कीनस्ट्रीट, कॉर्नमार्केटस्ट्रीट व सेंट आल्डेट्स असे चार रस्ते फुटतात. ऑक्सफोर्ड फार मजबुतीच्या ठिकाणी वसलें आहे.

इतिहास -ऑक्सफोर्ड व केंब्रिज यांमधील वैमनस्यामुळें त्यांच्या स्थापनेंविषयी पुष्कळ दंतकथा प्रचलित होत्या. कित्येक ऑक्सफोर्डचा संबंध ब्रूट दि ट्रोजन राजा मेम्प्रिक (ख्रि.पू.१००९) व ड्रईड यांच्याशी लावीत. परंतु एवढें मात्र खरें की, येथे विश्वविद्यालयाची स्थापना शहरानंतर झाली. थेम्स व चेरवेल यांच्यामधील द्वीपकल्पावर एक लहानसें रोमॅनो नामक ब्रिटिश खेडें असावें. मर्सिया व वसक्स यांच्या सरहद्दीवचर ऑक्सफोर्ड हें एक महत्त्वाचे ठाणें होते. याविषयीं ९१२ सालचा एक उल्लेख इंग्लिश बखरीत आहे. वरच्या थेम्सच्या खोऱ्यांतील हे तटबंदीचे ठिकाण असल्यामुळें याजवर डेन्स लोकांनां पुष्कळ हल्ले केले. शिवाय राजकीय दृष्टया हें महत्त्वाचे असून येथे 'विटेना मेमॉट' या सभेच्या बऱ्याच बैठकी झाल्या. नॉमन विजयाच्या वेळेस ऑक्सफोर्ड शहराचें बरेंच नुकसान झालें असावें. रॉबर्ट डि ऑइलि नांवाच्या नॉर्मन शेरिफाच्या अंमलाखाली ऑक्सफोर्डची फार भरभराट झाली. यानेंच किल्ल्याचा बुरुज व सेंट मायकेलचें प्रार्थनामंदिर बांधले. स्टीफननें ११४२ साली येथील किल्ल्यास वेढा दिला. त्यावेळी महाराज्ञी मॅटिल्वा इनें त्याच्या हातावर तुरी दिल्या व ती अ‍ॅबिंग्डनला गेली.

शिक्षणासंबंधी पहिला संघटित असा प्रयत्न ११३३ त झाला. १२१४ ते येथें एका विद्यापीठाधिकाऱ्या (चान्सेलर)ची नेमणूक झाली. विश्वविद्यालयाचा आरंभ कधी झाला याची माहिती मिळत नाहीं. परंतु ऑक्सफोर्ड हें विद्येचें केन्द्र होण्यास ब्यूमांट येथें वारंवार भरत असलेला दरबार बऱ्याच अंशीं कारणीभूत झाला. १३ व्या शतकांत येथें वेगवेगळे ख्रिस्तीधर्मपंथ आले व त्यामुळें येथील विद्यादानावर बराच परिणाम झाला. तरी पण या शतकांत ऑक्सफोर्डचे राजकीय महत्त्व कायच राहिलें. येथें पार्लमेंटच्या पुष्कळ बैठकी झाल्या. त्यांतल्या त्यांत 'मॅड' पार्लमेंटची बैठक (१२५८) महत्त्वाची आहे. त्याच बैठकींत 'ऑक्सफोर्डच्या शर्ती' (प्रोव्हिजन्स ऑफ ऑक्सफोर्ड) पसार झाल्या. १३ व्या शतकाच्या शेवटच्या दशकांत येथें कॉलेजपद्धतीची सुरुवात होऊन तिच्या अन्वयें मर्टन युनिव्हर्सिटी व बेलिअल या कॉलेजाची स्थापना झाली. युनिव्हर्सिटीचें वर्चस्व व तिला राजाकडून मिळत असलेला पाठिंबा यामुळें शहरच्या लोकांचे तिच्याशीं वैमनस्य आलें. या वैनसयाचें पर्यवसान पुढें सेंट स्कोलास्टिकाच्या भयंकर दंगलींत झालें. परंतु राजांनी विश्वविद्यालयाला वेळोवेळी सनदा व हक्क दिलें. १५७१ च्या इलिझाबेथ राणीच्या कायद्यानें ऑक्सफोर्ड व केंब्रिज विश्वविद्यालयांस मान्यता मिळाली.

 

मेरीच्या कारकीर्दीत ब्रॉडस्ट्रीनमधल्या एका जागीं प्रसिध्द रिडले, लेटिमर व कॅनमर यांनी स्वमतार्थ प्राणत्याग केला. त्यांचे स्मारक म्हणून या ठिकाणी नवीन तऱ्हेचा, परंतु सुशोभित असा क्रुस केला आहे. या धामधुमीच्या काळांत विश्वविद्यालयाचें बरेंच नुकसान झालें. परंतु इलिझाबेथ व बोलसे (वूल्से) यांनी हे नुकसान भरून काढलें. राजा व पार्लमेंट यांच्यामधील यादवींत ऑक्सफोर्ड येथे राजपक्षाचें मुख्य ठाणें असून पहिल्या चार्लसचें पार्लमेंट येथें भरत असे. पुढे राजपक्षाचा पराभव झाल्यामुळें चार्लस पळून गेला व ऑक्सफोर्डला वेढा पडून तें शहर १६४६ त पार्लमेंटपक्षाच्या स्वाधीन झाले. या लढाईच्या धामधुमींत विश्वविद्यालयां त अभ्यास व शिस्त यांची फार अनास्था झाली व क्रॉमबेल जरी चान्सेलर झाला तरी ह्याची भरपाई झाली नाही. राज्यसत्तेच्या उत्कर्षाबरोबर विद्यार्थी व शहरवासी यांच्यांत तेढ उत्पन्न झालीं. ऑक्सफोर्ड येथें शेवटची पार्लमेंट दुसऱ्या चार्लसने १६८१ त भरविली. दुसऱ्या जेम्सशीं विश्वविद्यालयाचें अधिकाऱ्यांच्या नेमणुकीच्या बाबतींत वैर आलें. हें शहर पुढें जॅकोबाईट पंथाचें म्हणून प्रसिद्धीस आलें. हॅनोव्हेरियन काळांत येथील लोक हॅनोव्हेरीन पक्षाचें झाले व विश्वविद्यालय जॅकोबिन पंथास चिकटून राहिलें. शेवटीं तिसरा जॉर्ज १७५५ त ऑक्सफोर्ड येथें गेला असतां हे दोन्ही पक्ष एकत्र होऊन त्यांच्यांतील पक्षभेद नामशेष झाला. येथूनच ऑक्सफोर्डचा राजकीय इतिहास संपतो.

ऑ क्स फो र्ड श ह रां ती ल वि द्या ल य यें, ऑल सोल्स कॉलेज (१४३७) :- या शिक्षणसंस्थेंतील शिक्षक मंडळ बहुतेक पदवीधरांचे बनलेलें आहे. या विद्यालयाला सर क्रिस्टोफर कॉडरिंग्टन यांनी आपलें ग्रंथालय अर्पण केलें.

बेलिअल कॉलेज (१२६२):- हें जुन्यांपैकी एक विद्यालय असून विद्वत्तेबद्दल याची फार ख्याति आहे.

ब्रॅसेनोज कॉलेज (१५०९):- हें बी. एन. सी. नांवानें प्रसिद्ध आहे.

ख्राइस्ट चर्च (१५३२) :- संख्येच्या बाबतीतंत हें ऑक्सफोर्डमधील सर्वात मोठें विद्यालय असून याची घटना विशेष तऱ्हेची आहे. ब्रिटिश व इतर राजघराण्यांतील बरेचसें पुरुष ह्या विद्यालयांत शिकले. शिवाय १९ व्या शतकांतील सुमारें १० प्रधानांचा विद्याभ्यास ह्या विद्यालयांत झाला. येथें 'टॉम' नांवाची मोठी घंटा आहे.

कॉर्पस ख्रिस्ती कॉलेज (१५१६):- येथील लहान ग्रंथालयांत दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितें यांचा संग्रह आहे.

एक्झीटर कॉलेज (१३१४):- ह्या विद्यालयाच्या व वॉडलियन ग्रंथालयाच्या इमारतींच्या दरम्यान एक सुंदर, गर्द असा बाग आहे.

हर्टफोर्ड कॉलेज (१८७४):- हें नवीन स्थापन झालेलें विद्यालय आहे.

जीझस कॉलेज (१५७१):- ह्या विद्यालयाचा संबंध वेल्सशीं विशेष येतो.

केबल कॉलेज (१८६९):- हें विद्यालय अगदीच नवीन असून जॉन केबलच्या स्मरणार्थ वर्गणी जमवून बांधिलें आहे.

लिंकन कॉलेज (१४२७):- हें विद्यालय वायक्लिफच्या मतावर प्रतिगामी धोरण म्हणून स्थापन झालें.

मॉडलिन कॉलेज (१४५६):- ह्या विद्यालयाची इमारत फार प्रेक्षणीय असून समोरच्या बाजूस घंटाघर आहे.

मर्टन कॉलेज (१२७०):- सध्याच्या चालू कॉलेज पद्धतीवरचें हें पहिलें विद्यालय होय. येथील प्रार्थनामंदिर व ग्रंथालय ह्या इमारती महत्त्वाच्या आहेत.

न्यू कॉलेज (१३८६):- राजा व पार्लमेंट यांमधील यादवीच्या वेळीं येथील टॉवरमध्य व मठाच्या खोलींत राजपक्षीयांचा शिलेखाना होता.

ओरिएल कॉलेज (१३२६):- ह्या विद्यालयांतील प्रसिद्ध लोकांनी 'ऑक्सफोर्ड-चळवळीत' भाग घेतला आहे.

पेम्ब्रोक कॉलेज (१६२४):- ह्या विद्यालयांत सॅम्युएल जॉन्सनच्या वेळचे कांही अवशेष आहेत.

क्वीन्स कॉलेज (१३४०):- तिसऱ्या एडवर्डची राणी फिलिपा इच्या स्मरणार्थ याला सध्याचें नांव मिळालें.

सेंटजॉन्स (१५५५), ट्रिनिटी (१५५४), वॅडहॅम (१६१३)
बोर्सेस्टर ( १७१४) हीं दुसरीं विद्यालये आहेत.

युनिव्हर्सिटी कॉलेज (१२४९) :- विश्वविद्यालयाच्या बऱ्याच अगोदर आलप्रेडनें याची ८७२ त स्थापना केली अशी दंतकथा आहे.

कोणत्याहि कॉलेजचा मेंबर असल्याशिवाय परीक्षेला बसण्याचा फायदा १८६८ पासून विद्यार्थ्यांस मिळाला. येथे स्त्रियांसाठी चार विद्यालयें असून त्यांनां पदवी मात्र मिळत नाहीं.

विश्वविद्याल्याच्या इारती ब्राडस्ट्रीट व हायस्ट्रीट यांच्या मध्यें आहेत. त्यांत वोडलीयन ग्रंथालय, क्लॅरन्डन मुद्रणालय, कान्व्होकेशन हाऊ, रॅडक्लिफ ग्रंथालय (सांप्रत बॉडलीयन ग्रंथालयाची वाचालयाची खोली) या मुख्य इमारती आहेत. याशिवाय विश्वविद्यालयाचें चित्रसंग्रहालय, अ‍ॅशमोलियन पदार्थसंग्रहालय व टेलरची आधुनिक यूरोपीय भाषांची संस्था अशा दुसऱ्या इमारती आहेत. विश्वविद्यालयाचें पदार्थसंग्रहालय, रॅडक्लिफ वेधशाला, हिंदी विद्यार्थी व हिंदी विषय यांच्यासाठी हिंदी इन्स्टिटयूट व ऑक्सफर्ड युनियन सोसायटी ह्या दुसऱ्या संस्था आहेत.

विश्वविद्यालयाचें शासन त्याने केलेल्या कायद्याप्रमाणे चालतें. प्रत्येक विद्यालयाचा कारभार स्वतंत्र असतो. विश्वविद्यालयाला पार्लमेंटसाठी दोन सभासद निवडण्याचा हक्क आहे. हिंदी व इतर परकीय विश्वविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठीं येथे कांहीं सोई केल्या आहेत.

ऑक्सफोर्ड शहरातर्फे एक प्रतिनिधि पार्लमेंटसाठी निवडतात.

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .