विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आग्यादेवी. - (सं. मसूरिका; मरा. देवी;गुज. काकाबलिया; हिं. माता ) मसृरिका चवदा प्रकारच्या आहेत. त्यांतील हा एक भेद आहे. ह्या मसूरिका नीलवर्ण, चपटया व विस्तीर्ण असून मध्यें खोलगट व महापीडायुक्त अशा असतात. या कांहीं कालानें परिपक्क्व होतता व फुटून पू स्त्रवतात यामुळें कंठाचा अवरोध होऊन अरोचकता येते. डोळ्यावर झांपड, बडबड व पदार्थांवर अप्रीति यांहीकरून युक्त ज्या देवी त्यास आग्यादेवी अथवा सन्निपात मसूरिका असें म्हणतात. 'देवी' शब्द पहा.