विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आगपेटया व आगकाडया, ज गां ती ल प्रा ची नां ची अ ग्नि सा ध नें: - मनुष्यजातीच्या रोजच्या व्यवहारास अग्नीची अत्यंत आवश्यकात आहे. यामुळें अर्थात् जरूर पडेल त्या वेळेस सुलभ रीतीनें अग्नि उत्पन्न करतां यावा ह्यासाठीं मानवजातीचे फार प्राचीन काळापासून प्रयत्न चालत आले आहेत. भौतिक शास्त्रांत आघाडी मारणाऱ्या पाश्चिमात्य देशांत एक म्हण प्रचलित आहे ती अशी की ''अग्नि हा चांगला चाकर पण वाईट धनी आहे.'' म्हणजे अग्नीस आपल्या कह्यांत ठेविलें तर त्यसपासून अनेक उपयोग करून घेतां येतील, परंतु त्यास निरर्गल रीतीनें वागूं दिल्यास तो आपल्या सर्व घरादारांचा नाश करील. आध्यात्मवृत्तीचें माहेरघर अलेल्या हिंदुस्थानांत वैदिक रीतीनें अग्निहोत्रास लागणारा अग्नि अरणीच्या साह्यानें (पिंपळाच्या पळींत एक खड्डा करून त्यांत पिंपळाचें दुसरें लांकूड उभे धरून मंथन क्रियेने) उत्पन्न करीत असत. हा अग्नि अतिशय पवित्र मानिला जात असे, व तो अग्निहोत्र्याच्या कुंडांत कायम राहील अशी व्यवस्था करीत. यामुळें घरांत अग्नीचे वास्तव्य कायम असे व गृहकृत्यांनां तो उपयोगी पडत असे घरांत बाळगलेला अग्नि निखाऱ्याच्या रूपांत असल्यामुळें त्याला ज्वाला नसते. ती उत्पन्न करण्यास पूर्वी सणकाडयांचा उपयोग करीत असत. अंबाडीच्या काडयांच्या आंतील गाभ्यास अग्नीवर पातळ केलेला गंधकांत बुडवून त्या काडया ठेवण्याची हिंदुस्थानांत व इतर देशांत पूर्वीं चाल असे. या रीतीनें चूल पेटविण्यास व दिवाबत्ती करण्यास या गंधकाच्या काडयांची योजना करीत असत. त्याखेरीज सर्व देशांत पूर्वी प्रचलित असणारें अग्निसाधन म्हणजे चकमक होय. गारगोटी, पोलादाची बारीकशी पट्टी व चकमकीच्या विस्तवाची ठिणगी धरणारा हलका कापूस किंवा शेवरीसारख्या झाडाचा कापूस, इतकें साहित्य चकमकीनें अग्नि तयार करण्याकरितां लागत असे.
आ ग का डया ब न वि ण्या चा प हि ला प्र य त्न व त्यां त सु धा र णाः - युरोप खंडातसुद्धां १७ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत आगकाडयांची कल्पना कोणांस सुचली नव्हती. व तोपर्यंत तिकडेहि चकमकीचाच उपयोग होत असे. आगकाडी तयार करण्याचा पहिला यत्न गाडप्रे हाकविझ यानें १६८० त केला. परंतु त्यांत दोष राहिल्यामुळें त्या प्रयत्नास मोठें महत्त्व देतां येत नाही. त्यानंतर १८०५ मध्यें प्रोफेसर चॅन्सेल यानें रासायनिक द्रव्यांपासून अग्नि उत्पन्न करण्याची युक्ति काढली. एका बाटलींत असबेस्टास आणि तेजाब ऊर्फ गंध काम्ल यांचें मिश्रण ठेवावयाचें व दुसरीकडे साखर व पालाशहिरत (क्लोरेट आफ पोटॅश) लावलेल्या काडया तयार ठेवावयाच्या व जरुर पडतांच त्यांपैकी एक काडी त्या बाटलींत बुडवावयाची की अग्नि तयार होत असे.
ही नवीन कल्पना निघाल्यानंतर रसायनशास्त्र व कुशल लोकांचे लक्ष्य ह्या विषयाकडे साहजिक लागलें त्यांत कोणच्या सुधारणा केल्या असतां गैरसोय कमी होऊन, धोक्याची भीति न राहतां खर्चहि कमी पडेल यासंबंधीं त्यांनीं प्रयोग करण्यास सुरुवात केली व या धंद्यांत चढाओढ सुरू होऊन केवळ २० वर्षांच्या आंतच रसायनाच्या बाटल्यांच्या जागीं काडयांच्या पेटया निघाल्या व त्या एकदम भडकून होणारे अनर्थहि कालांतरानें बंद झाले. त्या काडयांनां सारखा आकार व सुबकपणा यांची जोड मिळाली १८२७ सालीं. जॉन वाकर नांवाच्या रसायनशास्त्रज्ञानें घर्षणानें अग्नि उत्पन्न करणारी आगकाडी बनविली. त्या वेळेस एका पेटीला एक शिलिंग किंमत पडत असे व प्रत्येक पेटीबरोबर कांचकागदाचा तुकडा घर्षणकरितां गुंडाळलेला असे. १८३३ मध्यें फास्फरसच्या काडया तयार झाल्या. परंतु लौकरच साधा, पांढरा किंवा पिवळा गंधक मिश्रणांत घातल्यापासून पुष्कळ तऱ्हेचे अपाय होण्याची भीति आहे असें आढळून आलें. या काडयांच्या धुरामुळें कित्येक ठिकाणीं अपघात होऊन माणसें मृत्युमुखीं पडली व कित्येकांस कांहीं विवक्षित रोग जडले. पिंवळयापेक्षां पांढरा गंधक जास्त अपायकारक आहे, यामुळेंच हिंदुस्थान सरकारनें कायदा करून त्या गंधकाच्या आगपेटया परदेशांतून कोणी आणूं नयेत व येथेंहि तयार करूं नये असें ठरविलें. तांबडा फास्फरस घालून सुरक्षित काडया (सेफ्टीमॅचेस) तयार होऊं लागल्यापासून ही भीति दूर झाली आहे व आपोआप आगपेटीनें पेट घेणें वगैरे अपघातापासून अलीकडें बराच बचाव झाला आहे.
क्रि या :- आगपेटयांच्या नवीन धर्तीनें चालणाऱ्या कारखान्यांत मुख्यतः आठ क्रिया असतात.
पहिला भाग लांकूड सोलण्याचें कामः- ह्या खात्यांत कच्चें ओले लांकूड रुंद सुरीनें सारखें सोलून याचें काडीला योग्य असे जाड व पेटयांनां योग्य असे रेखांकित पातळ पत्रे सोलून काढतात.
दुसरा भाग:- जाड पत्र्यांच्या काडया पाडणें व पातळ पत्र्यांचे आगपेटयांना योग्य असे तुकडें पाडणें.
तिसरा भागः- काडयांच्या चौकटी भरणें.
चौथा भाग:- काडयांस गूल लावणें.
पांचवा भाग:- आगपेटयांचीं आंतील व बाहेरील टोपणें (पेटया) तयार करणें व या पेटयांनां रंगीत कागद अथवा लेबलें लावणें.
सहावा भाग :- चौकटींतल्या गूल लावलेल्या काडया सोडवून घेणें (अलग करणें)
सातवा भाग:- काडया पेटयांतून भरणें
आठवा भाग:- यां तयार झलेल्या आगपेटयांनां बाजूनें घर्षणाचें साधन लावणें (सँडिंग)
यानंतर आगपेटयांचे पुडे बांधणें व बाहेर गांवी जाण्याकरतां मोठमोठया देवदारी लांकडाच्या खोक्यांत भरणें (पॅकिंग) ह्या क्रिया होतात.
आ ग का ड्यां क रि ता लां कू ड: - उपर्युक्त पहिल्या खात्यांतील (सोलण्याच्या) कामासंबंधानें विचार करतां आगपेटी व आगकाडी यांच्याकरितां योग्य लांकडांची निवड व मुबलक पुरवठा या दोन गोष्टी मोठया अडचणीच्या आहेत. पेटीकरितां सोईचें लांकूड न मिळाल्यामुळेंच हिंदुस्थानातील पूर्वीचे यत्न सफल झाले नाहीत. पेटीच्या लाकडांपेक्षां काडीचे लांकूडच स्वस्त, मुबलक व योग्य असलें पाहिजे. पापलर; अस्पाईन, पाईन अशा जातींच्या लांकडांचा उपयोग इतर देशांत करितात. आपल्या देशांत ही झाडें हिमालयाशिवाय फारशी कोठें होत नाहीत. तेथून तीं आणण्यास खर्च फार लागेल म्हणून त्या लाकडाचा उपयोग होऊं शकत नाहीं. याकरितां जेथें ही लाकडे पैदा होतात अशा जंगलातच काडया व पेटया बनविण्याचे कारखाने निघतील व त्याच्या जवळच रेल्वे स्टेशनालागून काडयांना रासायनिक मिश्रण लावून व पेटया तयार करून बाहेर पाठविण्याची तजवीज होईल, तसेंच त्यांवरील रेल्वेभाडेंही माफक पडेल तरच हा धंदा हिंदुस्थानांत यशस्वी होईल.
मध्यभाग व दक्षिण भाग यांच्या जवळपासच्या जंगलांतून कांटेसांवरीची लागवड मोठया प्रमाणावर केल्यास कांहीं वर्षांनीं त्या झाडांचा आगपेटयांचे कारखाने काढण्यास उपयोग होईल. हिंदुस्थानातील जंगलखात्याच्या मताप्रमाणें खालील लाकडे या धंद्यास उपयोगीं पडतीलः''
धूप, सलाई, काटेसांवरी, चिरंजी, करभागोंद , वामवर्णी, वायाचें झाड, फुगळी, कडकफळ, तसेच बकावलि, सोनचांफा, आंबा, अंबाडी वगैरे एकंदर ५१ झाडें आगपेटयाकरितां कामास येण्यासारखी हिंदुस्थानात आहेत असें ट्रुपसाहेब यांच्या रिपोर्टावरून समजतें. ह्यास्तव भांडवलवाले ह्या धंद्यातले तज्ज्ञ लोक यांनीं योग्य दिशेनें यत्न केल्यास ह्या धंद्यास कायमचे स्वरूप देण्याचें श्रेय त्यांस मिळेल. या कामीं आजपर्यंत झालेले प्रयत्न कां सिद्धीस गेले नाहीत याचाहि पूर्णपणें शोध करून त्यांत अपयश येण्यास जी कारणें झालीं असतील तीं टाळणें अत्यंत जरूर आहे. त्रावणकोर संस्थानांत सुमारें १५० प्रकारचीं झाडें आहेत त्यांपासून आगपेटया तयार करतां येतील.
आ ग का ड्यां ना ला ग णा री रा सा य नि क द्र व्यें :- अॅटिमनीसल्फाईड, आयर्न ऑक्साईड, पोटॅशियम क्लोरेट, पोटॅशियम डिचरोमेट, लेड डायऑक्साइड, रेडलेड, रेड फॉस्फरस, गंधक, रेसिन, ग्लू, कांचेची भुकटी इत्यादी आहेत. काडी उत्तम असल्याची परीक्षा पुढीलप्रमाणें करावी. चांगली आगकाडी सावकाश जळते, तिचें गूल पटकन पडत नाहीं. 'सेफ्टी मॅच' पूर्ण जळली पाहिजे व तिच्यांतून राख निघतां कामा नये.
आ ग पे टयां चा व्या पा रः - सन १९१३-१४ पासून १९१८-१९ पर्यंत आयात झालेल्या मालाच्या किंमतीः-
१९१३।१४ ८९ लाख रुपये.
१९१४।१५ १९९ ,,
१९१५।१६ १३८ ,,
१९१६।१७ १२२ ,,
१९१७।१८ २३४ ,,
१९१८।१९ १६५ ,,
जपान, स्वीडन व नार्वें, झेकोस्लोव्हाकिया या देशांतून आगपेटया आपल्या देशांत येतात. त्यांपैकी सुरक्षित काडयाच्यां किंमतीचें प्रमाणे सुमारें शेंकडा ६० रुपये पडतें व बाकी साध्या आगपेटया असतात. आगपेटया तयार करून आपल्या देशांत पाठविण्यांत सध्यां जपानचा नंबर पहिला लागतो. प्रोफेसर गोडबोले यांनीं असें दाखविलें आहे की, हिंदुस्थानांत दर माणशीं एका सालांत सुमारें ४२९ आगकाडया खपतात, म्हणजे माणशी दररोज १२ आगकाडी लागते; पण यूरोपमध्यें दरमाणशी ६ पासून १९ आंगकाडया रोज लागतात.
हिं दू स्था नां ती ल का र खा नेः - गेल्या २०-२५ वर्षांत सुमारे १६ आगकाडयांचे कारखाने निघाले. गुजराथ इस्लाम फॅक्टरी नांवाचा एक कारखाना अहमदाबादेस चालू स्थितींत आहे. त्यांत आगपेटया (सेफ्टी मॅचेस)व चंद्रजोतीच्या काडया तयार होतात. बंगालमधील सुंदरवन मॅच फॅक्टरीहि चांगल्या स्थितींत आहे. कऱ्हाड येथें एक आगकाडयांचा कारखाना चालू असून त्यांतून बऱ्या प्रकारचा माल बाहेर पडतो. मध्यप्रांतात एलिचपूर येथें एका कारखाना निघाला होता; पण तो बंद पडला. तथापि कोटा (विलासपूर) येथें एक कारखाना चालू असून त्यांतूनहि कांही माल बाहेर पडतो. इंदूर संस्थानांत खरगोण येथेंहि एक कारखाना आहे.
ह्या कारखान्याच्या मालकांनां आजपर्यंत वर्षानुवर्ष तोटाच होऊन राहिला आहे. तरी मोठया नेटानें त्यांनीं तो चालविला आहे.
आ ज प र्यं त आ ग पे ट्या चे का र खा ने बु ड ण्या ची का र णेः- ही थोडक्यात खाली दिली आहेत :-
(१) योग्य लांकडाचा अभाव किंवा कमी पुरवठा.
(२) आगपेटयांचीं यंत्रें कित्येक ठिकाणी महाग पडली किंवा कित्येक ठिकाणीं जपानी स्वस्त यंत्रे आणूनहि चालवितां आलीं नाहींत.
(३) मजूर स्वस्त पण आळशी व अडाणीं.
(४) कित्येक ठिकाणीं अपुरें भांडवल.
(५) हुशार रसायनशास्त्रज्ञांचा अभाव.
(६) रेल्वेचे दर कारखान्यास प्रतिबंधक असणें.
(७) जंगलापासून कारखाने दूर असणें.
(८) या धंद्यास लागणारी रासायनिक द्रव्यें व यंत्रें आपल्याच देशांत मिळत नसल्यामुळें त्यांनां उत्तेजन नाहीं.
म हा रा ष्ट्रां ती ल का र खा ने व त्यां ची स्थि ति :- आपल्या महाराष्ट्रांत काडयांच्या पेटया करणारे तीन कारखाने दिसतात. कऱ्हाड मॅच फॅक्टरी मध्यंतरीं डबघाईस आली होती ती आतां चांगली सांवरलेली दिसते. हा काडयांच्या पेटयांचा कारखाना कऱ्हाड गांवी एका मोठया जुन्या चाळीच्या वाडयांत आज आहे. महायुद्ध सुरू असतांना पेटी व काडी करण्यास लागणारें लांकूड मिळत नसल्यामुळें हा कारखाना चालू नव्हता. आतां त्यास जंगलांतील लांकूड मिळूं लागलें आहे; व कामहि चांगलें होऊ लागलें आहे. पेटी आणि काडी शेवरीच्या ओल्या लांकडापासून करितात, आणि जागच्या जागीं हें लांकूड चार आणे गाडीप्रमाणें विकत मिळतें. तोडणावळ व वाहतुक खर्चामुळे लांकडाची किंमत ६-७ रुपयांपर्यंत वाढते. प्रथम मोठमोठया झाडांचे फूट सवाफूट लांबीचे ओंडके मोठया गोल करवतीनें कापून त्यांची साल काढून टाकितात. ओंडा कितीही जाड असला तरी चालतो व करवतयंत्र तैल-यंत्राच्या शक्तीनें चालत असल्यामुळें कापण्याची अडचण पडत नाही. काडयाची पेटी तयार होण्यापर्यंतचीं सर्व कामें म्हणजे ओल्या ओंडयापासून कार्डबोर्डसारखे कमीजास्ती जाडीचे तक्ते काढणें, त्यांस घडया घालण्यासाठीं वण पाडणें, त्यांची लांबी-रुंद कापून लागणऱ्या मापाचे तुकडे बनविणें, पेटीचे आंतले व बाहेरचे भाग बनविणें, चिकटवून डबी करणें, लेबलें लावणें, तसेंच काडया कापणें व त्या एकाच जाडीच्या करणें, लेबलें जुळविणें, गूल लावणें, वाळविणें इत्यादि प्रत्येक गोष्ट या कारखान्यांत केवळ यंत्रांच्या साधनानें केली जाते आणि अशा तऱ्हेनें दररोज सध्यां ५० ग्रोस आगपेटया तयार होत आहेत. ह्या सर्व कामास एकंदर २०-२५ यंत्रें लागतात.
औंध संस्थानांतहि काडयाच्या पेटया स्वस्त सफाईदार कशाकरितां येतील याविषयीं प्रयोग चालू आहेत. परेदशी पेटीवर २० टक्के कर बसल्याकारणानें हा धंदा ऊर्जितावस्थेस येण्याला हरकत दिसत नाही. इंदूर संस्थानांत थेडया भांडवलांत व देशी साधनांनी पेटया तयार करण्याचा कारखाना निघाला आहे. (केसरी १६।१।२३).
वे ळू च्या लां क डा चा आ ग का ड्या क र ण्या क डे उ प यो गः - वेळूच्या काडयापासून आगकाडया व वेळूच्याच आगपेटया होऊ शकतात, अशाबद्दल पेटंट ऑफिसची नोटीस सप्टेंबर १९२२ च्या ग.इं. गॅझेटांत प्रसिद्ध झाली आहे. वेळूच्या तयार केल्या गेलेल्या आगकाडया व पेटया १९२२ च्या आक्टोबर महिन्यांत इंदोर शहरी उद्योगप्रदर्शन झालें त्या वेळीं प्रदर्शनांत ठेविल्या होत्या, आणि काडया व पेटया करण्याची कृतीसुद्धां दाखविली होती. या आगपेटया करण्याचा कारखाना इंदोर राज्यांत खरगोण मुक्कामी सुरू झाला आहे.
वेळूच्या आगपेटया रोज ५ ग्रोस तयार करण्यास गांवचे सुतार व लोहार यांजक रवीं फक्त अडीचशें रुपयांची उपकरणें तयार करावी लागतात, व जवळजवळ १०० रुपये वेळू व इतर रसायन खरेदी करण्यास व मजुरी देण्यास लागतात. एक ग्रोस सवादोन रुपयास विकल्यास प्रत्येक ग्रोसामागें सहा आण्यापासून दहा आण्यापावेतों फायदा मिळूं शकतो. यांतील सर्व काम घरोघरीं बायका व पुरुष मिळून करूं शकतात. सामान सर्व तयार असल्यास आठ दिवसांच्या शिक्षणाने साधारण पुरुषास किंवा स्त्रीस एकंदर कृतीची माहिती दिली जाऊं शकते असें मांडण्यांत आले आहे. वेळूची लागवड कमी खर्चांत होऊ शकते. ५-६ वर्षांत वेळू उपयोगी पडेल अशीं बेटें १०-१५ एकर जमिनींत तयार होऊं शकतात व वेळूची पुढील वाढ सतत चालू राहते. यंत्रे खरेदी करण्यास जें हजारों रुपयांचे भांडवल लागतें, त्याच्या दरमहाच्या व्याजापेक्षा कमी भांडवलातच आपल्या राहत्या शहराच्या व त्याच्या आजूबाजूच्या व गांवगन्नाच्या पुरवठयापुरत्या आगपेटया प्रत्येक शहरांत होऊन त्यांच्या मजुरीचा पैसा त्याच गांवांत राहील, अशी मांडणी करण्यांत आली आहे. माल जास्त काढणे असल्यास उपकरणांपैकी फक्त एकच वस्तु जास्त प्रमाणावर गांवडी सुताराकडून कोणत्याहि लांकडाची करावी या प्रत्येकीस १ रुपया पडतो व प्रत्येक ग्रोसाला अशा तीस वस्तू लागतात.
आ ग पे ट्यां चे का र खा ने व हिं दु स्था न स र का र :- बंगालबहार सरकारांनी काडयाच्या पेटयांच्या कारखानदारांनां त्यांच्या धंद्यांतील अडचणी दूर करण्याच्या कामीं मदत करण्याकरितां म्हणून तज्ज्ञ नेमला आहे. हा तज्ज्ञ काडया व पेटया तयार करण्यास अक्षय पुरणारें लांकूड कोठे मिळेल व काडयाच्या टोंकांशी असलेला गूल सादळूं नये म्हणून काय उपाय करावा यासंबंधात चौकशी करून आपला अभिप्राय रिपार्टद्वारें प्रसिद्ध करील असें सरकारीरीतीनें जाहीर झाले आहे. बंगालची या दृष्टीनें पहाणी होऊन रिपोर्ट प्रसिद्ध व्हावयाचा राहिला आहे. बहार प्रांताकडे काम नुकतें सुरू झालें. याप्रमाणेंच जर प्रत्येक प्रांतिक सरकार करील तर हिंदुस्थानांत दरवर्षी विशेषतः जपानांतून अजमासें दोन कोटी रुपयांची काडी जी येते तिला बराच आळा बसून, हा एक महत्त्वाचा धंदा हिंदुस्थानांत चांगला चालेल. खाजगी प्रयत्नानें फार अल्प प्रगति होणार हें निःसंशय आहे तेव्हां या कामीं सरकारनें मदत करणें अत्यवश व कर्तव्यप्राप्त आहे, अशी मतें व्यक्त करण्यांत आली आहेत.
हिं दी का र खा न्यां त झा ले ली आ ग पे ट्या ब न वि ण्या ची यं त्रे :- या बाबतींत आजपर्यंत झालेल्या संशोधनावरून असें म्हणतां येईल की, आगकाडयांना लागणारा कच्चा माल हिंदुस्थानांत इतका मुबलक आहे की, अगदी सुधारलेल्या यंत्रसामुग्रीच्या मदतीनें आगकाडया करण्याचे कारखाने निघाल्यास हिंदुस्थानाला पुरेसा, इतकेच नव्हे तर बाहेर देशी पाठविण्याइतका, माल येथे होऊं शकेल. मात्र आगकाडयांचे कारखाने खेडयापाडयांतूनहि थोडक्या भांडवलानें काढतां येतील अशी यंत्रयोजना होणें जरूर आहे. हा हेतु मनांत धरून बंगाल्यांतील डॉ.महेंद्र चंद्र नंदी राहणार कलेकच्छ (टिपरा) यांनी लहानसें तीन मण वजनाचें यंत्र तयार केलें. या यंत्राचा विशेष हा आहे कीं, सरळ शिरा असलेले कोणत्याहि जातीचें लांकूड या यंत्रांत उपयोगी पडतें; परदेशी यंत्राप्रमाणें विशिष्ट जातीचेच लांकूड पाहिजे असे नाहीं. डॉ.नंदी यांच्या यंत्रामुळें हा धंदा इतका सोपा व यश्स्वी बनला आहे की, बंगला ,बहार व ओरीसा मिळून १५० हून अधिक कारखाने चालू झाले आहेत असे ''इंडस्ट्री'' मासिकांत (पु.१३,अं.१४८) एका लेखकानें म्हटलें आहे. डॉ.नंदी यांच्या खेरीज इतर शास्त्रज्ञांनींहि कांहीं फेरफार करून असल्या प्रकारचीं यंत्रें अलीकडे तयार केलीं आहेत. या यंत्रांमुळें आतां ७५० रुपये भांडवलांत हा कारखाना निघू शकतो. त्यामुळें प्रत्येक जिल्ह्यांत स्थानिक भांडवल, स्थानिक मजूर व स्थानिक लांकूड घेऊन स्थानिक भांडवल खपापुरता माल सहज करतां येईल, अशा आशा प्रकट झाल्या आहेत. सदरहूं यंत्रे हल्लीं पुढील ठिकाणीं तयार होतात.
(१) डॉ.महेंद्र नंदी पायोनियर आयर्न वर्क्स; कोमिल्ला बंगाल. (२) घटक आयर्न वर्क्स, राय बहादुर रोड, बेहाल कलकत्ता. (३) भवानी इंजिनियरिंग अँड ट्रेडिंग कं.१२२-१ अपर सर्क्युलर रोड कलकत्ता. (४) मेसर्स बी.सी.नंदी आणि कं. ८, विद्यासागर स्ट्रीट, कलकत्ता (५) बाबू विरेंद्र चंद्रसेन, बारासेठ चंद्रनगर. (६) कलकत्ता इंडस्ट्रीज, लि.७१ कॅनिंग स्ट्रीट कलकत्ता.
का ड्या च्या पे टया व का ड्या ब न वि ण्या चें यं त्रः - हें साधें असतें. त्याला एक चाकू असून तो लांकडाच्या टोकळयांच्या पातळ चकत्या पाडतो. या चकत्यांनंतर दुसऱ्या विशिष्ट नस्तऱ्यांनीं काडयाच्या पेटयांचे कोंपरे तयार करण्यासाठीं ओरखाडे काढले जातात. हेंच यंत्र काडया व संबंध पेटया तयार करतें; फक्त त्या करतांना नस्तरे बदलावें लागतात व चाकू पाहिजे तितक्या जाडीच्या चकत्या पाडण्यासाठीं बसवावा लागतो. हे यंत्र भक्कम लोखंडाचें असून त्याचे सर्व भाग पुन्हा नवीन थोडया किंमतीत बसवितां येतील असेच साधारणतः केलेले असतात. यांतील चाकू नस्तरे धार लावण्यासाठी बाहेर काढतां येतात. सबंध यंत्राचें वजन अजमासें तीन मण असतें व त्याला पांच चौरस फुटांइतकी जागा पुरे होते. खालीं विटांचा पाया घालून किंवा तीन लोखंडी पायांवर हें बसवितात. एक यंत्र दहा तासांत संबंध सात आठ ग्रीसांचा माल तयार करितें.
आगपेटयांच्या कारखान्यांतील मुख्य काम म्हणजे लांकडावरचें; तें वरील यंत्रानें केल्यावर पुढील किरकोळ कामें म्हणजे (अ) रसायनें तयार करणें, (आ) पेटयांना लेबलें लावणें, (इ) पेटयांना घर्षणमिश्रणाच्या लपेटा करणें, (ई) पॅरॅफिन लावण्यापूर्वी काडया वाळविणें, (उ) काडया, पॅरॅफिन व ज्वालाग्राही मिश्रणांत बुडविणें, (ऊ) काडया व पेटया वाळविणें, (ए) पेटया भरणें आणि (ऐ) बांधणें. ही कामें लहानशा कारखान्यांत हातांनी करण्यांत येतात. हातांनी चालविण्याचे वरील प्रकारचें यंत्र ५०० रुपयांपर्यंत मिळतें व इतर साधनांना तितकाच खर्च लागतो.
हातयंत्राऐवजी वाफेचें यंत्र घेतल्यास तें ७००-८०० रुपयांस मिळतें, व त्यानें रोजी २० ते ३० ग्रोस माल तयार होतो. याप्रमाणें कारखान्यांची वाढ येथें होणें बरेंच सोपें झालें आहे. असें आहे तरी एक अडचणं अशी राहिली होती की, येथील काडया हवेंतील ओल्याव्यामुळें सर्द होऊन पेटण्यास कठिण जातात. पण फ्रान्समधील एका सरकारी तज्ज्ञानें कधीहि सर्द न होतील अशा आगकाडया करण्याची कृति काढली. ती कृति एका सरकारी रिपोर्टांतून प्रसिद्ध झाली आहे (इंडस्ट्री मासिक पु.१३ अं. १५२ पा.३४० पहा).
इतकें आहे तरी हा एक घरधंदा (होम इंडस्ट्री) होण्याइतका सुलभ व कमी खर्चाचा नाहीं; यंत्राचे कारखानदार आपला माल खपविण्याकरितां चुकीची कल्पना करून देत असतात हें नेहमीं ध्यानांत घेतलें पाहिजे (मॉर्डन रिव्ह्यू पु.३३ अं.६ पहा).
हिंदुस्थानांत या धंद्यांत तज्ज्ञ म्हणून जे पुढें आले आहेत त्यांचे नांवे :-
१. श्रीयुत.ए.पी.घोष एम.एस.सी.आय (लंडन) कलकत्ता; हे इंग्लंड, जपान, जर्मनी, फ्रान्स, व स्वीडन या देशांतून शिकून आले असून, बंगाल व बहार सरकारनें आपल्या प्रांतांत या धंद्यांसंबंधांत पाहणी करण्याचें काम यांना सांगितलें आहे. २. श्री.ए.टी.मलिक, दार्जिलिंग; ३. रा.एम्.जी.काळे, वर्धा; ४. श्री.एच.नंदी, कलकत्ता; ५ श्री.पी.सी.चक्रवर्ती, कोमिल्ला (बंगाल); ६. श्री.पी.सी.राय (वंदे मातरम् मॅच फॅक्टरीचे माजी व्यवस्थापक), कलकत्ता; ७. रामराव व्ही. अलगवाडी, मॅनेजिंग डिरेक्टर; कर्नाटक मॅच फॅक्टरी धारवाड (यांनीं स्वतः एक यंत्र व नवीन कृति शोधून काढिली आहे.)