विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
ऑगस्टसबादः - ड्रेस्डेनच्या पूर्वेस २० मैलांवर एका रमनणीय खिंडींत वसलेलें. सॅक्सनीच्या राज्यांतील जर्ननीचें एक आरोग्यकारक ठिकाण. लोकसंख्या ९००. येथे क्षारयुक्त व लोहगुणात्मक पाण्याचे पांच झरे आहेत. यांचें पाणी पिण्याच्या व स्नानाच्या उपयोगांत आणतात. अर्धांगवायु, संधिवात, मज्जातंतुव्यथा व स्त्रियांचे रोग या विकरांवर हें रामबाण औषध आहे अशी समजूत आहे. येथें उन्हळ्यांत पुष्कळ लोक रहावयास येतात.