विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आग्रा जिल्हा - आग्रा नांवाच्या प्रांतांतील किंवा विभागांतील संयुक्तप्रांतांतील एक जिल्हा. उत्तरअक्षांश २६ ४५’ ते २७० २४’ व पूर्व रेखांश ७७० २६० ते ७८० ५१’ क्षेत्रफळ १८४५ चौ. मैल. लो. सं. १९२१ सालीं ६१९१३८.
दे श व र्ण न. - उत्तरेस मथुरा व इठा;पूर्वेस मेनपुरी आणि इटाव्हा;दक्षिणेस ग्वाल्हेर व धोलपूर संस्थानें आणि पश्चिमेस भरतपुर, यमुना, बाणगंगा, आणि चंबळा या नद्यां यामुळें याचे चार भाग झाले आहेत. हा एकंदर प्रदेश गंगेच्या कांठचा झालेला असल्यामुळें पार सुपीक आहे. येथें ५१३ फूट खोलीवर खडक लागतो. यमुना नदीच्या उत्तरभागांतील दुआबामध्यें मिळणारी सर्व झाडें येथें होतात. चित्ते, तरस हे डोंगराळ प्रदेशांत आढळतात. यमुना नदीच्या आसपास लांडगे व हरीण पुष्कळ आहेत. सांबर पुष्कळ ठिकाणीं आढळतो. नदीमध्यें माशांना कमतरता नाहीं. पश्चिमेकडील वाळूच्या मैदानाला हा प्रांत जवळ असल्यामुळें हवा फार कोरडी आहे. हिंवाळा व उन्हाळा फार कडक असतो; तरी पण हवा रोगकारक नाहीं. ज्यानुआरीमध्यें उष्णतामान ५९ असतें, तेंच मेमध्यें ९६ अंशावर असतें. पावसाचें सरासरी मान २६ इंच असतें. याचा स्वतंत्र असा महत्त्वाचा इतिहास नाहीं. फक्त यांतील पुष्कळ शहरांशीं मोगल बादशहाचा संबंध आला. दिल्ली राजधानी होण्यापूर्वीं आग्रा हें मोगल बादशहांचें राजधानीचें शहर होतें इ.स. १५२७ मध्यें फत्तेपूर येथें एक मोठें युद्ध झालें त्यांत बाबराचा जय झाला. सिकंदरा येथें अकबराची मशीद आहे. आग्रयाच्या शहाजहानानें बांधलेला ताजमहाल तर सर्वत्र प्रसिद्ध आहे. सामोगड येथें शहाजहानचें म्हातारपण तुरुंगांत गेलें. इ.स. १७६१ मध्ये आग्रा शहर जाट लोकांनीं घेतलें. पुढें पुष्कळप्रकारे गडबड होऊन इ.स. १८०३ मध्यें आग्रा लार्ड लेकच्या हस्तगत झालें. इ.स. १८५७ च्या बंडांत या भागांत पुष्कळ गडबड झाली होती.
लो क सं ख्या - जिल्ह्यांत ११९७ खेडीं व ९ शहरें आहेत. इ.स. सात १९२१ मध्यें लोकसंख्या ९,२४,१५५ होती. याच्या तहशिली पाडल्या आहेत. त्या येणेंप्रमाणें. कोष्टकांतील व पुढील लोकसंख्येचें आंकडे १९०१ सालचें आहेत.
तहशील | क्षे.फ. | शहरें | खेडीं | लोक सं. | साक्षरता |
इतिमादपुर | २७७ | २ | १८० | १५९८८१ | ४३३३ |
फिरोझाबाद | २०३ | १ | १८६ | ११९७७५ | ३३२४ |
बाह | ३४१ | १ | २०४ | १२३५९१ | ३८२४ |
फत्तेहाबाद | २४१ | १ | १६१ | ११४७३३ | २८९७ |
आग्रा | २०२ | १ | १४० | २९१०४४ | २१४०९ |
केरोवली | २७२ | २ | १७१ | १२३८१२ | ३६०५ |
खेरागड | ३०५ | १ | १९५ | १२७६९२ | २९११ |
हिंदूलोक शेंकडा ८६ आहेत व मुसलमान शें १२ आहेत. १२९५३ जैन, ५५२२ ख्रिस्ती, २३५४ आर्यं. शेंकडा ९९ लोक हिंदी बोलतात व शें. १ व्रज भाषा बोलतात. चांभार लोकांची वस्ती सर्वांत जास्त म्हणजे १७५००० आहे. त्याच्या खालोखाल ब्राह्मण ११७०००; रजपूत ८९०००; जाट ६९०००; बनिये ६५०००; कच्छि ५३००० ( हा शेतकरीवर्ग आहे;) कोरी ( कोष्टी ) ३२०००;गडरि ( धनगर ) अहीर ( गवळी ) ; गुझरलोध ( शेतकरी ); मल्ल ( नावाडी व कोळी ) हे प्रत्येकीं ३०००० ते २०००० पर्यंत आहेत. येथील मुसुलमान आपणांस शेख म्हणवितात. पठाण लोक ११००० भिस्ती सयद, भंगी इत्यादीचीं लोकवसती प्रत्येकी ८०० पासून ६०० पर्यंत आहे शेकडा ४८ लोक शेती करणारे आहेत.
शे त की. - जमीन सर्वत्र चांगल्या मगदूराची आहे व पाटाच्या पाण्याचा पुरवठा चांगला मुबलक आहे. नदीच्या बाजूना वालुकामिश्रित जमीन उत्तम सुपीक आहे. त्यास ''कच्छर'' हें नांव आहे. बुंदेलखंडांतील मार जातीच्या जमीनीसारखी काळीं जमीन ग्वाल्हेरच्या हद्दीवर पुष्कळ आहे. जमीनधाऱ्याची पद्धती - जमीनदारी महाल ११ पूर्ण पट्टी १८२४; व अर्धवटपट्टीदारी १६६८; याप्रमाणें आहे. बाजरी, चणे, जवार, गहूं ही मुख्य धान्यें आहेत; कापूस ११८ चौ.मै. जमीनींत पेरला जातो. शेतकीमध्यें सुधारणा होत नाहीं जमीन दिवसानुदिवस कमी लागवडीस येत आहे.
तहशील | ए. ज | लागवडीची | पाण्याची | पडीक |
इतिमादपुर | २७७ | २०५ | ७५ | २३ |
फिरोझाबाद | २०३ | १४१ | ६० | १३ |
बाह | ३४१ | १९० | १२ | २५ |
फत्तेहाबाद | २४१ | १६९ | ६० | १९ |
आग्रा | २०२ | १५१ | ६० | २३ |
केरोली | २७२ | २१० | ६७ | ३६ |
खेरागड | ३०९ | २०६ | ३४ | ५६ |
येथील मूळीचीं गुरें नावाजण्यासारखीं जातिवंत नाहींत. बहुतेक मध्यहिंदुस्थान व पंजाब येथून येतात. घोडयाची उपज चांगल्या प्रकारची व्हावी म्हणून वळू घोडे सरकारनें ठेविले आहेत. इ.स. १९०३-४ मध्यें एकंदर लागवडीखाली असलेल्या १२७२ एकर जमीनीपैकीं ३३८ जमीन पाटाच्या व विहीरीच्या पाण्यावर केली गेली होती. सर्वांत महत्त्वाची खनिज संपत्ति म्हणजे वालुकामिश्रित पाषाण ( सँडस्टोन. ) याच्या खाणी केरोली व खैरागड तहसीलमध्यें आहेत.
अ धि का री व र्ग. - कलेक्टर, त्याशिवाय दोन सिव्हिल सर्विस पैकीं माणसें, पाच डेप्युटी कलेक्टर्स आणि प्रत्येक तहशीलिला एकेक तहशीलदार. दोन मुनसब व एक स्मालकाज कोर्टाचा जज्ज असतो.
सा क्ष र लो कां चें प्र मा ण. - शेंकडा ४ आहे. इ.स. १९०२-०३ मध्यें २६६ शिक्षणसंस्था होत्या व त्यांत १३९११ विद्यार्थीं शिकत होते, त्यांत विद्यार्थींनीची संख्या १५१३ हेती शिवाय १०२ खाजगी शिक्षणसंस्थेंत काम करीत होत्या, त्यांत २०९९ विद्यार्थी शिकत होते. तीन उच्चशिक्षणाचीं आर्ट कॉलेजें असून त्यांतील दोहोंमध्य कायदा शिकविला जातो. एक वैद्यकीय शाळा आहे शिक्षणावप्रीत्यर्थ जवळजवळ २॥ लाख रुपये खर्च होतात त्यांतलि ६७००० फीचे वसूल झालेले असतात. त्या जिल्ह्यांत १६ इस्पितळें असून अशक्त रोग्याची सोय आहे, आग्रा फेरो जाबाद या दोन शहरांस म्युनसिपालिटी आहे व त्या शिवाय ६ शहरांची इ.स. १८५६ च्या २० व्या कायद्याप्रमाणें व्यवस्था आहे.