प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

आंगरे - मराठीशाहींत नौकानयनांत जे मराठे सरदार नामांकित झाले त्यामध्यें कुलाब्याच्या आगऱ्यांचें नांव प्रमुख आहे. ज्या समुद्रकांठच्या प्रदेशांत आंगऱ्यांनीं आपलें नांव गाजविलें त्यास पूर्वीं अष्टागर म्हणजे आठ गांवांचा समुदाय असें म्हणत. हल्लीं या गावांचा समावेश अलीबाग तालुक्यांत होतो. या गांवांत पूर्वीं चौल हा गांव फार प्रसिद्ध होता. पुढें शिवाजीला या प्रांताची उपयुक्तता विशेष वाटून त्यानें तेथें किल्ले बांधून आपलीं ठाणीं बसविलीं. त्यानें अलीबाग येथें सन १६८० मध्यें एक मजबूत किल्ला बांधिला, तोच कुलाब होय. परंतु शिवाजी अल्पायुषी झाल्यामुळें त्याच्याहातून ह्या प्रांताचा बंदोबस्त त्याच्या मनाजोगता झाला नाहीं.

मू ळ पु रु ष. - आंगऱ्यांचा पहिला प्रसिद्ध पुरुष तुकोजी संकपाळ हा असून त्याने शहाजी भोसले याला मोंगलाविरुद्ध कोंकणांत युद्ध करण्यास मदत केली होती. तो आपला मुलगा कान्होजी यासह आरंभीं शिवाजीच्या आरमारांत नोकर होता. हे दोघेहि आपल्या कामांत प्रवीण व नेकीनें वर्तत असून शिवाजीच्या वेळेसच ते विशेष प्रसिद्धीस आले. संभाजीच्या कारकीर्दींत कुलाब्यावर भीवजी गुजर नांवाचा सरदार असून कान्होजी आंगरे संकपाळ हा दर्यावर्दीं व फिरती आरमारें यांजवर मुख्य नेमलेला होता. कान्होजी संकपाळ हा हर्णेंजवळ आंगरवाडी म्हणून गांव आहे तेथील राहणारा असल्यामुळें त्यास व त्याच्या वंशजांस आंगरे हे उपनांव प्राप्त झालें.

का न्हो जीः - आगऱ्यांचा पहिला प्रसिद्ध पुरुष तुकोजी हा इ. सन १६९० च्या सुमारास मरण पावला. व त्याचा मुलगा कान्होजी त्याचें काम पाहूं लागला. कान्होजी हा आंगरे घराण्याचा संपादक होता. सन १६९७-९८ च्या सुमारास तो मराठयांच्या आरमाराचा अधिपति झाला. कुलाबा, सुवर्णदुर्ग, व विजयदुर्ग या ठिकाणीं त्याचीं बळकट ठाणीं होतीं. १६९९ साली त्यानें पोर्तुगीज व शिद्दी यांच्या संयुक्त आरमाराशीं लढून सागरगड किल्ला घेतला व कुलाबा, खांदेरी, सागरगड या ठाण्यांचा काहीं  आणि राजकोट व चौल येथील सर्व वसूल आपणास मिळावा असा तह करून घेतला. शाहू व ताराबाई यांचे भांडण सुरू झालें तेव्हां कान्हाजीनें ताराबाईचा पक्ष स्वीकारून तिजकडून मुंबई ते सावंतवाडीपर्यंतचा समुद्रकिनारा, राजमाचीचा किल्ला व कल्याण भिवंडी परगणा इतक्यांचें अधिकारपत्र मिळविलें. पुढें १७१३ सालीं बाळाजी विश्वनाथामार्फत त्याचा शाहूशीं तह होऊन त्यास खादेरीपासून देवगडपर्यंतच्या मुलुखाचें आणि दहा कोंकणी किल्याचें अधिकारपत्र, आरमाराच्या मुख्य सेनापतीची जागा आणि सरखेल ही पदवी शाहूकडून मिळाली. कान्होजीनें मुसुलमान, इंग्रज व फिरंगी या त्रिवर्गांशीं लढून मराठ्याचे जंजिरे व प्रांत यांचें रक्षण केलें. कान्होजी हा इ.स. १७२९ सालीं मरण पावला. त्याला विवाहित स्त्रीपासून दोन व उपस्त्रीपासून चार असे एकंदर सहा पुत्र होते ( कान्होजी पहा).

से खो जी - कान्होजीच्या मृत्यूनंतर त्याचा वडील औरस पुत्र सेखोजी हा सरखेलीचा कारभार पाहूं लागला. त्याचा स्वभाव मनमिळाऊ असून त्याचें वैमनस्य, भांडण तंटा वगैरे कोणाशीं कांहीं नव्हतें. परंतु तो फार दिवस जगला नाहीं. इ.स. १७३३ त तो मरण पावला. (सेखोजी पहा).

सं भा जीः - सेखोजीनंतर कान्होजीचा धाकटा आरस पुत्र संभाजी व दासीपुत्र मानाजी यांच्या दरम्यान दौलतीकरितां झगडे सुरू झाले. आंगऱ्यांच्या घराण्यांत दुफळी पाडून त्यांची सत्ता कमी करण्याच्या हेतूनें बाजीरावानें मानाजीस वजारतमाव असा किताब देऊन कुलाब्यास स्थापिलें व संभाजीस सरखेलींचें पद देऊन सुवर्णदुर्ग व त्याच्या दक्षिणेकडील मुलुख वाटून दिला. बाजीरावाचें हें कृत्य संभाजीस आवडलें नाहीं. त्यानें शाहूकडून ही व्यवस्था फिरवून घेण्याची खटपट केली, पत तींत त्यास यश आलें नाहीं. यामुळें संभाजी व मानाजी यांमध्यें कायमचें वांकडें आलें (संभाजी पहा).

तु ळा जी. - मानाजीचा सख्खा भाऊ तुळाजी हा संभाजीजवळ राहून कारभार पहात असे. इस. १७४१त संभाजी मरण पावला तेव्हां तुळजींनें सभांजीची जागा घेऊन त्याचें भांडण पुढें चालविलें. तुळाजी हा पेशव्यांचा कट्टा द्वेष्टा असल्यामुळें पेशव्यांनीं इंग्रजांची मदत घेऊन तुळाजीचे सुर्णदुर्ग, विजयदुर्ग वगैरे किल्ले काबीज केले व तुळाजीस व त्याच्या बायकापोरांस कैद करून (स.१७५६) डोंगरी किल्ल्यांत अटकेंत ठेविलें तुळाजी पहा).

मा ना जी. - मानाजीकडे कुलाब्याचा अधिकार १७३५ सालीं पेशव्यांनीं सोंपविला. तेव्हांपासून तो पेशव्याशीं मिळून आपल्या बंधूंशीं झगडत होता. तुळाजीशीं झालेल्या अखेरच्या युद्धांत देखील तो घाटांवर येऊन पेशव्यास मदत करीत होता. परंतु पेशव्यांनीं तुळाजीचा पाडाव करून त्यास कैदेंत टाकल्यावर त्याच्याकडे असलेले किल्ले वगैरे त्याच्याच घराण्यांतील मानाजीस देऊन आंगऱ्यांची दौलत पुन्हां एक केली नाहीं. बाणकोट व दासगांव हीं इंग्रजांस देऊन विजयदुर्ग किल्ला पेशव्यांनी स्वतः घेतला व तेथें आपला आरमारी सुभा स्थापन करून आनंदराव धुळप यास सुभेदार नेमिलें. मानाजी हा यानंतर पुढें लकरच म्हणजे १७५८ सालीं वारला (मानाजी पहा).

र घू जी. - मानाजीच्या मृत्यूंनंतर त्याचा दासीपुत्र रघूजी याला पेशव्यांच्या मदतीने प्रथमच शिद्यांशीं लढावें लागलें. त्यानें उंदेरी बेट शिद्यांकडून घेऊन पेशव्यांस दिलें. रघूजीनें अलीबागेस राहून आपल्या मुलूखाची नीट व्यवस्था केली व चौल इत्यादि ठिकाणीं मिठागरें वगैरे काढून आपलें उत्पन्न वाढविलें. तो पेशव्यास दरसाल दोन लक्ष रुपये खंडणी देत असे व अलीबागच्या सरंजामामोबदला पदरीं फौज ठेवून तो पेशव्यांची नोकरी करी. रघूजी हा १७९३ सालीं मरण पावला.

मा ना जी दु स रा व बाबुराव - रघूजीच्या निधनानंतर जयसिंग आंगरे हा रघूजीच्या मानाजी नांवाच्या अल्पवयी मुलांचें पालकत्व स्वीकारून कुलाब्याचा कारभार पाहूं लागला. जयसिंगानें ही गोष्ट पुणें दरबारास न विचारतां केली असल्यामुळें मानाजी व जयसिंग हे दोघेहि कारमारीमंडळाच्या रोषास पात्र झाले. पण सवाई माधवराव पुढें लवकरच मरण पावल्यामुळें बाजीरावास गादी मिळून कारभारी मंडलाची सत्ता संपुष्टांत आली असें दिसतें कीं या वेळच्या कारस्थानांत मानाजीचा पक्ष पेशव्यांनीं घेतल्यामुळें प्रतिपक्षी जयसिंग यानें शिंद्याच्या दरबारीं मदत मिळविण्याविषयी बोलणें लावलें. शिंद्याकडील सरदार बाबूराव हा अलीबागेस आला; पण अखेर त्यानें उभय पक्षांच्या हक्कदारांनां कैदेंत टाकून स्वतःच अलीबाग बळकाविली. बाबूराव हा आंगरे घराण्यांतील पुरुष असून तो दौलतराव शिंद्याचा मामा होता (वैशावळी पहा).

१८१३ सालीं बाबूराव जांबगांव येथें मृत्यु पावल्यावर मानाजीस आपलें डोकें वर काढतां आलें व पेशव्यांस १० हजारांचा मुलुख व खांदेरी बेट देऊन त्यानें अलीबाग परत मिळविली. मानाजी हा १८१७ सालीं वारला. या दोन पिढयांतल्या भांडणामुळें अत्यंत नुकसान होऊन आंगऱ्यांची तीस पसतीस लक्षांची दौलत तीन लक्षांवर आली.

र घू जी दु स रा. - मानाजीच्या पश्चात त्याचा अल्पवयी मुलगा रघूजी हा गादीवर बसला. त्याचा कारभार बिवलकर याजकडे होता. पेशवाईची समाप्ति झाल्यानंतर १८२२ सालीं इंग्रज व आंगरे यांचा तह होऊन आंगऱ्यांनीं इंग्रजांची सत्ता कबूल केली. तेव्हांपासून आंगऱ्याच्या गादीचा वारसा ठरविण्याचा अधिकार इंग्रजांकडे आला. १८३८ सालीं रघुजी वारला. पुढें दोन वर्षांनीं त्याचा मुलगा दुसरा कान्होजी हाहि वारल्यामुळें आंगरे घराण्याची औरस संतति नष्ट झाली. तेव्हां रघूजींच्या बायकोनें दत्तकाची परवानगी मागितली. पंरतु इंग्रजांनीं ती नाकारून संस्थान खालसा केलें.

प र्या लो च न. - आंगऱ्यांचे घराणें दर्यावर्दीपणांत विलक्षण धाडसी होतें. लहानपणापासून समुद्राच्या लाटांवर हेलखावे खाऊन त्यांच्या अंगीं कंटकपणा व धाडस हे गुण उपजतच पैदा झाले होते. तेव्हां व्यापारी जहाजांवर हात मारून संपन्न होण्याकडे ह्या गुणांचा उपयोग आंगऱ्यांनीं केला. त्या वेळच्या व्यापाराच्या मानानें चांचेपणाचा धंदा किफायतशीर होता. गुलामांचा व्यापार, चांचेपणा इत्यादि शब्द आज आपण ऐकिले म्हणजे ते आपल्याकानास कसेसेच लागतात; व त्या गोष्टी प्रत्यक्ष करणारे लोक मनुष्य ह्या नावांस योग्य आहेत कीं नाहींत अशी शंका येते. परंतु कोणत्याहि गोष्टीचा विचार करणें तो परिस्थितीच्या मानानें करावा लागतो. प्रत्यक्ष इंग्रज व्यापाऱ्यांनीं सुद्धां चांचेपणांत अग्रगण्यता संपादिली होती. डग्लस म्हणतो, मराठेचांचे दुष्ट तर खरेच, पण इंग्रज चांचे त्यांहीपेक्षां दृष्ट होते; कारण इंग्रजांचें ज्ञान जास्त असून त्यांची भूक शमलेली नव्हती.

आंगऱ्यांचा व इंग्रजांचा समुद्रावर पुष्कळ वर्षें झगडा चालू होता. त्याची हकीकत वाचली असतां ह्या पाश्चात्य कलेंत आमचे लोक इंग्रजासारख्यांची बरोबर करूं शकले, इतकेंच नव्हें, तर शेंकडो वर्षें त्यांनी इंग्रजांची डाळ शिजूं दिली नाहीं, ह्याचें आज मोठें नवल वाटतें. सन १७२४ पासून १७५४ च्या दरम्यान इंग्रजांची दोन, फ्रेंच्याचें एक व डच लोकांचीं तीन मोठालीं लढाऊ जहाज आंगऱ्यांनीं काबीज केलीं. इंग्राजानीं नाना प्रकारचे कावे केले; केव्हां पोर्तुगीजांची मदत घ्यावी, केव्हां शिद्यांशी सख्य करावें व केव्हां तर नाइलाज होऊन आंगऱ्यांशींच तह करावा, असे अनेक प्रकार त्यांस करावे लागले. घेरिया उर्फ विजयदुर्ग किल्ल्यावर इंग्रजांचे जे गोळे जाऊन पडत, ते कापसाचे, लोंकरीचे किंवा भुशाचे केलेले आहेत असें आंतल्या लोकांस वाटे. पश्चिम किनाऱ्यावर आंगऱ्यांशीं लढण्याचें म्हणून एक आरमार कंपनीनें निराळेंच ठेविलें होतें. त्याचा खर्च सालीना पांच लाख रुपये होता.  'ससेक्स' नांवाचें इंग्रजांचें जहाज आंगऱ्यांनीं काबींज केलें, तेव्हां उभयतांत जो संग्राम मातला तो सतत ३८ वर्षे चालू होता. आंगऱ्यांचा दरारा इतका होता कीं, अरबी समुद्रांतून येणारी इंग्रजांची जहाजें किनाऱ्यावर सुखरूप आणण्याबद्दल आंगऱ्यांच्या वाटाडयास पांच हजार रुपये बक्षीस देण्याचा कंपनीचा रिवाज पुढें पुष्कळ दिवस चालू होता. आगऱ्यांच्या घराण्यांतील पुष्कळ बायकाहि पुरुषाप्रमाणेंच पराक्रमी होत्या. जयसिंगाची बायको सकवारबाई हिनें सन १७९८ च्या सुमारास खांदेरी बेट काबीज केलें, तें तिजपासून परत घेण्याची कोणाचीच छाती होईना. तिचा नवरा पुण्यास तुरुंगांत होता, 'बेट स्वाधीन करशील तर नवऱ्याची सुटका करितों' असे वचन शिंद्यानें तीस दिलें. त्याजवर भरवंसा ठेवून तिनें किल्ला खालीं करून दिला. पण शिंद्यानें वचनभंग करून तिच्या नवऱ्यास ठार मारिलें. रघूजीची बायको आनंदीबाई अशीच पराक्रमी होती. ती अनेक प्रसंगीं मोठया शौर्यानें लढली. शिंद्याच्या शेजारानें व शिद्याचा प्रकिकार करावा लागल्यामुळें, आंगऱ्यांच्या अंगांत क्रूरपणाहि बराच उत्पन्न झाला होता. निदान आंगऱ्यांच्या वाटेस जाऊन त्यांच्या अनियंत्रित जलधिसत्तेस जो कोणी अडथळा करी त्यास विलक्षण हाल भोगावे लागत. पोत्यांत घालून सागरगडाच्या टोकावरून खालीं समुद्रांत कडेलोट करणें ही नेहमींची ठरलेली शिक्षा होती. आंगऱ्यांच्या पदरीं उत्तम जातींचे अरबी व इराणी बहुमोल घोडे पुष्कळ असत. जमिनीवरही आंगऱ्याचा अंमल बराच होता. शाहू छत्रपतीच्या वेळेला आंगऱ्यांचे प्रस्थ फारच मोठें होतें. लोहगडाचा मजबूत किल्ला त्यांच्या ताब्यांत होता. तथापि आंगऱ्यांनी राजचिन्हें कधींहि धारण केलीं नाहींत. शिवाजीच्या पश्चात मराठशाहीवरील बिकट प्रसंगांत शिद्दी, मोंगल व पोर्तुगीझ ह्या तीन सत्तांशीं शौर्यांनें आणि हिकमतीनें टक्कर देऊन, मराठे लोकांचा अंमल समुद्रकिनाऱ्यावर कायम राखिल्यामुळें आंगऱ्यांचे घराणें राष्ट्रेतिहासांत प्रमुख समजलें जातें.

स. १७९० च्या सुमारास कान्होजी काम पाहूं लागला तेव्हांपासून सुमारें १५० वर्षेपाबेतों म्हणजे स. १८४० पर्यंत आंगऱ्यांची सत्त अरबी समुद्रावर चालू होती असे स्थूलमानानें म्हणण्यास हरकत नाहीं. इंग्रजांच्या मुंबईस खेटा देऊन, त्याचें राज्य सुमारें १५० मैल लांब व ३० पासून ६० मैल रुंद इतक्या जमिनीच्या टांपूवर पसरलेलें होतें. सन १८४०त वारसाच्या अभावी त्यांचें राज्य इंग्राजांकडे खालसा झालें त्यावेळीं त्याचें उत्पन्न तीन लाखाचें होतें.

(संदर्भ ग्रंथ.-ग्रांटडफ;कैफियती यादी वगैरे; मराठी रियासतः  इतिहाससंग्रहांत  (जुलै व आगस्ट १९०९) छापलेली आंगऱ्यांची बखर; मुंबई गॅझेंटियर; मराठे आणि इंग्रज)

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .